13
येसु तेनं चेलंसना पाय धवय
1 मंग तेनी मांगं चालनारं लोकंसवर येसु पक्का मया करता आनं शेवट परन तेसवर मया करना. आनं वल्हांडनना सननी आगुदार तेला मायती पडी गया का, हाई जगला सोडीसनं देवबाप कडं परत नींगी जावाना टाईम ई लागना सय. 2 मंग ते संध्याकाळना जेवन करी रनलत. आनं येसुला वीस्वासघात करीसनं तेनं दुशमनंसना हातमं धरी देवानी करता शीमोनना पोर्या यहुदा ईस्कंरीयोतना मनमं सैतान काम करेल व्हताल. 3 मंग येसुला मायती पडना का, देवबाप आख्या गोस्टीसवर आधीकार तेना हातमं देयेल सय. आनं हाई बी तेला मायती पडना का, तो देव पईन ईयेल सय आनं लवकर देवबापपन जाई रहना सय. 4 तवं येसु जेवन वयथीन उठना आनं तेना आंग वतला कोट काडी लीना आनं रुमाल लीसनं येक नौकर सारका सोताना कंबरला बांधना. 5 तेनी नंतर तो येक तगारीमं पानी टाकीसनं चेलंसना पाय धवाला लागना. आनं कंबरना बांधेल रुमालघाई पुसाला लागना.
6 मंग पाय धवता धवता तो शीमोन पेत्र कडं वना. पन पेत्र तेला सांगना, परभु, तु मना पाय नोकोज धवाला पायजे. 7 येसु तेला सांगना, मी जा काही करी रहना सय, ता आतं तुला समजावु ना, पन नंतर समजी. 8 पन पेत्र तेला सांगना, तरी बी तु मना पाय नोकोज धवाला पायजे. मंग येसु सांगना, जर मी तुला धवना ना तं, तु मना चेला बनु शकय ना. 9 मंग शीमोन पेत्र सांगना, तं मंग परभु, फक्त मना पायंज ना, पन मना हात आनं डोका बी धव. 10 येसु सांगना, जो मानुस आंग धयेल सय, तेना फक्त पाय धवानी गरज सय. कजं का तो शुधं व्हई जायेल सय. आनं तुमं शुधं सत. पन तुम मयथीन आखं जन ना. 11 आनं कोन तेला दुशमनंसना हातमं धरी देनार सय, हाई येसुला मायती व्हताल. तेमन तो सांगना का, तुम मयथीन आखं जन शुधं ना सत.
12 मंग आखं चेलंसना पाय धवानी नंतर येसु परत तेना कोट घालना आनं तेनी जागावर बसना. मंग तो तेसला वीचारना, मी तुमना साठी जा करना, ता तुमला समजना का? 13 तुमं माला गुरुजी आनं परभु सांगत. आनं तुमं खरज सांगत, कजं का मी तोज सय. 14 मंग मी गुरुजी आनं परभु व्हईसनं बी येक नौकर सारका तुमना पाय धवना, तशाज तुमं बी येक मेकंसना पाय धवानी सारका येक मेकंसनी सेवा कराला पायजे. 15 कजं का जशा मी तुमला करना, तशाज तुमं बी येक दुसरंसला कराला पायजे मनीसनं मी येक ऊदाहरन तुमला दखाडी दीना सय. 16 मी तुमला खरज सांगय का, येक नौकर तेना मालक पेक्षा मोठा ना सय. आनं येक धाडेल मानुस तेना धाडनार पेक्षा मोठा ना सय. 17 आतं मी जा करना, ता तुमला समजी गया सय. तेमन जर तुमं तशेज करशात तं, देव तुमला नक्की आशीर्वाद देई.
येक चेला तेला वीस्वासघात करी मनीसनं येसु सांगय
(मतय २६:२०-२५; मार्क १४:१७-२१; लुक २२:२१-२३)
18 येसु आखु सांगना, तुमं आखंसला देव आशीर्वाद देई, आशा मी सांगय ना. कजं का जवं तुमला मी नीवाडना, तवं पईन माला मायती सय का, तुमं कशे सत. आनं जो मानुस माला वीस्वासघात करनार सय तेला बी मी नीवाडना सय. कजं का देवना वचनमं जा लीखेल सय, ता नक्की घडालाज पायजे. देवना वचनमं आशा लीखेल सय का,
✞"जो मानुस मनी संगं जेवन करना, तोज मावर ऊची तंगडी करना."
