6
येसु पाच हाजारथीन जास्त लोकंसला जेवाडय
(मतय १४:१३-२१; मार्क ६:३०-४४; लुक ९:१०-१७)
1 तेनी नंतर येक दीवस येसु आनं तेनं चेलं गालील समुद्रनी तथानी बाजुमं गयत. हाई समुद्रला तीबीर्या समुद्र बी सांगत. 2 तवं बरज लोकंसनी गरदी येसुनी मांगं मांगं गयी. कजं का तो बरज आजारी लोकंसला बरा करताना आनं चमत्कारना कामं करताना ते दखेल व्हतलत. 3 मंग येसु येक टेकडीवर चडी गया आनं तेनं चेलंसनी संगं तई बसना. 4 तवं यहुदी लोकंसना वल्हांडनना सन शेजार ई लागेल व्हताल.
5 मंग येसु नजर टाकीसनं दखना का, लोकंसनी मोठी गरदी तेनी कडं ई रहनी सय. तवं तो तेना चेला फीलीपला वीचारना, ईतलं लोकंसला जेवाडानी करता भाकरी आपुन कथाईन ईकत ली येवुत? 6 फीलपनी परीक्षा लेवानी करता येसु तेला आशा वीचारना. कजं का तो काय करनार सय, हाई पयलं पईन येसुला मायती व्हताल. 7 मंग फीलीप सांगना, गुरुजी, ईतला लोकंसला जेवाडानी करता दोनशे दीनारना भाकरी लेवुत, तरी बी पुरावुत ना.
8 मंग आंद्रीया नावना दुसरा चेला बी तई व्हताल. तो शीमोन पेत्रना भाऊ व्हताल. 9 तो येसुला सांगना, आठी येक धाकला पोर्‍या सय. आनं तेपन जुवारन्या पाच भाकरी आनं दोन मासं सत. पन ईतला लोकंसला त्या पुरावुत ना. 10 तवं येसु सांगना, आखं लोकंसला जेवानी करता बसाला सांगा. मंग तई भरपुर चारा व्हताल. तेमन ते आखं लोकं चारावर बसनत. त‍ई फक्‍त मानसंज पाच हाजार व्हतलत. 11 मंग येसु त्‍या भाकरी लीना आनं तीसनी बद्दल देवना ऊपकार मानना. आनं बसेल लोकंसला वाटानी करता तेनं चेलंसपन दीना. आनं मासं बी लीसनं तो तशाज करना. तवं ते लोकंसला जीतला पायजे व्हताल, तीतला ते पोट भरी जेवन करनत.
12 मंग जवं आखं लोकं पोट भरी जेवन करनत, तवं येसु तेनं चेलंसला सांगना, ऊरेल भाकरीसनं आनं मासंसनं तुकडं तुमं गोळा करा. कजं का काही बी वाया नोको जावाला पायजे. 13 मंग जवं लोकं जेवाला सुरुवात करनत, तवं तई जुवारन्या पाच भाकरी व्हतल्यात. पन शेवट ज्या भाकरी ऊरी जायेल व्हतल्यात, त्याज ते चेलं गोळा करीसनं बारा टोपलं भरनत.
14 मंग येसुना करेल हाई चमत्कारला दखीसनं लोकं सांगनत का, जो देवना वचन सांगनार हाई जगमं येनार व्हताल, तो हाऊज सय. 15 मंग येसुला मायती पडना का, ते लोकं बळजुबरी तेला लीसनं राजा बनाडानी करता बेत करी रहनं सत. तेमन तो तथाईन नींगीसनं येकटा डोंगर भागमं नींगी गया.
येसु पानीवर चालय
(मतय १४:२२-३३; मार्क ६:४५-५२)
16 मंग जवं संध्याकाळ व्हयनी, तवं येसुनं चेलं गालील समुद्रनी कडं गयत. 17 आनं ते येक डुंगावर बसीसनं समुद्रनी तथानी बाजुना कफरनाहुम शेहेर कडं गयत. तवं आंधारा व्हई जायेल व्हताल आनं येसु तेसनी कडं परत ईयेल ना व्हताल. 18 तवं वारा पक्‍का जोरमं चालु व्हताल आनं समुद्रमं मोठमोठला लाटा ई रनल्यात.
