20
येसुना आधीकारनी बद्दल प्रशनं
(मतय २१:२३-२७; मार्क ११:२७-३३)
1 येक दीवस येसु मंदीरमं लोकंसला शीकाडी रहनाल आनं सुवार्ता सांगी रहनाल. तवं काही मुख्य याजक, यहुदी लोकंसना नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकं ईसनं तेला वीचारनत, 2 तु कोनता आधीकारथीन या आख्या गोस्टी करय? आनं हाई कराला तुला कोन आधीकार दीना सय? 3 तवं तो तेसला सांगना, मी बी तुमला येक प्रशनं वीचारय. 4 तुमं माला सांगा का, बापतीस्मा करनार योहानला बापतीस्मा कराना आधीकार कथाईन भेटेल व्हताल, देव पईन का मानुस पईन? 5 तवं ते आपसमं वीचार कराला लागनत का, ‘जर आपुन देव पईन व्हताल' आशा सांगु तं, तो सांगी का, मंग कजं तुमं तेना वचनवर वीस्वास ठेवनत ना? 6 पन जर आपुन 'मानुस पईन व्हताल' आशा सांगु तं, लोकं आपुनला दगडमार करीत. कजं का योहान येक देवना वचन सांगनार व्हताल मनीसनं आखं लोकं मानत. 7 मंग ते सांगनत, तो कथाईन सय हाई आमला मायती ना सय. 8 तवं येसु तेसला सांगना का, मंग मी बी तुमला सांगावु ना का, कोनता आधीकारथीन मी हाई करय.
द्राक्षमळाना ऊदाहरन
(मतय २१:३३-४६; मार्क १२:१-१२)
9 मंग येसु येक ऊदाहरन दीसनं लोकंसला सांगाला लागना. येकदाव कोनी येक मानुस द्राक्षसना मळा लावना. आनं तो मळाला गवानद्यासना हातमं दीसनं बराज वरीसनी करता तो बाहेर देश नींगी गया. 10 मंग द्राक्षसना दीवस वना. तवं तो तेना गवानद्यास पईन काही द्राक्षसना फळ भेटाला पायजे मनीसनं मळा कडं येक नौकरला धाडना. पन ते गवानदे तो नौकरला धरीसनं हाननत आनं रीकामा परत धाडी दीनत. 11 मंग तो मालक परत दुसरा नौकरला तेसनी कडं धाडना. पन तेला बी ते हाननत आनं तेना आपमान करीसनं रीकामा परत धाडी दीनत. 12 मंग तो मालक आजुन तीसरा जनला धाडना. पन तेला ते रंगताया करीसनं बाहेर फेकी दीनत. 13 तवं तो द्राक्षमळाना मालक सांगना, आतं मी काय करु? जर मी मना आवडता पोर्याला धाडसु, कदाचीत ते तेना मान ठेईत आनं काही द्राक्षसना फळ देईत. 14 आशा वीचार करीसनं तो तेना आवडता पोर्याला धाडना. पन ते गवानदे तेला दखीसनं येकमेकला सांगनत, हाऊ वारीस सय, चाला, आपुन येला जीवता मारुत. मंजे मळा आपला व्हई जाई. 15 मंग ते तेला बी धरीसनं द्राक्षमळानी बाहेर वडी काडनत आनं जीवता मारनत. मंग तो द्राक्षमळाना मालक काय करी? 16 तो ईसनं ते गवानदेसना नास करी टाकी, आनं द्राक्षमळाला दुसरंसना हातमं दी देई.
हाई आयकीसनं ते लोकं सांगनत, आशा नोको व्हवाला पायजे. 17 मंग येसु तेसनी कडं दखीसनं सांगना, मनी बद्दल देवना वचनमं लीखेल सय का,
✞"जो दगडला बांधकाम करनारं नाकारी दीनत, तोज कोपराना दगड बनी गया."
येना आर्थ काय सय, येनी बद्दल तुमं वीचार कराला पायजे. 18 मी तो दगडनी सारका सय आनं जे लोकं माला नाकारी देत, ते हाई दगडवर पडनारं लोकंसनी सारकं सत. आनं जो कोनी हाई दगडवर पडी, तेना तुकडं तुकडं व्हई जाई. पन जवं तो दगड कोनवर पडी, तेला तो चुरा चुरा करी टाकी.
परुशी लोकं येसुला फसाडानी कोशीत करत
(मतय २२:१५-२२; मार्क १२:१३-१७)
19 तवं नीयम शीकाडनारं आनं मुख्य याजक लोकंसला मायती पडना का, हाऊ ऊदाहरन तो तेसला लाईसनं सांगना. तेमन लगेज तोज टाईमला येसुला धरानी करता ते कोशीत करनत. पन ते तेला धरीत तं, लोकं काहीतरी करीत मनीसनं तेसला भीव वाटना. 20 तेमन ते येसुवर नजर ठेवनत आनं तेला बोलामं धरीसनं आधीकारीना हातमं देवानी कोशीत करनत. तेमन काही नीतीवान सारका ढोंग करनारं जासुस लोकंसला गच्चुप तेनी मांगं धाडनत.
