6
शब्बाथना दीवस पाळानी बद्दल येसु शीकाडय
(मतय १२:१-८; मार्क २:२३-२८)
1 मंग येक शब्बाथना दीवसमं येसु तेनं चेलंसनी संगं वावर मयथीन जाई रहनाल. तवं तेनं चेलं कनसं मोडीसनं हातवर चोळीसनं खावाला लागनत. 2 तवं काही परुशी तेसला वीचारनत, शब्बाथना दीवसमं जा ना कराला पायजे, ता तुमं कजं करत? 3 मंग येसु तेसला सांगना, ✞जवं दावीदला आनं तेनी संगं जे व्हतलत तेसला भुक लागनील, तवं तो काय करना? हाई देवना वचन तुमं वाचनत ना का? 4 तो देवना मंदीरमं गया आनं ज्या आर्पन करेल भाकरी याजक लोकं शीवाय कोनी खावाला ना पायजे, त्या तो खाई लीना. आनं जे तेनी संगं व्हतलत, तेसला बी खावाला दीना. आनं देव येला पाप मनीसनं गनना ना.
5 आखु येसु तेसला सांगना, मी मानुसना पोर्या सय. तेमन शब्बाथना दीवसमं काय कराना सय आनं काय ना कराना सय, हाई नक्की कराना आधीकार मना हातमं सय.
येसु येक लुळ्या हातना मानुसला बरा करय
(मतय १२:९-१४; मार्क ३:१-६)
6 नंतर आखु दुसरा शब्बाथना दीवसमं येसु प्राथना घरमं जाईसनं लोकंसला शीकाडी रहनाल. तवं जेवना हात लुळ्या व्हयेल येक मानुस तई व्हताल. 7 तवं काही नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकं येसुवर दोस लावानी करता काहीतरी सापडाला पायजे मनीसनं दखी रनलत. तेमन शब्बाथना दीवसमं तो तेला बरा करय का ना, हाई दखाला ते टपी बसनंलत. 8 पन येसु तेसना मनना वीचार वळखीसनं तो लुळ्या हातना मानुसला सांगना, उठ आनं मजार हुबा रह. तवं तो उठीसनं हुबा रहना. 9 आनं येसु तेसला सांगना, मी तुमला वीचारय का, शब्बाथना दीवसमं चांगला कराना सय का वाईट कराना सय? आनं जीव वाचाडाना सय का माराना सय? 10 मंग चारीमेर आखंस कडं दखीसनं तो मानुसला येसु सांगना, तुना हात पुडं कर. तवं तो मानुस तशाज करना आनं लगेज तेना हात चांगला व्हई गया. 11 मंग ते पक्का संताप करनत आनं येसुला काय कराना सय, येनी बद्दल आपसमं वीचार कराला लागनत.
येसु बारा चेलंसला नीवाडय
(मतय १०:१-४; मार्क ३:१३-१९)
12 येकदाव येसु प्राथना कराला डोंगरवर गया. आनं तई देव कडं प्राथना करीसनं आखी रात घालना. 13 आनं जवं दीवस ऊगना, तवं तो तेनी मांगं चालनारंसला बलावना. आनं तेस मयथीन बारा जनंसला तो नीवाडना आनं तेसला ✞‘प्रेशीत’ नाव दीना. 14 ते बारा जनंसना नाव आशा व्हताल का, शीमोन (जेला तो पेत्र नाव दीना) आनं तेना भाऊ आंद्रीया आनं याकोब, योहान, फीलीप, बर्थलमय, 15 मत्तय, थोमा, आलफीना पोर्या याकोब, शीमोन (जेला जीलोत बी सांगतत), 16 याकोबना पोर्या यहुदा आनं यहुदा ईस्कंरीयोत, जो येसुला धरी दीना.
येसु बरज आजारीसला बरा करय
(मतय ४:२३-२५)
17 मंग येसु ते चेलंसनी संगं डोंगर वयथीन खाल उतरना आनं येक सरशी जागावर हुबा रहना. तवं तेनी मांगं चालनारंसनी मोठी गरदी तई गोळा व्हयेल व्हतील. आनं आखा यहुदीया आनं यरुशलेम शेहेरना, आनं समुद्रना काटना सोर आनं सीदोन शेहेरना बरज लोकं बी तई गोळा व्हयेल व्हतलत. ते तेना वचन आयकाला आनं तेसनं आजार पईन बरा व्हवाला तई ईयेल व्हतलत. 18 तवं भुतना आत्मा लागेल लोकंसला बी तो चांगला करना. 19 आनं आखी गरदी तेला हात लावानी करता धडपड करी रहनील. कजं का ते मयथीन शक्ती नींगीसनं ते आखंसला चांगला करी रहनील.
