8
येसु येक कोडी मानुसला चांगला करय
(मार्क १:४०-४५; लुक ५:१२-१६)
1 जवं येसु डोंगर वयथीन खाल उतरना, तवं लोकंसनी येक मोठी गरदी तेनी मांगं येवाला लागनी. 2 तवं येक कोडी मानुस आचानक येसुपन वना आनं तेना पाय पडीसनं सांगना, परभुजी, माला चांगला कर. कजं का जर तुनी ईशा व्हई तं, तु माला चांगला करु शकशी. 3 मंग येसु तेला हात लाईसनं सांगना, मनी ईशा सय का, तु चांगला व्हई जा. तवं लगेज तेना कोड नींगी गया आनं तो चांगला व्हई गया. 4 मंग येसु तेला सांगना, दख, हाई कोनला बी सांगु नोको. पन जाईसनं सोताला याजकला दखाड. आनं तुमना चांगला व्‍हवानी करता जो काही मोसाना देयेल नीयममं सांगामं ईयेल सय, ता लीसनं लोकंसनी समोर भेट चडाव. तवं ता दखीसनं तेसला मायती पडी का, तु बरा व्हई गया सय.
येसु येक नौकरला बरा करय
(लुक ७:१-१०)
5 तेनी नंतर येसु कफरनाहुम शेहेरमं वना. तवं येक सीपाईसना आधीकारी तेनी कडं ईसनं तेला वीनंती करीसनं सांगना का, 6 परभु, मना नौकरला पक्षीवादना आजार व्हई जायेल सय आनं तो घरमं पडेल सय. आनं तो पक्‍का दुख भोगी रहना सय. तेमन मी तुला वीनंती करय का, तेला तु बरा कर. 7 तवं येसु तेला सांगना, चाल मी ईसनं तेला बरा करसु. 8 मंग तो सीपाईसना आधीकारी सांगना, परभु, तु मना घरमं ईशी आशा मी लायकना ना सय. पन तु आठीथीन फक्‍त सांगी दे मंजे मना नौकर बरा व्हई जाई. 9 कजं का मी बी येक ताबादार मानुस सय आनं मना हातखाल बी सीपाई सत. जर मी येखादाला 'जा' सांगय तं तो जाय, आनं दुसराला 'ये' सांगय तं तो येय. आनं जर मना नौकरला मी 'हाई कर' सांगय तं, ता तो करय. 10 हाई आयकीसनं येसुला नवल वाटना आनं तेनी मांगं चालनारं लोकंसला तो सांगना, मी तुमला खरज सांगय का, ईतला मोठा वीस्वास माला ईस्रायेल लोकंसमं बी दखाला भेटना ना. 11 मी तुमला सांगय का, न्यायना दीवसमं जगना चारीमेरथीन बरज लोकं सोरगंना राज्यमं येईत आनं आब्राहाम आनं ईसहाक आनं याकोबनी संगं जेवाला बसीत. 12 पन जे यहुदी लोकं देवना राज्यमं रव्हाला पायजे व्हतलत, तेसला सोरगंना बाहेरना आंधारामं टाकामं येई. आनं त‍ई ते पक्‍का रडीत आनं दात कडकड खाईत.
13 मंग येसु तो सीपाईसना आधीकारीला सांगना, जा, जशा तु वीस्वास धरना सय तशाज व्हई. तवं तोज टाईमला तेना नौकर बरा व्हई गया.
येसु पेत्रनी सासु आनं बरज लोकंसला चांगला करय
(मार्क १:२९-३४; लुक ४:३८-४१)
14 नंतर येसु पेत्रना घर गया आनं दखना का, तेनी सासु तावमं पडेल सय. 15 मंग येसु तीना हातला हात लावताज लगेज तीना ताव ऊतरी गया. आनं ती उठीनं तेसला जेवाडाला लागनी.
16 मंग जवं संध्याकाळ व्हयनी, तवं लोकं बरज भुत लागेल लोकंसला येसुपन लयनत. आनं तो येकंज शब्‍द सांगीसनं भुतंसला काडी टाकना आनं आजारीमं पडेल आखं लोकंसला बरा करना. 17 तवं देवना वचन सांगनार यशयाना सांगेल भवीस्यवानी पुरी व्हयनी. ती भवीस्यवानी आशी व्हतील का,
"तो सोता आमना दुख ली गया आनं आमना आजारंसला बरा करी दीना."
