13
तुमना आधीकारी लोकंसला मान द्या
1 तुमं आखं वीस्वासी लोकं तुमना आधीकारीसना आधीमं रव्हाला पायजे. कजं का ते आधीकारीसला देवज आधीकार देयेल सय आनं तोज नीवाडीसनं ठेयेल सय. 2 तेमन जे लोकं आधीकारीसना वीरोध करत, ते देवना करेल कामला वीरोध करत. आनं तेसला दंड भेटी. 3 आनं जे लोकं चांगला काम करत, ते आधीकारीसला दखी घाबरत ना. पन जे वाईट काम करत, तेज घाबरत. तेमन जर आधीकारीसला दखीसनं तुमं घाबराला ना दखत तं, तुमं चांगला काम कराला पायजे. तवं ते तुमला शबास सांगीत. 4 कजं का तुमना चांगला करानी करता देव तेसला तेनं सेवक मनीसनं नीवाडेल सय. पन जर तुमं वाईट काम करशात तं, तुमं तेसला दखीसनं घाबराला पायजे. कजं का तुमला दंड देवाना आधीकार तेसना हातमं देवामं ईयेल सय. आनं जे वाईट करत तेसला दंड देवानी करता देव तेनं सेवक मनीसनं तेसला नीवाडेल सय. 5 तेमन तुमं तेसना आधीमं रव्हाला पायजे. पन फक्‍त दंड भेटी मनीसनं ना, पन हाई कराना चांगला सय मनीसनं तुमं तेसना आधीनमं रव्हाला पायजे. 6 आनं येनी करताज तुमं आधीकारीसला कर देत. कजं का देव जा काम देयेल सय, ता ते करत. 7 आनं ते आधीकारीसला तुमं जा देवाना व्हई ता दी टाका. मंजे जर तेसला कर देवाना व्हई तं, तेसला दी टाका. आनं तेसला दखी घाबराना व्हई तं, तेसला दखी घाबरा. आनं तेसला मान देवाना व्हई तं, तेसला मान द्या.
येक मेकंसवर मया करा
8 तुमं येक मेकंसनी कोनती बी गोस्टंमं दाबायेल रहु नोका. पन फक्‍त मया करामं दाबायेल रहा. कजं का जो कोनी दुसरंसवर मया करय, तो देवना आखा नीयम पाळय. 9 कजं का देवना नीयम सय का,
"शीनाळीना काम करु नोको, खुन करु नोको, चोरी करु नोको आनं लोभ लालुस धरु नोको."
या आख्या आज्ञा आनं आजुन दुसरी कोनती बी आज्ञा व्हई तं, त्या आख्या येकंज आज्ञानी खाल ई लागत. आनं ती आज्ञा हाई सय का,
"जशा सोतावर, तशाज आपला शेजारनंसवर बी मया करा."
10 कजं का जर तुमं दुसरंसवर मया करत तं, तेसना वाईट करु शकत ना. तेमन मया कराना मंजे आखा नीयम पाळाना सय.
येसु ख्रीस्‍त परत येयी मनीसनं तयार रहा
11 आनं आपुन कोनता काळमं जीवन जगी रहनं सत, हाई तुमला मायती सय. तेमन जा मी तुमला सांगना, ता करत रहा. आतं जे लोकं नीजेल सारकं सत, तेसना जागं रव्हाना टाईम ई लागना सय. कजं का जवं आपुन देववर वीस्वास ठेवनत, तवं देव आपुनला तारन देवाना टाईम ईतला शेजार ना व्हताल, पन आतं तो टाईम पक्‍का शेजार ई लागना सय. 12 आतं रात सरामं वना सय आनं कायमना दीवसना ऊजाळा जवळ ई लागना सय. तेमन पापना आंधारामं लोकं जे वाईट काम करत, ते आखं आपुन सोडी देवाला पायजे. आनं जशा येक शीपाई लडाईला जावानी आगुदार आखं हात्यार लीसनं तयार रहय, तशाज आपुन दीवसना ऊजाळाना चांगला काम करानी करता तयार रव्हाला पायजे. 13 आनं दीवसना ऊजाळामं जीवन जशा जगत, तशा चांगला जीवन आपुन जगाला पायजे. आपुन मजाना जीवन आनं दारु पेवाना जीवन जगाला नोको पायजे. आनं शीनाळीना जीवन आनं वाईट जीवन बी आपुन जगाला नोको पायजे. आनं आपुन दुसरंसनी संगं कज्या नोको कराला पायजे आनं दुसरंसला दखीसनं आपला जीव नोको बळाला पायजे. 14 पन जशा परभु येसु ख्रीस्‍त जीवन जगना, तशाज तुमं बी जीवन जगा. आनं पापना सोभाव कडं ध्यान नोको द्या. कजं का तेनी द्वारा तुमला वाईट काम करानी ईशा व्हई.