20
द्राक्षमळामं काम करनारंसना ऊदाहरन
1 मंग येसु आखु सांगना, देव लोकंसवर राज्य कराना मंजे येक शेतकरी मानुसनी सारका सय. आनं तो मानुस तेना द्राक्षमळामं काम करानी करता काही मानसंसला लेवाला सकासना सऊ वाजता बाहेर नींगी गया. 2 आनं काही मजुरंसला रोजनी मजुरी प्रमानं ठराईसनं मळामं काम कराला लावना. 3 मंग आखु सकासना नऊ वाजता तो मानुस बाहेर जाईसनं दखना का, बाजारमं काही मजुर लोकं रीकामं हुबं सत. 4 मंग तो तेसला बी सांगना, तुमं जाईसनं मना द्राक्षमळामं काम करा. आनं जा योग्य सय, ता मी तुमला मजुरी दीसु. तवं ते बी तेना मळामं काम कराला गयत. 5 आखु तो मानुस दुफारना बारा वाजता आनं तीन वाजता बाहेर जाईसनं तशाज करना. 6 नंतर पाच वाजता बी तो बाजारमं गया आनं काही मजुरंसला रीकामं हुबं रहताना दखना. मंग तेसला तो वीचारना, तुमं दीवसभर कजं बीगर कामनं हुबं रहनं सत. 7 आनं ते सांगनत, आमला कोनी बी कामला बलावनत ना, तेमन आमं आठी हुबं सत. तवं तो तेसला सांगना का, तुमं बी मना द्राक्षमळामं जाईसनं काम करा. मंग ते बी तेना मळामं काम कराला गयत.
8 मंग जवं संध्याकाळ व्हयनी, तो मालक तेना नौकरला बलाईसनं सांगना, मजुरंसला बलाईसनं शेवट पईन सुरुवात करीसनं पयला परन जे कामला लायेल सत तेसला मजुरी दी दे. 9 तवं जे लोकंसला पाच वाजता कामला लायेल व्हताल तेसला रोजनी मजुरी भेटनी. 10 मंग जे लोकंसला पयलं कामला लायेल व्हताल तेसला आशा वाटना का, आमला येसनी पेक्षा जास्त मजुरी भेटी. पन तेसला बी रोजनीज मजुरी भेटनी. 11 मंग ते ती मजुरी लीसनं तो मालकनी बद्दल कुरकुर करीसनं सांगनत, 12 ये शेवटमं येनारं फक्‍त येकंज तास काम करनत आनं आमं दीवसभर ऊनतानमं काम करनत. तरी बी तु तेसला आमनी ईतलाज मजुरी दीना. 13 तवं द्राक्षमळाना मालक तेस मयथीन येक जनला बलाईसनं सांगना, भाऊ मी तुना काही वाईट करय ना. तु मनी संगं रोजनी मजुरी लेवानी भाशा करनाल का ना? 14 आनं तुला मी जीतला नक्‍की करेल व्हताल, तीतला लीसनं आठीथीन नींगी जा. आनं जशा तुला दीना, तशा शेवटनं लोकंसला बी देवानी मनी ईशा सय. 15 आनं जो मना सोताना पयसा सय तेला मी मनी ईशा प्रमानं वापर करु शकावु ना का? आनं जर मी मोकळा मनथीन दुसरंसला देय तं, तुना जीव कजं बळय?
16 तशाज जे मोठलं सत ते धाकलं व्हई जाईत आनं जे धाकलं सत ते मोठलं व्हई जाईत.
येसु तेना मरननी बद्दल तीसरा दाउ सांगय
(मार्क १०:३२-३४; लुक १८:३१-३४)
17 नंतर येसु आनं तेनं बारा चेलं यरुशलेम शेहेरमं जाई रनलत. तवं तो तेनं चेलंसला बाजुला ली जाईसनं सांगना का, 18 दखा, आपुन यरुशलेम शेहेरमं जाई रहनं सत. तई मानुसना पोर्‍याला मंजे माला मुख्य याजक लोकंसना आनं नीयम शीकाडनारंसना हातमं देवामं येई. आनं ते माला जीवता माराना दंड ठराईत. 19 आनं ते माला बीगर यहुदी लोकंसना हातमं देईत. आनं ते बीगर यहुदी लोकं मनी थट्टा करीत आनं माला काकडाघाई हानीत आनं कुरुस खांबावर ठोकीसनं माला जीवता मारीत. पन तीसरा रोजला मी मरन मयथीन परत उठसु.
