19
लगीन आनं फारकटीनी बद्दल येसु शीकाडय
(मार्क १०:१-१२)
1 मंग या आख्या गोस्टी सांगानी नंतर येसु तेनं चेलंसनी संगं गालील जील्ला मयथीन नींगीसनं यार्दन नदीनी तथानी बाजुना यहुदीया जील्लामं गया. 2 तवं लोकंसनी मोठी गरदी तेसनी मांगं गयी आनं तेसमं जे आजारी व्हतलत येसु तेसला बरा करना. 3 मंग काही परुशी लोकं ईसनं तेनी परीक्षा लेवानी करता तेला वीचारनत का, काही बी कारन दखाडीसनं येक मानुसला तेनी बायकोला फारकटी दीसनं सोडी देवाना चांगला सय का? 4 मंग येसु तेसला सांगना, देवना वचनमं काय लीखेल सय, हाई तुमं वाचनत ना का? तई आशा लीखेल सय का,
✞"जो देव आखंकाही बनाडना सय, तो सुरुवात पईन मानुसला आनं बाईला बनाडेल सय".
5 आनं तेनी नंतर तो सांगना सय का,
✞"येनी करता मानुस तेना मायबापंसला सोडीसनं तेनी बायकोनी संगं येक व्हईसनं रही. आनं ते दोनी जन येक शरीर सारका व्हई जाईत".
6 तेमन देवनी नजरमं ते पुडं दोन ना सत, पन येकंज शरीर सत. येनी करता का देव जो जोडेल सय, तेला मानुस तोडाला नोको पायजे.
7 मंग ते तेला वीचारनत, ✞ येक कागदवर फारकटीनी बद्दल लीखी दीसनं बायकोला सोडी देवाना मोसा कजं आमला परवानगी देयेल सय? 8 येसु तेसला सांगना, तुमना रुदय कठीन सय मनीसनं तो हाई आज्ञा तुमना साठी दीना सय. पन जवं देव मानुस जातला बनाडना, तवं पईन तशा ना व्हताल. 9 आनं मी तुमला सांगय का, शीनाळीना कारन शीवाय दुसरा कारन वयथीन जो कोनी सोतानी बायकोला सोडी देय आनं दुसरी बायको करय, तो शीनाळीना काम करय. आनं जो कोनी आशा सोडेल बायकोनी संगं लगीन करय, तो बी शीनाळीना काम करय.
10 मंग तेनं चेलं तेला सांगनत, बायको करानी बद्दल मानसंसनी आशी गोस्टं सय तं, मंग मानसंसला लगीन ना कराना, हाई चांगला सय. 11 तवं येसु तेसला सांगना, हाई वचनला आखं जन स्वीकार करु शकावुत ना, पन जे लोकंसला बीगर लगीनना रव्हाना दान देव पईन भेटेल सय, तेज स्वीकार करु शकत. 12 कजं का आलंग आलंग प्रकारना कारन मुळे लोकं लगीन करत ना. काही लोकं जल्म पईन लगीनना लायक ना रहत, तेमन ते लगीन करत ना. आनं काही लोकंसला दुसरं लोकं लगीननी करता बीगर लायकना बनाडी देत, तेमन ते बी लगीन करत ना. आनं आखु काही लोकं देवनी सेवा चांगला रीतथीन करु शकाला पायजे मनीसनं सोता तशेज रही जात आनं लगीन करत ना. तेमन मी तुमला सांगय का, तुम मयथीन जे लोकंसला हाई मना शीक्षन समजना, ते स्वीकार करीसनं पाळाला पायजे.
येसु धाकलं पोरेसला आशीर्वाद देय
(मार्क १०:१३-१६; लुक १८:१५-१७)
13 मंग काही लोकं तेसनं धाकलं पोरेसला येसु कडं ली वनत. कजं का तो तेसवर हात ठेईसनं प्राथना कराला पायजे आशी तेसनी ईशा व्हतील. हाई दखीसनं येसुनं चेलं ते लयनारंसला डोकाडनत. 14 पन येसु तेसला सांगना, पोरेसला मापन येवु द्या, तेसला मना करु नोका. कजं का जे लोकं आशे धाकलं पोरेसनी सारकं सोताला नम्र बनाडत, तेसना साठीज देवना राज्य सय. 15 मंग ते पोरेसवर हात ठेईसनं येसु प्राथना करना आनं तथाईन नींगी गया.
