8
येसु चार हाजार लोकंसला जेवाडय
(मतय १५:३२-३९)
1 ते दीवसमं आखु येक दाउ लोकंसनी मोठी गरदी येसुपन गोळा व्हयनी. आनं तेसपन खावाला काहीज ना व्हताल. तेमन येसु तेनं चेलंसला बलाईसनं सांगना, 2 माला ये लोकंसनी कीव येय. कजं का तीन दीवस प‍ईन ते मनी संगं सत. आनं तेसपन खावाला काहीज ना सय. 3 मी तेसला भुक्‍या घर धाडना तं, ते रस्तामं भुक्ये भुक्ये बेसुध व्हई जाईत. कजं का तेस मयथीन काही लोकं बरज दुरथीन ईयेल सत. 4 मंग चेलं तेला सांगनत, आठी जंगलमं तेसला जेवाडानी करता कथाईन ईतल्‍या भाकरी लवुत? 5 तवं तो वीचारना, तुमपन कीतल्‍या भाकरी सत? ते सांगनत, सात. 6 मंग तो लोकंसला जमीनवर बसाला सांगना. आनं तो त्‍या सात भाकरी लीना आनं देवना ऊपकार मानीसनं मोडना. आनं त्या वाढानी करता तेनं चेलंसपन दीना. मंग ते चेलं लोकंसला वाटी दीनत. 7 तेसपन थोडं धाकलं मासं बी व्हतलत. मंग तो तेसवर देवना ऊपकार मानना आनं ते बी तेसला वाटाला सांगना. 8 मंग आखं लोकं पोटभरी जेवन करनत. नंतर येसुनं चेलं ऊरेल तुकडं गोळा करनत आनं सात डालखं भरनत. 9 तई कमीतंकमी चार हाजार लोकं व्हतलत. 10 जेवननी नंतर तो तेसला घर धाडी दीना आनं ल‍गेज तेनं चेलंसनी संगं डुंगामं बसीसनं दल्मंनुथा नावनी जागामं वना.
येसु तेनं चेलंसला परुशी लोकंस प‍ईन सावध रव्हाला सांगय
(मतय १६:१-१२)
11 मंग काही परुशी लोकं वनत आनं येसुनी संगं वादावाद करु लागनत. आनं तेनी परीक्षा लेवानी करता सांगनत का, खरज तु देव प‍ईन वना सय मनीसनं आमं वीस्वास कराला पायजे, तेमन तु आमला सोरगं मयथीन काहीतरी चमत्कार करी दखाड. 12 तवं तो पक्‍का जोरमं दम टाकीसनं सांगना, आतंनं लोकं कजं नीशानी मांगत? मी तुमला खरज सांगय का, ये लोकंसला काही नीशानी देवामं येवावु ना. 13 मंग येसु आनं तेनं चेलं तेसला सोडीसनं परत डुंगामं बसनत आनं तथानी बाजु नींगी गयत.
14 मंग येसुनं चेलं भाकरी लेवाला भुलाई गयलत आनं डुंगामं तेसपन येकंज भाकर व्हतील. 15 तो तेसला सावध करीसनं सांगना का, समाळीनं रहज्या. तुमं परुशी लोकंसना आनं हेरोद राजाना खमीर प‍ईन सावध रहज्या. 16 मंग ते येकमेकंसला वीचाराला लागनत का, आपुनपन भाकरी ना सत मनीसनं हाऊ आशा बोलना का? 17 ते जा बोली रनलत ता वळखीसनं तो सांगना, तुमपन भाकरी ना सत येनी बद्दल कजं वीचार करत? तुमं आतं परन माला वळखनत ना का? आनं समजनत ना का? तुमना रुदय जड व्हई गया सय का? 18 डोळा रहीसनं बी तुमं दखु शकत ना आनं कान रहीसनं बी तुमं आयकु शकत ना. 19 तुमला याद ना सय का? जवं मी पाच हाजार लोकंसला पाच भाकरी मोडीसनं वाटाला दीना, तवं तुमं तुकडंसनं कीतलं डालखं भरनंलत? ते सांगनत, बारा. 20 तशाज जवं मी चार हाजार लोकंसनी करता सात भाकरी मोडनाल, तवं तुमं कीतलं डालखं भरनंलत? ते सांगनत, सात. 21 मंग तो सांगना, आजुन तुमला समजना ना का?
