14
येसु येक सुजेल मानुसला बरा करय
1 मंग येक शब्बाथना दीवसमं परुशी लोकंसना येक आधीकारीना घरमं येसु जेवाला गया. तवं तो काही करी तं, तेमं तेला धराला लोकं येसुवर टपी बसनंलत. 2 तवं येसुनी समोर हातपायना सुजेल येक मानुस व्हताल. 3 मंग येसु यहुदी लोकंसना नीयम शीकाडनारंसला आनं परुशी लोकंसला वीचारना, आपला नीयम प्रमानं शब्बाथना दीवसमं आजारीसला बरा कराला पायजे का ना? 4 पन ते गच्चुप रहनत. मंग येसु तो हातपायना सुजेल मानुसला हात लाईसनं बरा करना आनं तेला घर धाडी दीना. 5 आनं तो तेसला सांगना, तुम मयथीन येखादाना पोर्या नातं बईल शब्बाथना दीवसमं यहरमं पडी गया तं, तो तेला लगेज बाहेर काडावु का ना? 6 मंग ते तेला काहीज उतर देवु शकनत ना. कजं का तेसला मायती पडी गया का, तेला ते धरु शकावुत ना आनं तो जा सांगी रहना सय, ता खरज सय.
सोताला नम्र बनाडानी बद्दल येसु शीकाडय
7 मंग येसु दखना का, जेवननी करता बलायेल लोकं मान भेटाडानी जागा नीवाडीसनं बसी रनलत. तेमन तो तेसला येक ऊदाहरन सांगना. 8 जर कोनी तुमला लगीनमं जेवाला बलावना तं, तुमं जाईसनं मान भेटाडानी जागामं बसु नोका. कजं का कदाचीत तुमनी पेक्षा आजुन येखादा मोठा मानुसला तो बलायेल व्हई. 9 आनं जो तुमला जेवाला बलायेल सय, तो ईसनं तुमला सांगी का, तु हाई मानुसला बसाला जागा दे. तवं तुमला लाज वाटी आनं खालनी जागामं जाईसनं बसना पडी. 10 पन जवं कोनी तुमला जेवाला बलावना तं, तुमं जाईसनं पयलं खालनी जागावर बसा. येनी करता का जो तुमला जेवाला बलायेल सय, तो ईसनं सांगी का, भाऊ, तु वरनी जागावर ईसनं बस. तवं जेवनला बसेल लोकंसनी समोर तुमला आजुन जास्त मान भेटी जाई. 11 कजं का जो कोनी सोताला मोठा समजय, तेला नम्र करामं येई. आनं जो सोताला नम्र करय तेला मोठा करामं येई.
12 मंग जो येसुला जेवननी करता बलावनाल, तेला बी येसु सांगना, जवं तु दुफारना नातं रातना जेवननी तयारी करशी, तवं तुनं सोपती नातं भाऊ नातं तुनं नातेवाईक नातं तुना शेजारनं धनवान लोकंसला बलावु नोको. कजं का जर तु तेसला बलावना तं, कदाचीत ते बी तुला जेवाला बलाईत आनं तुनी परत फेड करी देईत. 13 पन जवं तु जेवननी तयारी करशी, तवं गरीब लोकंसला आनं लंगडं, आंधळं आनं पांगळं लोकंसला बलाव. 14 तवं तुला आशीर्वाद भेटी. कजं का तुनी परत फेड कराला तेसपन काहीज ना सय, पन देव तुला आशीर्वाद देई. आनं जवं नीतीवान लोकं मरन मयथीन परत उठीत, तवं देव तुनी परत फेड करी देई.
मोठा जेवनना ऊदाहरन
(मतय २२:१-१०)
15 मंग येसुनी संगं जे यहुदी लोकं जेवाला बसनंलत तेस मयथीन येक जन हाई आयकना. आनं तो सांगना, देवना राज्यमं जे लोकं जेवन करीत✞, ते धन्य सत. 16 तवं येसु येक ऊदाहरन दीसनं तेला सांगना, कोनी येक मानुस मोठा जेवननी तयारी करना. आनं तो बरज लोकंसला जेवाला बलावना. 17 मंग जवं जेवनना टाईम व्हई गया, तवं तो जे लोकंसला जेवाला बलावनाल तेसपन तेना येक नौकरला आशा सांगीसनं धाडना का, जेवननी तयारी व्हई गयी सय, आतं तुमं या. 18 पन ते आखं जन येक सारका बाहना दखाडीसनं येवाला नाकारी दीनत. पयला जन तेला सांगना का, मी येक वावर ईकत लीना सय आनं जाईसनं माला दखना पडी. तेमन मी येवु शकावु ना. मी तुमला वीनंती करय का, माला माफ कराला तुना मालकला सांग. 19 आनं दुसरा जन सांगना का, मी बईलंसन्या पाच जोड्या ईकत लीना सय आनं ते बराबर काम करत का ना, हाई दखाला मी जाय रहना सय. तेमन मी येवु शकावु ना. मी वीनंती करय का, माला माफ कराला तुना मालकला सांग. 20 आनं आखु येक जन तेला सांगना, मी आतंज लगीन करना सय. तेमन मी येवु शकावु ना.
