9
देव ईस्रायेल लोकंसला नीवाडना सय
1 मी येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवय, तेमन मी खोटा बोलय ना पन खरा बोलय. आनं मना मजारना मन पवीत्र आत्माघाई चालय आनं मनी बद्दल साक्षी देय का, 2 माला पक्‍का दुख वाटय आनं मना रुदयमं कायम वाईट वाटय. 3 कजं का मनं भाऊ आनं ब‍ईन, जे लोकं मना सोताना यहुदी जातनं सत, ते देव प‍ईन आलंग व्हई गयं सत. आनं माला वाटय का, जर माला देव प‍ईन श्राप भेटी आनं येसु ख्रीस्त पईन माला आलंग करी देवामं येयी तरी बी चाली, पन तेसला मी देव कडं ली येवालाज पायजे. 4 ते ईस्रायेल लोकं सत आनं देव तेसला सोतानं पोरे बनाडानी करता नीवाडेल सय. आनं तेनं पोरे बनाना मोठा मान तो तेसला देयेल सय आनं तेसनी संगं करार करीसनं नीयम देयेल सय. आनं खरी भक्‍ती कराला तेसला तो शीकाडेल सय आनं तेसला वचन देयेल सय. 5 आनं ते तेसनं मोठलं मोठलं लोकंसनी पीढीमं जल्म लीयेल सत. आनं तेसमंज येसु ख्रीस्‍त मानुसना रुप लीसनं जल्म लीना. आनं तोज देव सय आनं आखंसवर सता चालाडनार तोज सय. आनं तेनीज स्‍तुती कायम व्‍हवाला पायजे. आमेन.
6 पन देव जो वचन देयेल व्हताल, तो पुरा करानी करता तो चुकाय गया, आशा ना सय. पन जे लोकं ईस्रायेल लोकंसनी पीढीमं जल्म लीनत, तेस म‍ईन काही जन देवनं लोकं ना सत. 7 आनं जे आब्राहामनी पीढीमं जल्म लीनं सत, तेस म‍ईन काही जन खरज आब्राहामनं पोरे ना सत. कजं का देव आब्राहामला सांगनाल का,
"फक्‍त ईसहाकनी पीढीमं जे जल्म लेईत, तेसलाज तुनं पोरे सांगामं येई."
8 येना आर्थ हाई सय का, आब्राहामनी पीढीमं जल्म लीयेल आखं जन देवनं पोरे सत, आशा ना सय. पन देवना देयेल वचन प्रमानं जे ईसहाकनी पीढीमं जल्म लीनत, तेसलाज खरं पोरे सांगामं वना. 9 कजं का आब्राहामला देव आशा वचन देयेल व्हताल का,
"पुडला वरीस हाई टाईमला जवं मी परत ईसु, तवं साराला येक पोर्‍या व्हई जायेल व्हई."
10 आनं तो पोर्‍या आपला पुर्वज ईसहाक व्हताल आनं तो रीबकानी संगं लगीन करना. मंग रीबका बी दोनदीवसी व्हईसनं दोन पोरेसला जल्म दीनी. 11-12 आनं ते पोरेसना जल्मनी आगुदार, आनं ते पोरे काही बरा वाईट करानी आगुदार देव तीला सांगनाल का, तुना धाकला पोर्‍या मोठा पोर्‍यावर आधीकार चालाडी. आनं हाई दखाडानी करता देव तीला आशा सांगना का, येखादा मानुसना कामघाई तो तेला नीवाडय ना. पन हाई तेवरज सय का, तेनी योजना साठी तो कोनला बी नीवाडु शकय. 13 आनं देवना वचनमं आशा बी लीखेल सय का,
"मी याकोबवर मया करना सय, पन येसावाला नाकारना सय."
14 तं मंग काय? देव बरोबर न्‍याय करय ना, आशा आपुन सांगुत का? कधीज ना. 15 कजं का तो मोसाला सांगना का,
"जेवर माला दया कराना सय, तेवर मी दया करसु. आनं माला जेनी कीव कराना सय, तेनी मी कीव करसु.
16 तेमन लोकंसनी ईशाघाई नातं तेसना पक्‍की कोशीतघाई देव तेसला नीवाडय ना. पन तो कोनला नीवाडय, हाई फक्‍त तो दया करनार देववरंज सय. 17 कजं का देव तेना वचनमं मीसर देशना राजा फारोला आशा सांगना का,
"येनी करता मी तुला राजा बनाडना सय का, तुघाई मनी शक्‍ती मी दखाडसु आनं येनी द्वारा जगनं आखं लोकंसला मनी बद्दल मायती पडाला पायजे."
18 तेमन जो मानुसवर दया करानी देवनी ईशा सय, तेवरंज तो दया करय. आनं जो मानुसना मन कठीन करानी तेनी ईशा सय, तेनाज मन तो कठीन करय.