19 मंग पाच तं सऊ कीलोमीटर पानीनी मजार जावानी नंतर ते दखनत का, येसु पानीवर चाली चालीसनं तेसनी कडं ई रहना सय. तवं ते पक्‍का भीवाय गयत. 20 पन येसु तेसला सांगना, मी सय, भीवु नोका. 21 मंग येसुना आयकीसनं ते आनंदमं तेला डुंगामं लीनत. तवं लगेज तेसला जी जागामं जावाना व्हताल, ती जागाना काटला ते जाई लागनत.
येसु जीवननी भाकर सय
22 मंग दुसरा दीवसला लोकंसनी गरदी समुद्रनी तथानी बाजुमं रही जायेल व्हतलत. आनं तेसला मायती व्हताल का, तई फक्‍त येकंज डुंगा व्हताल आनं तो डुंगामं बसीसनं तेनं चेलं नींगी गयलत आनं येसु तेसनी संगं गयाल ना. 23 तवं तीबीर्या शेहेर कडथीन काही दुसरं डुंगं वनत. आनं जी जागामं देवना ऊपकार मानीसनं परभु येसु लोकंसला भाकरी आनं मासं जेवाडेल व्हताल, ती जागानी शेजार ते वनत. 24 मंग लोकं दखनत का, येसु आनं तेनं चेलं तई ना सत. तेमन ते डुंगंसमं बसीसनं येसुला दखानी करता कफरनाहुम शेहेर कडं गयत.
25 मंग समुद्रनी तथानी बाजुना कफरनाहुम शेहेरमं ते येसुला भेटनत. आनं तेला वीचारनत, गुरुजी, तु कवं आठी ई लागना सय? 26 येसु तेसला सांगना, कजं तुमं माला दखतं फीरी रहनं सत, हाई माला मायती सय. मी तुमला खरज सांगय का, मी करेल चमत्कारंसला दखीसनं तुमं माला दखतं फीरी रहनं सत आशा ना सय. पन मी तुमला पोट भरीसनं जेवाडना मनीसनं तुमं माला दखतं फीरी रहनं सत.
27 मी तुमला सांगय का, हाई जगना जेवन नास व्हई जाय. तेमन हाई नास व्हई जानार जेवननी करता तुमं खटपट करु नोका. पन जो जेवन कायम टीकय आनं कायमना जीवन देय, तेना साठी तुमं खटपट करा. आनं तो जेवन फक्‍त मानुसना पोर्‍या मंजे मीज देवु शकय. कजं का तो देवानी करता देवबाप फक्‍त मालाज आधीकार देयेल सय.
28 मंग ते येसुला वीचारनत, आमं काय कराला पायजे मनीसनं देवनी ईशा सय? 29 येसु तेसला सांगना, देवनी ईशा सय का, तुमं मावर वीस्वास ठेवाला पायजे. कजं का माला तोज धाडेल सय. 30 मंग ते तेला सांगनत, तुलाज देव धाडेल सय मनीसनं आमं कशे वीस्वास ठेवुत? आनं आमला हाई खरा पटाला पायजे मनीसनं तु आमला कोनता चमत्कार करी दखाडशी? कजं का जर तु आखु येक चमत्कार करी दखाडशी तं, आमं तुवर वीस्वास ठेवु शकशुत. 31 जवं आपला वाडावडील लोकं सुना रानमं लागी जाई रनलत, तवं तेसला चमत्कार रीतथीन मान्ना नावना जेवन खावाला देवामं वनाल आनं ते खानत. कजं का देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"तो तेसला सोरगं मयथीन भाकर खावाला दीना."
