18
येक वीधवा बाई आनं न्‍याय करनारना ऊदाहरन
1 मंग देव प्राथनाना उतर लवकर ना देय, तरी बी हीम्मत ना सोडीसनं कायम प्राथना करत रव्हाला पायजे, हाई शीकाडानी करता येसु तेसला येक ऊदाहरन सांगना. 2 येक शेहेरमं येक न्‍याय करनार व्हताल. तो कधी देवला भीवता ना आनं लोकंसनी पर्वा करता ना. 3 आनं तोज शेहेरमं येक वीधवा बाई व्हतील. ती घडीघडी तो न्‍याय करनार कडं जाईसनं वीनंती करीसनं सांगती का, मना न्‍याय कर आनं मना वीरोध करनारंस प‍ईन माला सुटका दे. 4 मंग बराज दीवस परन तो न्‍याय करनार तीना न्‍याय करना ना. पन शेवट तो सोताला सांगना का, मी देवला भीवय ना आनं लोकंसनी बी पर्वा करय ना. 5 पन हाई वीधवा बाई घडीघडी ईसनं माला डोका लावय मनीसनं मी तीना न्‍याय करी दीसु. नातं ती आजुन घडीघडी ईसनं माला पक्‍की परीशान करी टाकी.
6 मंग परभु येसु आखु सांगना, तो न्‍याय करनार पापी व्हताल, पन तो काय सांगय आयका. 7 तो पापी रहीसनं बी तशा करय तं, जेसला देव नीवाडेल सय आनं जे रातदीवस तेला हाक मारत तेसना न्‍याय तो करावु ना का? आनं तेसला मदत करानी करता तो उशीर करी का? 8 मी तुमला खरज सांगय का, तो तेसना न्‍याय लवकर करी. पन जवं मी जगमं परत ईसु, तवं मी तेसला बीगर दोसना ठरावसु मनीसनं धरतीवर बरज लोकं मावर वीस्वास ठेवताना माला सापडावुत ना.
येक परुशी आनं कर वसुली करनारना ऊदाहरन
9 तवं काही लोकं सोताला नीतीवान समजीसनं सोतावर भरोसा ठेवतत आनं दुसरंसला नीचा मानतत. तेसना साठी येसु येक ऊदाहरन सांगना. 10 येकदाव दोन जन प्राथना करानी करता मंदीरमं गयत. तेस मयथीन येक जन परुशी आनं दुसरा कर वसुली करनार व्हताल. 11 मंग तो परुशी हुबा रहीसनं तेना मनमं आशी प्राथना करना का, हे देव, मी तुना आभार मानय का, मी दुसरं लोकंसनी सारका ना सय. ते लुटनारं सत आनं वाईट कामं करनारं आनं शीनाळी करनारं सत. पन मी तेसनी सारका ना सय. आनं हाई कर वसुली करनारनी सारका बी मी ना सय. 12 मी आठोडामं दोन दाउ ऊपास करय. आनं जा काही माला भेटय, ते म‍ईन दाहवा भाग मी दान देय.
13 पन कर वसुली करनार सोताला लायक समजना ना आनं दुर हुबा रहना. आनं तो सोरगं कडं बी दखु शकना ना. आनं तेना पापनी करता दुखी व्हईसनं सांगना, हे देव, मी पापी मानुस सय, मावर दया कर आनं माला माफ कर.
14 मंग येसु तेसला सांगना, खरज मी तुमला सांगय का, तो परुशी ना, पन कर वसुली करनार तो रोजला देवनी नजरमं नीतीवान बनीसनं घर गया. कजं का जो सोताला मोठा करय तेला नीचा करामं येई, आनं जो सोताला नीचा करय तेला मोठा करामं येई.
येसु धाकलं पोरेसला आशीर्वाद देय
(मतय १९:१३-१५, मार्क १०:१३-१६)
15 मंग काही लोकं तेसनं धाकलं पोरेसला येसु कडं ली वनत. कजं का तो तेसवर हात ठेईसनं आशीर्वाद देवाला पायजे मनीसनं तेसनी ईशा व्हतील. पन हाई दखीसनं येसुनं चेलं तेसला डोकाडनत. 16 पन येसु ते पोरेसला शेजार बलाईसनं सांगना, पोरेसला मापन येवु द्या, तेसला मना करु नोका. कजं का जे लोकं आशे धाकलं पोरेसनी सारकं सोताला नम्र बनाडत, देवना राज्‍य तेसना साठीज सय. 17 मी तुमला खरज सांगय का, जो कोनी येक धाकला पोर्‍यानी सारका बनीसनं सोताना जीवनमं देवना राजला स्वीकार करावु ना, तो तई जावावुज ना.
कायमना जीवननी बद्दल येक श्रीमंत मानुस येसुला प्रश्‍नं वीचारय
(मतय १९:१६-३०; मार्क १०:१७-३१)
18 तवं यहुदीसना येक आधीकारी येसुला वीचारना, हे चांगला गुरुजी, कायम देवनी संगं जीवन जगानी करता मी काय कराला पायजे? 19 मंग येसु तेला सांगना, जवं तु माला चांगला सांगय, तु काय बोली रहना सय, येनी बद्दल वीचार कर. कजं का फक्‍त देव शीवाय कोनी बी चांगला ना सय. 20 तुला तं या देवनी आज्ञा मायती सत,
"शीनाळी करु नोको, खुन करु नोको, चोरी करु नोको, दुसरंसनी बद्दल खोटा बोलु नोको आनं तुना मायबापसना मान ठेव".