19 हाई गोस्टं घडानी आगुदारज मी तुमला येनी बद्दल सांगी दीना सय. येनी करता का, जवं ती गोस्टं घडी, तवं तुमं वीस्वास ठेवाला पायजे का, मीज तो देवना धाडेल राजा सय. 20 मी तुमला खरज सांगय का, जे लोकंसला मी धाडसु, तेसला जो कोनी स्वीकार करय, तो माला बी स्वीकार करय. आनं जो कोनी माला स्वीकार करय, तो फक्त मालाज ना, पन जो देवबाप माला धाडेल सय तेला बी तो स्वीकार करय.
21 मंग हाई सांगानी नंतर येसु मनमं पक्का परेशान व्हई गया. आनं तो मोकळा सांगी दीना का, मी तुमला खरज सांगय का, तुम मयथीन येक जन माला दुशमनंसना हातमं धरी देनार सय.
22 तवं तो कोनी बद्दल बोली रहना सय, हाई चेलंसला मायती पडना ना. तेमन ते येक मेकंसला दखाला लागनत. 23 आनं तेस मयथीन ✞येक चेलावर येसु पक्का मया करता. तो येसुना शेजार बसेल व्हताल. 24 मंग शीमोन पेत्र तो चेलाला ईसारा करीसनं सांगना, येसुला वीचार का, तो कोनी बद्दल बोली रहना सय. 25 तवं तो चेला येसुना शातीवर डोका टेकीसनं तेला वीचारना, परभु, तो मानुस कोन सय? 26 मंग येसु सांगना, जेला मी भाकरना तुकडा ताटमं बुडाईसनं दीसु, तोज सय. आशा सांगीसनं येसु भाकरना तुकडा ताटमं बुडाईसनं शीमोनना पोर्या यहुदा ईस्कंरीयोतला दीना. 27 आनं यहुदा ईस्कंरीयोत तो भाकरना तुकडा लीसनं खाना. मंग सैतान तेनी मजार घुसना. मंग येसु यहुदाला सांगना, भाऊ, तुला जा काही कराना सय, ता लवकर कर. 28 पन कजं येसु तेला आशा सांगना हाई जेवनला जे बसेल व्हतलत तेस मयथीन कोनला बी समजना ना. 29 आनं काही चेलंसला आशा वाटना का, वल्हांडन सननी करता ज्या वस्तु पायजे, त्या लेवाला येसु यहुदाला सांगना नातं गरीब लोकंसला दान देवानी बद्दल तो तेला सांगना. कजं का पयसंसना लेनदेन करानी जवाबदारी यहुदाना हातमं व्हतील. 30 मंग यहुदा भाकर खावानी नंतर लगेज बाहेर नींगी गया. तवं रातना टाईम व्हताल.
येसु चेलंसला नवीन आज्ञा सांगय
31 यहुदा बाहेर नींगी जावानी नंतर येसु सांगना, मानुसना पोर्या मंजे मी कीतला मोठा सय, हाई आतं देव लोकंसला दखाडी. आनं मनी द्वारा लोकंसला मायती पडी का, देवबाप बी कीतला मोठा सय. 32 आनं जर मनी द्वारा लोकंसला मायती पडय का, देव कीतला मोठा सय तं, देव बी लोकंसला दखाडी देई का, मानुसना पोर्या मंजे मी बी कीतला मोठा सय. आनं पक्का लवकर तो हाई करी. 33 पोरेसवन, आजुन थोडाज टाईम मी तुमनी संगं सय. तेनी नंतर तुमं माला दखशात, पन मी तुमनी संगं रवावु ना. आनं जशा मी यहुदी लोकंसला सांगना, तशाज तुमला बी सांगय का, जई मी जाई रहना सय, तई तुमं येवु शकावुत ना. 34 तेमन आतं मी तुमला येक नवीन आज्ञा दी रहना सय. ती हाई सय का, तुमं येक मेकंसवर मया करा. आनं जशा मी तुमवर मया करना सय, तशाज तुमं बी येक मेकंसवर मया करा. 35 जर तुमं येक मेकंसवर मया करशात तं, आखं लोकंसला मायती पडी का, तुमं मनं चेलं सत.
पेत्र तेला नाकारी मनीसनं येसु सांगय
(मतय २६:३१-३५; मार्क १४:२७-३१; लुक २२:३१-३४)
36 मंग शीमोन पेत्र येसुला वीचारना, परभु, तु कई जाई रहना सय? येसु तेला सांगना, जई मी जाई रहना सय, तई तु आतं मनी संगं येवु शकावु ना. पन नंतर तु ईशी. 37 मंग पेत्र सांगना, परभु, आतं कजं मी तुनी संगं येवु शकावु ना? मी तुना साठी मराला बी तयार सय. 38 येसु तेला वीचारना, खरज तु मना साठी तुना जीव देवाला तयार सय का? पन मी तुला खरज सांगय का, आज रातला कोमडा कोकावानी आगुदार तु माला वळखय ना मनीसनं तीन दाउ नाकारशी.