तु बी आशा चमत्कार करु शकशी का? 32 मंग येसु तेसला सांगना, मी तुमला खरज सांगय का, मोसा ते लोकंसला सोरगं मयथीन खावाला मान्ना दीना ना, पन मना देवबाप तुमला सोरगं मयथीन खरी भाकर देय. 33 कजं का देवनी देयेल भाकर मंजे, जी सोरगं मयथीन जगमं येय आनं जगनं लोकंसला कायमना जीवन देय, तीज सय. 34 मंग ते येसुला सांगनत, गुरुजी, आमला कायम तीज भाकर दे. 35 येसु तेसला सांगना, मीज ती जीवन देनार भाकर सय. जो मनी कडं येय तेला कधी भुक लागावु ना. आनं जो मावर वीस्वास ठेवय तेला कधी तीस लागावु ना. 36 पन तुमं माला आनं मना करेल चमत्कारंसला दखेल सत, तरी बी मावर वीस्वास ठेवत ना. येनी बद्दल मी तुमला पयलं बी सांगेल सय. 37 आनं जे लोकंसला देवबाप मना हातमं देय, ते आखं जन मनी कडं येईत. आनं जे कोनी बी मनी कडं येत, मी तेसला कधी नाकारावु ना. 38 कजं का मनी सोतानी ईशा प्रमानं करानी करता मी सोरगं मयथीन जगमं वना ना, पन जो माला धाडेल सय तेनी ईशा प्रमानं करानी करता वना सय. 39 आनं जो माला धाडेल सय तेनी ईशा आशी सय का, जे लोकंसला तो मना हातमं देयेल सय तेस मयथीन येकला बी मी गमाडाला नोको पायजे. पन शेवटना न्यायना दीवसमं तेसला मी मरन मयथीन जीवता उठाडाला पायजे. 40 कजं का मना देवबापनी ईशा सय का, जे लोकं माला दखीसनं मावर वीस्वास ठेवत, तेसला कायमना जीवन भेटाला पायजे. आनं तेसला मी शेवटना दीवसमं जीवता उठाडाला पायजे.
41 मंग ते यहुदी लोकं येसुना वीरुद कुरकुर कराला लागनत. कजं का तो सांगना का, सोरगं मयथीन जगमं ईयेल भाकर मीज सय. 42 आनं ते सांगाला लागनत का, हाऊ तं योसेफना पोर्‍या येसु सय. आनं येना मायबापसला आपुन वळखत. मंग कशा तो सांगय का, मी सोरगं मयथीन ईयेल सय? 43 येसु तेसला सांगना, तुमं आपसमं कुरकुर करु नोका. 44 मना देवबाप माला धाडेल सय आनं तोज लोकंसला मनी कडं ली येय. जर तो ली वना ना तं, कोनी बी सोता मनी कडं येवु शकावुत ना. आनं जे लोकंसला तो मनी कडं ली येय, तेसला मी शेवटना दीवसमं मरन मयथीन जीवता उठाडसु. 45 देवना वचन सांगनारं आशे लीखेल सत का,
"देव ते आखं लोकंसला शीकाडी."
तेमन जे कोनी देव पईन आयकीसनं शीकत, ते आखं जन मनी कडं येत. 46 आनं कोनी बी देवबापला दखेल ना सत. पन फक्‍त मीज तेला दखेल सय. कजं का तोज माला धाडेल सय. 47 आनं मी तुमला खरज सांगय का, जो मावर वीस्वास ठेवय, तेला कायमना जीवन भेटी जायेल सय. 48 कजं का मीज कायमना जीवन देनार भाकर सय. 49 तुमना वाडावडील लोकं जंगलमं मान्ना खानत, तरी बी ते मरी गयत. 50 पन येक भाकर सोरगं मयथीन ईयेल सय. आनं जे लोकं ती सोरगं मयथीन ईयेल भाकरला खाईत, ते आत्मीक जीवनमं कधी मरावुत ना. 51 खरज सोरगं मयथीन ईयेल जीवन देनार भाकर मीज सय. आनं जे कोनी हाई भाकर मयथीन खाईत, तेसला कायमना जीवन भेटी. आनं ती भाकर मंजे मना शरीर सय. आनं जगना आखा लोकंसला कायमना जीवन भेटाला पायजे मनीसनं मी हाई शरीरला बलीदान करी दीसु.
