16
परुशी आनं सदुकी लोकं येसु पईन चमत्कारनी नीशानी मांगत
(मार्क ८:११-१३; लुक १२:५४-५६)
1 मंग काही परुशी आनं सदुकी लोकं वनत आनं येसुनी परीक्षा लेवानी करता सांगनत का, जर खरज तु देव पईन वना सय तं सोरगं मयथीन काहीतरी चमत्कार करीसनं आमला दखाड. 2 मंग येसु तेसला सांगना, जवं सुर्य बुडाना टाईम व्हई जाय, तवं तुमं सांगत का, आकास लाल सय, तेमन सकाळना वातावरन चांगला रही. 3 आनं सकासला तुमं सांगत का, आज वावधन येई, कजं का आकास लाल आनं आंधारा सय. तुमला आकासला दखीसनं वातावरन वळखता येय, पन आजकाल काय घडी रहना सय, येनी बद्दल तुमला वळखता येय ना. 4 आनं तुमं वाईट लोकं सत आनं मावर वीस्वास ठेवनारं लोकं ना सत, तेमन तुमं आशी नीशानी मांगत. पन देवना वचन सांगनार योनाला जो व्हयना, तशी नीशानी शीवाय तुमला आजुन दुसरी काही बी नीशानी देता येवावु ना. मंग येसु तेसला सोडीसनं तेस पईन नींगी गया.
येसु तेनं चेलंसला परुशी लोकंस पईन सावध रव्हाला सांगय
(मार्क ८:१४-२१)
5 मंग येसु आनं तेनं चेलं डुंगामं बसीसनं समुद्रनी तथानी बाजुला गयत आनं तेनं चेलं भाकरी लेवाला भुलाई गयलत. 6 तवं येसु तेसला सांगना, परुशी आनं सदुकी लोकंसना ✞खमीर पईन पक्का सावध रहज्या. 7 मंग ते चेलं येकमेकंसला वीचाराला लागनत का, आपुन भाकरी ना लीनत मनीसनं हाऊ आशा बोलना का? 8 पन ते जा बोली रनलत ता वळखीसनं तो तेसला सांगना, आरे कमी वीस्वासनं लोकं, आपुन भाकरी ना लीनत मनीसनं हाऊ आशा बोलय, आशा वीचार तुमं कजं करत? 9 तुमं आतं परन माला वळखनत ना का? पाच हजार लोकंसला जेवाडानी करता फक्त पाच भाकरी वतल्यात, तवं शेवट आजुन कीतलं टोपलंसन्या ऊरेल भाकरी तुमं भरनंलत? 10 तशाज चार हजार लोकंसला जेवाडानी करता फक्त सात भाकरी वतल्यात, तवं शेवट आजुन तुमं कीतलं डालखंसन्या ऊरेल भाकरी भरनंलत, हाई तुमला याद ना सय का? 11 मी तुमला भाकरीसनी बद्दल बोलना ना, हाई तुमला कजं समजय ना? पन मी आखु तुमला सांगय का, परुशी आनं सदुकी लोकंसना खमीर पईन तुमं सावध रहज्या. 12 तवं तेसला समजना का, तो भाकरीसना खमीरनी बद्दल ना, पन परुशी आनं सदुकी लोकंसना शीक्षन पईन सावध रव्हाला सांगना.
