11
देव यहुदी लोकंसला सोडी दीना ना
1 तं मंग मी वीचारय का, देव तेनं यहुदी लोकंसला सोडी दीना सय का? कधीज ना. कजं का मी बी यहुदी लोकंस मतला सय. आनं मी आब्राहामनी पीढीना बन्‍यामीनना कुटुम मतला सय. 2 जे यहुदी लोकंसला देव पयला प‍ईन नीवाडेल सय, तेसला तो सोडी दीना ना. देवना वचन सांगनार येलीयानी बद्दल काय लीखेल सय, हाई तुमला मायती सय. तो यहुदी लोकंसना वीरुद देवपन आशा वीनंती करना का,
3  "हे परभु, ते तुनं वचन सांगनारंसला जीवता मारी टाकनं सत. आनं ते तुन्‍या वेदीसला पाडी टाकनं सत. आनं तेस म‍ईन मीज येकटा रहना सय. आनं माला बी ते मारी टाकाला दखी रहनं सत."
4 पन तेला देव काय सांगना? तो सांगना का,
"जे लोकं बाल देवनी पाय पडनत (गुडगं टेकनत) ना, आशे सात हाजार लोकंसला मी मना साठी राखी ठेयेल सय."
5 आनं आतं बी तशाज सय. देव आपुन यहुदी लोकंसवर दया करना आनं काही लोकंसला नीवाडी ठेवना सय. तेमन आतं परन काही लोकं तेवर वीस्वास ठेवनं सत. 6 आनं तेसना काही बी करेल कामघाई ना, पन तेसवर दया करीसनं तो तेसला नीवाडी ठेवना सय. जर तेसना करेल कामघाई देव नीवाडी ठेवता व्हई तं, तेनी दया काहीज ऊपयोगनी ना सय.
7 तं मंग काय? जे यहुदी लोकं नीतीवान बनानी करता पक्‍का कोशीत करी रनलत, ते बनु शकनत ना. पन जेसला देव नीवाडना, ते नीतीवान बनी गयत. आनं बाकीनंसना मन कठीन व्हई गया. 8 आनं तेसला देवना वचन प्रमानं व्हयना. तो वचन आशा सय का,
"देव तेसना मन बधीर करी दीना. तेमन ते काही समजु शकनत ना. आनं डोळा रहीसनं बी ते दखु शकत ना आनं कान रहीसनं बी ते आयकु शकत ना. आनं आतं परन तशाज चाली रहना सय."
9 आनं दावीद बी सांगय का,
"तेसना जेवन करीसनं मजा करानाज तेसनी करता येक फासा सारका बनीसनं तेसला नास कराला पायजे. आनं तेसना आशीर्वादंज तेसला खाल पाडाला पायजे. आनं ते जा करनत, तेना साठी तेसला दंड भेटाला पायजे. 10 आनं तेसना डोळा आंधळा व्हईसनं तेसला काही नोको दखावाला पायजे. आनं गुलाम सारका ते कायम मोठा वझा ऊचलत तेनी मुळे तेसनी पाठ कायम वाकडी व्हई जावाला पायजे."
11 मंग मी वीचारय का, ते यहुदी लोकं पडी गयत आनं ते कधीज उठु शकनत ना, आशा सय का? आशा ना सय. पन ते देवनी आज्ञा पाळनत ना, तेमन देव बीगर यहुदी लोकंसना तारन करना. आनं ये व्हईथीन ते यहुदी लोकंसना जीव बळाला पायजे मनीसनं देव आशा करना. 12 आनं देव तेसना साठी जो तारन ठेयेल व्हताल, तेला ते चुकी करीसनं नाकारी दीनत, तेमन जगनं आखं बीगर यहुदी लोकंसला पक्‍का आशीर्वाद भेटना. आनं जर शेवट ते देवना तारनला स्वीकार करीत तं, तेसनी द्वारा जगनं लोकंसला आजुन पक्‍का आशीर्वाद भेटी.
