8
पवीत्र आत्माघाई जीवन जगा
1 तेमन जे लोकंसनी संमंध येसु ख्रीस्तनी संगं जोडाय गया सय, तेसला काही दंड भेटावु ना. 2 कजं का जे तेवर वीस्वास ठेवत, तेसला पवीत्र आत्मानी शक्ती जीवन देय. आनं ती आत्मानी शक्ती येसु ख्रीस्तनी द्वारा आपुनला पाप आनं आत्मीक मरन पईन सुटका देयेल सय. 3 आनं आपला पापना सोभाव मुळे आपुन देवना नीयमला पाळु शकनत ना, तेमन तो नीयम आपुनला वाचाडु शकना ना. पन जो काम तो नीयम करु शकना ना, तेला देव करी दखाडना. आनं हाई करानी करता देव तेना पोर्याला हाई जगमं धाडना. आनं आपला पापना दंड सोता भोगानी करता तेना पोर्या आपली सारका पापी मानुसना रुप लीसनं वना. आनं आशा करीसनं देव पापना ताकत जो आपुनला गुलाम बनाडेल व्हताल, तेला नास करी टाकना. 4 देव आशा करना मनीसनं नीयममं जा लीखेल सय, ता आपुन आतं पाळु शकत. कजं का आपला पापना सोभावनी ईशाघाई आतं आपुन जीवन जगत ना, पन पवीत्र आत्मानी ईशाघाई जीवन जगत. 5 आनं जे लोकं पापना सोभावघाई जीवन जगत, ते पापन्या गोस्टीस कडं मन लावत. पन जे लोकं पवीत्र आत्मानी ईशाथीन जीवन जगत, तेसला पवीत्र आत्मा जा कराला सांगय, तेनी कडं ते मन लावत. 6 आनं जे लोकं पापना सोभाव कडं मन लावत, ते आत्मीक मरनना रस्तामं जात. पन जे लोकं पवीत्र आत्मा कडं मन लावत, तेसला कायमना जीवन आनं शांती भेटय. 7 आनं जर येखादा मानुस पापना सोभाव कडं मन लावय तं, तो देवना दुशमन व्हई जाय. कजं का तो देवना नीयम पाळय ना आनं कधीज पाळु शकावु ना. 8 आनं जे पापना सोभावघाई जीवन जगत, ते देवला खुश करु शकत ना.
9 पन जर तुममं देवना आत्मा रहय तं, तुमं तुमना पापना सोभावघाई जीवन जगत ना, पन पवीत्र आत्मानी ईशाथीन जीवन जगत. आनं जर येखादामं देवना आत्मा ना सय तं, तो येसु ख्रीस्तना ना सय. 10 पन जर ख्रीस्त आपला जीवनमं सय तं, आपुन शरीरमं मरी जावुत तरी, आपला आत्मा जीवता रही. कजं का ख्रीस्त आपुनला देवनी नजरमं नीतीवान बनाडेल सय. 11 आनं जो देव येसु ख्रीस्तला मरन मयथीन जीवता उठाडेल सय, जर तेना आत्मा आपुनमं रहना तं, जशा तो तेला मरन मयथीन जीवता करना, तशाज जो आपला शरीर मरनारंज सय तेला बी तो जीवता करी. आनं तेना आत्मा जो आपला मजार रहय, तेनी द्वारा तो तशा करी.
12 मंग मनं भाऊ आनं बईन, आपुन येक गोस्टं करालाज पायजे, तो मंजे आपला पापना सोभाव प्रमानं आपुन जीवन जगाला नोको पायजे, पन देवनी ईशा प्रमानं जगाला पायजे. 13 आनं जर आपुन पापना सोभावघाई जीवन जगनत तं, आपुन मरसुत. पन आपला पापना सोभावघाई जा वाईट काम नींगत, ते आपुन देवना आत्माघाई सोडी देवुत तं, आपुन जीवन जगसुत. 14 कजं का जे लोकंसला देवना आत्मा चालाडी रहना सय, ते आखं देवनं पोरे सत. 15 आनं जशा येक गुलाम तेना मालकला घबरय, तशा घाबरीसनं परत तेना गुलाम बनी जावाना आत्मा देव आपुनला देयेल ना सय. पन तो आपुनला आशा आत्मा देयेल सय का, जेनी द्वारा आपुन तेनं पोरेसोरे बनी गयं सत. तेमन आपुन तेला ✞बाप मनीसनं हाक मारु शकत. 16 आनं तो देवना आत्मा सोता आपला मनमं सांगय का, आपुन खरज देवनं पोरे सत. 17 आनं जर आपुन तेनं पोरे सत तं, आपुन बी तेना वारीस सत. आनं जशा येसु ख्रीस्त देवना वारीस सय, तशेज आपुन बी देवनं वारीसंज सत. तेमन जशा देव पईन येसु ख्रीस्तला मोठा मान भेटना, तशाज आपुनला बी भेटी. पन जशा येसु ख्रीस्त दुख भोगना, तशाज आपुनला बी भोगना पडी. तवंज तेला जो मान भेटी, तेमं आपुन बी भागीदार बनसुत.
