22
मोठा जेवनना ऊदाहरन
(लुक १४:१५-२०)
1 मंग येसु परत ऊदाहरन दीसनं तेसला शीकाडाला लागना. 2 तो सांगना का, देव लोकंसवर राज्य कराना मंजे कोनी येक राजानी सारका सय. येकदाव तेना पोर्याना लगीननी करता तो राजा मोठा जेवननी तयारी करना. 3 आनं लगीनना जेवनी करता जे लोकंसला बलावामं ईयेल व्हताल तेसला बलावानी करता तो राजा तेना नौकरंसला धाडना. पन ते येवाला नाकारी दीनत. 4 मंग परत आखु दुसरं नौकरंसला तो राजा तेस कडं धाडना. आनं तेसला सांगना का, तुमं जाईसनं ते बलायेल लोकंसला सांगा का, राजा तुमनी करता चांगला जेवन तयार करेल सय. आनं तुमनी करता चांगलं चांगलं जनावरंसला मारीसनं जेवन तयार करेल सय. आखंकाही तयार सय, तेमन तुमं या आनं लगीनना जेवन करा. 5 मंग ते नौकर जाईसनं तेसला सांगनत, पन कोनी बी ती गोस्टंवर ध्यान दीनत ना. आनं येक जन तेना वावरमं नींगी गया आनं दुसरा जन तेना कामधंदाला नींगी गया. 6 आनं काही लोकं ते नौकरंसला धरीसनं आपमान करनत आनं जीवता मारी टाकनत. 7 तवं हाई आयकीसनं तो राजाला पक्का राग वना आनं तो तेनं सीपाईसला धाडीसनं ते मारनारंसला नास करी टाकना आनं तेसना शेहेरला चेटाडी टाकना.
8 मंग तो राजा तेना नौकरंसला सांगना, लगीनना जेवन तयारी व्हई जायेल सय, पन आपुन जेसला जेवाला बलावनंलत ते जेवनना लायकंज ना सत. 9 तेमन तुमं गावना रस्तासवर जाईसनं जीतलं लोकं तुमला दखाईत, तीतलं लोकंसला लगीनना जेवननी करता बलाई ली या. 10 मंग ते राजानं नौकर रस्तासवर जाईसनं बरावाईट जीतलं बी लोकंसला दखनत, ते आखंसला येक जागं करनत आनं लगीनना जेवनला ली वनत. तवं तो लगीनना घर लोकंसना भरी गया.
11 मंग तो राजा जेवन करनारं लोकंसला भेटानी करता मजार वना. तवं तेला दखायना का, लगीनना जेवननी करता देयेल कपडं बीगर घालीसनं येक जन तई ईयेल व्हताल. 12 मंग राजा तेला सांगना, भाऊ, लगीनना जेवननी करता देयेल कपडं बीगर घालीसनं तु आठी कशा वना? पन तो मानुस राजाला काही उतर देवु शकना ना. 13 तवं राजा तेनं नौकरंसला सांगना, येना हात पाय बांधीसनं येला बाहेरना आंधारामं टाकी द्या. आनं तई पक्का त्रास मुळे हाऊ पक्का रडी आनं दात खाई. 14 कजं का बलायेल लोकं बरज सत, पन तेस मयथीन थोडंज लोकंसला देवना राज्यनी करता नीवाडामं येई.
परुशी लोकं येसुला फसाडानी कोशीत करत
(मार्क १२:१३-१७; लुक २०:२०-२६)
15 नंतर परुशी लोकं नींगी गयत आनं येसुला बोलामं कशा धराना सय, येनी बद्दल ते बेत करनत. 16 आनं ते तेसनं काही चेलंसला आनं काही हेरोद राजानी कडलं लोकंसला येसु कडं धाडनत. मंग ते लोकं जाईसनं येसुला सांगनत, गुरुजी, आमला मायती सय का, जा खरा सय, ताज तु बोलय आनं शीकाडय. तु कोनलाज दखीसनं घाबरय ना आनं तु मानसंसना तोंड दखीसनं बोलय ना. पन देवना रस्ता खरज शीकाडय. 17 मंग तु आमला सांग का, आमं रोम देशना मोठा राजा ✞कैसरला कर देवाला पायजे का ना? येनी बद्दल तुला काय वाटय? 18 पन येसुला तेसना वाईट वीचार मायती पडी गया. तेमन तो तेसला सांगना, आरे ढोंगी लोकं, तुमं कजं मनी परीक्षा ली रहनं सत? 19 जो पयसाघाई तुमं कर भरत तो पयसा माला दखाडा. तवं ते तेला येक रुपया दीनत. 20 मंग तो तेसला रुपया दखाडीसनं वीचारना, हाऊ रुपयामं कोना तोंड आनं कोना नाव सय? 21 ते सांगनत, कैसरना. मंग येसु तेसला सांगना का, तं मंग जो कैसरला देवाना सय, तो कैसरला द्या आनं जो देवला देवाना सय, तो देवला द्या. 22 तवं हाई आयकीसनं तेसला पक्का नवल वाटना, कजं का ते तेला बोलामं धरु शकनत ना. मंग ते तेला सोडीसनं नींगी गयत.