येसु लोकंसला शीकाडय
(मतय ५:१-१२)
20 तवं येसु तेनी मांगं चालनारं लोकंस कडं दखीसनं सांगना, हे गरीब लोकं, तुमं धन्य सत. कजं का देव तुमना जीवनमंज राज्य करय. 21 आनं तुमं जे आतं भुक्ये सत, तुमं धन्य सत. कजं का देव तुमला भरपुर देई. आनं तुमं जे आतं रडत, तुमं धन्य सत. कजं का देव तुमला पक्का आनंद देई.
22 जवं मानुसना पर्याना मंजे मना साठी लोकं तुमना वीरोध करीत आनं तुमला नाकारीत आनं तुमना आपमान करीत आनं तुमना नावमं वाईट सांगीत, तवं तुमं धन्य सत. 23 आशा व्हई तं, ते दीवसमं तुमं आनंद करीसनं हुड्या मारा. कजं का सोरगंमं देव तुमला मोठा बक्षीस देई. आनं ते लोकंसनं वाडावडील बी देवना वचन सांगनारंसला तशेज करनत. 24 पन तुमं जे आतं धनवान सत, तुमनी पक्की हाल व्हई. कजं का आतंज तुमं आखं सुख भोगी रहनं सत. 25 आनं जेसपन खावापेवानी करता भरपुर सय, तेसनी बी पक्की हाल व्हई. कजं का नंतर तेसला काहीज भेटावु ना. तशाज तुमं जे आतं हासत, तुमनी पक्की हाल व्हई. कजं का येक दीवस तुमं दुखी व्हईसनं रडशात. 26 जवं लोकं तुमनी बद्दल बढाई मारीत, तवं तुमनी पक्की हाल व्हई. कजं का जे लोकं सोताला देवना वचन सांगनारं मनीसनं खोटा सांगत तेसनी बद्दल तेसनं वाडावडील बी तशेज सांगनंलत.
तुमना दुशमनंसवर मया करा
(मतय ५:३८-४८; ७:१२)
27 मंग येसु आखु लोकंसला सांगना, तुमं जे मना आयकी रहनं सत, मी तुमला सांगय का, तुमं तुमना दुशमनंसवर मया करा. आनं जे तुमना वीरोध करत, तेसना चांगला करा. 28 आनं जे तुमला श्राप देत, देव तेसला आशीर्वाद देवाला पायजे मनीसनं प्राथना करा. आनं जे तुमनी टीका करत, तेसना साठी बी तुमं प्राथना करा. 29 ✞जर कोनी तुना येक गालवर थपड मारय तं, दुसरा गाल बी तेनी समोर कर. ✞तशाज जर कोनी तुना कोट ली जाय तं, तेला तुनी कुडची बी ली जावाला मना करु नोको. 30 जर कोनी तुपन काही बी मांगय तं, तेला दे. तशाज जर कोनी तु पईन काही बी हीसकाय ली जाय तं, ते पईन परत मांगु नोको. 31 आनं दुसरं लोकं जशे तुमनी संगं वागाला पायजे मनीसनं तुमनी ईशा सय, तुमं बी तेसनी संगं तशेज वागा. 32 जे तुमवर मया करत, तेसवर तुमं मया करनत तं, तुमं कोनता मोठा काम करनत? कजं का जे लोकं देववर वीस्वास ठेवत ना, ते बी तेसवर मया करनारंसवर मया करत. 33 आनं जे तुमना चांगला करत, फक्त तेसनाज तुमं चांगला करनत तं, तुमं कोनता मोठा काम करनत? कजं का जे लोकं देववर वीस्वास ठेवत ना, ते लोकं बी तशेज करत. 34 जे पईन परत भेटानी आसा सय, फक्त तेसलाज तुमं ऊसना दीनत तं, तुमं कोनता मोठा काम करनत? कजं का जे लोकं देववर वीस्वास ठेवत ना, ते लोकं बी जीतला दीनत तीतला परत भेटानी आसा ठेईसनं दुसरं बीगर वीस्वासी लोकंसला ऊसना देत. 35 पन तुमं तुमना दुशमनंसवर मया करा आनं तेसना चांगला करा. आनं परत भेटानी आसा ना ठेईसनं तेसला ऊसना द्या. मंग देव तुमला मोठा बक्षीस देई. आनं लोकंसला मायती पडी का, तुमं आखंस पेक्षा मोठा देवनं पोरे सत. कजं का ऊपकार ना माननारंसवर आनं वाईट लोकंसवर बी देव दया करय. 36 जशा तुमना देवबाप दया करनार सय, तशाज तुमं बी दया करनारं बना.
