11
येसु लाजारला मरन मयथीन जीवता करय
1-2 मंग बेथानी गावमं लाजार नावना येक मानुस व्हताल. आनं तेन्या दोन बयनी व्हतल्यात. येकना नाव मार्था आनं दुसरीना नाव मरीया व्हतील. आनं ✞हाईज मरीया येकदाव परभु येसुला मान देवानी करता तेना पायला सुगंधी तेल लाईसनं तीना केशंसघाई पुसेल व्हतील.
मंग येकदाव तो लाजार पक्का आजारी व्हताल. 3 तेमन त्या दोनी बयन्या येसुला नीरोप दीसनं सांगन्यात का, परभु, जेवर तु पक्का मया करय तो पक्का आजारी सय. 4 पन हाई आयकीसनं येसु सांगना, हाई आजार तेला मारानी करता ना सय, पन देव कीतला शक्तीवान सय, हाई लोकंसला मायती पडाला पायजे मनीसनं तो आजारी सय. आनं येनी द्वारा देवना पोर्याला मंजे माला पक्का मान भेटी. 5 तवं येसु मार्था आनं मरीया आनं तीसना भाऊ लाजारवर पक्का मया करता. 6 पन लाजार आजारी सय हाई आयकीसनं बी जी जागामं तो व्हताल, तई आजुन दोन दीवस रही गया. 7 दोन दीवसनी नंतर तो तेनं चेलंसला सांगना, चाला, आपुन यहुदीया जील्लामं परत जावुत. 8 पन तेनं चेलं सांगनत, गुरुजी, काही दीवसनी आगुदारज तई यहुदी लोकं तुला दगडमार करानी कोशीत करी रनलत, तरी बी तई जावानी तुनी ईशा सय का? 9 मंग येसु तेसला सांगना, येक दीवसमं बारा तास ऊजाळा रहय. आनं जर येखादा मानुस ऊजाळामं चालय तं, तेला ठेस लागय ना. कजं का हाई जगमं जो ऊजाळा पडय, तेघाई तो दखु शकय 10 पन जो कोनी रातला चालय, तेला ठेस लागी जाय. कजं का तवं ऊजाळा ना रहय.
11 हाई सांगानी नंतर येसु आखु तेसला सांगना, आपला सोपती लाजार नीजी गया सय. तेमन तेला नीज मयथीन उठाडानी करता मी जाई रहना सय. 12 मंग ते चेलं सांगनत, गुरुजी, जर तो नीजी गया व्हई तं, तो सोता उठी जाई. 13 तवं येसु तेना मरननी बद्दल बोली रहनाल, पन तेसला समजना ना. तेसला वाटना का, तो नीजानी बद्दलज बोली रहना सय. 14 तवं येसु तेसला मोकळा सांगना का, लाजार मरी गया सय. 15 आनं मी तई ना सय मनीसनं माला आनंद वाटय. हाई तुमना साठी चांगला सय. कजं का येनी द्वारा मावर तुमना वीस्वास वाढी जाई. मंग चाला आतं आपुन तेनी कडं जावुत. 16 तवं थोमा, जेला ते ✞दीदुम सांगतत, तो तेसला सांगना, चाला आपुन बी येनी संगं जावुत आनं येनी संगं मरुत.
17 मंग जवं ते बेथानी गावनी शेजार जाई लागनत, तवंज येसुला मायती पडना का, लाजारला चार दीवसनी आगुदारज कबरमं ठेवामं ईयेल सय. 18 आनं बेथानी गाव यरुशलेम शेहेर पईन तीन कीलोमीटर पेक्षा बी कमी व्हताल. 19 तवं तीसना भाऊ मरी जायेल सय मनीसनं यरुशलेम शेहेरथीन बरज यहुदी लोकं मार्था आनं मरीयाला दीलासा देवानी करता ईयेल व्हतलत.
