9
येसु येक पक्षवादी मानुसला बरा करय
(मार्क २:१-१२; लुक ५:१७-२६)
1 मंग येसु आनं तेनं चेलं डुंगामं बसीसनं समुद्रनी तथानी बाजुला गयत. आनं जो ✞शेहेरमं तो रव्हु लागनाल, तई ते वनत. 2 तवं काही लोकं येक पक्षवादी मानुसला येसुपन लई वनत. तो मानुस झोळीमं नीजेल व्हताल. तवं येसु तेसना वीस्वास दखीसनं तो पक्षवादी मानुसला सांगना, पोर्या धीर धर, कजं का मी तुना पापनी माफी करी दीना सय. 3 मंग काही यहुदीसनं नीयम शीकाडनारं तई व्हतलत. आनं ते तेसना मनमं वीचार कराला लागनत का, हाऊ मानुस कजं देवना वीरुद बोली रहना सय? 4 मंग तेसना मनना वीचार येसुला मायती पडी गया. तेमन तो तेसला सांगना, तुमं तुमना मनमं कजं आशा वाईट वीचार करत? 5 या दोन गोस्टीसमं कोनता सोपा सय? 'तुना पापनी माफी व्हई गयी सय' हाई सांगाना का 'उठीसनं चाल' हाई सांगाना? 6 आनं मी तुमला सांगी दखाडय का, जगमं पापनी माफी देवाना आधीकार फक्त मानुसना पोर्यापन मंजे मापनंज सय. मंग येसु तो पक्षवादी मानुसला सांगना, उठ आनं तुनी झोळी ऊचलीनं तुनी घर नींगी जा. 7 मंग लगेज तो उठना आनं तेनी घर नींगी गया. 8 हाई दखीसनं आखं लोकं घाबरी गयत आनं जो देव मानुसला आशा आधीकार दीना सय, तेनी स्तुती ते कराला लागनत.
मतय येसुना चेला बनय
(मार्क २:१३-१७; लुक ५:२७-३२)
9 मंग जवं येसु तथाईन जाई रहनाल, तवं तो मतय नावना येक मानुसला कर वसुली करनार नाकावर ✞बसेल दखना. आनं तेला सांगना, मनी संगं ये. तवं लगेज तो उठीसनं तेनी संगं गया.
10 नंतर येसु आनं तेनं चेलं मतयना घरमं जेवाला बसेल व्हतलत. तवं बरज कर वसुली करनारं आनं दुसरं पापी लोकं बी ईसनं येसु आनं तेनं चेलंसनी संगं जेवाला बसनत. 11 हाई दखीसनं परुशी लोकं येसुनं चेलंसला सांगनत, तुमना गुरुजी कजं कर वसुली करनारं आनं पापी लोकंसनी संगं जेवन करय? 12 हाई आयकीसनं येसु सांगना, चांगलं लोकंसला डाकटरनी गरज ना रहय, पन आजारीसला रहय. 13 देवना वचनमं लीखेल सय का,
✞"मला जनावरंसना बलीदान नोको पायजे, पन लोकं येक दुसरंसवर दया कराला पायजे, हाई मनी ईशा सय".
तुमं जाईसनं येना आर्थ काय सय, हाई शीका. कजं का जे सोताला नीतीवान समजत, ते लोकंसला ना, पन पापी लोकंसला बलावानी करता मी वना सय.
ऊपासनी बद्दल प्रश्नं
(मार्क २:१८-२२; लुक ५:३३-३९)
14 तवं बापतीस्मा करनार योहाननं काही चेलं येसुपन ईसनं तेला वीचारनत, आमं आनं परुशी लोकं लगेलग ऊपास करत, पन तुनं चेलं कजं ऊपास करत ना? 15 तवं येसु तेसला सांगना, जो परन वराडनी संगं नवरदेव रहय, तो परन ते दुख करत का? पन आशा दीवस येईत का, नवरदेवला तेस पईन लेवामं येई✞. तवं ते ऊपास करीत.
16 मंग येसु तेसला आखु येक ऊदाहरन सांगना, कोनी बी नवा कपडाना ठीगळ जुना कपडाला लावत ना. जर लावनत तं, तो नवा कपडाना ठीगळ जुना कपडाला फाडी टाकय. आनं तो कपडा पयला पेक्षा जास्त फाटी जाय. 17 तशाज कोनी बी नवा द्राक्षसना रसला ✞कातडान्या जुन्या बाटलीसमं भरत ना. जर भरनत तं, त्या कातडान्या बाटली फुटी जात आनं द्राक्षसना रस खाल वताई जाई. आशे ते दोनी नास व्हई जात. तेमन नवा द्राक्षसना रसला कातडान्या नव्या बाटलीसमं भरत, तवं ते दोनी चांगला रहत.
