12
शब्बाथना दीवस पाळानी बद्दल येसु शीकाडय
(मार्क २:२३-२८; लुक ६:१-५)
1 मंग येक शब्बाथना दीवसमं येसु तेनं चेलंसनी संगं वावर मयथीन जाई रहनाल. तवं तेनं चेलंसला भुक लागनी, तेमन ते कनसं मोडीसनं खावाला लागनत. 2 हाई दखीसनं काही परुशी येसुला सांगनत, दख, शब्बाथना दीवसमं जा ना कराला पायजे, ता तुनं चेलं कजं करत? 3 मंग येसु तेसला सांगना, ✞जवं येकदाव दावीद राजाला आनं तेनी संगं जे व्हतलत तेसला भुक लागनील, तवं तो काय करना, हाई देवना वचन तुमं वाचनत ना का? 4 तो देवना ✞मंदीरमं गया आनं ज्या आर्पन करेल भाकरी याजक लोकं शीवाय कोनी खावाला ना पायजे, त्या तो खाई लीना. आनं जे तेनी संगं व्हतलत, तेसला बी खावाला दीना. आनं देव येला पाप मनीसनं मोजना ना.
5 आनं मोसाना देयेल नीयममं लीखेल सय का, शब्बाथना दीवसमं याजक लोकं मंदीरमं काम करीसनं शब्बाथना नीयम मोडतत. तरी बी देव येला पाप मनीसनं मोजना ना. हाई देवना वचन तुमं वाचनत ना का? 6 पन मी तुमला सांगय का, मी मंदीर पेक्षा बी मोठा सय आनं आठी सय. तेमन तुमं शब्बाथना दीवसना रीत पाळानी पेक्षा मना शीक्षनला पाळाला पायजे. 7 देवना वचनमं लीखेल सय का,
✞"माला जनावरंसना बलीदाननी गरज ना सय, पन येक दुसरंसवर दया करनारं पायजे."
येना आर्थ जर तुमला समजता तं, ये बीगर दोसना मानसंसवर तुमं दोस लावतत ना. 8 कजं का मी मानुसना पोर्या सय आनं मी शब्बाथना दीवसना बी परभु सय. तेमन शब्बाथना दीवसमं काय कराना सय आनं काय ना कराना सय, हाई नक्की कराना आधीकार मना हातमं सय.
येसु येक सुकायेल हातना मानुसला बरा करय
(मार्क ३:१-६; लुक ६:६-११)
9 नंतर येसु तथाईन नींगीसनं यहुदी लोकंसना प्राथना घरमं गया. 10 तवं येक सुकायेल हातना येक मानुस तई व्हताल. तवं काही परुशी लोकं येसुवर दोस लावानी करता तेला वीचारनत, मोसाना देयेल नीयम प्रमानं शब्बाथना दीवसमं आजारीसला बरा कराला पायजे का ना? 11 मंग येसु तेसला येक ऊदाहरन दीसनं सांगना, जर तुम मजार येखादानी येकंज मेंडी व्हई आनं जर ती शब्बाथना दीवसला येखादा कडामं पडी गयी तं, तो तीला बाहेर काडावु ना का? 12 पन देवनी करता मानुसना जीव मेंडीस पेक्षा बी पक्का कीमतीना सय. तेमन शब्बाथना दीवसमं येक मानुसनी करता बरा कराना पक्का चांगला सय.
13 मंग येसु तो मानुसला सांगना, तुना हात पुडं कर. तवं तो मानुस तेना हात पुडं करना आनं लगेज तो सुकायेल हात तेना दुसरा हातनी गत चांगला व्हई गया. 14 मंग परुशी लोकं बाहेर जाईसनं येसुला जीवता मरानी बद्दल बेत कराला लागनत.
येसुला देव नीवाडेल सय
(मार्क ३:७-१२)
15 पन जवं येसुला हाई मायती पडना, तो तथाईन नींगी गया. तवं बरज लोकं तेनी मांगं मांगं जावाला लागनत. आनं तेसमं जे आजारी व्हतलत ते आखंसला तो बरा करना. 16 आनं तेसला आज्ञा दीसनं सांगना का, मनी बद्दल कोनला बी सांगु नोका. 17 देवना वचन सांगनार यशयाना सांगेल भवीस्यवानी पुरी व्हवाला पायजे मनीसनं तो या गोस्टी करना. ती भवीस्यवानी आशी सय का,
18 ✞ "दखा, हाऊ मना सेवक सय आनं येला मी नीवाडना सय. आनं येला मी पक्का मया करय आनं येवर मी पक्का खुस सय. मना आत्माघाई येला मी ताकत दीसु आनं मी दुसरं दुसरं देशंसनं लोकंसला कशा नीतीवान बनाडसु, येनी बद्दल तो प्रगट करी. 19 तो कोनी संगं बी कज्या करावु ना आनं कोनला बी जोरमं काही सांगावु ना. आनं रस्तासवर जाताना तो बढाई मारीसनं काही सांगावु ना. 20 जे लोकंसना वीस्वास वाकेल बोरु सारका कमजोर सय, तेसनी संगं तो नम्र रीतथीन वागी. आनं वलाय जावाना दीवानी सारका जे लोकंसना वीस्वास कमजोर सय, तेसला तो हीम्मत देई. आनं जो परन देवना नीतीवानना काम पुरा व्हई ना, तो परन तो आशा करत रही. 21 आनं तो वाचाडी मनीसनं दुसरं दुसरं देशंसनं लोकं बी तेवर आसा ठेईत."