52 मंग हाई आयकीसनं यहुदी लोकं पक्‍का वादवीवाद करु लागनत. ते सांगनत का, हाऊ मानुस येना सोताना शरीर कशा आपुनला खावाला देवु शकी? 53 येसु तेसला सांगना, मी तुमला खरज सांगय का, तुमं मानुसना पोर्‍याना मंजे मना शरीर खावाला पायजे आनं मना रंगत पेवाला पायजे. आनं जर तुमं तशे करनत ना तं, तुमला कायमना जीवन भेटावु ना. 54 तेमन जे कोनी मना शरीरला खातं रहीत आनं मना रंगतला पेतं रहीत, तेसला कायमना जीवन भेटी जायेल सय. आनं शेवटना दीवसमं तेसला मी मरन मयथीन जीवता उठाडसु. 55 कजं का मना शरीर आनं मना रंगत खरा आत्मीक जेवन सय. 56 तेमन जे मना शरीरला खात आनं मना रंगतला पेत, ते मनामं रहत आनं मी बी तेसमं रहय. 57 जो देवबाप जीवन देय, तोज माला धाडेल सय आनं तेनी द्वारा मी जीवन जगय. तशाज जे लोकं मना शरीरला खाईत, ते बी मनी मुळे कायमना जीवन जगीत. 58 सोरगं मयथीन ईयेल भाकर मीज सय. तुमना वाडावडील लोकं जंगलमं मान्ना खानत, तरी बी ते मरी गयत. पन जे लोकं हाई सोरगं मयथीन ईयेल भाकरला खाईत, ते कायमना जीवन जगीत.
59 जवं येसु कफरनाहुम शेहेरना यहुदीसना प्राथना घरमं शीकाडी रहनाल, तवं या आख्या गोस्टी तो सांगनाल.
येसुनी मांगं चालनारं बरज लोकं तेला सोडीसनं नींगी जात
60 मंग या गोस्टी आयकीसनं येसुनी मांगं चालनारं बरज लोकं येक मेकंसला सांगनत, या गोस्टी स्वीकार करानी करता पक्‍क्या कठीन सत. कोनी बी या गोस्टीसवर वीस्वास ठेवावुत ना. 61 पन येसुला मायती पडी गया का, तेनी मांगं चालनारं लोकं कुरकुर करी रहनं सत. तेमन तो तेसला सांगना का, हाई शीक्षनघाई मावर वीस्वास कराला तुमला आडचन वाटय का? 62 तं मंग जो सोरगं मयथीन मानुसना पोर्‍या मंजे मी वना सय तई माला परत जाताना तुमं दखशात तं, तुमला आजुन जास्त आडचन वाटी. 63 मानसंसना शरीरनी शक्‍तीघाई लोकंसला कायमना जीवन भेटु शकय ना, पन देवना आत्मा लोकंसला कायमना जीवन देय. आनं ज्या गोस्टी मी तुमला सांगना, त्या देवना आत्माघाई ईयेल सत, तेमन तीजघाई कायमना जीवन भेटय.
64 मंग कोन तेवर वीस्वास ठेवावुत ना आनं कोन तेला धरी देई, हाई येसुला पयला पईन मायती व्हताल. तेमन तो सांगना, तुम मयथीन काही लोकं त्या गोस्टीसवर वीस्वास ठेवत ना. 65 तेमन मी तुमला सांगना का, जे लोकंसला देवबाप मनी कडं येवु देय ना, ते मनी कडं येवु शकावुत ना.
66 मंग येसु हाई सांगानी नंतर तेनी मांगं चालनारं बरज लोकं परत नींगी गयत आनं आजुन ते कधीज तेनी मांगं गयत ना. 67 मंग येसु तेनं बारा चेलंसला वीचारना, तुमं बी माला सोडीसनं नींगी जाशात का? 68 शीमोन पेत्र तेला सांगना, परभु, तुला सोडीसनं आमं कोनपन जावुत? कजं का फक्‍त तुज कायमना जीवन देनार वचन आमला शीकाडय. 69 आनं आमला मायती सय का, देव पईन ईयेल पवीत्र जन तुज सय. आनं हाई गोस्टंवर आमं वीस्वास ठेवत. 70 येसु तेसला सांगना, मी तुमला बारा जनंसला नीवाडना ना का? पन तुम मयथीन येक जन सैतानना ताबामं सय. 71 शीमोन ईस्कंरीयोतना पोर्‍या यहुदानी बद्दल येसु हाई गोस्टं सांगना. कजं का यहुदा बारा चेलंस मईन येक व्हताल, पन तोज नंतर येसुला वीस्वासघात करीसनं धरी देनार व्हताल.