7
येसु मांडवना सनला जाय
1 येनी नंतर येसु तेनं चेलंसनी संगं आखा गालील जील्लामं जागं जागं फीरीसनं लोकंसला शीकाडना. आनं यहुदीया जील्लामं जावानी तेनी ईशा ना व्हतील. कजं का तई यहुदीसनं पुढारी लोकं तेला जीवता मारानी कोशीत करी रनलत. 2 तवं यहुदी लोकंसना मांडवना सन जवळ ई लागेल व्हताल. 3 तेमन येसुनं भाऊ तेला सांगनत, तु आठीथीन नींगीसनं यहुदीया जील्लामं जा. कजं का तई बी तुना करेल चमत्कारंसला तुवर वीस्वास ठेवनारं लोकं दखाला पायजे. 4 आनं येखादा मानुसला आखं लोकं वळखाला पायजे मनीसनं तेनी ईशा रहय तं, तो तेना करेल कामंसला दपाडय ना. तशाज तु बी तई जाईसनं काही चमत्कार कर. येनी करता का, तुना करेल चमत्कारंसना कामं आखं लोकंसला मायती पडाला पायजे. 5 तवं येसुला देव धाडेल सय मनीसनं तेनं भाऊ बी वीस्वास ठेवतत ना, तेमन ते आशे सांगनत.
6 मंग येसु तेसला सांगना, तुमं कोनता टाईमला बी सन पाळाला जावु शकत, पन सनला जावानी करता मना टाईम आतं परन ईयेल ना सय. 7 आनं मी सांगय का, हाई जगनं लोकं जा करत ता वाईट सय. तेमन ते माला जीव लावु शकत ना. पन ते तुमला जीव लावु शकत. 8 तेमन तुमं सन पाळानी करता जा ज्या, मी आतं येवावु ना. कजं का मना चांगला टाईम आतं परन वना ना सय. 9 आशा सांगीसनं येसु गालील जील्लामंज रही गया.
10 मंग येसुनं भाऊ सन पाळाला नींगी गयत. तेनी नंतर तो बी तई गया. पन तो ऊजात गया ना, गच्चुप गया. 11 तवं तो सनमं यहुदीसनं पुढारी लोकं तेला दखतं फीरी रनलत. आनं ते लोकंसला वीचारी रनलत का, तो मानुस कई सय?
12 मंग तो सननी जागामं लोकंसनी मोठी गरदी जमा व्हयेल व्हतील. आनं ते येसुनी बद्दल येक मेकंसला बोलु लागनत. काही लोकं सांगनत का, तो चांगला मानुस सय. पन दुसरं लोकं सांगनत का, तो चांगला ना सय आनं लोकंसला फसाडय. 13 पन कोनी बी येसुनी बद्दल हुगडपनामं सांगु शकनत ना. कजं का ते यहुदीसना पुढारी लोकंसला भीवाय रनलत.
येसु यरुशलेम मंदीरमं लोकंसला शीकाडय
14 मंग मांडवना सन आरदा नींगी जावानी नंतर येसु मंदीरमं गया आनं लोकंसला शीकाडाला लागना. 15 आनं तेना शीक्षन आयकीसनं यहुदी लोकंसला पक्का नवल वाटना. आनं ते सांगनत, हाऊ मानुस कधीज आपली धार्मीक शाळामं वना ना, पन येला ईतला कशाकाय मायती सय? 16 तवं येसु तेसला सांगना, मी तुमला जा शीकाडी रहना सय, ता मना सोता पईन ना सय. पन जो देवबाप माला धाडेल सय, ते पईनंज सय. 17 आनं जो कोनी देवनी ईशा प्रमानं चालानी ईशा ठेवय, तेलाज मायती पडी का, मना शीक्षन मना सोताना ना सय, पन देवबाप पईन ईयेल सय. 18 आनं जे लोकं सोताना मनथीन सांगत, ते सोताला मान भेटाडाला दखत. पन मी मना धाडेल देवबापला मान भेटाला पायजे मनीसनं दखय. आनं मी कायम खरज बोलय, कधी खोटा बोलय ना. 19 मोसा तुमला देवना नीयम दीनाल का ना? पन तुम मयथीन कोनी बी तो नीयमला पाळत ना. तं मंग कजं तुमं मना जीव लेवाला दखत?