येसु सैतान पेक्षा पक्का शक्तीवान सय
(मार्क ३:२०-२७; लुक ११:१४-२३; १२:१०)
22 मंग येक भुत लागेल मानुस व्हताल. तो आंधळा आनं मुक्या व्हई जायेल व्हताल. आनं काही लोकं तेला येसुपन ली वनत. तवं येसु तेला बरा करना, तेमन तो मानुस बोलाला लागना आनं तेला परत दखावाला लागना. 23 हाई दखीसनं लोकंसला पक्का नवल वाटना. आनं ते येक दुसरंसला सांगाला लागनत का, दावीदनी पीढी मयथीन जेला धाडाना वचन देव देयेल सय, तो हाऊ सय का? 24 पन हाई आयकीसनं परुशी लोकं सांगनत का, हाऊ मानुस भुतंसना आधीकारी बालजबुलना मदतथीन भुतं काडय. 25 पन येसु तेसना मनना वीचार वळखी लीना. आनं तो तेसला सांगना, येखादा राज्यमं आपसमं फुट पडना तं, तो राज्य नास व्हई जाय. आनं येखादा शेहेरनं लोकंसमं नातं कुटुमनं लोकंसमं फुट पडी गया तं, तो शेहेर नातं कुटुम बी टीकु शकय ना. 26 तशाज जर सैतान सैतानला काडय तं, तेना राज्यमं बी फुट पडी जायेल सय. आनं तेना राज्य बी टीकु शकावु ना. 27 आनं मी जर भुतंसना आधीकारी बालजबुलना मदतथीन भुतं काडय तं, तुमनं लोकं कोना मदतथीन काडत? आशेज तुमनं लोकंज तुमला दखाडी देत का, तुमं चुकीना बोली रहनं सत. 28 पन जर मी देवना आत्मानी शक्तीथीन भुतं काडय तं, तुमला मायती पडाला पायजे का, देवना राज्य कराना टाईम तुमपन ई लागना सय.
29 मंग येसु तेसला येक ✞ऊदाहरन सांगना. येखादा शक्तीवान मानुसला बांधा शीवाय तेना घरमं घुसीसनं तेना माल कोनी बी लुटु शकय ना. पन तेला पयलं बांधी दीनत तं, तो तेना घर लुटु शकय.
30 जो मानुस मनी संगं ना सय, तो मना वीरुदना सय. आनं जो कोनी लोकंसला देव कडं ली येवानी करता माला मदत करय ना, तो लोकंसला देव पईन दुर ली जाय. 31 तेमन मी तुमला सांगय का, दर प्रकारना पाप पईन देव लोकंसला माफी देवु शकी. आनं जर कोना बी वीरुद तो वाईट बोलना तं, तेला बी देव माफी देवु शकी. पन जर कोनी पवीत्र आत्माना वीरुद वाईट बोलना तं, तेला देव पईन कधीज माफी भेटावु ना. 32 तशाज जर कोनी मानुसना पोर्या मंजे मना वीरुद काही बोलना तं, तेला देव पईन माफी भेटी जाई. पन जर कोनी पवीत्र आत्माना वीरुद वाईट बोलना तं, तेला देव पईन कधीज माफी भेटावु ना. आनं तेला आतंज ना पन कधीज माफी देवामं येवावु ना.
फळघाई झाडंसला वळखामं येय
(लुक ६:४३-४५)
33 मंग आखु येसु तेसला सांगना, जर येखादा झाड चांगला रहय तं, ते वयथीन चांगला फळ भेटय. पन जर झाड चांगला ना रहय तं, ते वयथीन फळ बी चांगला भेटावुत ना. कजं का आखा झाडंसला तेसना फळ वयथीन वळखता येय. 34 तुमं पक्कं जेहरवालं सापडंसनी सारकं वाईट सत, तं मंग तुमला चांगल्या चांगल्या गोस्टी कशा बोलता येई? कजं का मानुसना रुदयमं जा भरेल रहय, ताज तेना तोंडवाटं नींगय 35 येखादा चांगला मानुस तेना रुदयमं ज्या चांगल्या गोस्टी ठेयेल रहय, त्याज तो काडय. आनं येखादा वाईट मानुस तेना रुदयमं जा वाईट ठेवय, ताज तो काडय. 36 पन मी तुमला सांगय का, जवं देव न्याय करी, तवं प्रतेक लोकं जा जा बीगर कामन्या गोस्टी बोलीत, त्या आखंसना हीसोब तेसला देना पडी. 37 कजं का तुमना बोला वयथीन तुमला बीगर दोसना ठरावामं येई, आनं तुमना बोला वयथीनंज तुमला दोसी ठरावामं येई.
