17
मोसा आनं येलीयानी संगं येसु गोस्टं करय
(मार्क ९:२-८; लुक ९:२८-३६)
1 मंग सऊ दीवसनी नंतर येसु पेत्रला आनं याकोबला आनं याकोबना भाऊ योहानला संगं लीसनं येक ऊचा डोंगरवर आलंग गया. 2 तवं तेसनी दखत येसुना रुप बदलना. तेना तोंड सुर्यनी सारका चमकाला लागना आनं तेनं कपडं पक्का ऊजाळा सारका धवळंचप व्हई गयत. 3 तवं ते चेलंसला दखायना का, आचानक ✞ मोसा आनं येलीया तई प्रगट व्हयनत आनं येसुनी संगं बोलाला लागनत. 4 मंग पेत्र येसुला सांगना, गुरुजी, आपुन आठी सत हाई चांगला सय. तुनी ईशा व्हई तं, मी आठी तीन झोपड्या बनाडसु. येक तुनी करता, येक मोसानी करता आनं येक येलीयानी करता. 5 मंग जवं तो बोली रहनाल तीतलामं आचानक येक पक्का चमकदार ढग ईसनं तेसला ढाकी लीना. आनं तो ढग मयथीन आशा आवाज वना का, हाऊ मना पोर्या सय, जेला मी पक्का मया करय. आनं येवर मी पक्का खुस सय. येना तुमं आयका. 6 तवं हाई आयकीसनं ते चेलं पक्कं घाबरी गयत आनं जमीनवर ऊबडं पडी गयत. 7 तवं येसु शेजार ईसनं तेसला हात लावना आनं सांगना, उठा घाबरु नोका. 8 मंग लगेज ते डोळा वर करीसनं चारीमेर दखनत तं, येसु शीवाय तेसला आजुन कोनी दखायना ना.
येलीयानी बद्दल प्रश्नं
(मार्क ९:९-१३)
9 मंग जवं ते डोंगर वयथीन खाल ऊतरी रनलत, तवं येसु तेसला आज्ञा दीसनं सांगना का, मानुसना पोर्या मंजे मी जो परन मरन मयथीन परत उठय ना, तो परन तुमं जा दखनत ता कोनला बी सांगु नोका. 10 तवं तेनं चेलं तेला वीचारनत, पयलंग येलीया येवाला पायजे आशे यहुदी लोकंसना नीयम शीकाडनारं कजं सांगत? 11 तो सांगना, हाई खरज सय का येलीया पयलंग ईसनं आखंकाही सुजारी. 12 पन मी तुमला सांगय का, येलीया ई लागना सय आनं काही लोकं तेला वळखनत ना आनं तेसना मनला जशा वाटना, तशाज ते तेनी संगं पक्का वाईट करनत. आनं तशाज मानुसना पोर्याला मंजे माला बी ते लोकं पक्का दुख देईत. 13 तवं तेसला समजना का, हाऊ बापतीस्मा करनार योहाननी बद्दल आपुनला सांगी रहना सय.
येसु येक भुत लागेल पोर्याला बरा करय
(मार्क ९:१४-२७; लुक ९:१९-३४)
14 नंतर येसु आनं तेनं चेलं लोकंसनी गरदीपन वनत. तवं येक मानुस येसु कडं ईसनं तेनी समोर गुडगं टेकीसनं सांगना, 15 परभु, मना पोर्यावर दया कर आनं तेला बरा कर. कजं का येक भुतना आत्मा द्वारा तेला फीट येय आनं तो पक्का दुख भोगी रहना सय. ती फीट मुळे तो घडीघडी ईस्तुमं आनं पानीमं जाय पडय. 16 मी तेला तुनं चेलंसपन बी ली गयाल, पन ते तेला बरा करु शकनत ना. 17 मंग येसु सांगना, आरे बीगर वीस्वासनं आनं वाईट पीढीनं लोकं, कवं परन मी तुमनी संगं रव्हु आनं तुमना सहन करु? तो भुत लागेल पोर्याला मापन ली या. 18 मंग जवं तो पोर्याला ली वनत, तवं येसु तो भुतना आत्माला ढटाडना. तवं लगेज भुतना आत्मा पोर्या मयथीन नींगी गया आनं तो बरा व्हई गया.
19 नंतर येसुनं चेलं तेला गच्चुप वीचारनत, गुरुजी, आमघाई कजं तो भुतना आत्मा काडता वना ना? 20 तो तेसला सांगना, तुमना कमी वीस्वास मुळे तुमं तेला काडु शकनत ना. कजं का मी तुमला खरज सांगय का, जर तुम मजार राईना दानानी ईतला बी वीस्वास रहना तं, तुमं हाई डोंगरला आथाईन नींगीसनं तथा जा, आशा सांगशात तं, तशाज व्हई. आनं तुमं आखा काही करु शकशात. 21 पन ऊपास आनं प्राथना शीवाय आशे प्रकारनं भुतंसनं आत्मा कधी नींगावुत ना.
येसु दुसरा दाउ तेना मरननी बद्दल सांगय
(मार्क ९:३०-३२; लुक ९:४३-४५)
22 जवं येसु आनं तेनं चेलं गालील जील्लामं येकजागं गोळा व्हयनत, तवं येसु तेसला सांगना, मानुसना पोर्याला मंजे माला लोकंसना हातमं धरी देवामं येई. 23 आनं ते माला जीवता मारीत आनं मरननी नंतर मी तीसरा दीवसमं परत जीवता उठसु. मंग हाई आयकीसनं ते चेलं पक्का दुखी व्हई गयत.
मंदीरना करनी बद्दल येसु शीकाडय
24 नंतर येसु आनं तेनं चेलं कफरनाहुम शेहेरमं वनत. तवं मंदीरना कर वसुली करनारं पेत्र कडं ईसनं तेला वीचारनत का, तुमना गुरु मंदीरना कर देय ना का? 25 आनं तो सांगना, हं तो देय.
मंग ते घरमं जावानी नंतर पेत्र काही बोलानी आगुदार येसु तेला सांगना, शीमोन तुला काय वाटय? धरतीवर राजा लोकं कोन पईन कर लेत? ते तेसनं पोरेस पईन लेत का पारकंस पईन लेत? 26 तवं पेत्र सांगना, पारकंस पईन. मंग येसु तेला सांगना, तं मंग पोरे मोकळं सत. 27 तरी बी आपुन तेसला आडखळन नोको व्हवाला पायजे मनीसनं तु जाईसनं समुद्रमं गळ टाक. आनं जो पयला मासा लागी तेना तोंड हुगड. तवं तुला तई येक चांदीना शीक्का भेटी, जो दोन जनंसना कर भराला भरपुर सय. ता ली जाईसनं मना साठी आनं तुना साठी कर मनीसनं तेसला दी दे.