4
सोताला देवना हातमं द्या
1 तुमनी मजार कज्या भानगडी कथाईन येत? शरीरला आनंद देवानी करता जी ईशा तुमनी मजार लढाई करत, ती मयथीन येत ना का? 2 तुमना जीवनमं कशानी तरी गरज रहय, पन ती तुमला भेटय ना. तेमन तुमं खुन कराला बी तयार व्हई जात आनं लोभ लालुस करत. तरी बी तुमला जा काही पायजे ता भेटय ना. तेमन तुमं कज्या भानगडी करत. तुमं देवपन प्राथना करीसनं मांगत ना, तेमन तुमला जा काही पायजे ता भेटय ना.
3 जवं तुमनी वाईट ईशा पुरी करानी करता आनं सोताला मजा करानी करता तुमं देवपन काही बी प्राथना करीसनं मांगत, तवं ता तुमला भेटय ना. 4 आरे वीस्वास मईन मांगं जानारं लोकं, तुमला मायती ना सय का, जगन्या वाईट गोस्टीसनी संगं सोपती कराना मंजे देवनी संगं दुशमनी सय? जो मानुस जगन्या वाईट गोस्टीसनी संगं सोपती कराला दखय, तो सोता देवनी संगं दुशमन व्हई जाय. 5 देवना वचनमं लीखेल सय का, देव आपुनमं जो आत्मा ठेयेल सय, तो आत्मावर तेना पक्का जीव बळय. हाई वचन तुमला आशाज वाटय का? 6 पन देव आपुनवर जास्त दया करय. तेमन वचनमं आशा लीखेल सय का,
✞"देव गर्व करनारंसला वीरोध करय. पन जे नम्र बनत, तेसवर तो दया करय."
7 तेमन तुमं सोताला देवना हातमं द्या, आनं सैतानला वीरोध करा. तवं तो तुम पईन पळी जाई. 8 तुमं देवपन या, तवं तो तुमपन येई. आरे पापी लोकं, तुमं वाईट काम कराना बंद करा. आरे दोन मननं मानसं, तुमं ✞तुमना रुदय पवीत्र करा. 9 तुमला दुख वाटाला पायजे, आनं तुमं रडाला पायजे. तुमना हासाना रडामं बदली जावाला पायजे. आनं तुमना आनंद दुखमं बदली जावाला पायजे. 10 तुमं परभुनी समोर नम्र बना, तवं तो तुमला मोठा करी.
येकमेकंसना न्याय करु नोका
11 मनं भाऊ आनं बईन, येकमेकंसनी बद्दल वाईट बोलु नोका. जर येखादा मानुस कोनी बद्दल वाईट बोलय, नातं तेवर दोस लावय तं, तो देवना नीयमना वीरुद बोलय. आनं तो देवना नीयमवर दोस लावय. जवं तुमं देवना नीयमवर दोस लावत, तवं तुमं नीयम पाळनारं ना सत, पन तुमं न्याय करनारं सत. 12 नीयम बनाडनार आनं न्याय करनार येकंज सय. आनं फक्त तोज तारन देवानी करता आनं नास करानी करता शक्तीवान सय. पन तुमनं शेजारनं लोकंसवर दोस लावनार तुमं कोन सत?
बढाई मारु नोका
13 मनं भाऊ आनं बईन आयका, तुमं सांगत का, आज नातं सकाळ आपुन येखादा शेहेरमं जावुत, आनं तई येक वरीस रहुत, आनं काही धंदा करीसनं पयसा कमावुत. 14 पन सकाळ तुमना काय व्हई जाई, हाई तुमला मायती ना सय. तुमना जीवन तरी काय सय? कजं का तुमं वाफनी सारकं सत, जो थोडा टाईम दखाय आनं लगेज मीटी जाय. 15 तेमन तुमं आशा सांगाला पायजे का, जर परभुनी ईशा व्हई तं, आपुन जगुत आनं आपुन हाई ता करुत. 16 पन तुमं तशेज गर्व करत आनं बढाई मारत. आशी बढाई माराना वाईट सय. 17 जर तुमला चांगला कराना मायती रहीसनं बी तुमं करत ना तं, तुमं पाप करत.