8
येसुला मदत करनार्या बाया
1 तेनी नंतर येसु खेडंपाडंसमं आनं गावंसमं फीरीसनं देवना राज्यनी बद्दल सुवार्ता प्रचार कराला लागना. आनं तेना बारा चेलं बी तेनी संगं व्हतलत. 2 तवं काही बाया बी तेनी संगं व्हतल्यात. तीसला तो भुतना आत्मास पईन आनं आजार पईन बरा करेल व्हताल. तीसमं जी मगदालीया मरीया मईन तो सात भुतंसना आत्मा काडेल व्हताल ती, 3 आनं हेरोद राजानी घरमं काम करनार खुजानी बायको योहान्ना आनं सुसान्ना आनं दुसर्या बर्याज बाया बी व्हतल्यात. त्या बाया तीसना सोताना पयसासघाई येसु आनं तेनं चेलंसनी मदत करत्यात.
बीवारा फोकनारना ऊदाहरन
(मतय १३:१-९; मार्क ४:१-९)
4 येकदाव बरज गावंसनं लोकं येसुपन येवाला लागनत. जवं लोकंसनी मोठी गरदी गोळा व्हयनी, तवं तो येक ऊदाहरन दीसनं सांगना का, 5 येकदाव येक शेतकरी तेना वावरमं बीवारा फोकाला नींगना. आनं जवं तो फोकी रहनाल, तवं काही बीवारा वाटवर पडना. मंग ते बीवारा चेंदाय गयत आनं चीडं ईसनं तेसला खाई टाकनत. 6 आनं काही बीवारा खडकाई जमीनवर पडना. मंग ते ऊगनत, पन लवकर सुकाय गयत. कजं का तई वलावा ना व्हताल. 7 आनं काही बीवारा काटाळा झुडपंसमं पडना आनं ते वाढाला लागनत. पन ते काटाळा झुडपं बी तेसनी संगं वाढनत आनं तेसला दडपी दीनत. 8 आनं आखु काही बीवारा चांगली मातीमं पडना. मंग ते ऊगीसनं शंबर पोता पीक दीनत.
मंग हाई सांगानी नंतर येसु जोरमं सांगना, जर तुमं ध्यान दीसनं आयकशात तं, तुमला समजी.
येसु ऊदाहरनना आर्थ सांगय
(मतय १३:१०-२३; मार्क ४:१०-२०)
9 मंग येसुनं चेलं तेला वीचारनत, हाऊ ऊदाहरनना आर्थ काय सय? 10 तो तेसला सांगना, देव लोकंसवर कशा राज्य करी येना गुपीत गोस्टं तो कोनला बी कधी समजाडेल ना सय, पन तुमला समजाडी देयेल सय. पन दुसरंसला मी ऊदाहरनघाईज सांगय. येनी करता का, देवना वचनमं जा लीखेल सय, ता पुरा व्हवाला पायजे. तो हाई सय का,
✞"ते दखत, पन देव जा करय ता ते दखु शकत ना. आनं ते आयकत, पन देव जा सांगय ता ते समजु शकत ना."
11 आतं मी तुमला हाऊ ऊदाहरनना आर्थ सांगय. बीवारा मंजे देवना वचन सय. 12 आनं काही लोकं वाटनी सारकं सत, जई देवना वचन पयराय जाय. पन ते वीस्वास नोको ठेवाला पायजे आनं तेसना तारन नोको व्हवाला पायजे मनीसनं सैतान ईसनं तेसना रुदय मईन वचनला काडी ली जाय. 13 तशाज, काही लोकं वचन आयकत आनं लगेज आनंदमं स्वीकारी लेत. ते देवना वचन पयरायेल खडकाई जमीन सारकं सत. पन तेसमं खोल मुळ सारका जास्त वीस्वास ना रहय. तेमन ते थोडाज टाईम वीस्वासमं टीकत. मंग तेसवर संकट नातं वीरोध वना मंजे, ते लगेज वीस्वास सोडी देत. 14 आनं काही लोकं देवना वचन आयकत, पन सोवसारनी चींता, धन दौलतनी लालुस आनं जगनी मजा तेसमं घुसीसनं वचननी वाढला दडपी देत. आनं ते चांगला फळ देत ना. ते लोकं काटंसनं झुडपंसनी खालना जमीननी सारकं सत. 15 आनं काही लोकं देवना वचन पयरायेल चांगली माटी सारकं सत. ते वचन आयकत. आनं मोकळा आनं चांगला मनमं वचनला धरी ठेवत. आनं ते धीर धरीसनं पीक देत.
