12
परुशी लोकंसनी सारका ढोंगी बनु नोका
(मतय १०:२६-२७)
1 तवं लोकंसनी पक्की मोठी गरदी येसुनी चारीमेर गोळा व्हयनी. आनं ते येक दुसरंसला चेंदु जशा लागनंलत. तवं येसु पयलं तेनं चेलंसला सांगाला लागना, तुमं परुशी लोकंसना ✞खमीरनी बद्दल सावध रहज्या. मंजे तेसना ढोंगीपना पईन सावध रहज्या. 2 तुमं तेसनी सारका बनु नोका. कजं का जा काही बी झाकामं ईयेल सय, ता आखा हुगडा करामं येई. आनं जा काही बी दपाडीनं ठेवामं ईयेल सय, ता मायती पाडामं येई. 3 तेमन जा काही तुमं गच्चुप बोलनं सत, ता बरज लोकंसनी समोर प्रगट करामं येई. आनं जा काही तुमं दार लाईसनं बागं बागं बोलनत, ता घर वयथीन गाजाडामं येयी आनं आखं लोकंसला मायती पडी जाई.
फक्त देवला दखीसनं भीवा
(मतय १०:२८-३१)
4 मना सोपतीसवन, मी तुमला सांगय का, जे फक्त शरीरना खुन करत पन तेनी नंतर आत्माला काही करु शकत ना, तेसला दखीसनं भीवु नोका. 5 पन तुमं कोनला दखीसनं भीवाला पायजे हाई मी तुमला सांगय. जीव लेवानी नंतर ✞नरकमं टाकानी शक्ती जो देवना हातमं सय, तेलाज दखीसनं तुमं भीवाला पायजे. खरज मी तुमला सांगय का, तेलाज दखीसनं तुमं भीवा. 6 तुमला मायती सय का, चीड्या पक्क्या कमी कीमतीन्या सत. आनं पाच चीड्या बी फक्त दोन पयसासमं ईकाय जात. तरी बी तेस मईन येक चीडीला बी देव भुलाय ना. 7 ✞खरज तुमना डोकाना आखं केशंसला बी देव मोजेल सय. तेमन तुमं घाबरु नोका. आनं तुमं बरज चीडंस पेक्षा बी कीमतीनं सत आनं देव तुमला कधी भुलावु ना.
येसु ख्रीस्तला स्वीकार कराना
(मतय १०:३२-३३; १२:३२; १०:१९-२०)
8 आनं मी तुमला सांगय का, जो कोनी दुसरं लोकंसनी समोर माला स्वीकार करय, तेला मानुसना पोर्या मंजे मी बी देवना दुतंसनी समोर स्वीकार करसु. 9 पन जो माला लोकंसनी समोर नाकारय, तेला बी देवना दुतंसनी समोर मी नाकारी दीसु. 10 आनं जर कोनी मना वीरुद काही बोलना तं, तेला देव पईन माफी भेटी जाई. पन जर कोनी पवीत्र आत्माना वीरुद वाईट बोलना तं, तेला देव पईन माफी भेटावु ना. 11 लोकं तुमला वीरोध करीसनं तुमना न्यायनी करता प्राथना घरमं आनं कोर्टमं आनं आधीकारीसनी समोर ली जाईत. तवं कशा आनं काय उतर देवाना आनं काय बोलाना येनी बद्दल काळजी नोको करज्या. 12 कजं का तुमला काय बोलाना सय, हाई पवीत्र आत्मा तो टाईमला तुमला शीकाडी.
बीगर बुधीना श्रीमंत मानुसना ऊदाहरन
13 मंग लोकंसनी गरदी मयथीन कोनी येक जन येसुला सांगना, गुरुजी, आमना बापना संपतीना वाटा पाडीसनं मना वाटा देवाला मना भाऊला सांग. 14 तवं येसु तेला संगना, भाऊ, तुमवर न्याय करनार नातं वाटा पाडनार मनीसनं माला कोन नीवाडना सय?
15 मंग आखु येसु लोकंसला सांगना, तुमं समाळीनं रहज्या. आनं आखा प्रकारना लोभ लालुस पईन दुर रहज्या. कजं का येखादा मानुसपन जास्त धन व्हई, तरी बी तो धन तेला शारीरीक आनं आत्मीक जीवन देवु शकावु ना.
16 मंग तो तेसला येक ऊदाहरन सांगना. येकदाव येक श्रीमंत मानुसना वावरमं पक्का पीक व्हयना. 17 तवं तो मानुस तेना मनमं आशा वीचार करना का, मी काय करु, कजं का मना पीक ठेवाला माला जागा ना सय? 18 मंग तो मानुस सोताला सांगना, मी मना धान्य ठेवाना घरला मोडीसनं मोठा बांधसु. आनं तई मना आखा धान्य आनं माल गोळा करीसनं ठेवसु. 19 आनं मी मना जीवला सांगसु, हे मना जीव, तुना साठी ईतला धान्य ठेयेल सय का, तुला बराज वरीस पुरी जाई. तेमन आराम कर आनं खाई पीईसनं मजा कर. 20 पन देव तेला सांगना, आरे बीगर बुधीना मानुस, आज रातलाज तुना जीव तु पईन लेवामं येई. मंग जा काही तु तुना साठी आवरी ठेवना सय, ता कोना व्हई जाई?