देववर वीस्वास ठेवनारंसला पुडं मान भेटी
18 मंग पुडं आपुनला मोठा मान भेटनार सय. आनं मी मानय का, आतं आपुन जो दुख भोगी रहनं सत, हाई तो मोठा माननी पुडं काहीज ना सय. 19 कजं का देव जा काही बी बनाडना सय, ते आखं पक्का आसा ठेईसनं वाट दखी रहनं सत का, कोन देवनं खरं पोरे सत हाई येक दीवस तो तेसला प्रगट करी. 20 कजं का देव जा काही बी बनाडना, ते आखं देवना योजनाला पुरा करु शकनत ना. आनं हाई तेसनी सोतानी ईशाघाई व्हयना ना, पन देव तेनी ईशाघाई आशा करना. 21 आनं ते आखंसला देव नासना बंधनमं टाकी दीना सय. पन तेसला बी येक आसा सय. आनं ती आसा मंजे, येक दीवस तेसला हाई बंधन मईन सुटका करामं येई. आनं देवनं पोरेसला येक दीवस जो मोठा मान भेटनार सय, तेमं बी ते भागीदार बनीत. 22 आनं आपुनला मायती सय का, देव जा काही बी बनाडना सय, ते आखं आतं परन पक्कं त्रास भोगी रहनं सत. आनं येखादी बाई पोर्याला जल्म देवानी येखं जशा त्रास वय, तशाज त्रास ते भोगी रहनं सत. 23 आनं फक्त तेज ना, पन आपुन बी तशा त्रास भोगी रहनं सत. आनं जे लोकंसला देव पवीत्र आत्मा दीसु मनीसनं वचन देयेल सय, ते लोकंस मईन आपुनला पयलं तो पवीत्र आत्मा भेटेल सय. तरी बी आपुन तशा त्रास भोगी रहनं सत. कजं का आतं देव आपुनला पापना सोभाव पईन सुटका करी आनं तेनं सोतानं पोरे बनाडी मनीसनं आपुन वाट दखी रहनं सत. 24 आनं आपुन हाई आसा ठेवनत मनीसनं देव आपुनला तारन दीना. आनं आपुन जा भेटानी करता आसा ठेवनं सत, जर ता पयलं पईन आपुनपन सय तं, ती आसा ठेवाना काही गरज ना सय. कजं का येखादी वस्तु भेटी गयी सय तं, तीनी आसा कोन धरीत? 25 पन जो आपुनला भेटेल ना सय, जर तेना साठी आपुन आसा धरी ठेवत तं, आपुन ता भेटय ताव धीर धरीसनं वाट दखत.
26 तशाज जवं आपुनला शक्ती ना रहय, तवं पवीत्र आत्मा आपुनला मदत करय. कजं का कशानी करता प्राथना कराला पायजे, हाई आपुनला मायती ना सय. पन आपुन प्राथनामं जा सांगु शकत ना, ता पवीत्र आत्मा आपला साठी देव कडं वीनंती करीसनं प्राथना करय. आनं तो आशा रीतथीन करय का, ता आपुनला समजय ना. 27 आनं पवीत्र आत्मा तेना मनमं आपला साठी काय प्राथना करी रहना सय, हाई आखंसना रुदय वळखनार देवला मायती पडी जाय. कजं का जशा प्राथना कराला पायजे मनीसनं देवनी ईशा सय, तोज प्रमानं तो पवीत्र आत्मा देवनं लोकंसनी करता प्राथना करय.