बीगर यहुदी लोकंसला तारन भे‍टना
13 आतं मी बीगर यहुदी लोकंसला सांगय. कजं का देव माला बीगर यहुदी लोकंसनी करताज धाडेल सय. तेमन मी मनी सेवाला पक्‍का मतवंना मनीसनं मानय. 14 येनी करता का, तुमं बीगर यहुदी लोकंसला दखीसनं मनं सोतानं यहुदी लोकंसना जीव बळाला पायजे, आनं कदाचीत तेस मतलं काही लोकंसला तारन भेटी जावाला पायजे. 15 कजं का जवं देव ते यहुदी लोकंसला नाकारी दीना, तवं जगनं दुसरं लोकं, जे पयलंग देवनं दुशमन व्हतलत, तेसना आनं देवना चांगला समंध व्हई गया. पन जर ते देवला स्वीकार करी लेईत तं, ते मरेलनं जीवतं सारकं व्हई जाईत. 16 जर देवला आर्पन करेल पयला फळ चांगला सय तं, बाकीनं आखा फळ बी चांगलाज सय. आनं जर येखादा झाडनी मुळ चांगली सय तं, तेन्‍या फाटा बी चांगल्याज सत. तशाज आब्राहाम आनं ते यहुदीसनं वाडावडील देवनं लोकं व्हतलत, तेमन ते बी देवनं लोकंज व्हईत. 17 आनं यहुदी लोकं आशे झाडंसनी सारकं सत का, जेसला फळ देवानी करता देव लावना सय आनं देखरेख करी रहना सय. पन जे झाडं तेनं तेनं जंगलमं नींगेल सत, तुमं बीगर यहुदी लोकं तेसनं सारकं सत. मंग आतं देवना लायेल झाडंसन्‍या काही फाटासला तोडी टाकामं वना. आनं तुमं जे जंगल मतलं झाडंसन्‍या फाटा सारकं सत, तुमला कलम करीसनं जोडामं वना सय. तेमन तुमं बी मुळनी संगं जोडाय गयं सत आनं तुमला बी ती मुळ प‍ईन चांगला पानी भेटना. 18 तेमन त्या चांगल्या फाटासला तोडीसनं तुमला जोडामं वना मनीसनं तुमं बढाई मारु नोका. आनं याद ठेवा का, तुमं ती मुळला आधार देत ना, पन ती तुमला आधार देय. 19 आनं कदाचीत तुमं सांगु शकसात का, आमला त‍ई कलम करीसनं जोडानी करता तेसला तोडामं वना. 20 हाई खरज सय. ते येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवनत ना, तेमन तेसला तोडामं वना आनं तुमं वीस्वास ठेवनत, तेमन तुमला जोडामं वना. तेमन बढाई मारु नोका, पन भीवाईसनं रहज्या. 21 कजं का जर देव पयल्या फाटासला बी सोडना ना तं, कदाचीत तुमला बी सोडावु ना. 22 तेमन तुमं फक्‍त देवनी दयालाज दखु नोका, पन तेना कडंकपनाना सोभावला बी तुमं दखा. आनं जे तेना आयकत ना, तेसना साठी तो पक्‍का कडंक सय. पन जर तुमं तेवर वीस्वास ठेयी रहशात तं, तुमवर तो दया करत रही. नातं तुमला बी तो झाडन्‍या फाटासनी गत तोडी टाकी.
23 आनं जर ते यहुदी लोकं परत देववर वीस्वास ठेवनत तं, तेसला बी कलम करीसनं झाडला जोडामं येई. कजं का हाई करानी करता देव शक्‍तीवान सय. 24 आनं तुमं जंगल मतलं झाडंसन्‍या फाटा सारकं व्हतलत, पन देव तुमला तोडीसनं घरना शेजारना झाडला जोडी दीना. आनं जो ना व्‍हवाला पायजे व्हताल, तेला तो करी दखाडना. तेमन ज्या पयल्या फाटासला तो तोडी टाकेल व्हताल, तेसला तो परत जोडु शकावु ना का?
यहुदी लोकंसला बी तारन भेटी
25 मनं भाऊ आनं ब‍ईन, तुमं सोताला शाहना नोको समजाला पायजे. तेमन मनी ईशा सय का, तुमं हाई गुपीत गोस्टं समजी लेवाला पायजे. आनं ती गोस्टं हाई सय का, यहुदी मतलं काही लोकंसना रुदय कठीन व्हई जायेल सय. पन हाई कठीनपना कायम रहनार ना सय. आनं जीतलं बीगर यहुदी लोकंसला येसु ख्रीस्‍तपन येवानी करता देव नीवाडेल सय, ते आखं लोकं ई लागनत तं, तो कठीनपना नींगी जाई. 26 नंतर देव आखं यहुदी लोकंसना तारन करी. कजं का देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"तारन देनार यरुशलेम मयथीन येई. आनं तो याकोबनी पीढीनं लोकंस पईन तेसना वाईट कामंसला दुर करी. 27 आनं मी तेसना आखा पापनी माफ करी दीसु मनीसनं तेसनी संगं मी मना करार करसु."
28 आनं ते यहुदी लोकं सुवार्ताला नाकारी दीनत, तेमन ते देवनं दुशमन बनी गयत. आनं हाई तुमं बीगर यहुदी लोकंसना फायदानी करताज व्हयना. पन देव यहुदी लोकंसनं वाडावडीसला वचन देयेल व्हताल, तेमन ते यहुदी लोकंसला तो नीवाडेल सय आनं तेसवर पक्‍का मया करय. 29 कजं का जे लोकंसला तो नीवाडय आनं आशीर्वाद देय, तेसनी बद्द‍ल तो तेना मन कधीज बदलय ना. 30 आनं येक टाईमला तुमं बीगर यहुदी लोकं देवनी आज्ञा पाळनारं ना व्हतलत. पन आतं ते यहुदी लोकं देवला नाकारी दीनत, तेमन तुमवर दया करामं वना सय. 31 तशाज आतं ते बी देवनी आज्ञा पाळनारं ना सत. पन जशा तुमवर दया करामं ईयेल सय, तशाज तेसवर बी येक दीवस दया करामं येई. 32 कजं का येक दीवस देव आखं लोकंसवर तेनी दया करी मनीसनं आतं तेसला आज्ञा मोडानी संधी देयेल सय.
33 खरज, देव तेनी बुधी आनं ज्ञानघाई जा करना सय, ता पक्‍का मोठा सय. आनं तो जा नक्‍की करना सय, ता कोनला समजावु ना. आनं तेना काम कराना तरीका बी कोनी समजु शकावुत ना. 34 कजं का देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"देवना मन मतला वीचारला कोन समजु शकय? आनं कोन तेला सल्‍ला देवु शकय? 35 आनं तो परत देवालाज पायजे मनीसनं कोन तेला पयलंग काही देय?"
36 कजं का तोज आखंकाही बनाडेल सय. आनं तेघाईज आखंकाही चाली रहना सय. आनं तेनाज आखंकाही सय. येनी करता का, ते कायम तेलाज मान देवाला पायजे. आमेन.