5
तळावना काटवर येसु येक आजारीला बरा करय
1 मंग काही दीवसनी नंतर यहुदी लोकंसना येक सन पाळानी करता येसु यरुशलेम शेहेरमं गया. 2 तवं यरुशलेम शेहेरना मेंडा नावना फाटुकनी शेजार येक तळाव व्हताल. ईब्री भाशामं तो तळावना नाव बेथेसदा व्हताल. आनं तो तळावला लागीसनं पाच झोपड्या व्हतल्यात. 3 त्या झोपडीसमं बरज आजारी लोकं पडेल रहतत. तेसमं बरज आंधळं, लंगडं आनं लकवा लागेल लोकं व्हतलत. आनं ते लोकं तळावना पानी हालानी वाट दखी रहतत. 4 कजं का कवं कवं येक देवदुत तळावमं ऊतरीसनं पानीला हालाडता. आनं तोज टाईमला जो कोनी पयलं जाईसनं तो पानीला हात लावता, तेला कोनता बी आजार रहता तं, तो बरा व्हई जाता.
5 तवं आडोतीस वरीस पईन आजारीमं पडेल येक मानुस तई व्हताल. 6 मंग येसु तो मानुसला तई पडेल दखना. तवं तेला मायती पडना का, हाऊ मानुस बराज वरीस पईन तई पडेल सय. तेमन तो तेला वीचारना, भाऊ, तुला बरा व्हवानी ईशा सय का? 7 मंग तो आजारी मानुस सांगना, साहेब, बरा व्हवानी मनी ईशा सय. पन जवं पानी हालय, तवं मला तई ली जावानी करता कोनीज ना सय. आनं मी जावाला नींगय तं, मनी आगुदारज दुसरा कोनीतरी पानीपन नींगी जाय. 8 मंग येसु तेला सांगना, उठीसनं हुबा रह आनं तुना आथरुंग ऊचलीसनं चालाला लाग. 9 तवं तो मानुस लगेज बरा व्हई गया आनं तेना आथरुंग ऊचलीसनं चालाला लागना.
मंग जो दीवसमं हाई व्हयना, तो शब्बाथना दीवस व्हताल. 10 तेमन तो बरा व्हयेल मानुसला यहुदी लोकं सांगनत, आज शब्बाथना दीवस सय. आनं आजना दीवसमं तु आथरुंग ऊचलीसनं जावाला नोको पायजे. कजं का हाई आपला नीयमना वीरुद सय. 11 पन तो मानुस सांगना, जो माला बरा करना सय, तोज माला सांगना का, तु तुना आथरुंग ऊचलीसनं चाल. 12 मंग ते तेला वीचारनत, आथरुंग ऊचलीसनं चालानी करता तुला जो सांगना तो कोन सय? 13 पन तो कोन व्हताल, हाई तो मानुसला मायती ना व्हताल. कजं का तई बरज लोकं गोळा व्हई जायेल व्हतलत आनं येसु तथाईन नींगी जायेल व्हताल.
14 नंतर तो येसु तो बरा व्हयेल मानुसला मंदीरमं भेटना. तवं येसु तेला सांगना, दख, तु बरा व्हई गया सय. तेमन आतं पईन पाप कराना सोडी दे. नातं पईला पेक्षा तुनी आखु पक्‍की हाल व्हई जाई. 15 मंग तो मानुस तथाईन नींगीसनं ते यहुदी लोकंस कडं परत गया. आनं तेसला सांगना का, जो माला बरा करना, तो येसु सय.
येसु देवना पोर्‍या सय
16 मंग शब्बाथना दीवसमं येसु या गोस्टी करी रहना सय मनीसनं यहुदी लोकं तेला पक्‍का वीरोध कराला लागनत. 17 पन येसु तेसला सांगना, मना देवबाप आतं परन कायम काम करी रहना सय, तेमन मी बी तशाज करय.
