17
येसु काही गोस्टी शीकाडय
(मतय १८:६-७,२१-२२; मार्क ९:४२)
1 येकदाव येसु तेनं चेलंसला सांगना, ज्या गोस्टी लोकंसला पापमं टाकत, त्या गोस्टी नक्‍की येईत. पन जे लोकंस प‍ईन त्या गोस्टी येत तेसला देव पक्‍का मोठा दंड दे‍ई. 2 मावर वीस्वास ठेवनारं ये धाकलंसला ते पापना रस्तामं ली जावा पेक्षा तेसना गळामं मोठी घोरटनी तळी बांधीसनं तेसला समुद्रमं फेकी देवाना हाई तेसना साठी चांगला सय. 3 तेमन तुमं सोताला समाळजा. आनं जर येखादा वीस्वासी भाऊ पाप करय तं, तेला ढटाडा. आनं तो पस्तावा करीसनं माफी मांगय तं, तेला माफ करा. 4 जर दीवसमं सात दाउ तो तुना वीरुद पाप करय आनं सात दाउ तुपन ईसनं सांगय का, मी पस्तावा करय, तं तु तेला प्रतेक दाउ माफ करालाज पायजे.
वीस्वासना काम
5 मंग परभु येसुनं चेलं तेला सांगनत, गुरुजी, देववर आमना वीस्वास वाढाला पायजे मनीसनं आमला मदत कर. 6 तवं परभु येसु तेसला सांगना, जर तुम मजार राईना दानानी येवडा बी वीस्वास व्हई तं, आनं जर तुमं हाई मोठा झाडला सांगशात का, तु ऊपडीसनं समुद्रमं ऊगी जा, तवं तशाज व‍य जाई.
तुमं चांगला सेवा करनारं बना
7 मंग येसु तेसला वीचारना, जर तुम मयथीन येखादाना नौकर नागरी रहना सय नातं मेंडया राखी रहना सय, आनं जवं तो वावर मयथीन काम करीसनं परत येय, तवं तुमं तेला ल‍गेज बसीसनं जेवाला सांगत का? 8 तुमं तशा सांगत ना. पन ऊलटा तुमं तेला सांगत का, तु मना साठी जेवन बनाड आनं मना जेवन व्हई ताव मनी सेवा कर आनं तेनी नंतर तु तुना जेवन कर. 9 नं येवडाज ना, पन तो तुमना आयकीसनं तो काम करना मनीसनं तुमं तेना ऊपकार बी मानत ना. 10 तशाज जवं तुमं बी देवना सांगेल काम पुरा करत, तवं तुमं बी सांगाला पायजे का, देव आमला आभार मानाला पायजे मनीसनं आमं लायक ना सत, पन देव जा सांगेल सय, ताज आमं करनत. तेनी पेक्षा जास्त काही करनत ना.
येसु दहा कोडी मानसंसला बरा करय
11 मंग जवं येसु यरुशलेम शेहेर कडं जाई रहनाल, तवं तो शोमरोन आनं गालील जील्‍लास मयथीन गया. 12 आनं जवं तो येक गावमं जाई रहनाल, तवं दहा कोडी मानसं तेला भेटाला वनत. 13 मंग ते दुर हुबं रहनत आनं जोरमं आराळ्या दीसनं सांगनत, हे येसु गुरुजी, आमवर दया कर आनं आमला चांगला कर. 14 तवं येसु तेस कडं दखीसनं सांगना, तुमं याजक कडं जाईसनं सोताला दखाडा. येनी करता का तो तुमला पारख करीसनं सांगी का, तुमं चांगला व्हई गयं सत. मंग ते जाता जाता रस्तामंज चांगला व्हई गयत.
15 आनं जवं तेसला मायती पडना का, ते चांगलं व्हई गयं सत, तवं तेस मयथीन येक जन जोरमं देवनी स्‍तुती करीसनं येसु कडं परत वना. 16 आनं तो तेना ऊपकार मानीसनं तेना पाय पडना. तो यहुदी मानुस ना व्हताल, पन येक शोमरोनी मानुस व्हताल. 17 तवं येसु सांगना, मी दहा जनंसला चांगला करी दीना, मंग बाकी न‍ऊ जन क‍ई गयत? 18 आनं हाई येकंज बीगर यहुदी मानुसनी शीवाय आजुन कोनी बी देवनी स्‍तुती कराला परत वनत ना का? 19 मंग येसु तो मानुसला सांगना, भाऊ, उठीसनं जा. तु मावर वीस्वास ठेवना मनीसनं बरा व्हयना सय.
