14
येसु तेनं चेलंसला हीम्मत देय
1 मंग येसु आखु तेनं चेलंसला सांगना, तुमं घाबरु नोका. पन देववर आनं मावर वीस्वास ठेवा. 2 मना बापना घरमं रव्हानी करता पक्या जागा सत. आनं तुमना साठी जगा तयार कराला मी जाई रहना सय. जर तई जगा ना रहत्यात तं, मी तुमला सांगी दीता. 3 आनं मी जाईसनं तुमना साठी जागा तयार करसु आनं परत ईसु. आनं तुमला बी मनी संगं तई ली जासु. येनी करता का जई मी रहसु तई तुमं बी मनी संगं रव्हाला पायजे. 4 आनं मी जई जाई रहना सय, तो रस्ता तुमला बी मायती सय.
5 मंग तेना चेला थोमा सांगना, परभु, तु कई जाई रहना सय, हाई आमला मायती ना सय. तं मंग तो रस्ता आमला कशाकाय मायती रही? 6 येसु सांगना, रस्ता आनं सत्य आनं जीवन मीज सय. आनं मनी द्वारा जावा शीवाय कोनी बी देवबापपन जावु शकावुत ना. 7 जर खरज मी कोन सय हाई तुमं वळखतत तं, तुमं मना देवबापला बी वळखतत. आनं आतं पईन तुमं तेला बी वळखत आनं तेला दखेल सत.
8 मंग तेना चेला फीलीप सांगना, परभु, आमला देवबापला दखाड. फक्‍त येवडाज आमला पायजे. 9 मंग येसु तेला सांगना, फीलीप, ईतला दीवस परन मी तुमनी संगं रहना, तरी बी तु माला वळखना ना का? जो माला दखेल सय, तो देवबापला बी दखेल सय. मंग कशा तु सांगय का, आमला देवबापला दखाड? 10 आनं मी देवबापमं सय आनं देवबाप बी मनामं सय. हाई गोस्टंवर तु वीस्वास करय ना का? आनं ज्या गोस्टी मी तुमला सांगय, त्या मी मना सोताना मनथीन सांगय ना, पन जो देवबाप मनामं रहय, तो मनी द्वारा तेनी काम करय. 11 आनं तुमं वीस्वास ठेवा का, मी देवबापमं सय आनं तो बी मनामं रहय. आनं जर तुमं मना सांगेलवर वीस्वास ठेवत ना तं जे चमत्कारंसना कामं मी करेल सय, तो काम वईथीन तरी तुमं मावर वीस्वास ठेवा. 12 आनं आतं मी मना देवबाप कडं जाई रहना सय. तेमन मी तुमला खरज सांगय का, जे चमत्कारंसना कामं मी करेल सय, ते मावर वीस्वास ठेवनारं लोकं बी करीत. आनं येवडाज ना, पन येनी पेक्षा आजुन मोठमोठलं कामं बी ते करीत. 13 आनं जा काही बी तुमं मना नावमं प्राथना करीसनं मांगशात, ता मी तुमना साठी करसु. येनी करता का, तेनी पोर्‍या मंजे मनी द्वारा लोकंसला मायती पडी का, देवबाप कीतला मोठा सय. 14 तेमन मी सांगय का, खरज तुमं काही बी मना नावमं प्राथना करीसनं मांगशात तं, ता मी तुमला दीसु.
पवीत्र आत्मानी बद्दल येसु सांगय
15 मंग येसु आखु सांगना, जर तुमं मावर मया करत तं, तुमं मनी आज्ञा बी पाळाला पायजे. 16 आनं मी मना देवबापला वीनंती करीसनं सांगसु का, तो तुमना साठी येक दुसरा मदत करनार मंजे पवीत्र आत्माला तुमनी कडं धाडी. आनं तो पवीत्र आत्मा कायम तुमनी संगं रही. 17 हाऊ मदत करनार पवीत्र आत्मा तुमला देवना सत्यनी बद्दल प्रगट करी देई. पन जगनं लोकं जे मावर वीस्वास ठेवत ना, ते तेला स्वीकार करु शकावुत ना. कजं का ते तेला दखु शकावुत ना आनं वळखु शकावुत ना. पन तुमं तेला वळखत, कजं का तो तुमनी संगं सय आनं तुमनी मजार कायम रही.