21 मंग तो मानुस सांगना, गुरुजी, मी मना धाकलपन पईथीन या आख्या आज्ञा पाळी रहना सय. आखु मी काय कराला पायजे? 22 हाई आयकीसनं येसु तेला सांगना, तुनी मजार आजुन येक गोस्टंनी कमी सय. तुपन जा सय, ता आखा ईकीसनं तो पयसा गरीबंसला वाटी दे. तवं तुला सोरगंमं देव प‍ईन आत्मीक धन भेटी. आनं चाल, मनी मांगं ये. 23 पन जवं तो मानुस हाई आयकना, तवं तो पक्‍का दुखी व्हई गया. कजं का तो पक्‍का श्रीमंत व्हताल आनं ता करानी तेनी ईशा ना व्हतील. 24 तवं तेला दखीसनं येसु सांगना,श्रीमंत मानसंसला देवना राज्‍यमं जावानी करता पक्‍का कठीन सय. 25 श्रीमंत मानसंसला देवना राज्‍यमं जावा पेक्षा, हुटला सुयना नाक मयथीन जावाला सोपा सय.
26 तवं लोकं मानतत का, धन मंजे देवना आशीर्वादनी नीशानी सय. तेमन जे लोकं हाई आयकनत, ते सांगनत का, तं मंग कोना तारन व्‍हवु शकी? 27 येसु सांगना, जी गोस्टं मानुसला शक्‍य ना सय, ती देवला शक्‍य सय.
28 तवं पेत्र येसुला सांगना, दख, आमं आखंकाही सोडीसनं तुनं चेलं बनेल सत. तं आमं देवना राज्यमं जावु शकावुत का ना? 29 पन येसु सांगना, मी तुमला खरज सांगय का, जो कोनी देवना राज्यनी करता घरदार, बायको, भाऊबईन, मायबाप आनं पोरेसोरे सोडेल सय, 30 तेला हाऊ जगना जीवनमं आखंकाही बराज दाउ भेटी आनं येनारा काळमं सोरगंमं कायमना जीवन बी भेटी.
येसु तेना मरननी बद्दल तीसरा दाउ सांगय
(मतय २०:१७-१९; मार्क १०:३२-३४)
31 मंग येसु तेनं बारा चेलंसला जवळ बलावना आनं बाजुला ली जाईसनं सांगना, दखा, आपुन यरुशलेम शेहेरमं जाई रहनं सत. आनं मानुसना पोर्‍यानी मंजे मनी बद्दल देवना वचन सांगनारं जे काही लीखेल सत, ते आखं त‍ई पुरा वनार सय. 32 माला बीगर यहुदी लोकंसना हातमं देवामं येई. आनं ते लोकं मनी थट्टा करीत आनं मना आपमान करीत आनं मावर थुकीत. 33 आनं ते माला काकडाघाई हानीत आनं जीवता मारीत. पन तीसरा दीवसमं मी मरन मयथीन परत उठसु.
34 पन ते चेलंसला या गोस्टी काही समजन्यात ना. आनं या गोस्टीसना आर्थ तेस प‍ईन दपाडी ठेवामं वना. आनं तो जा सांगना, ता तेसला समजना ना.
येसु येक आंधळाला बरा करय
(मतय २०:२९-३४; मार्क १०:४६-५२)
35 तेनी नंतर येसु आनं तेनं चेलं यरीहो शेहेरना शेजार वनत. तवं त‍ई वाटवर येक आंधळा बसीसनं भीक मांगी रहनाल. 36 मंग तो आंधळा शेजार जानारंसना आवाज आयकना. आनं तेसला वीचारना, हाई काय व्हई रहना सय? 37 ते तेला सांगनत, नासरेथना येसु हाई रस्ता धरी जाई रहना सय. 38 तवं तो आराळ्या दीसनं सांगाला लागना, हे येसु, दावीद राजाना पोर्‍या, मावर दया कर. 39 तवं पुडं चालनारं तेला डोकाडीसनं सांगनत, ऊगाज रह. पन तो आजुन जोरमं आराळ्या दीसनं सांगाला लागना, हे दावीद राजाना पोर्‍या, मावर दया कर. 40 मंग येसु हुबा रहना आनं तेला तेनी कडं लयाला सांगना. मंग तो आंधळा शेजार येवानी नंतर येसु तेला वीचारना, 41 मी तुना साठी काय कराला पायजे आशी तुनी ईशा सय? तो आंधळा सांगना, गुरुजी, माला परत दखावाला पायजे. 42 येसु सांगना, तु मावर वीस्वास ठेवना मनीसनं बरा व्हई गया सय. जा तुला परत दखाई. 43 तवं ल‍गेज तेला दखावाला लागना. आनं तो देवनी स्‍तुती करीसनं येसुनी मांगं चालाला लागना. आनं हाई दखीसनं बाकी लोकं बी देवनी स्‍तुती करनत.