8
वेश्या बाईला लोकं धरत
1 मंग येसु मंदीर मयथीन जैतुन नावना डोंगरवर नींगी गया. 2 आनं दुसरा दीवसमं पाहाटला परत तो मंदीरमं वना. तवं बरज लोकं तेनी चारीमेर गोळा व्हयनत. आनं तो बसीसनं ते लोकंसला शीकाडाला लागना.
3 तवं यहुदीसनं नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकं येक बाईला लीसनं तई वनत आनं लोकंसनी समोर तीला हुबं करनत. ती बाईला वेश्याना काम करताना ते धरेल व्हतलत. 4 आनं ते येसुला सांगनत, गुरुजी, हाई बाईला वेश्याना काम करताना आमं धरनं सत. 5 ✞ मोसाना देयेल नीयममं आशा लीखेल सय का, आश्या बाईसला आपुन दगडमार करीसनं मारी टाकाला पायजे. पन येनी बद्दल तु काय सांगय? 6 ते येसुला फसाडानी करता हाई वीचारनत. कजं का तो काहीतरी चुकीना बोली तं, तेमं तेला धराला ते दखी रनलत. पन येसु तेसला काही सांगना ना आनं तो ढोंगा पडीसनं तेना बोटघाई जमीनवर काहीतरी लीखाला लागना. 7 मंग ते लोकं येक सारकं तेला वीचारी रनलत. तेमन हुबा रहीसनं तो तेसला सांगना, तुम मयथीन जो कोनी कधी पाप करेल ना सय, तोज पयलं यीला दगड मारी. 8 हाई सांगीसनं येसु आजुन ढोंगा पडीसनं तेना बोटघाई जमीनवर काहीतरी लीखाला लागना. 9 मंग येसु जा सांगना, ता आयकीसनं ते आखं जन येक येक करीसनं मांगं नींगी गयत. जे मोठलं व्हतलत ते पयलं नींगी गयत आनं तेनी नंतर धाकलं बी नींगी गयत. मंग येसु ती बाईनी संगं तई येकटाज व्हताल. 10 आनं तो हुबा रहीसनं तीला वीचारना, बाई, ते आखं लोकं कई नींगी गयत? तेस मयथीन येक जन बी तुला दोसी ठराव शकना ना का? 11 ती सांगनी, ना परभु, कोनी बी माला दोसी ठराव शकनत ना. येसु सांगना, मी बी तुला दोसी ठरावय ना. तेमन तु परत नींगी जा आनं येनी पुडं आजुन पाप करु नोको.
येसु जगना ऊजाळा सय
12 मंग येसु आजुन ते परुशी लोकंसला सांगना, मी जगना आखं लोकंसनी करता येक ऊजाळा सारका सय. आनं जे लोकं मावर वीस्वास ठेवत, ते कधी आंधारामं जीवन जगावुत ना. पन तेसनी संगं कायमना जीवन देनार ऊजाळा रही. 13 पन ते परुशी लोकं तेला सांगनत, फक्त तुज तुनी बद्दल बोली रहना सय. आनं तु जा बोलय, ता खरा सय का ना येनी बद्दल तुला सोडीसनं आजुन दुसरा कोनी बी साक्षी देवु शकय ना. तेमन आमं तुन्या गोस्टीसवर कशाकाय वीस्वास ठेवु शकुत? 14 पन येसु तेसला सांगना, हाई खरा सय का, मी सोतानी बद्दलज साक्षी देय. तरी बी मी जा सांगय, ता खरा सय. कजं का मी कथाईन वना सय आनं कई जाई रहना सय, हाई माला मायती सय. पन ता तुमला मायती ना सय. 15 आनं तुमं मानसंसना रीत रीवाज प्रमानं मना न्याय करत, पन मी कोना बी न्याय करय ना. 16 पन जर मी न्याय करसु तं, तो न्याय खरा व्हई. कजं का मी येकटाज ता करावु ना, पन जो देवबाप माला धाडेल सय, तो बी मनी संगं सय. 17 तुमना सोताना नीयममंज आशा लीखेल सय का, ✞जर दोन जन येक गोस्टंनी बद्दल पुरावा दीनत तं, ती गोस्टं खरी सय. 18 मंग मी सोतानी बद्दल पुरावा देय आनं तशाज मना धाडेल बाप बी मनी बद्दल पुरावा देय. तेमन जा काही बी आमं सांगत, ता खरज सय आनं तुमं तेवर वीस्वास ठेवाला पायजे. 19 मंग ते येसुला वीचारनत, तुना बाप कई सय? येसु सांगना, तुमं माला नातं मना बापला वळखत ना. जर तुमं माला वळखतत तं, मना बापला बी वळखतत.