20 मंग ते लोकं येसुला सांगनत, तुला भुत लागेल सय. कोनी बी तुला माराला दखत ना. 21 येसु तेसला सांगना, मी शब्बाथना दीवसमं येकंज चमत्कार करना तं, तेला दखीसनं तुमला पक्का नवल वाटना. 22 आनं मोसा तुमला सुन्नत वीधी कराना नीयम दीना मनीसनं शब्बाथना दीवसमं बी तुमनं पोरेसना सुन्नत वीधीना दीवस वना तं, तुमं सुन्नत वीधी करत. खरज सांगु तं, सुन्नत वीधी मोसा पईन ईयेल ना सय, पन आपला वाडावडीलंस पईन ईयेल सय. 23 आनं मोसाना देयेल नीयमला मोडाला नोको पायजे मनीसनं शब्बाथना दीवसमं बी तुमं येखादा पोर्याना सुन्नत वीधी करत. पन जवं मी शब्बाथना दीवसमं येखादा मानुसला पुरा बरा करना तं, तुमं कजं मावर राग करत? 24 तुमं फक्त बाहेरन्या गोस्टी दखीसनं न्याय करु नोका. पन जा खरा सय, ता मायती करीसनं तुमं न्याय कराला पायजे.
येसुनी बद्दल लोकंसमं प्रश्नं नींगय
25 मंग यरुशलेमनं काही लोकं सांगनत, हाऊ मानुसलाज पुढारी लोकं जीवता माराला दखी रहनं सत. 26 पन दखा, आखं लोकंसनी समोरज तो शीकाडी रहना सय. आनं तो शीकाडताना कोनी बी तेला काही सांगत ना. कदाचीत पुढारी लोकंसला मायती पडी गया व्हई का, तोज खरज देवना धाडेल राजा सय. 27 पन हाऊ तो देवना धाडेल राजा रहु शकावु ना. कजं का जवं तो राजा येई, तवं तो कथाईन वना सय हाई लोकंसला मायती पडावु ना. पन आपुनला तं मायती सय, हाऊ मानुस कथाईन वना सय.
28 तवं बी येसु मंदीरमंज शीकाडी रहनाल. मंग तो जोरमं सांगना, खरज तुमला मायती सय का, मी कोन सय आनं कथाईन ईयेल सय. पन मी मना सोताना आधीकारथीन ईयेल ना सय. पन जो माला धाडेल सय, तो खरा देव सय. तुमं तेला वळखत ना. 29 पन मी तेला वळखय. कजं का मी ते पईनंज वना सय आनं तोज माला धाडेल सय.
30 मंग हाई आयकीसनं लोकं तेला धराला कोशीत करनत. पन कोनी बी तेला धरु शकनत ना. कजं का तो परन तेना मराना टाईम ईयेल ना व्हताल. 31 तरी बी बरज लोकं तेवर वीस्वास ठेवनत. आनं ते सांगनत का, जवं देवना धाडेल राजा येई, तो येनी पेक्षा बी आजुन जास्त चमत्कार करु शकी का? तेमन हाऊज देवना धाडेल राजा रव्हाला पायजे.
यहुदी लोकं येसुला धराला कोशीत करत
32 मंग लोकं येसुनी बद्दल आपसमं बोलताना परुशी लोकं आयकनत. आनं मुख्य याजक लोकं आनं परुशी लोकं येसुला धरानी करता मंदीरनं काही सीपाईसला धाडनत. 33 तवं येसु लोकंसला सांगना, मी तुमनी संगं आजुन थोडाज दीवस रहसु. तेनी नंतर जो माला धाडेल सय तेपन मी परत नींगी जासु. 34 तवं तुमं माला दखशात, पन मी तुमला भेटावु ना. कजं का जई मी रहसु, तई तुमं येवु शकावुत ना.
35 मंग ते यहुदी लोकं येक मेकंसला वीचाराला लागनत का, हाऊ मानुस कई जानार सय का, आपुन येला भेटु बी शकावुत ना? बीगर यहुदी लोकंसना शेहेरमं रहनारं आपलं यहुदी लोकंसनी कडं जाईसनं तेसला बी तो शीकाडी का? 36 हाऊ मानुस सांगय का, तुमं माला दखशात, पन मी तुमला भेटावु ना आनं जई मी रहसु, तई तुमं येवु शकावुत ना. येना आर्थ काय सय?