दीवाना ऊदाहरन
(मार्क ४:२१-२५)
16 मंग आखु येसु सांगना,✞कोनी बी दीवा लाईसनं टोपलीनी खाल नातं खाटनी खाल ठेवत ना. पन मजार येनारंसला ऊजाळा दखावाला पायजे मनीसनं गोखलामं ठेवत. 17 तशाज जो काही बी देवना सत्य दपाडामं ईयेल सय, येक दीवस तेला प्रगट करामं येई. आनं जो काही बी झाकामं ईयेल सय, येक दीवस तेला हुगडपनामं सांगामं येई. 18 तेमन तुमं कशा आयकत येनी बद्दल समाळीसनं रहज्या. कजं का जे मना वचन आयकीसनं पाळत, तेसला आजुन जास्त शीकाडामं येई. पन जे मना वचन आयकीसनं पाळत ना, ते जा काही बी समजत मनीसनं वीचार करत, ता बी ते दवडाय दीईत. ✞
येसुनं खरं नातेवाईक
(मतय १२:४६-५०; मार्क ३:३१-३५)
19 मंग येसुनी माय आनं तेनं भाऊ तेला भेटाला वनत. पन गरदी मुळे ते तेपन जावु शकनत ना. 20 तवं कोनीतरी तेला सांगनत का, तुनी माय आनं तुनं भाऊ तुला भेटानी करता बाहेर हुबं सत. 21 पन तो तेसला सांगना, जे कोनी देवना वचन आयकत आनं पाळत, तेज मनं खरं भाऊ आनं माय सत.
येसु वावधनला थांबाडय
(मतय ८:२३-२७; मार्क ४:३५-४१)
22 येक दीवस येसु तेनं चेलंसला सांगना, चाला, आपुन समुद्रनी तथानी बाजुमं जावुत. तवं ते डुंगामं बसीसनं नींगनत. 23 जवं ते जाई रनलत, तवं येसु नीजी गया. मंग समुद्रमं मोठा वावधन वना. आनं डुंगामं पानी भरावाला लागना. तवं ते पक्का संकटमं पडनत. 24 मंग ते येसुला उठाडीसनं सांगनत, गुरुजी, गुरुजी, आपुन पानीमं बुडी रहनं सत. तवं येसु उठीसनं वाराला आनं पानीना लाटासला ढटाडना. मंग ते बंद व्हई गयात आनं तई आखंकाही शांतं व्हई गया. 25 तवं तो चेलंसला सांगना, तुमना वीस्वास कई सय? तवं ते घाबरी गयत आनं तेसला नवल वाटना. आनं ते येक दुसरंसला वीचाराला लागनत, हाऊ कोन सय? कजं का वारा आनं पानीला बी तो आज्ञा करय आनं ते तेना आयकत.
येसु येक भुत लागेल मानुसला बरा करय
(मतय ८:२८-३४; मार्क ५:१-२०)
26 मंग येसु आनं तेनं चेलं गरसेकरना भागमं जाई लागनत. तो भाग समुद्रनी तथानी बाजुना गालील जील्लाना समोर व्हताल. 27 मंग जवं येसु डुंगा मयथीन खाल उतरना, तवं लगेज भुतना आत्मा लागेल तो गावना येक मानुस ईसनं तेला भेटना. बराज दीवस पईन तो कपडं घालता ना आनं घरमं रहता ना. पन तो मसानमंज रहु लागनाल. 28 तो येसुला दखीसनं आराळ्या दीना आनं तेना पाय पडीसनं जोरमं सांगना, हे येसु, आखंस पेक्षा मोठा देवना पोर्या, तुला मा पईन काय पायजे? मी तुला रावन्या करय का, माला दंड देवु नोको. 29 तो आशा सांगना, कजं का येसु तो भुतना आत्माला तो मानुस मईन नींगानी करता आज्ञा देयेल व्हताल. तो भुतना आत्मा तो मानुसला बराज दाउ धरेल व्हताल. आनं लोकं तेला साकळीसघाई आनं बेडयाजघाई बांधीसनं कोंडी ठेवतत. पन तो साकळ्या आनं बेडया तोडी टाकता. आनं भुतना आत्मा तेला जंगलमं ली जाता.
30 मंग येसु तेला वीचारना, तुना नाव काय सय? तो सांगना, ✞सैन्य. कजं का तो मानुसनी मजार बरज भुतं घुसेल व्हतलत. 31 मंग ते भुतंसनं आत्मं येसुला रावन्या करीसनं सांगनत का, आमला ✞कायमना आंधाराना खड्डामं धाडु नोको.
32 तवं डुकरंसना येक मोठा गवारा तई डोंगरपन चरी रहनाल. मंग ते भुतं येसुला रावन्या करीसनं सांगनत, आमला ते डुकरंसमं जावु दे. तवं येसु तेसला डुकरंसमं जावु दीना. 33 मंग ते भुतं तो मानुस मयथीन नींगीसनं ते डुकरंसमं घुसनत. आनं तो गवारा जोरमं पळत पळत जाईसनं कडा वयथीन समुद्रमं पडना. आनं ते डुकरं बुडीसनं मरनत.
34 मंग डुकरं चारनारं पळत पळत जाईसनं गावमं आनं मळंसमं हाई गोस्टं सांगनत. 35 तवं काय व्हयना हाई दखाला लोकं वनत. आनं ते येसुना जवळ ईसनं दखनत का, जो मानुस मयथीन भुत नींगेल व्हताल, तो कपडं घालीसनं येसुना पायना जवळ शुधीवर ईसनं बसेल सय. तवं ते घाबरी गयत. 36 आनं जे लोकं हाई दखनंलत, ते हाई हाकीगत तेसला सांगनत. 37 तवं गरसेकर भागना आखं लोकं येसुला तथाईन नींगी जावानी करता रावन्या करनत. कजं का ते पक्का घाबरी जायेल व्हतलत.