20 जवं येसु मंदीरमं शीकाडी रहनाल, तवं तो दानपेटीनी शेजार बसीसनं या गोस्टी सांगना. पन कोनी बी तेला धरु शकनत ना. कजं का तो परन तेना मरनना टाईम ईयेल ना व्हताल.
येसुनी बद्दल यहुदी लोकंसला समजय ना
21 आखु येसु तेसला सांगना, लवकर मी तुमला सोडीसनं नींगी जासु. आनं तुमं माला दखतं फीरशात आनं तुमना पापमंज तुमं मरी जाशात. पन जई मी जाई रहना सय, तई तुमं येवु शकावुत ना. 22 मंग ते यहुदी लोकं येक मेकंसला वीचाराला लागनत, हाऊ मानुस सोताला मारी टाकनार सय का? कजं का तो सांगय, जई मी जाई रहना सय, तई तुमं येवु शकावुत ना. 23 येसु तेसला सांगना, तुमं हाई जगमं जल्म लीयेल सत, पन मी सोरगं मईन वना सय. आनं तुमं जगनं लोकं सत, पन मी जगना ना सय. 24 मी तुमला सांगना का, तुमं तुमना पापमंज मरी जाशात. खरज, जर ✞मी तोज सय मनीसनं तुमं वीस्वास ठेवत ना तं, तुमं तुमना पापमंज मरी जाशात.
25 मंग ते येसुला वीचारनत, तु कोन सय? येसु सांगना, सुरुवात पईन मी जेनी बद्दल सांगी रहना सय, मी तोज सय. 26 तुमनी बद्दल बी बरज गोस्टी सांगीसनं मी तुमवर दोस लावु शकय. पन जो माला धाडेल सय, तो खरा बोलय. आनं जा काही मी ते पईन आयकेल सय, ताज मी जगनं लोकंसला सांगय.
27 पन देवबापनी बद्दल येसु जा काही सांगना, ता लोकंसला काहीज समजना ना. 28 तेमन येसु तेसला सांगना, मीज सोरगं मयथीन जगमं ईयेल सय. आनं जवं तुमं मानुसला पोर्याला मंजे माला कुरुस खांबावर मारानी करता वर टांगशात, तवं तुमला मायती पडी का, मीज तो सय आनं मी मना सोताना आधीकारथीन काही करय ना. पन जा काही देवबाप शीकाडय, ताज मी तुमला सांगय. 29 आनं जो माला धाडेल सय, तो मनी संगं सय. आनं तो माला येखलाला सोडना ना सय. कजं का जा तेला आवडय, ताज मी कायम करय.
30 जवं येसु या गोस्टी सांगी रहनाल, तवं त्या आयकीसनं बरज लोकं तेवर वीस्वास ठेवनत.
पाप पईन सुटका व्हवानी बद्दल येसु सांगय
31 मंग जे यहुदी लोकं येसुवर वीस्वास ठेवनत तेसला तो सांगना, जर तुमं कायम मना शीक्षनला पाळशात तं, तुमं मनं खरं वीस्वासी बनशात. 32 तवं देवना सत्य तुमला समजी. आनं तो खरा देव तुमला गुलामगीरीना बंधन पईन सुटका करी.
33 मंग ते लोकं सांगनत, आमं आब्राहामनी पीढीनं लोकं सत आनं कधी कोनी बी गुलामगीरीमं ना सत. मंग तु कशा सांगय का, आमला गुलामगीरीना बंधन पईन सुटका भेटी जाई. 34 येसु तेसला सांगना, मी तुमला खरज सांगय का, जे लोकं पाप करत ते पापना गुलामगीरीमंज सत. 35 येखादा गुलामगीरी करनार मानुस कायम तेना मालकना कुटुमनं लोकंसनी संगं रहु शकावु ना, पन तो मालकना पोर्या कायम रहु शकय. 36 तेमन जर देवना पोर्या मंजे मी तुमना सुटका करसु तं, तुमला नक्की सुटका भेटी जाई. 37 माला मायती सय का, तुमं आब्राहामनी पीढीनं लोकं सत. तरी बी तुमं माला जीवता माराला दखी रहनं सत. कजं का मी तुमला जा शीकाडय, ता तुमं स्वीकार करत ना. 38 मना देवबाप जा काही माला दखाडेल सय, ताज मी तुमला सांगय. पन तुमना बाप जा काही तुमला सांगेल सय, ताज तुमं करत.
