19
जक्‍कयना जीवन बदलय
1 मंग येसु यरीहो शेहेरमं लागी जाई रहनाल. 2 तवं जक्‍कय नावना येक मानुस तो शेहेरमं व्हताल. तो कर वसुली करनारंस मयथीन मुख्य व्हताल आनं श्रीमंत व्हताल. 3 आनं येसु कोन सय हाई दखानी करता तो पक्‍का कोशीत करी रहनाल. पन गरदी मुळे तो दखु शकना ना. कजं का तो बुटक्या व्हताल. 4 तवं तो पुडं पळत पळत गया आनं येसुला दखानी करता येक ऊंबरना झाडवर चडना. कजं का येसु तो रस्ता धरी जानार व्हताल. 5 मंग येसु तो झाडपन वना आनं वर दखीसनं तेला सांगना, जक्‍कय, ल‍गेज खाल उतर. कजं का आज माला तुनी घर ईसनं रव्हाना सय. 6 तवं तो ल‍गेज खाल उतरना आनं आनंदमं तेला घर ली गया.
7 हाई दखीसनं आखं लोकं कुरकुर करनत आनं सांगाला लागनत का, हाऊ येक पापी मानुसना घरमं पाहुनं गया सय. 8 तवं जक्‍कय हुबा रहीसनं परभु येसुला सांगना, परभुजी दख, मापन जा काही सय, ते मयथीन आरदा मी गरीबंसला दी देय. आनं जर मी कोन ‍पईन काही फसाडीसनं लीयेल व्हई तं, तेना चारपट परत करय. 9 मंग येसु सांगना, आज हाऊ घरना आखं मानसंसला तारन भेटना सय. कजं का हाऊ मानुस दखाडी दीना का, खरज हाऊ बी आब्राहामना येक पोर्‍या सय. 10 आनं ध्यान ठेवा का, मानुसना पोर्‍या मंजे मी येना सारका दवडायेल लोकंसला दखाला आनं चाडाला हाई जगमं वना सय.
दहा सोनाना शीक्‍कासना ऊदाहरन
(मतय २५:१४-३०)
11 जवं लोकं या गोस्टी आयकी रनलत, तवं येसु तेसला येक ऊदाहरन सांगना. कजं का तो यरुशलेमना शेजार व्हताल आनं लोकंसला आशा वाटु लागनाल का, येसु लवकर राजा बनीसनं तेना राज्यना सुरुवात करनार सय. 12 मंग येसु सांगना, येखादा चांगला कुटुमना मानुस राजा बनीसनं परत येवानी करता येक दुर देशमं गया. 13 मंग जावानी आगुदार तो तेना दहा नौकरंसला बलाईसनं तेसला दहा सोनाना शीक्‍का दीना. आनं तेसला सांगना, मी परत येय ताव येसवर काहीतरी धंदा करा. 14 पन तेना राज्यनं लोकंसला तो मानुस पटता ना. तेमन तेनी मांगं ते येक जनला आशा सांगीसनं धाडनत का, हाऊ मानुस आमना राजा नोको बनाला पायजे मनीसनं आमनी ईशा सय.
15 मंग काही वरीसनी नंतर तो मानुस राजा बनीसनं परत वना. तवं जे नौकरंसला तो सोनाना शीक्‍का देयेल व्हताल, तेसला तो बलावना. आनं ते काय काय धंदा करनत आनं काय कमावनत हाई तेसला वीचारना. 16 मंग पयला जन तेनी समोर ईसनं सांगना, महाराज, तुना येक सोनाना शीक्‍कावर मी आजुन दहा शीक्‍का कमावना सय. 17 तवं तो तेला सांगना, शब्बास, तु येक चांगला नौकर सय. कजं का तु थोडाशी गोस्टंसवर वीस्वासु रहना सय मनीसनं मी तुला दहा शेहेरंसवर आधीकारी बनाडसु. 18 नंतर दुसरा जन ईसनं सांगना, महाराज, तुना येक सोनाना शीक्‍कावर मी आजुन पाच शीक्‍का कमावना सय. 19 तवं तेला बी तो सांगना, शब्बास, तुला बी मी पाच शेहेरंसवर आधीकारी बनाडसु.
20 मंग आजुन येक जन ईसनं सांगना, महाराज, हाई दख तुना सोनाना शीक्‍का, मी रुमालमं बांधी ठेयेल सय. 21 कजं का तु येक कडंक मानुस सय मनीसनं माला भीव वाटना. आनं जा तु ठेवय ना, ता तु दुसरंस पईन ऊचली ली जाय. आनं जा तु पयरय ना, ता तु दुसरंस पईन कापी ली जाय. 22 मंग तो राजा तेला सांगना, आरे वाईट नौकर, तु जो सांगय तेघाईज मी तुना न्‍याय करसु. मी कडंक मानुस सय, आनं जा मी ठेवय ना, ता मी ऊचली ली जाय आनं जा मी पयरय ना, ता मी कापी ली जाय मनीसनं तुला मायती व्हताल नं? 23 तवं तु मना पयसा बँकमं कजं ठेवना ना? जर तु ठेई दीता तं, मी ईसनं व्याज समत वसुल करता. 24 मंग शेजार हुबा रहनारंसला तो सांगना, ये प‍ईन तो सोनाना शीक्‍का लीसनं जेपन दहा सोनाना शीक्‍का सत तेला द्या. 25 तवं ते तेला सांगनत, महाराज, तेपन तं पयला प‍ईन दहा सोनाना शीक्‍का सत. 26 मंग तो सांगना, खरज मी तुमला सांगय का, जो कोनी तेला देयेल वस्तुसला चांगला उपयोग करय, तेला आखु देवामं येई. पन जो कोनी तेला देयेल वस्तुसना चांगला उपयोग करय ना, तेप‍न जा सय ता बी काडी लेवामं येई. 27 आनं मी तेसना राजा नोको बनाला पायजे मनीसनं जे मनं दुशमनंसनी ईशा व्हतील, तेसला आठी ली या आनं मनी समोर जीवता माराना दंड द्या.
