4
येसु येक शोमरोन जातनी बाईनी संगं बोलय
1 मंग परुशी लोकं आयकनत का, येसु बापतीस्मा करनार योहाननी पेक्षा बी जास्त लोकंसला बापतीस्मा दी रहना सय आनं चेलं बनाडी रहना सय. 2 पन खरा सांगु तं, येसु सोता लोकंसला बापतीस्मा दी रहनाल ना, पन तेनं चेलं दी रनलत. 3 मंग कोनीतरी परभु येसुला सांगनत का, परुशी लोकंसला तुनी कामनी बद्दल मायती पडी गया सय. तवं तो तेनं चेलंसनी संगं यहुदीया जील्ला मयथीन परत गालील जील्लामं जावाला नींगना.
4 मंग गालील जील्लामं जाताना तेसला शमरोन भाग मयथीन जाना पडना. 5 तवं ते शमरोन भागना सुखार नावना येक गावमं वनत. ✞ बरज वरीसनी आगुदार याकोब तेना पोर्या योसेफला तई येक वावर देयेल व्हताल. आनं तो वावरना शेजार तो सुखार गाव व्हताल. 6 आनं तो वावरमं याकोबनी यहर व्हतील. तवं दुफारना बारा वाजेल व्हताल. आनं येसु चाली चालीसनं पक्का थकी जायेल व्हताल. तेमन तो यहरपन ईसनं बसी लीना.
7 तवं पानी लेवानी करता येक शमरोन जातनी बाई ती यहरपन वनी. मंग येसु तीला सांगना, बाई, माला पेवाला थोडासा पानी दे. 8 तवं येसु तई येकटाज व्हताल. कजं का तेनं चेलं खावानी करता काहीतरी ईकत लेवाला गावमं जायेल व्हतलत.
9 तवं यहुदी लोकं शोमरोनी लोकंसनी संगं समंध ठेवतत ना. तेमन ती शोमरोनी बाई येसुला सांगनी, तु येक यहुदी मानुस सय आनं मी येक शोमरोनी बाई सय. तु कशा मापन पानी मांगी रहना सय? 10 मंग येसु तीला सांगना, देव तुला जो दान देनार सय, येनी बद्दल तुला मायती ना सय. आनं आतं कोन तुपन पानी मांगी रहना सय, हाई बी तुला मायती ना सय. तुला जर या गोस्टी मायती रहत्यात तं, तु मापन मांगती. आनं मी तुला जीवन देनार पानी दीतु. 11 मंग ती सांगनी, साहेब, तुला तो जीवन देनार पानी कथाईन भेटी? कजं का हाई यहर तं पक्की खोल सय आनं पानी काडानी करता तुपन बादली नातं काहीज ना सय. 12 आनं आमना बाप याकोब आमना साठी हाई यहर खंदी देयेल सय. तो आनं तेनं कुटुमनं लोकं आनं तेना घरनं जनावरं हाई यहर मयथीन पानी पीयेल सत. खरज तु तेनी पेक्षा मोठा ना सय. तं मंग कशा तु येनी पेक्षा बी चांगला पानी देवु शकशी? 13 मंग येसु तीला सांगना, जो कोनी बी हाई पानी पेई, तेला आजुन तीस लागी. 14 पन जो कोनी मना देयेल पानी पेई, तेला कधीज तीस लागावुज ना. कजं का जो पानी मी दीसु, तो लोकंसना मजार येक कायमना झीरा सारका बनी जाई. आनं तो झीरा मयथीन कायमना जीवन देनार पानी नींगी आनं लोकंसला कायमना जीवन देई. 15 मंग येसु जा सांगना, ता ती बाईला समजना ना. तेमन ती सांगनी, साहेब, माला कधी तीस नोको लागाला पायजे आनं पानी लेवानी करता मी आठी नोको येवाला पायजे मनीसनं माला तो पानी दे.
16 मंग येसु तीला सांगना, जा, तुना नवराला बलाईसनं आठी ली ये. 17 ती सांगनी, मना नवरा ना सय. येसु तीला सांगना, तु खरा सांगनी का, तुला नवरा ना सय. 18 कजं का तु पाच नवरा करेल व्हतील. आनं जो मानुसनी संगं तु आतं रहय, तो बी तुना नवरा ना सय. तेमन तु जा सांगनी, ता खरज सय.