21 मंग ते लोकं जाईसनं येसुला सांगनत, गुरुजी, आमला मायती सय का, जा खरा सय, ताज तु बोलय आनं शीकाडय. तु कधी मानसंसना तोंड दखीसनं बोलय ना, पन देवना रस्ता खरज शीकाडय. 22 आतं तु आमला सांग का, आमं रोम देशना मोठा राजा ✞कैसरला कर देवाला पायजे का ना? 23 पन येसुला मायती पडी गया का, ते तेला फसाडानी कोशीत करी रहनं सत. तेमन तो तेसला सांगना, मापन येक चांदीना रुपया ली या, ता मी दखसु. 24 मंग ते येक चांदीना रुपया ली वनत. तवं येसु तो रुपया तेसला दखाडीसनं वीचारना, हाऊ रुपयामं कोना तोंड आनं कोना नाव सय? ते तेला सांगनत, रोम देशना मोठा राजा कैसरना. 25 तवं तो तेसला सांगना, जो कैसरला देवाना सय, तो कैसरला द्या आनं जो देवला देवाना सय, तो देवला द्या. 26 मंग ते लोकंसनी समोर तेला फसाडु शकनत ना. पन तेना आयकीसनं तेसला नवल वाटना आनं ते गच्चुप रही गयत.
मरन मयथीन उठानी बद्दल प्रश्नं
(मतय २२:२३-३३; मार्क १२:१८-२७)
27 तवं सदुकी नावना येक गठना लोकं वीस्वास करतत का, मरन मयथीन परत जीवता व्हवाना ना सय. मंग तो गठ मयला काही लोकं येसु कडं ईसनं तेला वीचारनत, 28 गुरुजी, मोसा तेना देयेल नीयममं आमना साठी आशा लीखी ठेयेल सय का,
✞"जर येखादाना भाऊ बीगर पोरेसोरेसना मरना आनं बायको रहनी तं, तो मरेल मानुसना भाऊ तीनी संगं लगीन करीसनं मरेल भाऊना कुटुमला पुडं चालाडाला पायजे."
29 मंग कोनीतरी सात भाऊ व्हतलत. तेस मईन पईला जन बायको करना आनं तो बीगर पोरेसोरेसना मरना. 30 मंग दुसरा आनं तीसरा भाऊ बी येकनी नंतर येक तीनी संगं लगीन करनत आनं बीगर पोरेसोरेसना मरनत. 31 तशेज साती भाऊ तीनी संगं येकनी नंतर येक लगीन करनत आनं बीगर पोरेसोरेसनं मरनत. 32 मंग आखंसनी शेवट ती बाई बी मरनी. 33 तर जवं लोकं मरेल मयथीन उठीत, तवं ती बाई ते साती जनंस मयथीन कोनी बायको व्हई? कजं का ती साती जनंसनी संगं लगीन करेल व्हतील. 34 येसु तेसला सांगना, हाई जगनं लोकं लगीन करत आनं तेसनं पोरेसोरेसना लगीन करी देत. 35 पन येनारा नवीन युगमं जावानी करता आनं मरन मयथीन उठानी करता जे लोकंसला देव लायक बनाडी, ते लगीन करावुत ना आनं तेसनं पोरेसोरेसना लगीन करी देवावुत ना. 36 आनं ते देवदुतंसनी सारका रहीत आनं कधी मरावुतंज ना. कजं का मरन मयथीन जीवता व्हयनत मनीसनं ते देवनं पोरेसोरे सत.
37 आनं मरेल मयथीन परत उठानी बद्दल मोसा बी तेना पुस्तकमं चेटेल झुडपानी गोस्टंमं लीखेल सय. तई तो परमेस्वरनी बद्दल आशा सांगेल सय का,
✞"आब्राहाम, ईसहाक आनं याकोब जो देवनी पुजा करत तो देव तोज सय."
38 मंग मोसानी बरज पयलंग ते लोकं मरी गयलत, पन देव सांगय का, आतं परन ते मनी पुजा करत. तेमन आपुनला मायती पडय का, तो मरेल लोकंसना देव ना सय, पन जीवतं लोकंसना देव सय. आनं तेनं आखं लोकं तेना साठी कायम जीवतंज सत.
39 तवं नीयम शीकाडनारंस मयथीन काही सांगनत, गुरुजी, तु खरज बोलना सय. 40 मंग तेनी नंतर आजुन कोनी बी येसुला काही तशा प्रशनं वीचारानी हीम्मत करनत ना.
देवना धाडेल राजा ख्रीस्त दावीदना पोर्या परभु सय
(मतय २२:४१-४६; मार्क १२:३५-३७)
41 मंग येसु तेना आयकनारंसला वीचारना, तुमला शीकाडनारं कसाला सांगत का, देवना धाडेल राजा ख्रीस्त दावीद राजाना पीढीमं जल्म व्हयेल सय? 42 कजं का दावीद सोता तेना पुस्तकमं लीखेल सय का,
43 ✞"परमेस्वर देव ✞ मना परभुला सांगना, मी तुना वैरीसला तुना पायनी खाल ली येय ताव, तु मनी जेवनी कडं बस."
44 जर दावीद सोता देवना धाडेल राजा ख्रीस्तला परभु सांगय, मंग देवना धाडेल राजा ख्रीस्त कशा दावीद राजानी पीढीमं जल्म व्हयेल सय? तो दावीद पेक्षा बी मोठा व्हवावु ना का?
येसु नीयम शीकाडनारंसनी बद्दल सांगय
(मतय २३:१-३६; मार्क १२:३८-४०)
45 मंग आखं लोकं येसुना आयकी रनलत. तवं तो तेनं चेलंसला सांगना, 46 नीयम शीकाडनारंसनी बद्दल समाळीसनं रहज्या आनं तेसनी सारका बनु नोका. कजं का तेसला ✞ लांबं कपडं घालीसनं फीराला आवडय. आनं बाजारमं लोकं तेसला मान दीसनं नमस्कार कराला पायजे, ता तेसला आवडय. तेसला प्राथना घरमं मुख्य जागा आनं जेवनला बसाला चांगली जागा आवडय. 47 ते वीधवासला फसाडीसनं तेसना घर ली लेत आनं दुसरंसला दखावानी करता लांबी लांबी प्राथना करत. देव तेसला पक्का मोठा दंड देई.