21 मंग तो नौकर परत ईसनं तेना मालकला आख्या गोस्टी सांगना. तवं तो घरना मालकला पक्का राग वना. आनं तो तेना नौकरला सांगना, शेहेरनं रस्तासवर आनं गल्लीसमं लवकर जा. आनं तईनं गरीब लोकंसला आनं आंधळं, लंगडं आनं पांगळं लोकंसला आठी ली ये. 22 मंग तशा करीसनं तो नौकर सांगना, मालक, तु जा सांगनाल ता मी करना सय. पन आजुन जागा बाकी सय. 23 मंग तो मालक तेला सांगना, मना घर भरी जावाला पायजे मनीसनं तु रस्तासवर आनं गावना गल्लीसमं जा. आनं लोकंसला रावन्या करीसनं ली ये. 24 कजं का मी तुमला सांगय का, जे लोकंसला जेवाला बलायेल व्हताल, तेस मयथीन येक मानुसला बी मना जेवन चाखाला भेटावु ना.
खरा चेला कोन सय?
(मतय १०:३७-३८)
25 येकदाव लोकंसनी येक मोठी गरदी येसुनी संगं चाली रहनील. तवं तो तेस कडं फीरीसनं सांगना, 26 जर कोनी मना चेला बनाला दखय तं, तो सोताना मायबाप आनं बायको आनं पोरेसोरे आनं भाऊ बईनीसवर मनी पेक्षा जास्त मया करला नोको पायजे. आनं सोताना जीवनवर बी मनी पेक्षा जास्त मया नोको करला पायजे. नातं तो मना चेला बनु शकावु ना. 27 मना चेला बनना मनीसनं जर येखादाला दुख आनं मरन येय आनं जर तो तेला स्वीकार करय ना आनं सहन करय ना तं, तो मना चेला बनु शकावु ना.
28 आतं मी तुमला येक ऊदाहरन सांगय. तुम मयथीन जर कोनी मोठा घर बांधानी ईशा करय तं, पयलं तो बसीसनं कीतला पयसा लागीत येना आंदाज करय. आनं काम पुरा करानी करता तेपन पयसा सय का ना, हाई बी तो दखय. 29 नातं तो पाया बांधीसनं घर पुरा करु शकना ना तं, आखं दखनारं लोकं तेला हासीत. 30 आनं ते सांगीत का, हाऊ मनुस घर बांधाला चालु करना सय, पन तो पुरा करु शकना ना.
31 तशाज जर येखादा राजापन दहा हजार सैनीक सत आनं तो वीस हजार सैनीक रहनारं दुसरा राजानी संगं लढाई कराला जाय तं, पयलं तो काय करी? पयलं तो बसीसनं वीचार करय का, जेपन वीस हाजार सैनीक सत, तेनी संगं तो लढाई करीसनं तेला हारावु शकय का ना. 32 आनं जर तेला वाटय का, तो लढाई करीसनं तेला हारावु शकय ना, तवं तेना दुशमन दुर रहताना तो तेपन येक नीरोप सांगनारला धाडीसनं सला कराला सांगी देई. 33 तशाज तुम मयथीन जर कोनी तेना आखंकाही सोडाला तयार ना सय तं, तो मना चेला बनु शकावु ना.
34 तुमला मायती सय का, मीठ येक चांगली वस्तु सय. पन मीठना खारटपना गया तं, तेनी चव परत लवता येवावु ना. 35 आनं तेला ऊखडावर टाकीसनं खत बनाडाना काममं बी उपयोगना येवावु ना. तेमन लोकं तेला बाहेर फेकी देत. तशाज जे लोकं देवनी करता उपयोगना ना सत, तेसना बी तशाज व्हई. जे लोकंसला समजानी ईशा सय, ते ध्यान दीसनं मना आयकाला पायजे.