3
आपुन कायम चांगला काम कराला पायजे
1 वीस्वासी लोकंसला आजुन येक दाउ सांगी दे का, ते सता चालाडनारं आनं आधीकारीसना आधीनमं रव्हाला पायजे. ते तेसनी आज्ञा पाळाला पायजे. आनं आखा चांगला काम करानी करता ते तयार रव्हाला पायजे. 2 ते कोनी बी नींदा नोको कराला पायजे. ते कज्या करनारं ना, पन नम्र बनीसनं आखं लोकंसनी संगं चांगला वागनुकमं रव्हाला पायजे.
3 कजं का आपुन बी पयलंग बीगर बुधीना आनं आज्ञा मोडनारं व्हतलत आनं भटकी जायेल व्हतलत. आपुन आखा वाईट ईशा आनं जगना मजामं फसेल व्हतलत. आपुन खराब जीवन आनं हेवा कराना जीवन जगु लागनंलत. दुसरं लोकं आपुनवर मया ना करतत आनं आपुन बी लोकंसवर मया ना करतत. 4 पन जवं आपला तारन करनार देवनी दया आनं मया मानसंसवर प्रगट व्हयनी, 5 तवं आपुन नीतीवानना काम करनत मनीसनं देव आपुनला तारन दीना ना, पन तेनी दयाथीन आपुनला तारन भेटना सय. आनं पवीत्र आत्माघाई आपला आखा पाप तो धई टाकना, आनं आपुनला येक नवीन जल्म आनं नवीन जीवन दीना सय. 6 देव आपला तारन देनार येसु ख्रीस्तनी द्वारा मोकळा मनथीन तो पवीत्र आत्मा आपुनला भरपुर दीना सय. 7 आनं तो आपुनला तेनी दयाथीन नीतीवान बनाडना, येनी करता का आपुन कायमना जीवनना वारीस बनाला पायजे. हाई आपली आसा सय.
8 ये आखं वचन खरं सत. आनं या गोस्टी मानसंसनी करता चांगल्या आनं उपयोगन्या सत. तेमन मनी ईशा हाई सय का, तु या गोस्टी जोर दीसनं शीकाड. येनी करता का, जे देववर वीस्वास ठेवनं सत, ते चांगलं कामं करानी काळजी लेवाला पायजे. 9 पन मुर्खपनानी वादवीवाद आनं पीढीसनी बद्दल वादवीवाद कराना, कज्या कराना आनं यहुदी लोकंसना नीयम शास्त्रनी बद्दल वादवीवाद कराना, येस पईन दुर रह. कजं का या गोस्टीसमं काही फायदा ना सय आनं बीगर कामन्या सत. 10 जर येखादा मानुस मंडळीला दोन भाग पाडता व्हई तं, तेला येकदोन दाउ समजाडीसनं सांग. नंतर तेला आलंग करी दे. 11 हाई तुला मायती सय का, आशा मानुस खरा पईन भटकी जायेल सय. आनं तो पाप करीसनं सोतालाज दोसी ठराय रहना सय.
पौल शेवटना सलाम सांगय
12 जवं मी आर्तमला नातं तुखीकला तुनी बांग धाडसु, तवं जीतला लवकर येता व्हई, तीतला लवकर तु मनी कडं नीकपलीस शेहेरमं नींगी ये. कजं का मी हीवाळाभर आठी रव्हाना नक्की करना सय. 13 जीतला लवकर व्हई तीतला लवकर जेना वकीलला आनं आपुल्लोला मनी कडं धाड. तेसना प्रवासमं काही कमी नोको पडाला पायजे, आशा तयारी करीसनं धाड. 14 आपलं लोकं बी चांगला काम कराना शीकाला पायजे. तवं ते येकमेकंसनी खरज गरज पुरी करु शकीत. मंजे तेसना जीवन उपयोगना बनी.
15 जे मनी संगं सत, ते आखं जन तुला सलाम सांगत. आपुनवर मया करनारं आखं वीस्वासीसला आमना सलाम सांग. मी प्राथना करय का, देव तुमं आखंसवर दया करी.