21 खरज मी तुमला सांगय का, जो कोनी सोतानी करता धन गोळा करय आनं देवला आवडानी सारका जीवन जगय ना, तेना बी तशाज व्हई.
काळजी करु नोका पन देववर भरोसा ठेवा
(मतय ६:२५-३४)
22 मंग येसु तेनं चेलंसला सांगना, मी तुमला सांगय का, काय खावाना मनीसनं तुमं काळजी करु नोका. आनं कपडं ना सत मनीसनं बी तुमं काळजी करु नोका. 23 कजं का जेवन पेक्षा जीवन जास्त मतवंना सय. आनं कपडंस पेक्षा आंग जास्त मतवंना सय. 24 चीडंसनी बद्दल वीचार करा. ते बीवारा पयरत ना आनं कापनी करत ना. आनं तेसला धान्य ठेवाना घर ना सय. तरी बी देव तेसला जेवन पुरा पाडय. आनं तुमं चीडंस पेक्षा पक्का कीमतीवान सत. 25 आनं काळजी करीसनं तुम मयथीन कोनी बी तेना आयुस्यना येक तास बी वाढावु शकय ना. 26 जर तुमं हाई धाकली गोस्टं करु शकत ना, तर बाकी दुसर्या गोस्टीसनी काळजी तुमं कजं करत?
27 जंगलनं फुलं कशे वाढत हाई तुमं दखा. ते काही मेहनत करत ना आनं सोतानी करता कपडं तयार करत ना. पन मी तुमला सांगय का, शलमोन राजा ईतला श्रीमंत व्हताल, तरी बी तो ते फुलंसनी सारका भारी कपडं घालना ना.
28 तशाज चारा आज वावरमं सय आनं सकाळ ईस्तुमं टाकामं येय. जर तो चाराला देव कपडं सारका ईतला भारी रंग देयेल सय, तर तो तुमला जास्त भारी कपडं देवावु ना का? तो तुमला देई मनीसनं तुमं कजं वीस्वास ठेवत ना? 29 तेमन काय खावाना आनं काय पेवाना येनी बद्दल काळजी करीसनं तुमना मनला दुखी करु नोका. 30 कजं का जे लोकं देववर वीस्वास ठेवत ना, तेज या गोस्टीसनी मांगं लागत. आनं तुमला या गोस्टीसनी गरज सय मनीसनं तुमना देवबापला मायती सय. 31 पन पयलं देव तुमना जीवनमं राज्य कराला पायजे मनीसनं तुमं झटा. मंजे या बठ्या गोस्टी बी तुमला भेटी जाई.
32 हे मनं चेलंसनी धाकली टोळी, तुमं भीवु नोका. कजं का तुमना जीवनमं राज्य करानी करता तुमना देवबापला पक्का आनंद वाटय. 33 तेमन जा काही तुमपन सय, ता आखं ईकीसनं गरीब लोकंसला दान करा. आनं जो कायम रहनार सय, आशा धन तुमं तुमना साठी सोरगंमं गोळा करी ठेवा. तो धन कधी सरनार ना सय आनं तेला चोरी करानी करता चोर कधी येत ना. आनं तो धनवर कीडा बी लागय ना. 34 मी तुमला येनी करता हाई सांगय का, जई तुमना धन रहय, तई तुमना मन बी लागय.
कायम तयारीमं रहज्या
(मतय २४:४५-५१)
35 येसु आखु सांगना, देवनी सेवानी करता तुमं कायम तयार रहज्या. आनं जशा दीवा पेटेल रहय, तशाज कायम तुमं तयारीमं रहज्या. 36 तेसना मालक लगीनना जेवन करीसनं परत येयी आनं दार ठोकी तं, लगेज हुगडानी करता काही नौकर कायम तयार रहत. तुमं बी तशे नौकरंसनी सारका कायम तयार रहज्या. 37 कजं का मालक परत ईसनं जे नौकरंसला तयार रहताना दखी तं, ते धन्य सत. खरज मी तुमला सांगय का, तवं तो मालक सोता तेसनी सेवा करानी करता तयार व्हईसनं तेसला जेवाला बसाडी आनं तेसनी सेवा करी. 38 आनं जर तो मालक आरदी रातला नातं पाहाटला ईसनं तेसला तयार रहताना दखना तं, ते धन्य सत.
39 कोनता टाईमला चोर ईसनं चोरी करी, जर हाई गोस्टं घर मालकला मायती रहता तं, तो जागा रहता. आनं तेना घरला फोडीसनं चोरी करु दीता ना. 40 तशाज तुमं बी मना परत येवानी येखं कायम तयार रव्हाला पायजे. कजं का तुमना मनमं वाटावु ना आशा टाईमला मानुसना पोर्या मंजे मी परत ईसु. हाई गोस्टं तुमं समजी ल्या.