18 ये वयथीन ते यहुदी लोकं येसुला जीवता माराला पक्‍का कोशीत करनत. कजं का ते सांगनत का, हाऊ मानुस शब्बाथना दीवसनी बद्दल नीयमला मोडय. आनं येवडाज ना, पन तो देवला मना बाप सांगय. आनं आशा सांगीसनं तो सोताला देवनी बरोबर गनय. 19 पन येसु तेसला सांगना, मी तुमला खरज सांगय का, मी सोताना आधीकारथीन काही करु शकय ना. पन मना बाप जा काही करताना मी दखय, ताज मी करय. कजं का जा काही बी बाप करय, ता पोर्‍या बी करय. 20 मना देवबाप मावर मया करय. आनं जा काही तो सोता करय, ता आखा तो माला दखाडय. आतं हाऊ मानुसला मी बरा करना सय, पन येनी पेक्षा बी मोठमोठला काम करानी करता मना देवबाप माला दखाडी. आनं ता आखं दखीसनं तुमला पक्‍का नवल वाटी. 21 मना बाप मरेल लोकंसला बी उठाडीसनं तेसला जीवता करय. तशाज मी बी लोकंसला कायमना जीवन देय. आनं जेला हाई जीवन देवानी मनी ईशा सय, तेलाज मी देय. 22 आनं मना बाप लोकंसना न्याय करय ना, पन न्याय कराना आधीकार तो मना हातमं देयेल सय. 23 येनी करता का जशे लोकं मना बापला मान देत, तशेज माला बी ते मान देवाला पायजे. आनं जे लोकं माला मान देत ना, ते मना बापला बी मान देत ना. कजं का तोज माला धाडेल सय.
24 मी तुमला खरज सांगय का, जो कोनी मना वचन आयकय आनं मला धाडनार देवबापवर वीस्वास ठेवय, तेला कायमना जीवन भेटेल सय. आनं तेला दोसी ठरावामं येवावु ना. पन तो आत्मीक जीवनना मरन मयथीन नींगी वना सय आनं तेला कायमना जीवन भेटी गया सय. 25 मी तुमला खरज सांगय का, आशा दीवस ई रहना सय का, तवं जे लोकं आत्मीक जीवनमं मरेल सत, ते मानुसना पोर्‍या मंजे मना आवाज आयकीसनं तो वचनवर वीस्वास ठेयीत. आनं ते कायम देवनी संगं जीवन जगीत. खरज सांगु तं, तो टाईम आतं ई लागेल सय. 26 कजं का जशा मना देवबापपन कायमना जीवन देवानी शक्‍ती सय, तशाज तो तेना पोर्‍याला मंजे माला बी कायमना जीवन देवानी शक्‍ती देयेल सय. 27 आनं मी आखं लोकंसना न्याय कराला पायजे मनीसनं तो मना हातमं आधीकार देयेल सय. कजं का मीज मानुसना पोर्‍या सय.
28 या गोस्टीसनी बद्दल तुमं नवल नोको कराला पायजे. कजं का आशा दीवस ई रहना सय का, आखं मरेल लोकं बी मना आवाज आयकीत. 29 आनं ते तेसनी कबर मयथीन नींगी येईत. आनं जे लोकं तेसना जीवनमं चांगला कामं करेल सत, ते देवनी संगं कायम जीवन जगानी करता उठीत. पन जे लोकं वाईट कामं करेल सत, ते देवना न्याय आनं कायमना दंड भोगानी करता उठीत.
येसु सोतानी बद्दल साक्षी देय
30 येसु आखु सांगना, मी फक्‍त मना सोताना आधीकारथीन काहीज करु शकय ना. पन मना देवबाप माला जशा सांगय, तशाज मी न्याय करय. तेमन मी जो न्याय करय, तो खरा सय. कजं का मी सोतानी ईशा प्रमानं काही करय ना, पन माला धाडनार देवबापनी ईशा जी सय, तीज मी करय.