येसु तेना परत येवानी बद्दल सांगय
(मतय २४:२३-२८,३७-४१)
20 मंग काही परुशी लोकं येसुला वीचारनत का, देव कवं लोकंसवर राज्य करी? तवं येसु तेसला सांगना, देव लोकंसवर आशा राज्य करी का, तेला कोनी बी दखु शकावुत ना. 21 आनं कोनी बी सांगावुत ना का, दखा, देव आठी लोकंसवर राज्य करी रहना सय नातं त‍ई राज्य करी रहना सय. कजं का देवना राज्य तं तुमना मजार ई लागना सय.
22 मंग येसु तेनं चेलंसला सांगना, आशा दीवस येईत का, तवं तुमं मानुसना पोर्‍याना मंजे मना येवानी येक दीवस तरी दखानी ईशा करशात. पन तो तुमला दखायनार ना. 23 आनं लोकं तुमला सांगीत, 'दखा तो आठी सय' नातं 'दखा तो त‍ई सय'. पन तुमं जाज्या नोका आनं तेसनी मांगं लागु नोका. 24 कजं का जशी ईज चमकय आनं आकासना येक बाजुथीन दुसरी बाजु परन ऊजाळा देय आनं आखं लोकं तेला दखु शकत, तशाज मी बी परत ईसु आनं आखं लोकं माला दखीत. 25 पन तेनी आगुदार माला पक्‍का दुख भोगना पडी आनं हाई पीढीनं लोकंस प‍ईन नाकारामं येई. 26 आनं जशा नोहाना दीवसमं व्हयना, जवं मी परत ईसु तो दीवसमं बी तशाज व्हई. 27 जवं नोहा आनं तेना कुटुमनं लोकं जाहाजमं गयलत, तो दीवस परन बाकी लोकं जशे करतत तशेज खाईपीई रनलत आनं लगीन करी रनलत आनं लगीन करी दी रनलत. ईतलामंज स‍ईनदार पानी पडना आनं जाहाजनी बाहेरना आखंसना नास करी दीना.
28 तशाज जवं मी परत ईसु, तवं लोटना दीवसमं जशा व्हयना तशा बी व्हई. तवं सदोम शेहेरनं लोकं खाईपीई रनलत आनं ईकत दी रनलत आनं ईकत ली रनलत. आनं ते वावरंसमं पयरी रनलत आनं घरं बांधी रनलत. 29 पन जो दीवसमं लोट सदोम शेहेर मयथीन नींगना, तोज दीवसमं आकास मयथीन ईस्तु आनं चेटेल गंधक पडना आनं आखंसना नास करी दीना. 30 आनं जवं मी परत ईसु, तो दीवसमं बी तशाज व्हई.
31 आनं तो दीवसमं जो मानुस घरवर रही, तो तेना सामान घर मयथीन लेवानी करता खाल ऊतरीसनं टाईम घालु नोका. आनं तशाज जो वावरमं रही, तो काही बी लेवानी करता मांगं नोको फीरी ईज्या. 32  लोटनी बायकोनी बद्दल काय व्हयना येनी याद करा. ती बी मांगं फीरनी आनं लगेज मीठना खांबा बनी गयी. 33 कजं का जो कोनी सोताना जीव वाचाडाला दखय, तो कायमना जीवनला दवडाय देई. पन जो कोनी मना साठी सोताना जीव दी देवाला बी तयार व्हई जाई, तेला कायमना जीवन भेटी. 34 मी तुमला सांगय का, जवं मी परत ईसु ती रातला येकंज खाटवर दोन जन नीजेल रहीत तं, तेस मईन येकला सोरगंमं ली जावामं येयी आनं दुसराला त‍ईज सोडी जावामं येई. 35 आनं दोन बाया मीळीसनं दळी रहीत, तवं येकला सोरगंमं ली जावामं येयी आनं दुसरीला त‍ईज सोडी जावामं येई. 36 आनं दोन जन वावरमं काम करतं व्हईत तं, तेस म‍ईन येकला लेवामं येयी आनं दुसराला त‍ईज सोडी देवामं येई.
37 मंग तेनं चेलं तेला वीचारनत, परभु, ये आखं क‍ई व्हई? तवं तो तेसला सांगना, ज‍ई मरेल वस्तु पडेल रही, त‍ईज गीदडं गोळा व्हईत. तशाज जई लोकं आत्मीक जीवनमं मरेल सत, तई देव तेसला दंड देई.