21
गरीब वीधवाना दान
(मार्क १२:४१-४४)
1 नंतर येसु मंदीरमं व्हताल. आनं धनवान लोकं दान पेटीमं दान टाकटाना तो दखी रहनाल. 2 तवं येक गरीब वीधवा बाई बी दोन तांबाना शीक्का दानमं टाकताना तो दखना. 3 आनं तो तेनं चेलंसला सांगना, मी तुमला खरज सांगय का, आखंस पेक्षा हाई गरीब वीधवा देवनी नजरमं जास्त टाकनी सय. 4 कजं का ते आखं लोकं तेसपन जो भरपुर व्हताल तेस मईन काही दान दीनत. पन ती गरीब रहीसनं बी तीपन तीना जीवन जगानी करता जा व्हताल, ता आखा टाकी दीनी.
मंदीरना नासनी बद्दल आनं शेवटना दीवसनी बद्दल येसु भवीस्य सांगय
(मतय २४:१-२१; मार्क १३:१-१९)
5 मंग येसुना काही चेलं मंदीरनी बद्दल सांगनत का, हाई मंदीर पक्का भारी दगडंसना बनाडेल सय. आनं लोकं जा काही देवला आर्पन करनंलत तेघाई सजाडेल सय. तेमन हाई पक्का भारी दखाय. 6 तवं येसु तेसला सांगना, हाई जो भारी मंदीर तुमं दखत नं, येक दीवस येक बी दगड दुसरा दगडवर रवावु ना. आनं तेस मईन आखंकाही पाडी टाकामं येई.✞
7 नंतर ते तेला वीचारनत, गुरुजी, या गोस्टी कवं व्हईत? आनं जवं या गोस्टी पुर्या व्हवामं येईत, तवं काय काय नीशान्या दखाईत? 8 मंग येसु सांगाना, कोनी तुमला फसाडाला नोको पायजे मनीसनं समाळीनं रहज्या. कजं का बरज लोकं मना नावमं ईसनं खोटा सांगीत का, मीज तो देवना धाडेल राजा ख्रीस्त सय, आनं तो शेवटना टाईम शेजार ई लागना सय. पन तुमं तेसना आयकु नोका. 9 आनं जवं तुमं लढाईसनी बद्दल आनं दंगासनी बद्दल आयकशात, तवं घाबरजा नोका. कजं का पयलं या आख्या गोस्टी नक्की व्हईत. पन येवडामं जगना शेवट व्हवावु ना.
10 मंग येसु आखु सांगना, तवं येक जातनं लोकं दुसरा जातवर उठीत आनं येक देश दुसरा देशवर उठी. 11 आनं जागा जागामं मोठमोठलं भुकंपं व्हईत आनं दुस्काळ पडीत. आनं नारा नारा मोठा आजारमं पडीसनं बरज लोकं मरी जाईत. तवं भयानक गोस्टी घडीत आनं आकासमं मोठमोठल्या नीशान्या दखाईत. 12 पन ये आखं व्हवानी आगुदार तुमला लोकं धरीत आनं तुमं मनं चेलं बनेल सत मनीसनं तुमला वीरोध करीत. आनं ते तुमला ✞ प्राथना घरंसमं ली जाईत आनं काही लोकंसला जेलमं कोंडीत. आनं तुमं मनं चेलं मनीसनं ते तुमला राजा आनं आधीकारीसनी समोर न्याय करानी करता हुबं करीत. 13 तवं तई तुमला मनी बद्दल सुवार्ता सांगानी करता आनं साक्षी सांगानी करता संधी भेटी. 14 तवं काय बोलाना सय येनी बद्दल आगुदारज तुमं वीचार नोको करज्या. 15 कजं का मी तुमला बोलाना सुचाडसु आनं बुधी दीसु. येना द्वारा तुमना कोनता बी वीरोध करनार तुमला आटकाडु शकावु ना आनं तुमं जा सांगत ता खोटा सय मनीसनं बोलु शकावु ना.
16 तवं मावर वीस्वास ना ठेवनारं तुमना मायबाप, भाऊबंद, नातेवाईक आनं सोपती बी तुमला वीरोध करनारंसना हातमं धरी देईत. आनं तुम मयथीन काही जनंसला जीवतं मारामं येई. 17 आनं तुमं मनं चेलं मनीसनं बरज लोकं तुमला नाकारीत. 18 पन घाबरु नोका, तुमना डोकाना येक केशना बी नास व्हवावु ना. 19 आनं तुमं धीर धरीसनं भक्कम रहशात तं तुमला कायमना जीवन भेटी.