31 आनं जर फक्‍त मी सोता मनी बद्दल लोकंसला सांगय तं, ता लोकंसला खरा पटावु ना. 32 पन मनी बद्दल लोकंसला सांगानी करता आखु येक जन सय. आनं माला मायती सय का, मनी बद्दल तो जा काही बी सांगय, ता आखा खरा सय. 33 आनं मनी बद्दल वीचारानी करता बापतीस्मा करनार योहान कडं तुमं काही लोकंसला धाडेल व्हतलत. आनं मनी बद्दल खरा काय सय, हाई तो तुमला सांगेल सय. 34 खरज सांगु तं, मनी बद्दल दुसरं लोकं साक्षी देवानी काही गरज ना सय. पन तुमं योहानना सांगेल गोस्टीसवर वीस्वास ठेवाला पायजे. आनं तुमला तारन भेटाला पायजे मनीसनं मी या गोस्टी तुमला सांगय. 35 जशा येक दीवा चेटीसनं ऊजाळा देय, तशाज बापतीस्मा करनार योहान तुम मजार व्हताल. आनं तेना वचन आयकीसनं काही दीवस परन तुमं पक्‍का आनंद करनत.
36 पन मनी बद्दल सांगानी करता योहान पेक्षा बी येक मोठा पुरावा सय. जे मोठमोठलं काम मी करय, तेज मनी बद्दल मोठा पुरावा सत. कजं का ते मोठमोठलं काम कराला मना देवबाप माला सांगेल सय. आनं ये कामंजघाई लोकंसला मायती पडय का, मना देवबापंज माला धाडेल सय. 37 आनं जो देवबाप माला धाडेल सय, तो सोता मनी बद्दल लोकंसला सांगेल सय. पन तुमं कधी बी तेना आयकनत ना आनं तेला वळखनत ना. 38 आनं तेना वचनला तुमं तुमना रुदयमं ठेवनत ना. कजं का जेला तो धाडेल सय, तेवर तुमं वीस्वास ठेवत ना. 39 तुमला वाटय का, देवना वचनघाई तुमला कायमना जीवन भेटी जाई. तेमन तुमं तो वचनला काळजी करीसनं मनन करत. आनं तोज वचन लोकंसला मनी बद्दल सांगय. 40 तरी बी कायमना जीवन भेटानी करता तुमं मावर वीस्वास ठेवाला नाकारी देत.
41 माला लोकंसना पईन मान नोको पायजे. 42 पन तुमं कशे सत, हाई माला मायती सय. आनं माला मायती सय का, देववर तुमं रुदय पईन मया करत ना.
43 मी मना देवबापना आधीकारथीन हाई जगमं वना सय. तरी बी तुमं माला स्वीकार करत ना. पन जर दुसरा कोनी सोताना आधीकारथीन तुमनी कडं येय तं, तेला तुमं स्वीकार करशात. 44 आनं येकमेकंसला मोठा मान देवाना तुमला आवडय. पन जो कामघाई तो येकंज देव तुमला मान देय, तो काम करानी कोशीत तुमं करत ना. तेमन तुमं कधीज मावर वीस्वास ठेवु शकावुत ना. 45 तुमं आशा वीचार करु नोका का, मी मना देवबापनी समोर तुमला दोसी ठरावसु. पन तुमला वाचाडी मनीसनं जो मोसाना देयेल नीयमवर तुमं आसा ठेवनं सत, तोज नीयम तुमला दोसी ठराई. 46 आनं जर तुमं खरज मोसावर वीस्वास ठेवनं सत तं, तुमं मावर बी वीस्वास ठेवशात. कजं का मोसा सोता तेनं पुस्तकमं मनी बद्दल लीखेल सय. 47 पन जर मोसा जा लीखेल सय, तेवर तुमं वीस्वास ठेवत ना तं, मी जा सांगय, त्या गोस्टीसवर तुमं कधीज वीस्वास ठेवु शकावुत ना.