मंग येसु डुंगामं बसीसनं परत जावाला नींगना. 38 तवं जो मानुस मयथीन भुतं नींगेल व्हतलत, तो येसुपन आशा रावन्या करीसनं सांगना का, मला बी तुनी संगं येवु दे. पन येसु तेला परत धाडीसनं सांगना, 39 तुनी घर परत जा आनं देव तुना साठी केवडा मोठा चमत्कार करेल सय, हाई लोकंसला सांग. मंग तो मानुस परत नींगी गया. आनं जो मोठा चमत्कार येसु तेना साठी करेल व्हताल, तो आखा गावमं सांगाला लागना.
येसु येक मरेल पोरला जीवता करय आनं येक पोगर लागेल बाईला बरा करय
(मतय ९:१८-२६; मार्क ५:२१-४३)
40 तेनी नंतर येसु आनं तेनं चेलं गालील समुद्रनी तथानी बाजुथीन परत वनत. तवं बरज लोकं तेसना स्वागत करनत. कजं का ते तेसनी वाट दखी रनलत. 41 तवं याईर नावना येक मानुस तई वना. तो यहुदीसना प्राथना घरना आधीकारी व्हताल. मंग तो येसुना पाय पडीसनं तेनी घर येवानी करता वीनंती करना. 42 कजं का तेनी बारा वरीसनी पोर पक्की आजारी व्हतील आनं मरनना काटवर पडेल व्हतील. आनं ती तेनी येकुलती येक पोर व्हतील.
मंग येसु तेनी घर जावानी करता नींगना. तवं बरज लोकं तेनी चारीमेर गरदी करी रनलत. 43 तवं बारा वरीसनी पोगर लागेल येक बाई तई गरदीमं व्हतील. तीला कोनी बी बरा करु शकनंलत ना. आनं तीना आजारनी करता तीपन जा व्हताल, ता आखा ती खर्च करी टाकनील.
44 मंग बरा व्हवानी करता ती येसुनी मांगं ईसनं तेना कपडना काटला हात लावनी. आनं लगेज तीना पोगर लागेल दुख बरा व्हई गया. 45 तवं येसु वीचारना का, माला कोन हात लावना? मंग आखं लोकं ना सांगनत. तवं पेत्र येसुला सांगना, गुरुजी, लोकंसनी गरदी तुला दडपी देवाला करी रहनं सत. आनं कशा तु वीचारय का, माला कोन हात लावना? 46 पन येसु सांगना, कोनीतरी माला हात लावना. कजं का माला मायती पडना का, येखादाला बरा करानी करता मा मयथीन शक्ती बाहेर नींगनी सय. 47 मंग ती बाईला मायती पडना का, ती दपु शकावु ना. तेमन ती भीवत भीवत आनं थरथर करीसनं येसुपन वनी आनं तेना पाय पडनी. आनं ती कजं येसुला हात लावनी आनं कशी लगेज बरी व्हई गयी, हाई हाकीगत आखं लोकंसनी समोर सांगनी. 48 तवं येसु तीला सांगना, पोर, तु मावर वीस्वास ठेवनी मनीसनं तु बरी व्हयनी सय. तेमन सुखनी जा.
49 जवं येसु बोली रहनाल, तेवडामंज तो प्राथना घरना आधीकारीना घरथीन येक मानुस ईसनं तो आधीकारीला सांगना, तुनी पोर मरी गयी सय. आतं गुरुजीला तकलीत देवु नोको. 50 पन हाई आयकीसनं येसु तो आधीकारीला सांगना, घाबरु नोको, पन फक्त मावर वीस्वास ठेव, मंजे तुनी पोर बरी व्हई जाई.
51 मंग ते यायीरना घरपन वनत. आनं पेत्र, योहान, याकोब आनं पोरनं मायबापसंनी शीवाय येसु तेनी संगं कोनला बी मजार येवु दीना ना. 52 तवं ती पोरनी करता आखं जन तई रडबोंबल करी रनलत. पन येसु तेसला सांगना, रडु नोका, कजं का हाई पोर ✞मरेल ना सय, पन नीजेल सय. 53 पन ते तेला दखीसनं हासाला लागनत. कजं का तेसला मायती व्हताल का, ती पोर मरी जायेल व्हतील. 54 मंग येसु ती पोरना हातला धरीसनं जोरमं सांगना, धाकली पोर उठ. 55 तवं तीना जीव परत वना आनं ती लगेज उठनी. मंग येसु सांगना, तीला काहीतरी खावाला द्या. 56 तवं तीनं मायबापसला नवल वाटना. पन येसु तेसला आज्ञा दीसनं सांगना का, हाई गोस्टं कोनला बी सांगु नोका.