12
नवीन जीवन जगा
1 मनं भाऊ आनं ब‍ईन, देव आपुनवर दया करेल सय. तेमन मी तुमला वीनंती करय का, तुमं सोताना जीवनला येक बलीदाननी सारका देवला आर्पन करा. आनं देवला खुश करानी सारका पवीत्र जीवन जगा. हाई देवनी भक्‍ती कराना चांगला रस्ता सय. 2 आनं जगनं लोकं ज्या वाईट गोस्टी करत, तीसला तुमं करु नोका. पन तुमना मनना जुना वीचारला देवला बदलु द्या, मंजे तुमं येक नवीन मानुस बनशात. तवं तुमना साठी देवनी पुरी ईशा काय सय, हाई तुमला समजी. आनं ती देवनी ईशा पक्‍की चांगली सय आनं ती ईशा प्रमानं आपुन जीवन जगुत तं, तेला पक्‍का आनंद वाटय आनं आपुन चांगला जीवन जगु शकत.
देवना देयेल दानला चांगला ऊपयोग करा
3 मनं भाऊ आनं बईन, मावर देव दया करीसनं तुमना साठी धाडेल सय. तेमन मी तुमं आखंसला सांगय का, तुमं सोताला बरोबर समजी ल्या. मंजे, तुमं जीतलाना लायक सत, तेनी पेक्षा सोताला जास्त समजु नोका. पन तुमना ताकत कीतला सय, येनी बद्दल तुमला देवना देयेल वीस्वास प्रमानं वीचार करा आनं तुमं जशे सत, तशेज सोताला समजा.
4 आपुन प्रतेकला येक येक शरीर रहय, पन बरज भाग रहत. आनं ते प्रतेक भागना आलंग आलंग काम रहत. 5 तशेज आपुन वीस्वासी लोकं बी सत. आपुन बरज वीस्वासी लोकं सत, पन येसु ख्रीस्‍तमं आपुन येक शरीरनी सारकं सत. आनं आखं जन तो येकंज शरीरना आलंग आलंग भाग सत. आनं आखं भागना येक मेकंसनी संगं समंध सय. 6 आनं देव आपुनवर दया करीसनं आलंग आलंग काम करानी करता आलंग आलंग प्रकारना दान देयेल सय. तेमन जर येखादाला देवना वचन सांगाना दान भेटेल सय तं, जो वीस्वास तेला देव देयेल सय, तो वीस्वासघाई तो वचन सांगाला पायजे. 7 आनं जर येखादाला येक दुसरंसनी सेवा कराना दान भेटेल सय तं, तो सेवा कराला पायजे. आनं जर येखादाला शीकाडाना दान भेटेल सय तं, तो शीकाडाला पायजे. 8 आनं जर येखादाला हीम्मत देवाना दान भेटेल सय तं, तो हीम्मत देवाला पायजे. आनं जर येखादाला दानधर्म कराना दान भेटेल सय तं, तो ता मोकळा मनथीन कराला पायजे. आनं जर येखादाला आधीकारी बनानी करता दान भेटेल सय तं, तो तेना काम करत रव्हालाज पायजे. आनं जेला दया कराना दान भेटेल सय, तो खुसीथीन कराला पायजे.
ख्रीस्‍ती जीवन जगाना नीयम
9 तुमं येक दुसरंसवर खरज मया करा. जा वाईट सय, तेला नाकारा आनं जा चांगला सय तेलाज धरी ठेवा. 10 येक मेकंसवर भाऊ ब‍ईननी सारका मया करा. आनं सोतानी पेक्षा दुसरंसला मोठा मानीसनं तेसला मान द्या. 11 कठीन काम करा, पन आळसी बनु नोका. आनं पुरा रुदयथीन देवनी सेवा करा. 12 तुमं जा आसा ठेवनं सत, तेनी बद्दल आनंद करा. आनं जवं तुमवर संकट येय, तवं धीर धरा. आनं कायम प्राथना करत रहज्या. 13 जे वीस्वासी लोकंसला गरज सय, तेसला मदत करा. आनं लोकंसना पावनसार करानी करता कायम तयार रहज्या. 14 जे तुमना वीरोध करत, तेसला श्राप देवु नोका, पन तेसला आशीर्वादंज भेटानी करता देव कडं प्राथना करा. 15 जे आनंद करत तेसनी संगं तुमं बी आनंद करा. आनं जे दुखमं सत, तेसना दुखमं तुमं बी भाग ल्या. 16 आनं येक दुसरंसनी संगं मीळीसनं शांतीमं रहज्या. आनं बढाई मारु नोका, पन जे नम्र सत तेसनी जोडमं रहज्या. आनं सोताला शाहना समजु नोका. 17 जे तुमना वाईट करत, तेसना वाईट करीसनं बदला लेवु नोका. आनं जा आखंसनी नजरमं चांगला सय, ताज करानी कोशीत करा. 18 तुमला जीतला करता येई, तीतला आखं लोकंसनी संगं शांतीमं रहज्या.
19 मनं भाऊ आनं ब‍ईन, कोनी तुमला काही करना तं, तेनी बद्दल बदला लेवु नोका. पन तेना बदला देवला लेवु द्या. कजं का देवना वचनमं लीखेल सय का,
"देव सांगय, बदला लेवाना मना काम सय, आनं मी तेसना फेड करसु. 20 पन तुमं आशा करा का, जर तुमना दुशमन भुक्‍या सय तं, तेला खावाला द्या. आनं जर तो तीसा व्हई तं, तेला पेवाला पानी द्या. कजं का जर तुमं आशा करशात तं, तेला पक्‍का लाज वाटी."
21 आनं जर कोनी तुमना वीरुद वाईट करना तं, तेना बदला वाईट करीसनं देवु नोका. कजं का तुमं तशा करशात तं, तेना वाईट काम तुमवर वीजय व्हई जाई. पन तुमं चांगला काम करीसनं तेना वाईट गोस्टीसला जीकी ल्या.