41 तवं पेत्र येसुला वीचारना, परभुजी, हाई ऊदाहरन तु आमना साठीज सांगय का आखंसनी करता? 42 मंग परभु येसु सांगना, मी तुमना साठी आनं जे लोकं वीस्वासु आनं बुधीवान कारभारी सारकं सत तेसना साठी हाई सांगय. वीस्वासु आनं बुधीवान कारभारी कोन सय? मालक तेना घरना नौकरंसला बरोबर टाईमला मजुरी देवानी जवाबदारी जेना हातमं सोपी देई, तोज सय. 43 आनं तेना मालक परत ईसनं जो कारभारीला तेना देयेल जवाबदारी चांगला रीतथीन करताना दखी, तो धन्य सय. 44 आनं मी तुमला खरज सांगय का, तो कारभारीला तेना मालक तेना आखा संपतीवर आधीकारी मनीसनं नीवाडी. 45 पन मना मालक परत येवाला उशीर करी रहना सय, आशा समजीसनं जर तो कारभारी दुसरं काम करनारंसला हानमार कराना चालु करी आनं सोता खाई पीईसनं मजा करी तं, 46 तो कारभारीना मनमं वाटावु ना आशा रोजला आनं तेला मायती बी पडावु ना आशा टाईमला तेना मालक परत ईसनं तेला पक्का मोठा दंड देई. आनं जी जागामं तो बीगर वीस्वासु लोकंसला ठेवय, ती जागामं तेला बी ठेई. 47 आनं येखादा कारभारीला तेना मालकनी ईशा मायती रहय, पन तो तशा तयार रवावु ना, आनं मालकनी ईशा प्रमानं करावु ना तं, तेला जास्त दंड भेटी. 48 पन जर येखादाला तेना मालकनी ईशा मायती ना रहय, आनं तो दंड भेटानी सारका काम करय तं, तेला कमी दंड भेटी. तशाज येखादाला जास्त देवामं ईयेल सय तं, ते पईन जास्त मांगामं येई. आनं जेला मोठी जवाबदारी देवामं ईयेल सय, ते पईन आजुन जास्त मांगामं येई.
येसुना वचन आयकीसनं लोकंसमं फुट पडी जाई
(मतय १०:३४-३६)
49 येसु आखु तेसला सांगना, मी धरतीवर लोकंसमं येक ✞ईस्तु चेटाडानी करता वना सय. आनं मनी आशी ईशा सय का, ती आगुदारज चेटती तं, कीतला चांगला वता. 50 माला पक्का दुख आनं मरन सहन कराना सय. आनं तो पुरा वय ताव, मी पक्का वीचारमं सय. 51 तुमं आशा नोको वीचार करा का, मनी द्वारा धरतीवर लोकंसमं शांती रही. आशा ना, पन मी तुमला सांगय का, मनी द्वारा लोकंसमं फुट पडी जाई. 52 कजं का येकंज कुटुममं काही लोकं मावर वीस्वास ठेईत आनं काही लोकं वीस्वास ठेवावुत ना. तशाज तेसमं फुट पडी जाई. जर येखादा घरमं पाच जन सत तं, तीन जन जे मावर वीस्वास ठेवत ना, ते वीस्वास ठेवनारं दोन जनंसना वीरुद उठीत. तशाज तीन जन मावर वीस्वास ठेवत तं, तेसना वीरुद बाकी दोन जन उठीत. 53 ✞ आनं येकंज कुटुममं पोर्याना वीरुद बाप आनं बापना वीरुद पोर्या उठी. तशाज पोरनी वीरुद माय आनं मायनी वीरुद पोर उठी. आनं ववुसनी वीरुद सासु आनं सासुनी वीरुद ववुस उठी.
दीवस वळखानी बद्दल येसु सांगय
(मतय १६:२-३)
54 मंग येसु लोकंसला सांगना, जवं ढगला वरायथीन वर नींगताना तुमं दखत, तवं लगेज सांगत का, आतं पानी पडी. आनं तशाज वय. 55 आनं जवं दक्षीन बाजुथीन वारा सुटताना तुमं दखत, तवं सांगत का, आतं पक्का गरम व्हई. आनं तशाज वय. 56 आरे ढोंगी मानसं, धरती आनं आकासला दखीसनं कशा वातावरन व्हई हाई तुमला मायती पडी जाय. पन हाऊ दीवसमं मनी द्वारा देव जो करी रहना सय, येना आर्थ कजं तुमला मायती पडय ना? 57 जो चांगला सय तोज तुमं सोतानी करता ठरावाला पायजे.
तुमं वीरोध मीटाडानी कोशीत करा
(मतय ५:२५-२६)
58 येसु आखु सांगना, जवं तुमं आनं तुमना वीरोध करनार कोर्टमं जात, तवं वाटलाज तेनी संगं मीटाडानी कोशीत करा. नातं कदाचीत तो तुमला कोर्टमं वडी ली जाई आनं न्याय करनार तुमला पोलीसंसना हातमं देई. आनं ते पोलीस तुमला जेलमं कोंडीत. 59 आनं आशा व्हयना तं, मी तुमला सांगय का, जो परन तुमं येक येक पयसा देवावुत ना, तो परन तुमं तथाईन सुटावुतंज ना.