लोकं येसुपन पुरावा मांगत
(मार्क ८:११-१२; लुक ११:२९-३२)
38 मंग काही यहुदी लोकंसना नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकं येसुला सांगनत, गुरुजी, खरज तु देव पईन वना सय मनीसनं आमं वीस्वास कराला पायजे, तेमन तु तुना हातघाई काहीतरी चमत्कार करीसनं आमला दखाड. 39 पन येसु तेसला सांगना, तुमं वाईट लोकं सत आनं मावर वीस्वास ठेवनारं लोकं ना सत, तेमन तुमं आशी चमत्कारनी नीशानी मांगत. पन देवना वचन सांगनार योनाला जो व्हयना, तशी नीशानी शीवाय तुमला आजुन दुसरी काही बी नीशानी देता येवावु ना. 40 कजं का जशा ✞योना तीन दीवस आनं तीन राता मासाना पोटमं रहना, तशाज मानुसना पोर्या मंजे मी बी तीन दीवस आनं तीन राता कबरमं रहसु. 41 आनं न्यायना दीवसमं नीनवे शेहेरनं लोकं तुमनी संगं हुबं रहीसनं तुमला दोसी ठराईत. कजं का ते योनाना वचन आयकीसनं पस्तावा करनत. पन दखा, योना पेक्षा बी मी मोठा सय आनं मी आठी सय. पन तुमं मावर वीस्वास ठेवत ना आनं मना आयकीसनं पस्तावा करत ना. 42 आनं जवं देव न्याय करी, तवं दक्षीन कडली ✞ रानी तुमनी संगं उठी आनं तुमला दोसी ठराई. कजं का शलमोन राजानी बुधीनी गोस्टं आयकानी करता ती तीना राज्य मयथीन पक्की दुर ईयेल व्हतील. पन दखा, शलमोन पेक्षा बी मी मोठा सय आनं मी आठी सय. पन तुमं मावर वीस्वास ठेवत ना.
भुतना आत्मा नींगी जाय आनं परत येय, तेनी बद्दल येसु ऊदाहरन सांगय
(लुक ११:२४-२६)
43 मंग आखु येसु तेसला सांगना, जवं येक मानुस मयथीन भुतना आत्मा नींगी जाय, तो भुतना आत्मा रव्हानी करता कोयडी जागामं आतातथा फीरय. पन तेला ती जागा भेटय ना. 44 मंग तो भुतना आत्मा सांगय, मी जो मानुस मयथीन नींगना सय, तोज मानुसमं परत जासु. आनं जवं तो परत येय, तेला दखाय का, तो मानुस येक झाडीझुडीसनं साफ करामं ईयेल आनं चांगला सजाडी ठेयेल रीकामा घरनी सारका सय. 45 तवं तो जाईसनं तेनी पेक्षा जास्त वाईट आशे आजुन सात आत्मासला तेनी संगं ली येय. आनं ते आखं तो मानुसनी मजार घुसीसनं रहत. तवं तो मानुसनी पयली हाल पेक्षा शेवटनी हाल जास्त वाईट व्हई जाय. तशाज तुमं वाईट पीढीनं लोकंसला बी व्हई.
येसुनं खरं नातेवाईक
(मार्क ३:३१-३५; लुक ८:१९-२१)
46 मंग जवं येसु लोकंसला शीकाडी रहनाल, तवं तेनी माय आनं तेनं भाऊ तेला भेटानी करता ईसनं बाहेर हुबं व्हतलत. 47 तवं कोनीतरी तेला सांगनत का, तुनी माय आनं तुनं भाऊ तुला भेटानी करता ईसनं बाहेर हुबं सत. 48 पन येसु ते बोलनारंसला सांगना, कोन मनी खरी माय आनं कोन मनं खरं भाऊ सत, हाई मी तुमला सांगय. 49 मंग तेवर वीस्वास ठेवनारंस कडं हात दखाडीसनं तो सांगना, दखा, येज मनं भाऊ आनं मनी माय सत! 50 कजं का जे कोनी मना सोरगं मतला देव बापनी ईशाथीन चालत तेज मनं भाऊ, बईन आनं माय सत.