3
येसु नीकदेमला शीकाडय
1 तवं नीकदेम नावना येक मानुस व्हताल. तो परुशी लोकंस मयला व्हताल आनं यहुदी लोकंसना येक मोठा पुढारी व्हताल. 2 येक दीवस तो रातला येसुपन वना आनं सांगना, गुरुजी, आमला मायती सय का, आमला शीकाडानी करता देव तुला धाडेल सय. कजं का तु जे चमत्कारं करय, ते कोनी बी करु शकावुत ना. पन जेनी संगं देव सय, तोज करु शकय. 3 मंग येसु तेला सांगना, मी तुला खरज सांगय का, नवीन जल्म लेवा शीवाय कोनी बी देवना राज्य दखु शकावुत ना. 4 नीकदेम वीचारना, येक मानुस धयड्या व्हई जावानी नंतर तो कशा आजुन जल्म लेवु शकी? कजं का जल्म लेवानी करता तो तेनी मायना पोटमं परत जावु शकावु ना. 5 मंग येसु तेला सांगना, मी तुला खरज सांगय का, पानी आनं पवीत्र आत्माघाई जल्म लेवा शीवाय कोनी बी मानुस देवना राज्यमं जावु शकावु ना. 6 आनं मायबाप पईन लोकं जल्म लेत तं, ते फक्‍त शरीरना जल्म लेत. पन आत्मीक जीवनना जल्म फक्‍त पवीत्र आत्मा पईनंज व्हय. 7 तुमं नवीन जल्म लेवाला पायजे, आशा मी सांगना मनीसनं तुला नवल नोको वाटाला पायजे. 8 आतं मी तुला येक ऊदाहरन सांगय, वारानी जी बांग जावानी ईशा व्हय, ती बांग तो जाय. आनं तो कथाईन येय आनं कई जाय, ता तुला मायती पडय ना. पन फक्‍त तु आयकु शकय. तशाज पवीत्र आत्मा पईन जल्म लेवाना मंजे काय, हाई बी लोकंसला समजावु ना.
9 मंग नीकदेम येसुला वीचारना, हाई कशा व्हवु शकय? 10 येसु तेला सांगना, तु सोता ईस्रायेल लोकंसना येक मोठा गुरु सय. तरी बी तुला या गोस्टंसनी बद्दल समजय ना का? 11 मी तुला खरज सांगय का, आमला जा खरा मायती सय, ताज आमं सांगत. आनं जा आमं दखेल सत, तेनी बद्दलज आमं साक्षी देत. तरी बी तुम मयथीन कोनी बी आमन्या सांगेल गोस्टीला मानत ना. 12 आनं जवं हाई जगन्या गोस्टंसनी बद्दल मी तुमला सांगय तं, तुमं वीस्वास ठेवतंज ना, तं मंग जर मी सोरगंन्या गोस्टंसनी बद्दल सांगसु तं, तुमं कशे वीस्वास ठेवशात? 13 सोरगंनी बद्दल मालाज मायती सय, कजं का मानुसना पोर्‍या मंजे मी सोरगं पईन वना सय. आनं आतं परन कोनी बी सोरगंमं गयाज ना सय, पन फक्‍त मीज गया सय. 14 आनं जशा सुना रानमं मोसा सापडाला ऊचा करना, तशाज येक दीवस मानुसना पोर्‍याला मंजे माला बी मारी टाकानी करता लोकं कुरुस खांबावर ऊचा करीत. 15 येनी करता का जो कोनी बी मावर वीस्वास ठेईत, तेसला कायमना जीवन भेटी. 16 कजं का देव जगवर येवडा मया करना का, तो तेना येकुलता येक पोर्‍याला दी दीना. येनी करता का जो कोनी तेवर वीस्वास ठेई, तेना नास व्हवावु ना, पन तेला कायमना जीवन भेटी. 17 कजं का जगना न्याय करानी करता देव तेना पोर्‍याला हाई जगमं धाडना ना. पन तेनी द्वारा जगनं लोकंसना तारन व्हवाला पायजे मनीसनं तेला धाडना सय. 18 तेमन जे लोकं देवना पोर्‍यावर मंजे मावर वीस्वास ठेवत, तेसला दोसी ठरावामं येवावु ना. पन जे लोकं तेवर वीस्वास ठेवनत ना, तेसला दोसी ठराईसनं दंड देवामं येई. कजं का ते देवना येकुलता येक पोर्‍यावर वीस्वास ठेवनत ना. 19 देवना खरा काय सय, हाई प्रगट करानी करता मी येक ऊजाळानी सारका हाई जगमं वना. पन लोकं तो ऊजाळावर मया करनत ना. आनं तेसला पापना आंधाराज आवडना, कजं का ते पक्‍कं वाईट कामं करनारं व्हतलत. तेमन देव तेसवर दोस लाईसनं तेसला दंड देई. 20 कजं का जे लोकं वाईट कामं करत, तेसला ऊजाळा आवडय ना. आनं तेसना वाईट कामं मायती नोको पडाला पायजे मनीसनं ते ऊजाळामं येतंज ना. 21 पन जे लोकं देवना सत्य प्रमानं जीवन जगत, ते ऊजाळामं येत. येनी करता का, तो ऊजाळा प्रगट कराला पायजे का, ते जा काही बी करत, ता ते देवना मदतथीन करत.
