4
सैतान येसुला पापमं फसाडानी कोशीत करय
(मतय ४:१-११; मार्क १:१२-१३)
1 मंग पवीत्र आत्मा येसुवर वना आनं तो यार्दन नदी पईन परत वना. तवं आत्मा तेला सुना रानमं ली गया. 2 आनं तई सैतान तेला चाळीस दीवस परन परीक्षा करीसनं पापमं फसाडानी कोशीत करना. ते दीवसमं येसु काहीज खाना ना. आनं जवं त्या चाळीस दीवस पुरा व्हयनात, तवं तेला भुक लागनी. 3 तवं सैतान तेला सांगना, जर तु खरज देवना पोर्या सय तं, हाई दगडला भाकर बनाला सांग. 4 पन येसु तेला नाकारीसनं सांगना, देवना वचनमं आशा लीखेल सय का,
✞"येखादा मानुस फक्त भाकरघाई जगु शकय ना."
5 मंग सैतान तेला येक पक्की ऊची जागामं ली गया. आनं आखा जग मयला राज्य लगेज तेला दखाडना. 6 आनं सांगना, तुला मी ये आखं राज्यंसवर आधीकार दीसु आनं तेसना आखा धन संपती दीसु. कजं का मना हातमं ये आखं देवामं ईयेल सय. आनं जो मना मनला वाटय तेला मी देवु शकय. 7 आनं जर तु मना पाय पडशी तं, ये आखं तुना व्हई जाई. 8 पन येसु तेला नाकारीसनं सांगना, देवना वचनमं आशा लीखेल सय का,
✞"तु तुना देव परमेस्वरनाज पाय पड, आनं फक्त तेनीज सेवा कर."
9 मंग शेवट सैतान तेला यरुशलेम शेहेरमं ली जाईसनं मंदीरना टोकावर हुबा करना. आनं सांगना, जर तु खरज देवना पोर्या सय तं, आठीथीन खाल कुद. 10 कजं का देवना वचनमं आशा लीखेल सय का,
✞"तुला वाचाडानी करता तो तेनं दुतंसला सांगी. 11 आनं तुना पायला बी दगड लागाला नोको पायजे मनीसनं ते तुला हातवर झेली धरीत."
12 पन येसु तेला नाकारीसनं सांगना, देवना वचनमं आशा बी लीखेल सय का,
✞"तु तुना देव परमेस्वरनी परीक्षा करु नोको."
13 मंग आखा प्रकारनी परीक्षा करानी नंतर दुसरी संधी भेटय ताव, सैतान तेला सोडीसनं नींगी गया.
नासरेथनं लोकं येसुला नाकारत
(मतय ४:१२-१७, १३:५३-५८; मार्क १:१४-१५, ६:१-६)
14 नंतर येसु पवीत्र आत्मानी शक्तीघाई गालील जील्लामं परत वना. तवं चारीमेरनं गावंसमं तेनी बद्दल पसरी गया. 15 आनं तो प्राथना घरंसमं जाईसनं लोकंसला देवना वचन शीकाडाला लागना. आनं तई आखं लोकं तेनी स्तुती करनत.
16 मंग जो नासरेथ शेहेरमं तो धाकलाना मोठा व्हयनाल, तई तो वना. आनं शब्बाथना दीवसमं जशा तो कायम करता, तशा तो प्राथना घरमं जाईसनं देवना वचन वाचानी करता हुबा रहना. 17 तवं देवना वचन सांगनार यशयाना लीखेल पुस्तक तेला वाचानी करता देवामं वना. आनं तो पुस्तक हुगाडीसनं तेसना साठी वाचना. तई आशा लीखेल व्हताल का,
18 ✞ "परभुना आत्मा मावर वना सय. कजं का गरीब लोकंसला सुवार्ता सांगानी करता तो माला नीवाडना सय. आनं जे लोकंसला सैतान बांधीसनं तेना ताबामं ठेयेल सय, तेसला सोडानी बद्दल प्रचार करानी करता बी तो माला धाडना सय. आनं आंधळंसला परत दखावानी करता आनं जेसवर लोकं जुलुम करत, तेसला सोडानी करता बी माला तो धाडना सय. 19 आनं तेनं लोकंसला वाचाडानी करता देव जो टाईम ठरायेल सय, तो ई लागना सय मनीसनं प्रचार करानी करता बी तो मला धाडना सय."