येसु येक आंधळाला बरा करय
22 मंग येसु आनं तेनं चेलं बेथसैदा गावमं वनत. तवं काही लोकं तेपन येक आंधळाला लय वनत आनं तेला हात लावानी करता रावन्‍या करनत. 23 येसु तो आंधळाना हात धरीसनं तेला गावनी बाहेर ली गया. आनं तेना डोळामं थुकीसनं आनं तेवर हात ठेईसनं वीचारना, तुला काही दखाय का? 24 तो आंधळा वर दखीसनं सांगना, माला मानसं दखाय रहनं सत, आनं ते चालतं झाडंसनी सारकं वाटी रहनं सत. 25 मंग येसु तेना डोळावर परत हात ठेवना. तवं तो मानुस चांगला दखु लागना. तो बरा व्हयना आनं तेला आखंकाही दखावाला लागना. 26 मंग येसु तेला घर धाडताना सांगना का, तु गावमं जाईसनं कोनला सांगु नोको आनं तुनी घर नींगी जा.
पेत्र सांगय का, येसुज ख्रीस्‍त सय
(मतय १६:१३-२०; लुक ९:१८-२१)
27 मंग येसु आनं तेनं चेलं कैसरीया फीलीप शेहेरना आसपासना गावंसमं गयत. वाटला तो चेलंसला वीचारना, लोकं माला काय मनीसनं वळखत? 28 ते सांगनत, काही जन तुला बापतीस्मा करनार योहान सांगत. आनं काही जन तुला येलीया सांगत. आनं आखु काही जन तुला देवनी गोस्टं सांगनारंस मयथीन येक सांगत. 29 तो वीचारना, पन तुमं माला काय मनीसनं वळखत? पेत्र सांगना, तु ख्रीस्‍त सय. 30 तवं तो तेसला आज्ञा दीसनं सांगना का, मनी बद्दल कोनला सांगु नोका.
येसु तेना मरन आनं परत जीवता व्‍हवानी बद्द‍ल सांगय
(मतय १६:२१-२३; लुक ९:२२)
31 मंग येसु तेनं चेलंसला शीकाडाला लागना का, माला पक्‍का दुख भोगना पडी. यहुदीसनं पुढारी लोकं आनं मुख्य याजक लोकं आनं यहुदीसनं नीयम शीकाडनारं माला नाकारी देईत. आनं ते माला जीवता मारीत. आनं तीन दीवसनी नंतर मी परत उठसु, हाई खरज सय. 32 तो तेसला हाई गोस्टं मोकळा सांगना. तवं पेत्र तेला येक कडं ली गया आनं ढटाडाला लागना. 33 मंग येसु फीरीसनं तेनं चेलंस कडं दखना आनं पेत्रला डोकाडीसनं सांगना, तु मनी समोरथीन नींगी जा. कजं का तु सैताननी सारका बोलय. आनं देवन्‍या गोस्टीस कडं तुना लक्ष ना सय, पन मानुसन्‍या गोस्टीस कडं सय.
जे येसुनी मांगं चालीत तेसला दुख झेलना पडी
(मतय १६:२४-२८; लुक ९:२३-२७)
34 मंग येसु तेनं चेलंसनी संगं लोकंसनी गरदीला बलाईसनं सांगना, जर कोनला मनी मांगं येवाना सय तं, तेला सोताना त्‍याग करना पडी. आनं तो सोता दुख आनं मरन सोसानी करता तयार व्हईसनं मनी मांगं चालना पडी. 35 कजं का जो कोनी सोतानी ईशाघाई जीवन जगय, तो सोरगंना जीवन दवडाय देई. आनं जो कोनी मना साठी आनं सुवार्तानी करता तेना जीवनला दी देई, तेला कायमना जीवन भेटी. 36 जर येक मानुस आखा जग मीळाडना आनं कायमना जीवन दवडाय दीना तं, तेला काही फायदा ना सय. 37 कजं का जर मानुस कायमना जीवन दवडाय दीना तं, काही बी दीसनं तो तेला परत भेटावु ना. 38 जे लोकं देवला नाकारत आनं पापना जीवन जगत, तेसमं जर कोनी माला आनं मना वचनला नाकारी देईत तं, जवं मी मना देवबापना देयेल मोठी शक्‍तीमं पवीत्र दुतंसनी संगं जगमं परत ईसु, तवं मी बी तेसला नाकारी दीसु.