20 मंग जवं मार्थाला मायती पडना का, येसु तीसना घर ई रहना सय, तवं ती तेला भेटानी करता गयी. पन मरीया घरमंज रहनी. 21 मंग मार्था येसुला सांगनी, परभु, जर तु आठी रहता तं मना भाऊ मरता ना. 22 तरी बी माला मायती सय का, आतं बी जा काही तु देवपन मांगशी, ता देव तुला देई. 23 येसु तीला सांगना, तुना भाऊ परत जीवता व्हई जाई. 24 मार्था सांगनी, माला मायती सय का, शेवटना दीवसमं जवं लोकं मरन मयथीन परत उठीत, तवं तो बी जीवता उठी. 25 मंग येसु सांगना, मीज पुनरुथान आनं जीवन सय. कजं का लोकंसला उठाडीसनं कायमना जीवन देनार मीज सय. आनं जे मावर वीस्वास ठेवत, ते मरी जाईत, तरी बी ते परत जीवतं व्हई जाईत. 26 आनं जे लोकं जीवन जगत आनं मावर वीस्वास ठेवत, ते आत्मीक जीवनमं कधीज मरावुत ना. हाई गोस्टंवर तु वीस्वास ठेवय का? 27 ती सांगनी खरज परभु, मी वीस्वास ठेवय का, तुज देवना धाडेल राजा सय. आनं जो देवना पोर्या हाई जगमं येनार व्हताल, तो तुज सय.
28 मंग आशा सांगीसनं मार्था परत गयी आनं तीनी बईन मरीयाला येक बाजुला बलाईसनं सांगनी, आपला गुरुजी आठीज सय आनं तो तुला बलाय रहना सय. 29 मंग हाई आयकीसनं मरीया लगेज उठनी आनं येसु कडं गयी. 30 तो परन येसु गावमं ईयेल ना व्हताल. पन जई मार्था तेला भेटनील, तईज तो व्हताल. 31 तवं जे यहुदी लोकं घरमं मरीयाला दीलासा दी रनलत, ते दखनत का, ती लगेज उठीसनं जाई रहनी सय. आनं ते बी तीनी मांगं मांगं गयत. कजं का तेसला वाटना का, ती कबरपन रडाला जाई रहनी सय.
32 मंग जई येसु व्हताल, तई मरीया वनी आनं तेला दखीसनं लगेज तेना पाय पडनी. आनं तेला सांगनी, परभु, जर तु आठी रहता तं, मना भाऊ मरता ना. 33 मंग येसु दखना का, ती रडी रहनी सय आनं तीनी संगं जे यहुदी लोकं ईयेल व्हतलत ते बी रडी रनलत. तवं तेला संताप वना आनं तो मनमं परेशान व्हई गया. 34 आनं तो वीचारना, तेला तुमं कई ठेयेल सत? ते सांगनत, परभु, ये आनं दख. 35 मंग येसु बी रडाला लागना. 36 तवं काही यहुदी लोकं सांगनत, दखा, तेवर तेना कीतला जीव व्हताल. 37 पन तेस मयथीन आजुन काही लोकं सांगनत, हाऊ मानुस आंधळा मानुसला बी बरा करु शकना, तशाज लाजारला बी मरन मयथीन वाचाडानी करता तो काही तरी कराला पायजे व्हताल.
38 मंग जवं येसु लाजारनी कबरपन वना, तवं तेला आखु संताप वना. ती कबर पोखारेल व्हतील आनं कबरना तोंडापन येक मोठी दगड झाकेल व्हतील. 39 मंग येसु सांगना, हाई दगडला येक बाजु करा. पन मार्था सांगनी, परभु तथाईन तं पक्का खराब वास येता व्हई. कजं का तेला मरीसनं चार दीवस व्हई गया सय. 40 तवं येसु तीला सांगना, मार्था, मी तुला आगुदारज सांगनाल का, जर तु मावर वीस्वास ठेवशी तं, देव कीतला शक्तीवान सय हाई तुला मायती पडी जाई.