पवीत्र आत्मानी बद्दल येसु शीकाडय
37 मंग सनना शेवटना दीवस वना. आनं तो दीवस पक्का मतवंना व्हताल. तवं येसु हुबा रहीसनं जोरमं सांगना, जे लोकंसला तीस लागय, ते मनी कडं येवाला पायजे. आनं मी जा दीसु, ता ते पेवाला पायजे. 38 आनं जो कोनी मावर वीस्वास ठेवय, देवना वचनमं लीखेल प्रमानं तेना रुदयथीन जीवन देनार पानीना झीरा नींगी.
39 येसु पवीत्र आत्मानी बद्दल या आख्या गोस्टी सांगना. कजं का जे लोकं येसुवर वीस्वास ठेवत, तेसला नंतर तो पवीत्र आत्मा भेटनार व्हताल. आनं तो परन तो पवीत्र आत्मा देवामं ईयेल ना व्हताल. कजं का तो परन येसुला मोठा मान भेटेल ना व्हताल मंजे तो मरीसनं परत जीवता उठेल ना व्हताल आनं सोरगंमं लेवामं ईयेल ना व्हताल.
येसुनी बद्दल लोकं वादवीवाद करत
40 मंग येसुना सांगेल गोस्टं आयकीसनं लोकंसमं वादवीवाद चालु व्हयना. काही लोकं सांगनत का, जो वचन सांगनारला धाडाना वचन देव देयेल सय, खरज हाऊ तोज सय. 41 आनं दुसरं लोकं सांगनत, हाऊ देवना धाडेल राजा सय. पन आजुन दुसरं सांगनत का, हाऊ देवना धाडेल राजा ना रवावु, कजं का तो देवना धाडेल राजा गालील जील्ला मयथीन येवावु ना. 42 कजं का देवना वचनमं लीखेल सय का, तो दावीद राजानी पीढीमं आनं तेना गाव बेथलेहेममं जल्म लेई.
43 मंग तई लोकंसमं येसुनी बद्दल फुट पडाला लागनी. 44 आनं काही लोकं येसुला धरानी कोशीत करनत, पन कोनी बी तेला धरु शकनत ना.
यहुदीसनं पुढारी लोकं येसुवर वीस्वास ठेवत ना
45 मंग ते मंदीरनं शीपाई मुख्य याजक लोकं आनं परुशी लोकंस कडं परत गयत. तवं ते शीपाईसला वीचारनत, कजं तुमं येसुला धरी ली वनत ना? 46 ते शीपाई सांगनत, तो मानुस ईतल्या चांगल्या चांगल्या गोस्टी शीकाडय का, कोनी बी कधी आशे शीकाडनत ना. तेमन आमं तेला धरु शकनत ना. 47 मंग ते परुशी तेसला वीचारनत, तुमला बी तो फसाडी लीना का? 48 देव तेला धाडेल सय मनीसनं आपलं पुढारी लोकंस मईन नातं परुशी लोकंस मईन येक बी वीस्वास ठेवत ना. 49 पन जे लोकंसला देवना नीयमनी बद्दल काही मायती ना सय, तेज तेवर वीस्वास ठेवत. तेमन देव तेसला दंड देई.
50 तवं तेस मयथीन नीकदेम नावना येक जन तई व्हताल. तो पयलं येसुपन जायेल व्हताल✞. 51 मंग तो तेसला सांगना, आपला नीयम प्रमानं येक मानुसना आयकानी शीवाय आपुन तेला दोसी ठरावु शकावुत ना. आनं तो काय करी रहना सय हाई बीगर मायती करीसनं आपुन तेना न्याय करु शकत ना. 52 मंग ते रागमं नीकदेमला वीचारनत, तु बी गालील जील्लाना सय का? कजं का तु बी तेनी मांगं चालनारं सारका बोली रहना सय. देवना वचन वाची दख, तवं तुला मायती पडी का, गालील जील्ला मयथीन देवना वचन सांगनार कोनी बी येवावु ना.
53 मंग ते आखं जन तेसना सोताना घर नींगी गयत.