14
दुसरंसना दोस काडु नोका
1 मनं भाऊ आनं बईन, तुम मयथीन जर येखादा कमी वीस्वासना सय, तरी बी तेला स्वीकार करा. आनं तेसना मनना वीचार चांगला सय का वाईट सय, येनी बद्दल वाद वीवाद करु नोका. 2 काही वीस्वासी लोकं आखंकाही खावामं वीस्वास ठेवत. पन आजुन काही लोकं वीस्वासमं कमजोर रहत आनं मटन खात ना, पन फक्त भाजीपाला खावामं वीस्वास ठेवत✞. 3 पन जो आखंकाही खाय, तो जे खात ना, तेसला नाव नोको पाडाला पायजे. आनं जो मटन खाय ना आनं फक्त भाजीपाला खाय, तो खानरंसवर दोस नोको लावाला पायजे. कजं का देव तेसला बी स्वीकार करेल सय. 4 आनं तो तेसना मालक सय आनं ते तेनं नौकर सारकं सत. तेमन दुसराना नौकरंसवर दोस लावनार तु कोन सय? कजं का ते दोसी सत का बीगर दोसनं सत, हाई ठरावाना आधीकार तेसना मालकपनंज सय. आनं ते नौकरंसला परभु स्वीकार करी लेई, कजं का तेसला बीगर दोसना करानी करता तो शक्तीवान सय.
5 काही लोकं आशे सत का, येखादा दीवसला दुसरा दीवस पेक्षा चांगला मनीसनं मानत. पन आजुन काही लोकं आखा दीवसला येक सारकाज मानत. तेमन आपुन आखं जन सोताना मनवर शंका नोको ठेवाला पायजे आनं जा काही बी आपुन मानत, ता चांगलाज सय मनीसनं समजाला पायजे. 6 जे कोनी येखादा दीवसला चांगला दीवस मनीसनं पाळत, ते परभुला मान देवानी करता पाळत. तशाज जे लोकं आखंकाही खात, ते परभुला मान देवानी करताज खात. कजं का ते जा काही बी खात, तेना साठी ते परभुला आभार मानत. तशाज जे लोकं काही वस्तु खात ना, ते बी परभुला मान देवानी करताज खात ना. आनं ते बी परभुना आभार मानत. 7 कजं का आपलंस मयथीन कोनी बी सोतानी करता जगत ना आनं सोतानी करता मरत ना. 8 कजं का जर आपुन जगत तं, परभुला मान नी करता जगत आनं मरत तं बी, परभुला मान नी करता मरत. तेमन आपुन जगनत नातं मरनत, तरी बी आपुन परभुनंज सत. 9 आनं येसु ख्रीस्त जीवता आनं मरेल आखं लोकंसना परभु बनाला पायजे मनीसनं तो मरना आनं परत जीवता व्हयना. 10 तं मंग काही वीस्वासी भाऊ आनं बयनीसवर कजं तुमं दोस लावत? आनं आजुन काही वीस्वासी भाऊ आनं बयनीसला कजं तुमं नाव पाडत? कजं का आपुन आखंसला देवनी पुडं हीसोब देवानी करता हुबं रहना पडी. 11 कजं का देवना वचनमं आशा लीखेल सय का,
✞"परभु सांगय, मी खरज जीवता देव सय, तेमन आखं लोकं मनी समोर गुडगं टेकीसनं नमन करीत. आनं मी परभु सय मनीसनं आखं लोकं तेसना तोंडघाई कबुल करीत."
12 तेमन आपुन आखं जनंसला जेनतेना हीसोब देवला देना पडी.
दुसरंसला पापमं ली जावु नोका
13 तेमन आतं पईन आपुन येक दुसरंसवर दोस लावाना बंद कराला पायजे. पन आशा नक्की करुत का, आपुन काही बी आशा काम नोको कराला पायजे का, जेनी द्वारा दुसरा वीस्वासी पापना रस्तामं नींगी जाई. 14 मी परभु येसुवर वीस्वास ठेवय आनं माला पक्का मायती सय का, कोनती बी खावानी वस्तु खराब/आशुध ना सय. पन येखादा मानुस जर वीस्वास ठेवय का, हाई खावाना चांगला ना सय तं, ती वस्तु तेनी करताज चांगली ना/आशुध सय. 15 आनं जर तुना खावानी द्वारा येखादा वीस्वासी भाऊ नातं बईनला दुख वाटता व्हई तं, तु तुना जीवनमं मया दखाडय ना. तेमन तुना खावानी द्वारा येखादाना वीस्वासला नास करु नोको. कजं का तेना साठी बी येसु ख्रीस्त सोताना जीव दीना सय. 16 तेमन तु आश्या गोस्टं करु नोको जेनी द्वारा जा तुना साठी चांगला सय, तेला दुसरं लोकं वाईट नोको सांगाला पायजे. 17 कजं का खावामं आनं पेवामं देवना राज्य ना सय. पन आपुन नीतीवान जीवन जगुत आनं आखंसनी संगं शांतीमं रहुत आनं पवीत्र आत्माना देयेल आनंदमं जीवन जगुत तं, देव आपुनवर राज्य करी. 18 आनं जो कोनी आशा जीवन जगीसनं येसु ख्रीस्तनी सेवा करय, तो देवना आवडता बनी आनं आखं लोकं तेला मान देईत.
19 तेमन आपुन कायम येक दुसरंसनी संगं शांतीमं रव्हानी कोशीत कराला पायजे. आनं येक दुसरंसला वीस्वासना जीवनमं भक्कम बनाडानी कोशीत कराला पायजे. 20 आनं तुमना खावापेवानी द्वारा देवना कामना नास करु नोका. आखा वस्तु खावानी करता चांगलाज सय. पन जो वस्तु खावानी द्वारा येखादा मानुसला पापना रस्तामं ली जाय तं, ता खावाना चुकीना सय. 21 जर मटन खावानी द्वारा नातं दारु पेवानी द्वारा आनं काही बी करानी द्वारा येखादाना वीस्वासना नास व्हई रहना सय तं, ता नोको कराला पायजे. 22 आनं या गोस्टीसनी बद्दल तुमं जा काही बी वीस्वास ठेवत, ता तुमपनंज आनं देवपनंज रहु द्या. आनं काही लोकंसनी नजरमं जा चांगला सय, ताज ते करत. आनं ता करानी करता तेसला वाईट वाटय ना. तशे लोकं धन्य सत. 23 पन जे लोकं मनमं शंका ठेईसनं काही बी खात, तेसला देव तेनी नजरमं दोसी ठरावय. कजं का ते वीस्वास ठेईसनं खात ना. आनं जा काही बी बीगर वीस्वासथीन करामं येय, ता पाप सय.