41 मंग लोकं ती मोठी दगडला येक बाजुला करी दीनत. तवं येसु सोरगं कडं दखीसनं सांगना, हे देवबाप, तु मनी प्राथना आयकना मनीसनं मी तुना ऊपकार मानय. 42 आनं माला मायती सय का, तु कायम मनी प्राथना आयकय. पन जे लोकं आठी हुबं सत, ते वीस्वास ठेवाला पायजे का, तु माला धाडेल सय, तेमन मी हाई सांगय.
43 आशा सांगीसनं येसु जोरमं हाक मारीसनं सांगना, लाजार, बाहेर ये. 44 मंग जो लाजार मरी जायेल व्हताल, तो लगेज जीवता व्हईसनं बाहेर वना. तेना हातपाय कपडंसघाई बांधेल व्हताल आनं तेना तोंड येक रुमालघाई झाकेल व्हताल. तवं येसु लोकंसला सांगना, येला मोकळा करा आनं जावु द्या.
यहुदीसनं पुढारी लोकं येसुला माराना बेत करत
(मतय २६:१-५; मार्क १४:१-२; लुक २२:१-२)
45 मंग जे यहुदी लोकं मरीयानी संगं ईयेल व्हतलत, ते येसुना करेल चमत्कारला दखनत आनं तेवर वीस्वास ठेवनत. 46 पन तेस मयथीन आजुन काही लोकं परुशी लोकंसनी कडं गयत आनं येसु जा काही करना ता तेसला सांगनत. 47 तवं मुख्य याजक लोकंसनी आनं परुशी लोकंसनी येकजागं मीटींग बसनी. आनं ते सांगनत, हाऊ मानुस बरज चमत्कार करी रहना सय. आपुन काय करी रहनं सत? 48 जर आपुन तेला तशेज सोडी दीसुत तं, आखं लोकं तेवर वीस्वास ठेईत. आनं रोम देशनी सरकार ईसनं आपला मंदीरला आनं आपला देशला हीसकाई ली जाईत.
49 मंग तेस मयथीन कयफा नावना येक मानुस तो वरीसला मोठा याजक व्हताल. आनं तो सांगना, तुमला काहीज मायती ना सय. 50 आपला देशनं आखं लोकंसना नास रोम सरकारना हातमं व्हवानी पेक्षा आपली जागामं येक मानुसना मराना आपला साठी चांगला सय. हाई तुमला मायती ना सय का? 51 तो सोताना मन पईन हाई सांगना ना. पन तो वरीस तो मोठा याजक व्हताल मनीसनं तेघाई देव भवीस्यवानी सांगना का, आखा यहुदी लोकंसनी करता येसु मरालाज पायजे. 52 आनं फक्त यहुदी लोकंसनी करताज ना, पन आखं जगमं जीतला बी देवनं लोकं पसरेल सत, ते आखंसला येकजागं गोळा करानी करता तो मरनार सय.
53 मंग तो दीवस पईन ते पुढारी लोकं येसुला जीवता माराना बेत कराला लागनत. 54 तेमन तवं पईन येसु यहुदी लोकंसमं मोकळा फीरना ना. पन तेनं चेलंसनी संगं येफ्राईम नावना येक शेहेरमं जाईसनं तो रव्हाला लागना. आनं तो शेहेर सुना रानना जवळ व्हताल.
55 तवं यहुदीसना वल्हांडनना सन शेजार ईयेल व्हताल. आनं सननी आगुदार सोताला ✞शुधं करानी करता बरज यहुदी लोकं यरुशलेम शेहेरला गयत. 56-57 तवं मुख्य याजक लोकं आनं परुशी लोकं आज्ञा देयेल व्हतलत का, येसु कई सय, हाई जेला बी मायती पडी तं, ते आमला सांगालाज पायजे. मंजे आमं तेला धरु शकशुत. तेमन लोकं येसुला दखी रनलत. आनं ते मंदीरमं हुबं रहीसनं येकमेकंसला वीचारनत, तुमला काय वाटय? तो सनला येवावु का ना?