येसु येक पोरला जीवता करय आनं येक पोगर लागेल बाईला बरा करय
(मार्क ५:२१-४३; लुक ८:४०-५६)
18 जवं येसु तेसनी संगं बोली रहनाल, तीतलामं येक यहुदीसना आधीकारी तई वना आनं येसुना पाय पडीसनं सांगना, गुरुजी मनी पोर आतंज मरी गयी. पन तु ईसनं तीना डोकावर हात ठेव, मंजे ती जीवती व्हई जाई. 19 मंग येसु उठीसनं तेनी संगं जावाला लागना. आनं तेनं चेलं बी तेनी संगं संगं जावाला लागनत.
20 जवं ते जाई रनलत, तवं बारा वरीसनी पोगर लागेल येक बाई येसुनी मांगं वनी आनं तेना कपडाना काटना गोंडाला हात लावनी. 21 कजं का ती तीना मनमं वीचार करती का, जर मी फक्त येना कपडाला हात लावसु तं, बरी व्हई जासु. 22 मंग येसु मांगं फीरीसनं तीला दखना आनं सांगना, बाई, धीर धर, तु मावर वीस्वास ठेवनी मनीसनं तु बरी व्हयनी सय. तवं लगेज तोज टाईमला ती बरी व्हई गयी.
23 मंग येसु तो आधीकारीना घर वना. आनं दखना का, वाजा वाजाडनारं आनं रडबोंबल करनारं पक्कं गरदी करी रनलत. मंग तो तेसला सांगना, 24 आखं जन बाहेर नींगी जा, कजं का ती पोर ✞मरेल ना सय, पन ती नीजेल सय. हाई आयकीसनं ते तेला हासाला लागनत. 25 मंग आखं लोकंसला बाहेर काडीसनं येसु मजार गया आनं ती पोरना हात धरीसनं तीला उठाडना. तवं लगेज ती पोर उठनी. 26 तवं हाई गोस्टं आखा भागमं पसरी गयी.
येसु दोन आंधळंसला बरा करय
27 जवं येसु तथाईन पुडं जाई रहनाल, तवं दोन आंधळं तेनी मांगं मांगं आराळ्या दीसनं सांगाला लागनत, हे ✞दावीदना पोर्या आमवर दया कर आनं आमला बरा कर. 28 मंग जवं येसु घरमं गया, तवं ते दोन आंधळं बी तेनी मांगं मांगं मजार गयत. तवं येसु तेसला वीचारना, मी तुमला बरा करु शकय मनीसनं तुमना वीस्वास सय का? ते सांगनत, हं परभु. 29 तवं येसु तेसना डोळासला हात लाईसनं सांगना, जशा तुमं वीस्वास ठेवत तशाज व्हई. 30 मंग लगेज तेसनं डोळा हुगडी गयत आनं तेसला दखावाला लागना. तवं येसु तेसला जोरमं आज्ञा दीसनं सांगना, दखा, हाई कोनला बी सांगु नोका. 31 पन ते बाहेर जाईसनं आखा भागमं येसुनी बद्दल सांगीसनं पसराय दीनत.
येसु येक मुक्या मानुसला बरा करय
32 मंग जवं ते तथाईन जाई रनलत, तवं काही लोकं येक मानुसला येसु कडं ली वनत. तो मानुसला भुतना आत्मा लागेल व्हताल आनं तो मुक्या व्हताल. 33 तवं येसु तो मानुस मयथीन भुत काडी टाकना आनं लगेज तो बोलाला लागना. तवं लोकंसला पक्का नवल वाटना आनं ते सांगाला लागनत का, ईस्रायेल लोकंसमं आमं आशी गोस्टं कधीज दखनंलत ना. 34 पन परुशी लोकं सांगाला लागनत, हाऊ मानुस ✞भुतंसना आधीकारीना मदतथीन भुतं काडय.
लोकंसनी बद्दल येसुला कीव येय
35 नंतर येसु शेहेर शेहेर आनं खेडापाडा फीरीसनं यहुदी लोकंसना प्राथना घरंसमं देवना राज्यना सुवार्ता शीकाडना आनं आखा आजारी पईन लोकंसला बरा करना. 36 तवं लोकंसला दखीसनं तेला पक्की कीव वनी. कजं का ते बीगर मेंडक्यानं मेंडरं सारकं व्हतलत. आनं ते पक्कं दुखमं व्हतलत आनं तेसला मदत करानी करता कोनीज ना व्हतलत. 37 मंग येसु तेनं चेलंसला सांगना, खरज वावरमं पीक तयार व्हई जायेल सय, पन कापनी करनारं पक्कं कमी सत✞. 38 तेमन तुमं वावरना मालक, मंजे देवबाप कडं प्राथना करा का, तो तेना पीकंसला कापानी करता बरज काम करनारंसला धाडी.