येसु यरुशलेममं शांतीना राजा सारका जाय
(मतय २१:१-११; मार्क ११:१-११; योहान १२:१२-१९)
28 या गोस्टी सांगानी नंतर येसु आनं तेनं चेलं यरुशलेम शेहेर कडं गयत. आनं तो सोता पुडं चाली रहनाल. 29 मंग ते जैतुन नावना डोंगरपन बेथफगे आनं बेथानी गाव जवळ वनत. तवं येसु तेनं दोन चेलंसला आशा सांगीसनं धाडना का, 30 तुमं समोरना गावमं जा. आनं त‍ई जाताज जेवर कधी कोनी मानुस बसेल ना सय, आशा येक गदडा तुमला बांधेल दखाई. तो सोडीसनं मापन ली या. 31 आनं जर कोनी तुमला वीचारना का, तुमं हाई गदडाला कजं सोडी रहनं सत? तवं सांगा का, परभुला येनी गरज सय.
32 मंग ते चेलं गयत आनं तेसला येसु जशा सांगेल व्हताल तशाज व्हयना. 33 जवं ते तो गदडाला सोडी रनलत, तवं गदडाना मालक तेसला वीचारना, तुमं हाई गदडाला कजं सोडी रहनं सत? 34 ते सांगनत, परभु येसुला येनी गरज सय. तवं तो मालक गदडाला ली जावु दीना.
35 मंग ते चेलं तो गदडाला येसु कडं लवनत आनं तेवर तेसनं काही कपडं टाकनत. मंग येसु तेवर बसना. 36 आनं जशा जशा येसु पुडं चालता तशा तशा लोकं तेला मान देवानी करता तेसनं कपडं वाटवर आथरतत. 37 आनं जवं तो जैतुनना डोंगरनी उतरतीपन वना, तवं जे चमत्कारंसना काम येसु करेल व्हताल, तेनी बद्दल आखं चेलंसनी गरदी आनंद करीसनं जोरमं देवनी स्‍तुती कराला लागनत. 38 ते सांगनत,
"परभुना नावमं जो राजा ई रहना सय तो धन्‍य सय. सोरगंमं शांती व्हवाला पायजे आनं देवला मोठा मान भेटाला पायजे."
39 तवं लोकंसनी गरदी म‍ईन काही परुशी लोकं तेला सांगनत, गुरुजी, तुनं चेलंसला डोकाड. कजं का ते आशा नोको सांगाला पायजे. 40 मंग येसु तेसला सांगना, मी तुमला खरज सांगय का, जर ये गच्चुप रहीत तं, मनी स्तुती करानी करता दगडं आराळ्या मारीत.
येसु यरुशलेम शेहेरनी करता रडय
41 मंग येसु यरुशलेमनी शेजार वना. आनं तो शेहेरला दखना आनं रडीसनं सांगना, 42 हे यरुशलेमनं लोकं, ज्या गोस्टी देवनी संगं शांतीमं रव्हाला मदत करय, त्या जर तुमं आज आयकी लीतत तं, कीतला चांगला वता. पन आतं या गोस्टी तुम प‍ईन दपाडी ठेवामं ईयेल सय. 43 आनं पुडं तुमना साठी आशा दीवस येईत का, तुमनं दुशमन तुमनी चारीमेर कोट बांधीसनं तुमला घेरीत. आनं चारीमेरथीन तुमला दबाव देईत. 44 आनं ते तुमना शेहेरला खाल पाडी टाकीत. आनं तुमला आनं तुमनं पोरेसोरेसला जीवता मारीसनं नास करी देईत. आनं ते तुमना शेहेरनं आखा दगडंसवर दगड रहु देवावुत ना. कजं का देव तुमला वाचाडाला तुमनी कडं ई रहनाल, पन तो टाईमला तुमं वळखनत ना.
येसु यरुशलेमना मंदीरला चांगला करय
(मतय २१:१२-१७; मार्क ११:१५-१९; योहान २:१३-२२)
45 मंग येसु मंदीरमं गया. तवं काही लोकं मंदीरमं बलीदान आनं आर्पननी करता जनावरं आनं दुसर्‍या काही वस्तु तई ईकी रनलत. मंग तो तेसला बाहेर काडाला लागना. 46 आनं तो तेसला सांगाला लागना का, देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"मना घरला प्राथनाना घर सांगामं येई."
पन तुमं तेला लुटारुसना दपाना घर करी टाकनं सत.
47 मंग तेनी नंतर येसु तो आठोडाना दर रोज मंदीरमं शीकाडी रहनाल. तवं मुख्य याजक लोकं, यहुदी लोकंसना नीयम शीकाडनारं आनं मोठलं लोकं तेला जीवता माराना बेत करी रनलत. 48 पन तेला मारानी करता तेसला काही रस्ता सापडता ना. कजं का आखं लोकं मन लाईसनं तेना वचन आयकतत. आनं जर ते येसुला धरीत तं, ते लोकं येसना वीरोध करीत.