येक दुसरंसनी सेवा करानी बद्दल येसु शीकाडय
(मार्क १०:३५-४५)
20 नंतर जबदीनी बायको तीनं दोन पोरेसला लीसनं येसुपन वनी आनं तेना पाय पडीसनं तेपन काहीतरी मांगाला लागनी. 21 मंग येसु तीला वीचारना, बाई, तुला काय पायजे? ती तेला सांगनी का, जवं तु लोकंसवर राज्य करशी, तवं मनं ये दोनी पोरेस मयथीन येकला तुनी जेवनी कडं आनं दुसराला तुनी डावी कडं बसीसनं तुनी संगं राज्य कराना आधीकार दे. 22 पन येसु सांगना, तुमं मापन काय मांगी रहनं सत, ता तुमला समजय ना. जो दुख मी भोगनार सय, तो तुमं बी भोगु शकसात का? ते तेला सांगनत, हं आमं भोगु शकशुत. 23 तवं तो सांगना, हाई खरज सय का, जो दुख मी भोगनार सय, तो तुमं भोगशात, पन मना जेवनी कडं का डावी कडं बसीनं राज्य करु देवाना आधीकार मापन ना सय. पन जे लोकंसला मना देवबाप नीवाडेल सय, तेसलाज मना जेवनी कडं आनं मना डावी कडं बसाना आधीकार देवामं येई. 24 मंग याकोब आनं योहान येसुला जा सांगनत, ता आयकीसनं बाकीनं दाहा चेलं तेसवर पक्‍कं संताप करनत.
25 पन येसु ते आखंसला शेजार बलाईसनं सांगना, हाई जगमं बीगर यहुदी लोकंसवर जे राज करी रहनं सत, ते तेसवर पुरा सत्ता चालाडत. आनं तेसनं मोठलं लोकं तेसवर जुलुम करत. हाई तुमला मायती सय. 26 पन तुमना मजार तशा नोको व्हवाला पायजे. तर जो कोनी तुमना मजार मोठा व्हवाला दखय, तो तुमना सेवक बनाला पायजे. 27 आनं जो कोनी तुमना मजार पयला व्हवाला दखय, तो आखंसना सेवक बनाला पायजे. 28 कजं का दुसरं लोकं मनी सेवा कराला पायजे मनीसनं मी हाई जगमं वना ना. पन दुसरंसनी करता सेवा कराला आनं आखं लोकंसना पापना दंड पईन सुटका देवानी करता सोताना जीव बलीदान कराला मी वना सय.
येसु दोन आंधळंसला दखता करय
(मार्क १०:४६-५२; लुक १८:३५-४३)
29 मंग येसु आनं तेनं चेलं यरीहो शेहेर सोडीसनं जाई रनलत. तवं लोकंसनी येक मोठी गरदी तेसनी मांगं मांगं जाई रहनील. 30 त‍वं दोन आंधळं वाटवर बसेल व्हतलत आनं ते आयकनत का, येसु हाई रस्ता धरी जाई रहना सय. मंग ते आराळ्या दीसनं सांगाला लागनत का, हे परभु, दावीद राजाना पोर्‍या आमंवर दया कर. 31 तवं बरज जन तेसला ढटाडीसनं सांगनत, ऊगाज रवा. पन ते आजुन जोरमं आराळ्या दीसनं सांगाला लागनत, हे परभु, दावीद राजाना पोर्‍या, आमंवर दया कर. 32 मंग येसु हुबा रहीसनं तेसला बलावना आनं सांगना, मी तुमना साठी काय कराला पायजे आशी तुमनी ईशा सय? 33 ते सांगनत, परभु, आमला बरा कर, कजं का आमला दखावाला पायजे. 34 तवं येसुला तेसनी कीव वनी, तेमन तो तेसना डोळ्यासला हात लावना. तवं लगेज तेसला दखावाला लागना आनं ते येसुनी मांगं मांगं चालाला लागनत.