19 मंग ती सांगनी, साहेब, आतं माला समजना का, तु येक देवना वचन सांगनार सय. कजं का मनी बद्दल आखंकाही तुला मायती पडी गया सय. 20 मी तुला येक गोस्टं वीचारु का? आमना वाडावडील पईन आतं परन आमं शोमरोनी लोकं हाई डोंगरवर देवनी भक्ती करत. पन तुमनं यहुदी लोकं कजं सांगत का, फक्त यरुशलेम शेहेरमंज देवनी भक्ती कराला पायजे? 21 येसु तीला सांगना, बाई, मी जा सांगय तेवर वीस्वास ठेव. आशा दीवस ई रहना सय का, लोकंसला देवबापनी भक्ती हाई डोंगरवर नातं यरुशलेम शेहेरमं करानी गरज पडावु ना. 22 आनं तुमनं शोमरोनी लोकं बी देवनी भक्ती करत, पन तुमं तेला वळखत ना. पन आमं यहुदी लोकं जो देवनी भक्ती करत, तेला आमं चांगला वळखत. कजं का आमं यहुदी लोकंस पईनंज पाप पईन तारन देनारला देव धाडेल सय. 23 पन आशा टाईम ई रहना सय का, तवं देवनी खरी भक्ती करनारं लोकं पवीत्र आत्माघाई आनं तेनी बद्दल जा काही बी सत्य सय, तेनी प्रमानं देवबापनी भक्ती करीत. आनं खरा सांगु तं, तो टाईम आतं ई लागना सय. आनं आशे भक्ती करनारंसला देवबाप दखी रहना सय. 24 देव मानुस ना सय, पन आत्मा सय. तेमन जे लोकं तेनी भक्ती करत, ते पवीत्र आत्माघाई आनं तेना सत्य वचन प्रमानं तेनी भक्ती कराला पायजे.
25 मंग ती बाई सांगनी, माला मायती सय का, देवना धाडेल राजा, जेला ख्रीस्त सांगामं येय, तो येनार सय. आनं जवं तो येई, तवं आख्या गोस्टी आमला समजाडीसनं सांगी. 26 मंग येसु सांगना, मीज तो देवना धाडेल राजा सय, जो तुनी संगं आतं परन बोली रहना सय.
27 तेवडामं येसुनं चेलं गाव मयथीन परत वनत. आनं ते दखनत का, येसु येक बाईनी संगं बोली रहना सय. तवं तेसला पक्का नवल वाटना. पन कोनी बी तेला वीचारनत ना का, तुला काय पायजे नातं कजं तु यीनी संगं बोली रहना सय?
28 मंग ती बाई तीना पानीना गुंडा तईज यहरपन सोडीसनं गावमं परत गयी. आनं ती गावनं लोकंसला सांगनी, 29 तुमं या आनं येक मानुसला दखा. मना जीवनमं जा काही बी मी करेल सय, ता आखा तो माला सांगी दीना. कदाचीत तोज देवना धाडेल राजा व्हई. 30 मंग गावनी बाहेर ईसनं बरज लोकं येसुला भेटाला वनत.
येसु तेनं चेलंसनी संगं बोलय
31 तवं येसुनं चेलं तेला वीनंती करीसनं सांगनत का, गुरुजी, तु काहीतरी खाई ले. 32 पन येसु तेसला सांगना, मापन खावाला जो जेवन सय, तेनी बद्दल तुमला काही मायती ना सय. 33 तवं ते चेलं येक मेकंसला वीचाराला लागनत, येला कोनीतरी खावाला काही दीना सय का? 34 येसु सांगना, जो माला धाडेल सय, तेनी ईशा प्रमानं चालाना आनं तेना देयेल काम पुरा कराना, हाईज मना जेवन सय. 35 जवं लोकं बीवारा पयरत, तवं सांगत का, पीक कापाला आजुन चार मयना बाकी सय. पन मी तुमला सांगय का, आतं तुमं ते येनारं लोकंसनी कडं दखा. ते तयार व्हई जायेल पीक सारकं सत. 36 तेमन आतं तुमं पीक कापानी करता तयार व्हई जावाला पायजे. आनं ते लोकंसला कायमना जीवन भेटाला पायजे मनीसनं तुमं काम कराला पायजे. तवं जशा येक कापनारला मालक मजुरी देय, तशाज देव बी तुमला बक्षीस देई. आनं तो पयरनारला आनं कापनी करनारला दोनीसला पक्का आनंद वाटी. 37 तवं आपुन जा सांगत, ता खरा व्हई. आपुन सांगत का, येक जन पयरय तं, दुसरा जन कापय. 38 आनं जो आत्मीक पीकनी करता तुमं मेहनत करनत ना, तो कापानी करता मी तुमला धाडना सय. तो पीकनी करता दुसरं लोकं मेहनत करनत, पन तुमं तेसना काम पुरा करनारं सत.