सैतान बरज लोकंसना बाप सय
39 मंग ते लोकं सांगनत, आब्राहामनी पीढीमं आमं जल्म लीयेल सत. येसु तेसला सांगना, जर तुमं खरज आब्राहामनी पीढीनं लोकं सत तं, आब्राहाम ज्या गोस्टी करना, त्या तुमं बी करतत. 40 मी देव पईन जा खरा वचन आयकेल सय, ताज तुमला सांगय. पन तुमं माला जीवता माराला दखी रहनं सत. आब्राहाम कधी तशा करना ना. 41 पन तुमना खरा बाप जा करना, ताज तुमं करत. मंग हाई आयकीसनं ते सांगनत, आमं शीनाळीना काम पईन जल्म लीनत ना. आनं आमना येकंज बाप सय, तो देवज सय. 42 येसु सांगना, जर खरज देव तुमना बाप रहता तं, तुमं मावर मया करतत. कजं का मी तोज देवबाप पईन वना सय आनं आतं आठी सय. मी सोताना आधीकारथीन आठी वना ना सय, पन तो देवज माला धाडेल सय. 43 मी तुमला जा शीकाडी रहना सय, ता तुमला कजं समजय ना? येनी करता का, जा मी शीकाडय, ता स्वीकार कराला तुमं तयार ना सत. 44 तुमना बाप सैतान सय आनं तुमं तेनाज सत. तेला जा आवडय, ताज करानी ईशा तुमं ठेवत. तो सुरुवात पईन खुन करनार आनं कायम देवना खरा वचनना वीरोध करनार सय. कजं का तेमं काही खरा ना सय. तो लबाड सय आनं लबाड बोलनारंसना बाप सय. तेमन तेना सोभाव प्रमानं तो लबाडंज सांगय. 45 पन मी देवना खरा वचन सांगय मनीसनं तुमं मावर वीस्वास ठेवत ना. 46 मी काही बी पाप करेल सय, आशा तुम मयथीन कोनी बी पुरावा देवु शकीत का? मंग जवं मी देवना खरा वचन सांगय, तुमं कजं मावर वीस्वास ठेवत ना? 47 जे लोकं देवनं सत, ते देवना वचनला आयकीसनं पाळत. पन तुमं देवना वचनला पाळत ना. कजं का तुमं देवनं लोकं ना सत.
येसु आब्राहामनी पेक्षा बी मोठा सय
48 मंग यहुदी लोकं येसुला सांगनत, आमं तुला सांगत का, तु ✞ शोमरोनी लोकंसनी सारका येक वाईट मानुस सय आनं तुला भुत लागेल सय. हाई खरज ना सय का? 49 येसु तेसला सांगना, माला भुत लागेल ना सय, पन मी मना देवबापला मान देय. पन तुमं मना आपमान करत. 50 तरी बी सोताला मान भेटाडाला मी दखय ना. पन माला मान भेटाला पायजे आशा दुसरा कोनी तरी कोशीत करी रहना सय. आनं तो आखंसना न्याय करनार सय. 51 मी तुमला खरज सांगय का, जे कोनी मना शीक्षनला पाळत, ते कधीज ✞मरावुत ना.
52 मंग ते यहुदी लोकं सांगनत, आतं आमला पुरा मायती पडी गया सय का, तुला भुतंज लागेल सय. कजं का आब्राहाम आनं देवना वचन सांगनारं कईनं मरी गयं सत. पन तु सांगय का, जे कोनी मना शीक्षनला पाळत, ते कधीज मरावुत ना. 53 आनं आमना बाप आब्राहाम बी मरी गया सय. आनं तेनी पेक्षा बी तु मोठा सय का? तशाज देवना वचन सांगनारं आखं लोकं बी मरी गयत. तु सोताला काय समजय? 54 येसु सांगना, जर सोताला मान भेटाडाला मी दखय तं, तो मान काहीज ना सय. पन मना देवबाप जेला तुमं तुमना देव मनीसनं मानत, तोज माला मान देय. 55 आनं तो देवला तुमं खरज वळखत ना, पन मी तेला वळखय. जर मी तेला वळखय ना मनीसनं मी सांगु तं, मी बी तुमनी सारका लबाड व्हई जासु. पन मी तेला नक्की वळखय आनं तो जा सांगय, ताज मी पाळय. 56 मना येवाना दीवसला दखसु मनीसनं तुमना बाप आब्राहामला पक्का आनंद वाटनाल. आनं तो दीवसला दखीसनं तेला पक्का आनंद व्हयना.
57 मंग ते यहुदी लोकं तेला सांगनत, तु तं पन्नास वरीसना बी ना सय. मंग कशाकाय तु आब्राहामला दखेल सय? 58 येसु सांगना, मी तुमला खरज सांगय का, आब्राहामना जल्मनी आगुदार पईन मी सय.
59 मंग हाई आयकीसनं ते लोकं पक्का राग करनत आनं येसुला दगड मार करानी करता दगडं ऊचलनत. पन येसु गच्चुप तो मंदीर मयथीन नींगी गया.