20 मंग येसु पुस्तक बंद करीसनं प्राथना घरना सेवकला परत दीना आनं लोकंसला शीकाडानी करता खाल बसना. तवं प्राथना घर मयलं आखं लोकं तेवर नजर टाकनत. 21 तवं तो तेसला सांगाला लागना का, आज तुमं आयकताना हाई देवना वचन पुरा व्हयना सय. 22 तवं आखं आयकनारं लोकं तेनी बढाई कराला लागनत. आनं जो चांगला वचन तो सांगी रहनाल, तेनी बद्दल तेसला पक्का नवल वाटना. आनं ते सांगाला लागनत का, हाऊ तो योसेफना पोर्या सय नं? 23 तवं तो तेसला सांगना, तुमं नक्की माला हाई सांग सांगशात का, हे डाकटर, फक्त दुसरंसलाज ना, पन तु सोताला बी बरा कर. आनं तु जा काही बी चमत्कार कफरनाहुम शेहेरमं करना सय मनीसनं आमं आयकनत, ता आखं तु हाई सोताना गावमं बी कर. 24 पन मी तुमला खरज सांगय का, देवना वचन सांगनारंसला तेना सोताना गावनं लोकं कधी स्वीकार करत ना. 25 आनं ✞येलीयाना दीवसमं जवं साडे तीन वरीस परन देव आकास मईन पानी पाडना ना, आनं आखा देशमं मोठा दुस्काळ पडनाल, तवं ईस्रायेल देशमं बर्याज वीधवा वतल्यात. 26 पन तेस मईन कोनती बी यहुदी वीधवा कडं देव येलीयाला मदत करानी करता धाडनाल ना. पन सीदोन देशना सारफत शेहेरनी येकंज वीधवा कडं देव तेला धाडनाल. 27 तशाज ✞देवना वचन सांगनार आलीशाना दीवसमं ईस्रायेल देशमं बरज कोडी लोकं व्हतलत. पन तेस मयथीन कोनला बी देव चांगला करनाल ना. पन फक्त सुरीया देशना नामान कोडीलाज चांगला करामं वना.
28 जवं प्राथना घरनं लोकं हाई आयकनत, तवं ते पक्का संताप करनत. 29 आनं ते उठीसनं येसुला बळजुबरी गावनी बाहेर काडी दीनत. आनं जो डोंगरवर तेसना गाव बसेल व्हताल, तो डोंगरना काटवर तेला ली गयत. कजं का तथाईन तेला गचाली देवाना तेसना वीचार व्हताल. 30 पन तो तेस मयथीन नींगी गया.
येक भुत लागेल मानुसला येसु चांगला करय
(मार्क १:२१-२८)
31 नंतर येसु गालील जील्लाना कफरनाहुम शेहेरमं वना. आनं शब्बाथना दीवसमं तई लोकंसला देवना वचन शीकाडाला लागना. 32 आनं तेना शीक्षन वयथीन लोकंसला पक्का नवल वाटना. कजं का जेला आधीकार भेटेल सय, आशा सारका तो तेसला शीकाडी रहनाल.
33 तवं तो प्राथना घरमं येक भुत लागेल मानुस व्हताल. आनं तो जोरमं आराळ्या दीसनं सांगना का, 34 हे नासरेथना येसु, आमनी संगं तुना काय संमंध? तु आमना नास कराला वना सय का? तु कोन सय, हाई मला मायती सय. तु देवना धाडेल पवीत्र जन सय. 35 मंग येसु तेला ढटाडीसनं सांगना, ऊगाज रह. आनं ये मयथीन नींगी जा. मंग आखंसनी समोर तो भुतना आत्मा तो मानुसला खाल पाडी टाकना. आनं तेला काही जखम ना दीसनं ते मयथीन नींगी गया. 36 तवं आखंसला नवल वाटना. आनं ते येकमेकंसला सांगाला लागनत का, येना बोलामं काय शक्ती सय? कजं का हाऊ मानुस भुतंसना आत्मासला बी आधीकारथीन आनं शक्तीथीन आज्ञा करय. आनं ते येना आयकीसनं लोकंस मयथीन नींगी जात.
37 मंग येसुनी बद्दल चारीमेरनं आखं गावंसमं पसरी गया.
शीमोननी सासुला आनं बरज दुसरं आजारीसला येसु बरा करय
(मतय ८:१४-१७; मार्क १:२९-३४)
38 मंग येसु प्राथना घर मयथीन उठीसनं शीमोन पेत्रना घर गया. तवं शीमोननी सासु पक्की तावमं पडेल व्हतील. आनं तीला बरा करानी करता ते तेला सांगनत. 39 तवं तो तीना जवळ हुबा रहना आनं तावला ढटाडीसनं नींगी जावाला सांगना. आनं लगेज तीना ताव नींगी गया. आनं ती उठीसनं तेसला जेवाडाला लागनी.
40 मंग संध्याकाळला लोकं आलंग आलंग आजारीसला तेपन लयनत. आनं तो ते आखंसवर हात ठेईसनं तेसला बरा करना. 41 आनं बरज लोकंस मयथीन भुतंसनं आत्मा काडना. आनं ‘तु देवना पोर्या सय’ आशा आराळ्या दीसनं ते भुतंसनं आत्मा लोकंस मयथीन नींगी गयत. पन तो तेसला ढटाडना आनं बोलु दीना ना. कजं का तेसला मायती व्हताल का, तोज देवना धाडेल राजा ख्रीस्त सय.
येसु प्राथना घरंसमं जाईसनं प्रचार करय
(मार्क १:३५-३९)
42 मंग दुसरा दीवस सकासमंज येसु नींगीसनं सुमसाम जागामं गया. तवं लोकंसनी गरदी तेला दखी रहनील. आनं जवं तो तेसला सापडना, ते तेपन वनत. आनं तेस पईन तो नोको जावाला पायजे मनीसनं ते तेला थांबाडानी कोशीत करनत. 43 पन येसु तेसला सांगना, देव लोकंसना जीवनमं कशा राज्य करी, येनी बद्दल सुवार्ता मी दुसरा गावंसमं बी सांगाला पायजे. कजं का येनी करताज देव माला धाडेल सय. 44 आनं तो तथाईन जाईसनं यहुदीयानं प्राथना घरंसमं प्रचार करता फीरना.