पेत्र सांगय का, येसुज देवना धाडेल राजा ख्रीस्त सय
(मार्क ८:२७-२९; लुक ९:१८-२१)
13 नंतर येसु आनं तेनं चेलं कैसरीया फीलीप शेहेरना आसपासना गावंसमं गयत. तवं तो तेनं चेलंसला वीचारना, मी जो मानुसना पोर्या सय, लोकं माला काय मनीसनं वळखत? 14 मंग ते तेला सांगनत, काही जन तुला बापतीस्मा करनार योहान सांगत. आनं काही जन तुला येलीया सांगत. आखु काही जन तुला यीर्मया नातं देवना वचन सांगनारंस मयथीन येक सांगत. 15 येसु तेसला वीचारना, पन तुमं माला कोन मनीसनं वळखत? 16 तवं शीमोन पेत्र सांगना, जीवता देवना पोर्या ख्रीस्त तुज सय. 17 येसु तेला सांगना, हे योनाना पोर्या शीमोन, तु धन्य सय. कजं का तु जा सांगना, ता कोनता बी मानसंसघाई तुला प्रगट करामं वना ना, पन मना सोरगं मतला देवबाप हाई तुला प्रगट करना सय. 18 आनं आखु मी तुला सांगय का, तु ✞पेत्र सय, आनं हाई खडकवर मी मनी मंडळी तयार करसु. आनं ती मंडळीनी पुडं सैताननी शक्तीना काही चालावु ना. 19 आनं मी तुला ती मंडळीवर आधीकार दीसु, जो सोरगं राज्यन्या कील्या सारका सय. आनं धरतीवर जा काही बी तु लोकंसला ना कराला सांगशी, ता देवला बी मान्य व्हई. तशाज जा काही बी तु लोकंसला कराला सांगशी, ताज देव बी कराला सांगी.
20 तवं येसु तेनं चेलंसला आज्ञा दीसनं सांगना का, मी देवना धाडेल राजा ख्रीस्त सय मनीसनं कोनला बी सांगु नोका.
येसु तेना मरन आनं परत जीवता व्हवानी बद्दल सांगय
(मार्क ८:३०-३३; लुक ९:२२)
21 मंग तवं पईन येसु तेनं चेलंसला सांगाला लागना का, मी यरुशलेम शेहेरमं जासु आनं तई यहुदीसनं पुढारी लोकं आनं मुख्य याजक लोकं आनं यहुदीसनं नीयम शीकाडनारंस पईन माला पक्का दुख भोगना पडी. आनं ते माला जीवता मारीत. पन तीसरा रोजला मी परत उठसु. या गोस्टी नक्की व्हईत. 22 तवं पेत्र येसुला बाजुला ली गया आनं मना करीसनं सांगना, परभु, तु तशा नोको सांगाला पायजे. कजं का देव तुवर दया करी आनं त्या गोस्टी तुवर कधी येवु देवावु ना. 23 पन येसु फीरीसनं पेत्रला डोकाडीसनं सांगना, आरे सैतान मनी समोरथीन नींगी जा. कजं का तु माला आडखळन करी रहना सय. कजं का देवन्या गोस्टीस कडं तुना ध्यान ना सय, पन मानसंसन्या गोस्टीस कडं सय.
जे येसुनी मांगं चालीत तेसला दुख झेलना पडी
(मार्क ८:३४-९:१; लुक ९:२३-२७)
24 मंग येसु तेनं चेलंसला सांगना, जर येखादाला मनी मांगं येवानी ईशा सय तं, ✞ तो तेनी सोतानी ईशाघाई जीवन जगाला नोको पायजे. ✞ आनं तो सोता दुख आनं मरन सोसानी करता तयार व्हईसनं मनी मांगं चालाला पायजे. 25 कजं का जो कोनी सोताना जीव वाचाडाला दखय, तो कायमना जीवनला दवडाय देई. पन जो कोनी मना साठी सोताना जीव दी देई, तेला कायमना जीवन भेटी. 26 जर येक मानुस आखा जग मीळाडना आनं कायमना जीवन दवडाय दीना तं, तेला काही फायदा ना सय. आनं येखादा मानुस कायमना जीवन दवडाय दीना तं, काही बी दीसनं तो तेला आजुन परत भेटाडावु ना. 27 तेमन काही बी व्हयना तं, तुमं मनी मांगं चालाला पायजे. कजं का जवं मानुसना पोर्या मंजे मी मना बापनी मोठी शक्तीथीन मनं सोरगं मतलं दुतंसनी संगं जगमं ✞परत ईसु, तवं मी आखं लोकंसला जेनतेना काम प्रमानं बक्षीस दीसु. 28 आनं मी तुमला खरज सांगय का, मानुसना पोर्याला मंजे माला राज्य करताना दखा शीवाय आठी हुबं रहनारंस मयथीन काही लोकं मरावुतंज ना.