28 मनं भाऊ आनं बईन, आपुनला मायती सय का, जे लोकं देववर मया करत आनं तेना हेतुनी करता जे लोकंसला तो नीवाडना सय, तेसला जा काही बी बरावाईट घडय, तेमं देव मदत करय आनं शेवट तेसना चांगलाज व्हई. 29 कजं का जग बनाडानी आगुदार ये लोकंसनी बद्दल देवला मायती व्हताल. आनं ते तेना पोर्या येसु ख्रीस्तनी सारका बनाला पायजे मनीसनं तो तेसला नीवाडेल व्हताल. येनी करता का, येसु ख्रीस्त आखं वीस्वासी भाऊ आनं बयनीसमं देवना पयला पोर्या बनाला पायजे. 30 जे लोकंसला देव आगुदारज नीवाडी ठेयेल व्हताल, तेसला तो तेनी मांगं चालानी करता बलावना. आनं जे लोकंसला तो बलावना, तेसला तो तेनी नजरमं नीतीवान ठरावना. आनं जेसला तो नीतीवान ठरावना, तेसला तो तेना मोठा मानमं भागीदार बनाडना.
देवनी मया पईन आपुनला कोनी आलंग करु शकय ना
31 मंग वरन्या गोस्टीसनी बद्दल आपुन काय सांगुत? जर देव आपली संगं सय तं, कोन आपुनला हारावु शकय?. 32 तो तेना सोताना पोर्याला बी राखी ठेवना ना, पन आपलं आखंसनी करता जीव देवाला दी दीना. आनं जवं तो तेना पोर्या येसु ख्रीस्तलाज आपला साठी दी दीना तेनी संगं आजुन आखंकाही आपुनला देवावु ना का? 33 आनं जे लोकंसला देव नीवाडीसनं नीतीवान बनाडना सय, तेसवर कोनी दोस लावु शकय का? 34 तं मंग आपुन देवनं लोकंसला कोन दोसी ठराई? येसु ख्रीस्त आपुनला दोसी ठराई का? कधीज ना. कजं का तोज येसु ख्रीस्त आपला साठी सोताना जीव दी दीना. आनं फक्त ईतलाज ना, पन देव तेला मरन मयथीन जीवता उठाडना. आनं आतं तो देवना ✞जेवनी कडं बसीसनं आपला साठी प्राथना करय. 35 आनं येसु ख्रीस्तनी मया पईन कोन आपुनला आलंग करु शकय? आपुन कीतला बी दुखमं रहसुत, तरी बी आलंग व्हवु शकत ना. आनं आपला जीवनमं कीतला बी कठीनपना नातं वीरोध येई, तरी बी आपुन आलंग व्हवु शकत ना. आनं आपुनला खावाला काहीज भेटना ना आनं घालाला कपडं भेटनत ना, तरी बी आपुन आलंग व्हवु शकत ना. आनं आपुन कीतला बी संकटमं रहसुत, तरी बी आपुन आलंग व्हवु शकत ना. आनं आपुनला कोनी मारी बी टाकी, तरी बी आपुन आलंग व्हवु शकत ना. 36 आनं देवना वचनमं आशा लीखेल सय का,
✞"आमं तुनं लोकं सत मनीसनं कायम ते आमला मारानी कोशीत करत. आनं जशा मेंडरंसला कापाला ली जात, तशेज ते आमला गनत."
37 आनं जो येसु ख्रीस्त आपुनवर मया करना, तेनी द्वारा या आख्या गोस्टीसमं आपुनला मोठा वीजय भेटय. 38-39 कजं का माला पुरी खातरी सय का, आपला परभु येसु ख्रीस्त आपला साठी जा करना तेघाई देव दखाडी देय का, तो आपुनवर कीतली मया करय. आनं तेनी मया पईन कोनी बी आपुनला आलंग करु शकत ना. मरन नातं जीवन, आनं देवनं दुतं नातं सैतानना आत्मा, आनं हाऊ काळन्या गोस्टी नातं येनारा काळन्या गोस्टी बी आलंग करु शकत ना. तशाज ज्या काही बी आकासमं सत आनं ज्या जमीनना खोल सत, त्या बी आलंग करु शकत ना. आनं देवना बनाडेल कोनती बी वस्तु आपुनला आलंग करु शकत ना.