बापतीस्मा करनार योहान येसुनी बद्दल सांगय
22 तेनी नंतर येसु आनं तेनं चेलं यरुशलेम मयथीन नींगीसनं यहुदीया जील्लामं गयत. आनं तई तो तेनं चेलंसनी संगं काही दीवस रहना आनं लोकंसला बापतीस्मा दीना. 23 तवं बापतीस्मा करनार योहान बी येनोन नावना गावमं लोकंसला बापतीस्मा दी रहनाल. कजं का तई भरपुर पानी व्हताल. आनं तो येनोन गावं शालीम नावना शेहेरना जवळ व्हताल. आनं दररोज लोकं सारकंज तेनी कडं ईसनं बापतीस्मा ली रनलत. 24 ताव परन योहान जेलमं कोंडायेल ना व्हताल.
25 तवं बापतीस्मा करनार योहाननं काही चेलंसनी संगं येक यहुदी मानुसना वादवीवाद चालु व्हयना. तेसना वादावाद शुधीकरननी करता रीत रीवाज प्रमानं आंग धवानी बद्दल व्हताल.
26 मंग ते चेलं योहानपन वनत आनं सांगनत, गुरुजी, यार्दन नदीनी तथानी बाजुला जवं तु बापतीस्मा दी रहनाल, तवं येक मानुस तुनी संगं व्हताल आनं तेनी बद्दल तु सांगेल व्हताल का, तोज देवना धाडेल राजा सय. हाई तुला याद सय का? आतं तो मानुस बी लोकंसला बापतीस्मा दी रहना सय आनं बरज लोकं तेनी कडं जाई रहनं सत. 27 मंग योहान तेसला सांगना, येनी बद्दल तुमना जीव नोको बळाला पायजे. कजं का जर देव सोतानी ईशाघाई करय ना तं, कोनी बी मोठा बनु शकय ना. 28 आनं मी देवना धाडेल तो राजा ना सय. पन तेना साठी वाट तयार करानी करताज तेनी आगुदार माला धाडामं ईयेल सय. हाई गोस्टंना पुरावा तुमं सोताज सत. कजं का हाई गोस्टं मी तुमना समोरज सांगेल सय. 29 आतं मी तुमला येक ऊदाहरन सांगय. जो मानुस नवरीनी संगं लगीन कराला जाय, तोज नवरदेव रहय. आनं नवरदेवना सोपती हुबा रहीसनं फक्‍त तेनी वाट दखी रहय. आनं जवं तो नवरदेवना आवाज आयकय, तवं तेला पक्‍का आनंद वाटय. तशाज जेनी बद्दल तुमं सांगत, तो बी येक नवरदेव सारका सय आनं मी तेला मदत करनार तेना सोपती सारका सय. आनं तेनी बद्दल तुम पईन आयकीसनं माला बी पक्‍का आनंद वाटय. 30 आनं तोज मोठा व्हवाला पायजे आनं मी तेनी पेक्षा धाकलाज रव्हाला पायजे.
31 मंग बापतीस्मा करनार योहान आखु तेसला सांगना, तोज सोरगं मयथीन ईयेल सय. आनं तोज आखंस पेक्षा मोठा सय. आनं जे लोकं मायबापंस पईन हाई जगमं जल्म लेत, ते फक्‍त मानसंज सत. आनं ते फक्‍त हाई जगन्या गोस्टीसनी बद्दलज बोलत. पन तो सोरगं मयथीन ईयेल सय मनीसनं तो आखंस पेक्षा मोठा सय. 32 आनं जा काही बी तो देव पईन आयकेल सय आनं दखेल सय, ताज तो सांगय. पन कोनी बी तेन्या सांगेल गोस्टीसला स्वीकार करत ना. 33 आनं जो कोनी तेन्या सांगेल गोस्टीसला स्वीकार करय, तो देवन्या सांगेल गोस्टीसला खर्‍या सत मनीसनं पुरावा देय. 34 आनं तो देवना वचन लोकंसला सांगाला पायजे मनीसनं देव तेला धाडेल सय. आनं देव तेला पवीत्र आत्मानी पुरी शक्‍ती देयेल सय. 35 देवबाप तेना पोर्‍यावर मया करय. आनं आख्या गोस्टीसवर आधीकार तेला देयेल सय. 36 आनं जो कोनी देवना पोर्‍यावर वीस्वास ठेवय, तेलाज कायमना जीवन भेटय. पन जो कोनी देवना पोर्‍यानी आज्ञा पाळय ना, तेला कधीज कायमना जीवन भेटावु ना. ऊलट देव तेवर संताप करीसनं तेला दंड देई.