मरन मयथीन उठानी बद्दल प्रशनं
(मार्क १२:१८-२७; लुक २०:२७-४०)
23 तवं सदुकी नावना येक गठना लोकं वीस्वास करतत का, मरन मयथीन परत जीवता व्हवाना ना सय. मंग तोज रोजला तो गठ मयलं काही लोकं येसु कडं ईसनं तेला वीचारनत, 24 गुरुजी, मोसा तेना देयेल नीयममं लीखी ठेयेल सय का,
✞"जर येखादा मानुस बीगर पोरेसोरेसना मरना तं, तेनी बाईनी संगं तो मरेल मानुसना भाऊ लगीन करीसनं मरेल भाऊना कुटुमला पुडं चालाडाला पायजे."
25 मंग आमनी मजार कोनीतरी सात भाऊ व्हतलत. तेस मईन पईला जन बायको करना आनं तो बीगर पोरेसोरेसना मरना. मंग दुसरा भाऊ बी तीनी संगं लगीन करना. पन तो बी बीगर पोरेसोरेसना मरना 26 आनं तीसरा बी तशाज व्हयना. तशेज साती भाऊ बी ती बाईनी संगं लगीन करीसनं बीगर पोरेसोरेसनं मरनत. 27 आखंसनी शेवट ती बाई बी मरनी. 28 तर जवं लोकं मरेल मयथीन उठीत, तवं ती बाई ते साती जनंस मयथीन कोनी बायको व्हई? कजं का ती साती जनंसनी संगं लगीन करेल व्हतील.
29 मंग येसु तेसला सांगना का, तुमला देवना वचन आनं देवनी शक्ती मायती ना सय. तेमन तुमं देवना खरा वचनला गलत समजत. 30 कजं का जवं लोकं मरन मयथीन उठीत, तवं मानसं लगीन करावुत ना आनं लोकं तेसन्या पोरीसना बी लगीन करी देवावुत ना. पन ते सोरगं मयला देवदुतंसनी सारका जीवन जगीत. 31 आनं मरेल मयथीन परत उठानी बद्दल देव तेना वचनमं जा सांगेल सय, ता तुमं वाचनत ना का? 32 तो देवना वचन आशा सय का,
✞"मी आब्राहामना देव, ईसहाकना देव आनं याकोबना देव सय".
तो मरेल लोकंसना देव ना सय, पन जीवता लोकंसना देव सय. 33 हाई आयकीसनं लोकंसला येसुना शीक्षन वयथीन पक्का नवल वाटना.
आखंसमं मोठी आज्ञा
(मार्क १२:२८-३४; लुक १०:२५-२८)
34 मंग जवं परुशी लोकंसला मायती पडना का, येसु सदुकी लोकंसना तोंड बंद करी दीना आनं ते तेनी संगं वादवीवाद करु शकनत ना, तवं ते येकजागं गोळा व्हयनत. 35 आनं तेस मयथीन येक जनला यहुदीसना नीयम पक्का मायती व्हताल. आनं तो येसुनी परीक्षा लेवानी करता तेला वीचारना, 36 गुरुजी देवना देयेल नीयमंसमं कोनता नीयम आखंस पेक्षा मोठा सय? 37-38 मंग येसु तेला सांगना, देवना देयेल आखी आज्ञासमं पयली आनं मोठी आज्ञा हाई सय का,
✞"तुमं आपला परमेस्वर देववर पुरा रुदयथीन आनं पुरा जीवथीन आनं पुरा मनथीन मया करा."
39 आनं येनी सारकीज दुसरी आज्ञा हाई सय का,
✞\qt "जशे तुमं सोतावर मया करत, तशे आपलं ✞ शेजारनंसवर बी मया करा."
40 या दोनी आज्ञासला धरीसनं मोसाना लीखेल आखा नीयम आनं देवना वचन सांगनारंसना लीखेल आखा वचन लीखामं ईयेल सय.
ख्रीस्त दावीदना पोर्या परभु सय
(मार्क १२:३५-३७; लुक २०:४१-४४)
41 मंग जवं परुशी लोकं येकजागं गोळा व्हयेल व्हतलत, तवं येसु तेसला वीचारना का, 42 देवना धाडेल राजा ख्रीस्तनी बद्दल तुमला काय वाटय? तो कोना पोर्या सय? ते तेला सांगनत, दावीद राजाना. 43 तवं तो सांगना, तं मंग दावीद राजा सोता पवीत्र आत्माघाई कशा तेला परभु सांगय? तो सांगय का,
44 ✞"परमेस्वर देव ✞ मना परभुला सांगना, मी तुना वैरीसला तुना पायनी खाल ली येय ताव तु मनी जेवनी कडं मंजे मोठा माननी जागावर बस."