येसुनी मांगं चालाना
(लुक ९:५७-६२)
18 आनं येकदाव येसु तेनी चारीमेर लोकंसनी येक मोठी गरदी दखीसनं तेनं चेलंसला सांगना, चाला आपुन समुद्रनी तथानी बाजुला नींगी जावुत. 19 तवं येक नीयम शीकाडनार ईसनं येसुला सांगना, गुरुजी, तु ज‍ई जई जाशी त‍ई मी तुनी मांगं ईसु. 20 मंग येसु तेला सांगना, कोल्‍हसना नळा सत आनं आकास मयलं चीडंसला घारा सत. पन मानुसना पोर्‍याला मंजे माला डोका ठेवाला बी जागा ना सय. 21 मंग तेनी मांगं चालनारंस मयथीन आजुन येक जन तेला सांगना, परभु, मी तुनी संगं येवानी आगुदार पयलं माला घर जावु दे आनं मना बापनी सेवा करु दे. मंग जवं तो मरी गया का, तवं तेला बुंजीसनं मी तुनी मांगं ईसु. 22 येसु तेला सांगना, जे लोकं आत्मीक जीवनमं मरी जायेल सत, तेसलाज शरीरमं मरेल लोकंसला बुंजु दे. पन तु मनी मांगं ये.
येसु वावधनला थांबाडय
(मार्क ४:३५-४१; लुक ८:२२-२५)
23 मंग येसु डुंगामं चडीनं बसना आनं तेनं चेलं बी तेनी मांगं गयत. मंग ते तथानी बाजुला जावाला नींगनत. 24 आनं जवं ते जाई रनलत, तवं समुद्रमं लगेज येक मोठा वावधन वना आनं लाटा तो डुंगाला जोरमं हीदाडाला लागन्‍यात. पन येसु नीजेल व्हताल. 25 तवं तेनं चेलं तेनी कडं ईसनं तेला उठाडीनं सांगनत, परभुजी, आमला वाचाड, आपुन बुडी रहनं सत. 26 तवं येसु तेसला सांगना, आरे कमी वीस्वासनं लोकं, तुमं कजं घाबरी गयत? मंग तो उठीसनं वाराला आनं समुद्रला ढटाडना. तवं लगेज तई पुरा शांतं व्हई गया. 27 मंग तेसला पक्‍‍का नवल वाटना आनं ते येकमेकंसला सांगाला लागनत, हाऊ कशा मानुस सय बोवा, कजं का वारा आनं समुद्र बी येना आयकत?
येसु दोन भुत लागेल मानसंसला बरा करय
(मार्क ५:१-२०; लुक ८:२६-३९)
28 मंग येसु आनं तेनं चेलं समुद्रनी तथानी बाजु गरदेकरना देशमं वनत. तवं भुतना आत्मा लागेल दोन मानसं मसान मयथीन नींगीसनं तेसला भेटनत. ते ईतलं भयानक व्हतलत का, कोनी बी तो रस्तांधरी येवुजावु करु शकतत ना. 29 मंग ते दोनी जन आराळ्या दीसनं सांगनत, हे देवना पोर्‍या, तुना आनं आमना काय समंध सय? ठरायेल टाईमना आगुदार आमला दंड देवाला तु आठी वना सय का? 30 मंग तथाईन थोडा दुर डुकरंसना येक मोठा गवारा चरी रहनाल. 31 तवं ते भुतं येसुला वीनंती करीसनं सांगनत का, जर तु आमला काडी रहना सय तं, आमला तो डुकरंसना गवारामं जावु दे. 32 मंग तो तेसला डुकरंसमं घुसाला सांगना. तवं ते भुतंसनं आत्मा नींगीसनं ते डुकरंसमं घुसनत. आनं तो आखा गवारा कडा वरथीन जोरमं पळत पळत जाईसनं समुद्रमं बुडीसनं मरनत. 33 मंग डुकरं चारनारं पळत पळत गावमं गयत आनं ते भुत लागेल मानसंसला जो व्हयना, ता आख्या गोस्टी लोकंसला सांगनत. 34 तवं गावनं आखं लोकं येसुला भेटाला वनत. जवं ते येसुला दखनत, तवं तेला रावन्‍या करीसनं सांगनत का, आमना भाग मयथीन नींगी जा.