18 आनं मी तुमला बीगर मायबापनी सारका सोडावु ना. पन मी तुमपन परत ईसु. 19 आनं काही दीवसनी नंतर जगनं जे लोकं मावर वीस्वास ठेवत ना, ते माला दखावुत ना. पन तुमं माला दखशात. आनं मी जीवता व्हई जासु, तेमन तुमं बी कायमना जीवन जगु शकसात. 20 आनं तो दीवसला तुमला मायती पडी का, मी देवबापमं सय. आनं तुमला हाई बी मायती पडी का, तुमं मनामं सत आनं मी बी तुममं सय. 21 जे लोकंसला मन्या आज्ञा मायती सत आनं जे ते पाळत, तेज मावर मया करत. आनं जे लोकं मावर मया करत, तेसवर मना देवबाप बी मया करी. आनं मी बी तेसवर मया करसु आनं मी कोन सय हाई तेसला मी प्रगट करसु.
22 मंग यहुदा येसुला वीचारना, परभु, तु कजं फक्‍त आमपन सोताला प्रगट करशी? आनं जगनं दुसरं लोकंसपन कजं ना? तो ईस्कंरीयोत यहुदा ना पन दुसरा यहुदा व्हताल. 23 मंग येसु सांगना, जो कोनी मावर मया करय, तो मना वचनला पाळी. आनं मना देवबाप बी तेवर मया करी. आनं आमं दोनी जन ईसनं तेनी संगं रहसुत. 24 पन जो मावर मया करय ना, तो मना वचनला पाळय ना.
आतं मी तुमला जा सांगी रहना सय, ता मना सोताना मनथीन सांगय ना, पन जो देवबाप माला धाडेल सय, तो सांगय. 25 आनं जवं मी तुमपन व्हताल, तवं या आख्या गोस्टी तुमला सांगी देयेल व्हताल. 26 तरी बी जो मदत करनार पवीत्र आत्माला देवबाप मना नावमं तुमपन धाडी, तो तुमला या आख्या गोस्टी शीकाडी देई. आनं ज्या गोस्टी मी तुमला सांगेल सय, त्या आख्या गोस्टीसना याद तुमला तो करी देई.
27 मी तुमनी संगं मनी शांती सोडी जाई रहना सय. मनी शाती मी तुमला दी रहना सय. आनं जशा जगनं लोकं शांती देत, तशा थोडा टाईमना साठी शांती मी तुमला देय ना. तेमन तुमं घाबराला नोको पायजे आनं भीवाला नोको पायजे. 28 मी तुमला सांगनाल का, मी मना देवबाप कडं जासु आनं परत ईसु. आनं हाई तुमं आयकेल सत. आनं जर तुमं मावर मया करत तं, मी देवबाप कडं जाई रहना सय मनीसनं तुमं आनंद कराला पायजे. कजं का मना देवबाप मनी पेक्षा बी पक्‍का मोठा सय.
29 आनं या आख्या गोस्टी घडानी आगुदारज मी तुमला सांगी देयेल सय. येनी करता का, जवं जवं या गोस्टी घडीत, तवं तवं तुमं आजुन जास्त मावर वीस्वास ठेवाला पायजे. 30 आनं मी आजुन जास्त टाईम परन तुमनी संगं बोलावु ना. कजं का हाई जगना आधीपती मंजे सैतान माला वार करानी करता ई रहना सय. पन तो मावर आधीकार चालाडु शकावु ना. 31 पन जगनं लोकंसला मायती पडाला पायजे का, मी मना देवबापवर पक्‍का मया करय. तेमन जा काही मना देवबाप माला आज्ञा देयेल सय, ताज मी करय.
चाला, आतं आपुन आठीथीन नींगी जावुत.