11
येसु आनं बापतीस्मा करनार योहान
(लुक ७:१८-३५)
1 मंग येसु तेनं बारा चेलंसला या आख्या गोस्टी शीकाडना बंद करना. आनं तथाईन नींगीसनं तो गालील जील्‍लाना गावंसमं देवना वचन शीकाडाला आनं प्रचार कराला गया.
2 तवं बापतीस्मा करनार योहान जेलमं रहीसनं येसु ख्रीस्‍त जो मोठला मोठला काम करु लागनाल, तेनी बद्दल आयकना. आनं तो तेनं काही चेलंसला तेपन आशा वीचारानी करता धाडना का, 3 जो ख्रीस्‍त येनार सय, तो तुज सय का, का आमं दुसरानी वाट दखुत? 4 मंग येसु तेसला सांगना, तुमं मना जा काम दखी रहनं सत आनं आयकी रहनं सत, ता जाईसनं योहानला सांगा. 5 तुमं सांगा का, आतं आंधळं लोकं दखाला लागनत आनं लंगडं लोकं चालाला लागनत. आनं कोडी लोकं चांगला व्हई जात आनं बयरे आयकाला लागनत. आनं मरेल मानसं जीवतं व्हई जात आनं गरीब लोकंसला सुवार्ता सांगामं ई रहना सय. 6 आनं जो कोनी मनी बद्दल मनमं शंका ना ठेईसनं वीस्वास ठेवय, तेसला देव आशीर्वाद करी.
7 मंग जवं बापतीस्मा करनार योहाननं चेलं नींगी गयत, तवं येसु योहाननी बद्दल लोकंसला सांगाला लागना का, तुमं काय दखाला सुना रानमं जायेल व्हतलत? जशा वाराना येक बोरु आतातथा हालय, तशा येक भीवक्या मानुसला तुमं दखाला गयलत का? 8 नातं मंग तुमं काय दखाला जायेल व्हतलत? पक्‍कं चांगलं आनं मागायनं कपडं घालेल येक मानुसला दखाला गयल‍त का? दखा, जे पक्‍कं चांगलं आनं मागायनं कपडं घालत ते सुना रानमं रहत ना, पन फक्‍त राजवाडामंज रहत. 9 तं मंग तुमं काय दखाला जायेल व्हतलत? येक देवना वचन सांगनारला दखाला गयलत का? खरज मी तुमला सांगय का, तुमं येक देवना वचन सांगनार पेक्षा बी येक जास्त मोठा मानुसला दखनत. 10 आनं जेनी बद्दल देवना वचनमं लीखेल सय, हाऊ तोज सय. तेनी बद्दल आशा लीखेल सय का,
"देव तेना धाडेल राजाला सांगय का, दख, मी मना नीरोप सांगनारला तुनी पुडं धाडसु. आनं तो तुनी आगुदार जाईसनं तुना साठी वाट तयार करी."
11 आनं मी तुमला खरज सांगय का, जे लोकं हाई जगमं जल्म लीयेल सत, तेस म‍ईन बापतीस्मा करनार योहान पेक्षा कोनी बी मोठा ना सय. पन जो देवना राज्यमं पक्‍का धाकला सय, तो योहान पेक्षा बी मोठा सय. 12 आनं जवं तो तेना प्रचार कराना सुरुवात करना, तवं प‍ईन आतं परन पक्‍का वाईट लोकं भयानक रीतथीन देवना राज्यनी बद्दल शीक्षनना वीरोध करनत आनं तेला नास करानी कोशीत करनं सत. 13 कजं का जवं योहान वना तो टाईम परन देवना राज्यनी बद्दल तेना नीयममं लोकंसला सांगामं वना आनं आखं तेनं वचन सांगनारं बी येनी बद्दलज सांगतं वनत. 14 आनं जर तुमं हाई गोस्टंला खरा मानशात तं, जो मानुस येलीयानी सारका वाट तयार करानी करता येवामं व्हताल, हाऊ योहान तोज सय. 15 जर तुमं ध्यान दीसनं आयकशात तं, तुमला समजी.