कायमना जीवननी बद्दल येक श्रीमंत मानुस येसुला प्रशनं वीचारय
(मार्क १०:१७-३१; लुक १८:१८-३०)
16 नंतर येक जन आचानक ईसनं येसुला वीचारना, गुरुजी, कायम देवनी संगं जीवन जगानी करता मी कोनता चांगला काम कराला पायजे? 17 मंग येसु तेला सांगना, जवं तु माला चांगला सांगय, तु काय बोली रहना सय, येनी बद्दल वीचार कर. कजं का फक्त येकंज जन चांगला सय आनं तो मंजे देवज सय. आनं जर तुला कायम देवनी संगं जीवन जगानी ईशा सय तं, तु देवन्या आज्ञा पाळत रह. 18 मंग तो मानुस वीचारना, कोनत्या आज्ञा? येसु तेला सांगना, देवन्या आज्ञा सत का,
✞"खुन करु नोको, शीनाळीना काम करु नोको, चोरी करु नोको, दुसरंसनी बद्दल खोटा बोलु नोको, 19 आनं तुना मायबापंसना मान ठेव. आनं जशा तु सोताना जीवनवर मया करय, तशाज तुनं शेजारनंसवर बी मया कर."
20 मंग तो जुवान सांगना, गुरुजी, मी मना धाकलपन पईथीन या आख्या आज्ञा पाळी रहना सय. आखु मी काय कराला पायजे? 21 मंग येसु तेला सांगना, जर देवनी नजरमं तु पुरा चांगला बनाला दखय तं, तु आतं जा आनं तुपन जा काही बी सय ता आखं ईकीसनं गरीबंसला वाटी दे. आनं चाल, मनी मांगं ये. तवं तुला सोरगंमं देव पईन आत्मीक धन भेटी. 22 पन हाई आयकीसनं तो मानुस पक्का दुखी व्हईसनं नींगी गया. कजं का तो पक्का श्रीमंत व्हताल.
23 तवं येसु तेनं चेलंसला सांगना, मी तुमला खरज सांगय का, जे लोकं सोताना धनवर भरोसा ठेवत, तेसला देवना राज्यमं जावानी करता पक्का कठीन सय. 24 आखु मी तुमला सांगय का, जे लोकं तेसना धनवर भरोसा ठेवत तेसला देवना राज्यमं जावा पेक्षा, हुटला सुयना नाक मयथीन जावाला सोपा सय. 25 तवं हाई आयकीसनं चेलंसला पक्का नवल वाटना. आनं ते येकमेकंसला सांगाला लागनत का, तं मंग कोना तारन व्हई? 26 मंग येसु तेसकडं दखीसनं सांगना, मानुसला हाई शक्य ना सय, पन देवनी करता आखा काही शक्य सय.
27 तवं पेत्र येसुला सांगाला लागना का, दख आमं आखा काही सोडीसनं तुनी मांगं ईयेल सत. तं मंग आमला काय भेटी? 28 तवं येसु तेसला सांगना, मी तुमला खरज सांगय का, जवं देव नवीन राज्य बनाडी, तवं मी मंजे मानुसना पोर्या लोकंसना न्याय करानी करता सोरगंनी राजगादीवर बससु. आनं तवं तुमं जे मनी मांगं ईयेल सत, ते बी मनी संगं बारा राजगादीसवर बसीसनं ✞ईस्रायेलनं बारा जातनं लोकंसना न्याय करीत. 29 आनं आखु मी तुमला सांगय का, जो कोनी मना साठी घरदार, भाऊबईन, मायबाप, पोरेसोरे आनं शेतीवाडी सोडेल सय, तेला हाई जगना जीवनमं आखंकाही बराज दाउ भेटी आनं सोरगंमं कायमना जीवन बी भेटी. 30 पन जे लोकं आतं मोठलं सत ते धाकलं व्हई जाईत आनं जे धाकलं सत ते मोठलं व्हई जाईत.