दुसरंसना दोस काडु नोका
(मतय ७:१-५)
37 तुमं दुसरंसवर आरोप लावु नोका. मंजे तुमवर बी देव आरोप लावावु ना. आनं तुमं कोना बी दोस काडु नोका. मंजे तुमला बी देव दोस काडावु ना. पन तुमं दुसरंसला माफ करा. मंजे तुमला बी देव माफी देई. 38 दुसरंसला जी गरज सय, ती तुमं पुरी करा. मंजे तुमला बी जी गरज सय, ती गरज देव पुरा पाडी. खरज देव तुमला चांगला माप पुरा भरीसनं आनं हालाडीसनं आनं सीगलाईसनं तुमना हातमं देई. कजं का जो मापघाई तुमं दुसरंसला मोजी दीशात, तोज मापघाई तुमला बी परत मोजी देवामं येई.
39 मंग येसु तेसला येक ऊदाहरन दीसनं सांगना का, ✞येक आंधळा दुसरा आंधळाला वाट दखाडु शकय ना. जर तो तशा करना तं, ते दोनी जन खड्डामं जाई पडीत. 40 आनं ✞येखादा चेला तेना गुरु पेक्षा मोठा व्हवु शकय ना. पन पुरा शीकानी नंतर तो तेना गुरु सारका व्हई जाय.
41 तुमं तुमना भाऊना डोळामं पडेल कचराला कजं दखत? आनं तुमना सोताना डोळामं पडेल मुसळ तुमला दखाय ना का? 42 जवं तुमना सोताना डोळा मयला मुसळ तुमला दखाय ना तं, तुमं तुमना भाऊला कशा सांगु शकसात का, भाऊ तुना डोळा मयला कचरा माला काडु दे? आरे ढोंगी लोकं, पयलं सोताना डोळा मयला मुसळ काडी टाका. तवं तुमना भाऊना डोळा मयला कचरा काडाला तुमला चांगला दखाई.
फळघाई झाडंसला वळखामं येय
(मतय ७:१६-२०; १२:३३-३५)
43 मंग आखु येसु तेसला सांगना, कोनता बी चांगला झाड वाईट फळं देय ना. तशाज कोनता बी वाईट झाड चांगला फळं देय ना. 44 आनं आखा झाडंसला तेसना फळ वयथीन वळखता येय. आनं काटाना झाड आंजीरना फळ देय ना. आनं काटंसना झुडपं द्राक्षसना फळ देत ना. 45 तशाज येखादा ✞चांगला मानुस तेना रुदयमं ज्या चांगल्या गोस्टी ठेयेल रहय, त्याज तो काडय. आनं येखादा वाईट मानुस तेना रुदयमं जो वाईट ठेवय, तोज तो काडय. कजं का येखादाना रुदयमं जा भरेल रहय, ताज तेना तोंड वाटं नींगय.
दोन प्रकारनं लोकं
(मतय ७:२४-२७)
46 मंग आखु येसु तेसला सांगना, तुमं मला परभु, परभु सांगत, पन मी जा सांगय ता कजं करत ना? 47 आनं जो कोनी मापन येय आनं मना वचन आयकीसनं पाळय, तो कोनी सारका सय, हाई मी तुमला सांगी दखाडय. 48 तो येखादा घर बांधनार मानुसनी सारका सय. तो खोल खंदीसनं खडकवर पाया बांधना. मंग जवं पुर वना आनं पानीना लोंडा तो घरवर पडना. तरी बी तो घर हालना ना. कजं का तो घर पक्का चांगला बांधेल व्हताल. 49 पन जो कोनी मना वचन आयकीसनं पाळय ना, तो बीगर पायाना घर बांधनार मानुसनी सारका सय. मंग जवं तो घरवर पानीना लोंडा वना, तवं तो घर लगेज पडी गया. आनं तो घरना मोठा नास व्हई गया.