16 परत येसु सांगना, हाई पीढीनं लोकंसला मी कोना बराबर गनु? जे पोरे मोकळा जागामं बसीसनं खेळताना येक दुसराला हाक मारत, ये तेसनी सारकं सत. 17 ते सांगत का,
"आमं तुमना साठी आनंदमं बासरी वाजनत, तरी बी तुमं नाचनत ना. आनं आमं दुखना गाना लावनत, तरी बी तुमं रडनत ना."
18 कजं का जवं योहान वना, तो दुसरं लोकंसनी गत चांगला जेवन करना ना आनं दारु बी पीना ना. तरी लोकं तेना आयकत ना आनं सांगत का, तेला भुत लागेल सय. 19 आनं मानुसना पोर्‍या मंजे मी ईसनं खावापेवाला नाकारना ना. आनं लोकं मना बी आयकत ना आनं सांगत का, दखा, हाऊ खादड आनं दारु पेनार सय. आनं हाऊ कर वसुली करनारंसना आनं पापी लोकंसना सोपती सय. पन मी आनं योहान जा करनत, येनी बद्दल जे लोकं खरज वीचार करीत, तेसलाज मायती पडी का, आमं जा करनत ता खरज बुधीना काम करनत.
जे पस्तावा करत ना तेसला देव दंड देई
(लुक १०:१३-१५)
20 मंग जे जे शेहेरंसमं येसु चमत्कारना कामं जास्त करेल व्हताल, त‍ईनं लोकं पस्तावा करनत ना. तेमन तो तेसला दोसी ठरावाला लागना. 21 तो सांगना का, हे खोराजीननं आनं बेथसेदानं लोकं, देव तुमला कीतला मोठा दंड देई. कजं का तुम मजार जे चमत्कारनं कामं व्हयनत, ते जर सोर आनं सीदोननं लोकंसमं वतत तं, ते बरज पयलंगज गोंटानं कपडं घालीसनं आनं सोतावर राख टाकीसनं पाप पईन पस्तावा करतत. 22 तेमन मी तुमला खरज सांगय का, जवं देव न्‍याय करी तवं तो सोर आनं सीदोननं लोकंस पेक्षा तुमला जास्त दंड देई.
23 आनं हे कफरनाहुमनं लोकं, देव तुमला मोठा बक्षीस देई मनीसनं तुमं वीचार करत का? कधीज ना. तुमला खाल नरकमं टाकामं येई. कजं का तुम मजार जे चमत्कारनं कामं करामं वनत, ते सदोम शेहेरनं लोकंसमं करामं ईता तं, ते लोकं आतं पावत टीकी रहतत. 24 तेमन मी तुमला खरज सांगय का, जवं देव न्‍याय करी तवं तो सदोमनं लोकंस पेक्षा तुमला जास्त दंड देई.
येसु देवबापना आभार मानय
(लुक १०:२१-२२)
25 तवं येसु प्राथना करीसनं सांगना का, हे मना बाप, सोरगंना आनं धरतीना परभु, मी तुना ऊपकार मानय. कजं का ज्या गोस्टी मनं चेलंसला मी आतं सांगना, त्या बुधीवान आनं समजदार लोकंस प‍ईन तु दपाडीसनं ठेवना, पन धाकलं पोरे सारकं लोकंसला दखाडना सय. 26 ‍खरज मना बाप, तुला आशाज कराला आवडना सय.
27 मंग येसु लोकंसला सांगना, मना सोरगं मतला बाप आखा काही मना हातमं दी दीना सय. आनं देवना पोर्‍या कोन सय, हाई मना बाप शीवाय कोनला बी मायती ना सय. आनं मीज तेना पोर्‍या सय आनं मना शीवाय कोनी बी तेला वळखत ना. आनं जे लोकंसला देवबापला दखाडानी करता मी नीवाडसु ते बी तेला वळखत.
28 हे थकेल आनं वझामं दाबायेल लोकं तुमं आखं मापन या, मंजे मी तुमला आराम कराला मदत करसु. 29 तुमं मना आधीनमं या, तवं मी तुमला शीकाडसु. कजं का मी धीर धरनार आनं नम्र सय. तेमन तुमना मनला शांती भेटी. 30 कजं का मना आधीनमं येवाना सोपा सय आनं मी जा शीकाडसु, ता कठीन ना सय.