20 जवं तुमं दखशात का, सीपाई लोकं यरुशलेम शेहेरला घेरी लीनत, तवं समजा का, तो शेहेरना नास व्हवाना टाईम शेजार ई लागना सय. 21 तवं जे लोकं यहुदीया भागमं सत, ते लवकर डोंगरवर पळी जावाला पायजे. आनं जे यरुशलेम शेहेरमं सत, ते बाहेर नींगी जावाला पायजे. आनं जे शेहेरनी बाहेर सत, ते काही बी लेवानी करता शेहेरमं येवाला नोको पायजे. 22 कजं का देवना वचनमं लीखेल प्रमानं तो दीवसमं यरुशलेमनं लोकंसला दंड भेटाना दीवस सय. 23 ते दीवसमं ज्या बाया दोनदीवस्या सत आनं ज्या दुध पाजनार्या बाया सत तेसना साठी हाई पक्का भयानक व्हई. कजं का ते पळु शकावुत ना. कजं का धरतीवर मोठा संकट येयी आनं ये लोकंसवर देवना कोप येई. 24 आनं काही लोकंसला तलवारघाई मारी टाकामं येई. आनं आजुन काही लोकंसला बांधीसनं बरज देशंसमं ली जावामं येई. आनं टाईम पुरा व्हई ताव, बीगर यहुदी लोकं यरुशलेमला पायखाल चेंदीत.
येसुना दुसरा दाउ जगमं येवाना
(मतय २४:२९-३१; मार्क १३:२४-२७)
25 मंग येसु आखु सांगना, ते दीवसमं बर्याज गोस्टी घडीत. सुर्य, चंद्र आनं चान्न्यासमं चमत्कारन्या नीशान्या दखाईत. तवं समुद्र आनं लाटासना पक्का आवाजमं धरतीनं बरज लोकं घाबरी जाईत. 26 आनं धरतीवर जा व्हई रहना सय, ता दखीसनं बरज लोकं भीवाई जाईत आनं बेसुध पडी जाईत. कजं का तवं आकास मयल्या शक्तया बी हालीसनं आथ्यातथ्या व्हई जाईत. 27 तवं माला मोठी शक्तीथीन आनं मोठा मानथीन ढगवर येताना लोकं दखीत. 28 जवं या गोस्टीसना सुरुवात व्हई, तवं तुमं हुबं रहीसनं तयार रहज्या आनं तुमना डोका वर करीसनं हीम्मत धरा. कजं का तुमला आखा दुख आनं संकट पईन सुटका भेटाना टाईम शेजार ई लागना सय.
येसु परत येयी मनीसनं जागं रहज्या
(मतय २४:३२-३५; मार्क १३:२८-३१)
29 मंग येसु तेसला येक ऊदाहरन सांगना, आंजीरना झाड आनं दुसरं झाडंसला तुमं दखा. 30 तेसला पाला फुटाला लागनत तं, तुमला मायती पडय का, आतं ✞ ऊनाळाना दीवस शेजार ई लागना सय. 31 तशाज जवं या गोस्टी घडताना तुमं दखशात, तवं समजा का, देव राज्य कराना टाईम शेजार ई लागना सय.
32 मी तुमला खरज सांगय का, हाई आखा पुरा व्हई ताव हाई पीढीनं काही लोकं मरावुतंज ना. 33 आकास आनं धरतीना नास व्हई जाई, पन मना वचन कधी बदलावु ना. 34 पन तुमं सोताला समाळीसनं रहज्या. नातं खावापेवामं आनं जास्त दारु पेवामं आनं सोवसारनी चींतामं तुमना रुदय जड व्हई जाई. आनं तो दीवस आचानक येक जाळानी सारका ईसनं तुमला फसाडी लेई. 35 कजं का धरतीवर रहनारं आखं लोकंसवर तो दीवस येई. 36 तेमन तुमं कायम जागं रहज्या. आनं येनारं आख्या गोस्टीसला सहन करानी करता आनं मनी समोर हुबं रव्हानी करता प्राथना करज्या.