देवना संताप आनं तेनी दया
19 मंग येखादा जन माला वीचारु शकय का, जर देव आखा काही तेनी ईशाघाई करय तं, मंग तो कजं आपुनवर दोस लावय? आनं तेनी ईशाला कोनी बी वीरोध करु शकावु ना, मंग कजं तो तशा करय? 20 पन मी तुमला सांगय का, आपुन फक्‍त मानसंज सत आनं देवला ऊलटीसनं बोलनारं आपुन कोन सत? आनं मडका बनाडनारला येखादा मडका कधीज सांगु शकय ना का, तु मला कजं आशा बनाडना? 21 कजं का मडका बनाडनार तेनी ईशाघाई येकंज चीखुलना गोळा प‍ईन येक मडकाला चांगला काम साठी आनं दुसराला हलका काम साठी बनाडाना आधीकार तेपन सय. 22 तशाज देवना हातमं बी संताप कराना आनं तेनी ताकत दखाडाना आधीकार सय. पन जेसवर तेना संताप येय आनं जेसला नास व्‍हवानी करता नीवाडेल सय, तेसना तो पक्‍का सहन करय. 23 आनं जे लोकंसवर तो दया करय, ते लोकंसला तो कीतला शक्‍तीवान सय, हाई दखाडानी करता तो तेसना सहन करना. आनं ते लोकंसला तो तेना मोठा मानमं भागीदार बनाडानी करता पईला पईन तयार करना सय. 24 आनं येनी करता जेसला तो नीवाडना सय, ते लोकं आपुनंज सत. आनं ते लोकंसला तो फक्‍त यहुदी लोकंस म‍ईनंज नीवाडना ना, पन बीगर यहुदी लोकंस म‍ईन बी नीवाडना सय. 25 आनं होशेयाना लीखेल पुस्तकमं देव आशा सांगय का,
"जे मनं लोकं ना व्हतलत, तेसला मी मनं लोकं सांगसु. आनं जे लोकंसला मी पयलंग मया करता ना, तेसला आतं मी मया करसु."
26 आनं आखु आशा सांगामं ईयेल सय का,
"आनं जी जागामं देव तेसला सांगना का, तुमं मनं लोकं ना सत, त‍ई तेसला जीवता देवनं पोरे सांगामं येईत."
27 आनं देवना वचन सांगनार यशया बी ईस्रायेल लोकंसनी बद्दल आराळ्या दीसनं सांगना का,
"जर ईस्रायेल लोकं समुद्रनी वाळुनी ईतलं व्हईत, तरी बी तेस म‍ईन थोडंज लोकंसला तारन भेटी. 28 कजं का जगना आखं लोकंसना जो न्याय मी करसु मनीसनं देव सांगना सय, तो न्याय तो पक्‍का लवकर आनं पुरा रीतथीन करी."
29 आनं येनी बद्दल यशया आखु सांगेल सय का,
"जर आखंस पेक्षा शक्‍तीवान देव आपला पोरेसला सोडी दीता ना तं, आपुन सदोम आनं गमोरानं लोकंसनी गत नास व्हई जातत."
ईस्रायेल लोकं देववर वीस्वास ठेवत ना
30 तं मंग आपुन काय सांगुत? आपुन सांगु शकत का, बीगर यहुदी लोकं देवनी नजरमं नीतीवानना जीवन जगानी कोशीत करनत ना, पन ते येसु ख्रीस्तवर वीस्वास ठेवनत मनीसनं देवनी नजरमं नीतीवान बनी गयत. 31 पन जे ईस्रायेल लोकं सोताला देवनी नजरमं नीतीवान बनाडानी करता नीयम पाळी रनलत, ते बनु शकनत ना. 32 कजं आशा व्हयना? कजं का देवनी नजरमं नीतीवान बनानी करता येसु ख्रीस्तवर वीस्वास ठेवानी तेसनी ईशा ना व्हतील. पन नीयम पाळीसनं नीतीवान बनानी करता ते कोशीत करनत. येसु ख्रीस्त येक दगड सारका सय. आनं तेवर वीस्वास ठेवानी ते ईस्रायेल लोकंसनी ईशा ना व्हतील मनीसनं ते तो दगडला ठेस लागीसनं तेवर पडी जावानी सारका व्हई गयत. 33 आनं देवना वचनमं लीखेल प्रमानं तशा व्हयना. त‍ई आशा लीखेल सय का,
"दखा, मी यरुशलेममं येक दगड ठेवय. तेघाई जास्त लोकंसला ठेस लागी जाई आनं ते पडी जाईत. पन जे लोकं तेवर वीस्वास ठेईत, ते कधी फजीत व्‍हवावुत ना."