5
जुलुम करनारं श्रीमंत लोकंसला दंड भेटी
1 आरे श्रीमंत लोकं, आयका, तुमवर जो संकट येनार सय तेनी बद्दल कीवा करीसनं रडज्या. 2 ✞तुमना धन सडी गया सय. आनं तुमनं कपडंसला ऊदी खाई टाकनी सय. 3 तुमना सोना चांदीवर जंग लागी गया सय. ते वतला जंग येक दीवस तुमना वीरुद पुरावा देई आनं ईस्तु सारका तुमना आंगला खाई टाकी. कजं का शेवटना दीवसमं तुमं धन आवरी ठेयेल सत. 4 दखा, तुमना वावरंसमं जे लोकं काम करेल सत आनं जे लोकंसनी मजुरी तुमं आडाय धरनं सत, ते तुमना वीरुध आराळ्या दी रहनं सत. आनं तेसना रडाना आवाज शक्तीवान देव आयकेल सय.
5 तुमं जगना मजामं जीवन जगनत. आनं तुमं तुमना सोताना बलीदानना दीवसनी करता खाई पीईसनं जाडंजुडं तयार व्हईनत. 6 जे लोकं तुमला काही वीरोध करनत ना, ते नीतीवान लोकंसला तुमं दोसी ठरावनत. आनं तेसला तुमं मरनना दंड दीनत.
धीर धरा
7 मनं भाऊ आनं बईन, परभु परत येय ताव तुमं धीर धरा. दखा, कशा शेतकरी वावरना चांगला पीकनी वाट दखीसनं पयला आनं शेवटला पानी परन धीर धरय. 8 तशा तुमं बी धीर धरा आनं तुमना रुदयला भक्कम बनाडा. कजं का परभुना येवाना टाईम शेजार ई लागना सय.
9 मनं भाऊ आनं बईन, देव तुमला दोसी ठरावला नोको पायजे मनीसनं येकमेकनी बद्दल कुरकुर करु नोका. दखा, न्याय करनार जवळ ई लागना सय.
10 परभुना नावमं जे वचन सांगनत, ते देवना वचन सांगनारं पक्का दुख सहन करनत आनं धीर धरनत. तुमं बी तेसनी सारका बना. 11 दखा, जे दुख सहन करनत, तेसला आपुन धन्य सांगत. तुमं ईयोबना धीरनी बद्दल आयकनं सत. आनं शेवट परभु तेला कशा आखंकाही दीना, हाई बी तुमला मायती सय. ये वयथीन तुमं दखनत का, परभु पक्का दया करनार आनं कीव करनार सय.
कशानी बी शपथ लेवु नोका
12 मनं भाऊ आनं बईन, आखंसमं मतवंनी गोस्टं हाई सय का, ✞सोरगनी नातं धरतीनी शपथ लेवु नोका. आनं दुसरी कोनती बी शपथ लेवु नोका. तुमवर देव दोस नोको लावाला पायजे मनीसनं 'हं' सांगाना सय तं 'हं'ज सांगा, आनं 'ना' सांगाना सय तं 'ना'ज सांगा.
प्राथनानी शक्ती
13 जर तुम मयथीन कोनी दुखमं पडेल सय तं, तो प्राथना कराला पायजे. आनं जर कोनी आनंदमं सय तं, तो स्तुतीना गाना लावाला पायजे. 14 जर तुम मयथीन कोनी आजारी पडेल सय तं, तो मंडळीनं वडील लोकंसला बलावाला पायजे. आनं ते मंडळीनं वडील लोकं परभुना नावमं तेला ✞तेल लाईसनं प्राथना कराला पायजे. 15 वीस्वासघाई करेल प्राथना आजारी मानुसला बरा करी, आनं परभु तेला उठाडी. आनं जर तो पाप करेल व्हई तं, परभु तेला माफी दीई. 16 तेमन तुमं आजार पईन बरा व्हवानी करता तुमना पाप येक दुसरापन कबुल करा. आनं येक दुसरानी करता प्राथना करा. नीतीवान लोकंसनी प्राथनामं चमत्कार करानी शक्ती सय. 17 ✞ येलीया बी आपुननी सारकाज येक मानुस व्हताल. आनं पानी नोको पडाला पायजे मनीसनं तो कळकळीनं प्राथना करना. आनं साडे तीन वरीस धरतीवर पानी पडना ना. 18 मंग जवं तो परत प्राथना करना, तवं देव पानी पाडना. आनं जमीन मयथीन पीक ऊगना.
वीस्वास मईन मांगं जायेल लोकंसला फीराय लयाना