बरज शोमरोन जातनं लोकं येसुवर वीस्वास ठेवत
39 मंग ती शोमरोनी बाई लोकंसला सांगनील का, मी मना जीवनमं जा काही बी करेल सय, ता आखा तो माला सांगी दीना. तवं हाई आयकीसनं तो शेहेरनं बरज शोमरोनी लोकं येसुवर वीस्वास ठेवनत. 40 मंग ते शोमरोनी लोकं येसु कडं वनत आनं तेसनी संगं रव्हानी करता तेला वीनंती करनत. तेमन येसु तई दोन दीवस रहना. 41 आनं तेना वचन आयकीसनं आजुन बरज लोकं तेवर वीस्वास ठेवनत. 42 मंग ते लोकं ती बाईला सांगनत, पयलं तु जा सांगनी, ता आयकीसनं आमं येसुवर वीस्वास ठेवनत. पन आतं आमं सोता तेना सांगेल वचन आयकनत, तेमन तेवर आजुन पक्का वीस्वास ठेवत. आनं आतं आमला मायती पडी गया सय का, खरज जगनं लोकंसला पाप पईन तारन देनार हाऊज सय.
येसु येक आधीकारी मानुसना पोर्याला बरा करय
(मतय ८:५-१३; लुक ७:१-१०)
43 मंग शोमरोनी लोकंसनी संगं दोन दीवस रव्हानी नंतर येसु आनं तेनं चेलं तथाईन नींगीसनं गालील जील्लामं गयत. 44 कजं का येसु सोता सांगेल व्हताल का, देवना वचन सांगनारंसला तेसना सोताना गावंसमं कोनी बी मान देत ना.
45 पन जवं ते तई वनत, तवं लोकं येसुना स्वागत करनत. कजं का ते लोकं वल्हांडनना सन पाळानी करता यरुशलेम शेहेरमं जायेल व्हतलत आनं तेना आखा करेल गोस्टं ते दखेल व्हतलत.
46 मंग येसु आखु गालील जील्लाना काना गावमं गया. तोज गावमं तो पानीना द्राक्षरस बनाडेल व्हताल.
तवं जवळना कफरनाहुम शेहेरमं येक आधीकारी मानुस व्हताल. आनं तेना पोर्या पक्का आजारी पडेल व्हताल. 47 मंग तो आधीकारी आयकना का, येसु यहुदीया मयथीन गालील जील्लामं ईयेल सय. तवं तो येसुपन जाईसनं तेला पक्का रावन्या करीसनं सांगना का, गुरुजी, तु कफरनाहुममं ईसनं मना पोर्याला बरा कर. कजं का तो मरनना काटवर पडेल सय. 48 येसु तेला सांगना, लोकंसला नवल करानी सारका चमत्कारनी गोस्टं दखा शीवाय तुमं मावर कधी वीस्वास ठेवत ना. 49 मंग तो आधीकारी येसुला सांगना, गुरुजी, मना पोर्या मरी जावानी आगुदार तु ईसनं तेला बरा कर. 50 येसु सांगना, जा, तुना पोर्या वाची जाई. मंग तो मानुस येसुना सांगेल गोस्टंवर वीस्वास ठेईसनं घर नींगी गया.
51 आनं जवं तो जाई रहनाल, तवं तेना काही नौकर लोकं ईसनं तेला भेटनत आनं सांगनत, तुना पोर्या बरा व्हई गया सय. 52 मंग तो तेसला वीचारना, कवं मना पोर्या बरा व्हयना सय? ते सांगनत, कालदी दुफारना येक वाजता पईन तेना ताव ऊतरी गया सय. 53 मंग तो पोर्याना बाप याद करना का, तोज टाईमला येसु तेला सांगेल व्हताल का, तुना पोर्या वाची जाई. तेमन तो आनं तेना कुटुमनं आखं लोकं येसुवर वीस्वास ठेवनत.
54 मंग यहुदीया जील्लाथीन परत गालील जील्लामं येवानी नंतर तो जील्लामं येसुना करेल हाई दुसरा चमत्कार व्हताल.