6
दुसरंसला मदत करा
1 येसु आखु लोकंसला सांगना, जवं तुमं चांगला चांगला काम करत, तवं लोकंसला दखाडानी करता करु नोका. येनी बद्दल सावध रहज्या. कजं का जर लोकंसला दखाडानी करता तुमं ते करत तं, तुमना सोरगं मतला बाप कडथीन तुमला बक्षीस भेटावु ना. 2 तेमन जवं तुमं गरीब लोकंसला काहीतरी दान करत, तवं लोकंसला दखाडानी करता तेसनी समोर गाजाडु नोका. कजं का ढोंगी लोकंज तशे करत. ते ढोंगी लोकं गरीब लोकंसला दान करताना दुसरं लोकंस पईन मान भेटाडानी करता प्राथना घरंसमं आनं रस्तासमं गाजाडत फीरत. मी तुमला खरज सांगय का, तेसला लोकंस पईन मान भेटु शकी, पन देव पईन तेसला काही बक्षीस भेटावु ना. 3 पन जवं तुमं गरीब लोकंसला दान करत, ✞तवं येनी बद्दल कोनला बी मायती पडु देवु नोको. 4 तवं तु ता गच्चुप करु शकशी आनं तुना देवबाप तुला बक्षीस देई. कजं का जा काही गच्चुप करामं येय, ता बी तेला मायती पडी जाय.
येसु प्राथनानी बद्दल शीकाडय
(लुक ११:२-४)
5 आखु येसु तेसला सांगना, जवं तुमं प्राथना करत, तवं ढोंगी लोकंसनी सारका बनु नोका. कजं का लोकंसला दखाडानी करता प्राथना घरंसमं आनं रस्तासमं जई जास्त लोकं रहत, तई हुबं रहीसनं प्राथना कराला तेसला आवडय. मी तुमला खरज सांगय का, तेसला लोकंस पईन मान भेटु शकी, पन देव पईन तेसला काही बी बक्षीस भेटावु ना. 6 पन जवं तु प्राथना करय, तवं तुनी खोलीमं जाज्यी आनं दार लाईसनं तुमना देवबाप जेला कोनी बी दखु शकत ना, तेनी कडं प्राथना कर. तवं तो तुला बक्षीस देई. कजं का जा काही गच्चुप करामं येय, ता बी तेला मायती पडी जाय.
7 आनं जवं तुमं प्राथना करत, तवं येकंज गोस्टं घडीघडी सांगु नोका. कजं का देववर वीस्वास ना ठेवनारं लोकं तशे करत. आनं तेसला वाटय का, ते जास्त बोलीत तं, तेसना देव तेसनी प्राथना आयकी. 8 पन तुमं तेसनी सारका बनु नोका. कजं का तुमना काय गरज सय, हाई तुमं प्राथना करीसनं मांगानी आगुदार तुमना देवबापला मायती सय.
9 तेमन तुमं आशे प्राथना करा का, हे आमना सोरगंना बाप, लोकं तुना नावला पवीत्र मानाला पायजे. 10 आनं तुना राज्य येवाला पायजे. जशा सोरगंमं व्हय, तशाज धरतीवर बी तुनी ईशा प्रमानं आखंकाही व्हवाला पायजे. 11 आमनी ✞रोजनी भाकर रोज आमला दे. 12 आनं जशा आमना वीरुद वाईट करनारंसला आमं माफी देत, तशाज तु बी आमना करेल वाईट कामंसनी बद्दल माफी दे. 13 आमला परीक्षामं पडु देवु नोको, पन आमला वाईट काम पईन वाचाड. ✞(कजं का तुज शक्तीवान राजा सय आनं तुलाज कायम मोठा मान भेटाला पायजे. आमेन.)
14 जे लोकं तुमना वीरुद वाईट करत, तुमं तेसला माफी देवाला पायजे. जर तुमं तशा करत तं, तुमना सोरगं मतला देवबाप बी तुमना करेल वाईट कामंसला माफ करी. 15 पन जर तुमं लोकंसला माफी दीनत ना तं, तुमना सोरगं मतला देवबाप बी तुमना पाप पईन तुमला माफी देवावु ना.
येसु ऊपासनी बद्दल शीकाडय
16 आखु येसु तेसला सांगना, जवं तुमं ऊपास करत, तवं ढोंगी लोकंसनी सारका तोंड ऊतारीसनं बसु नोका. कजं का ते ऊपास करी रहनं सत, हाई लोकंसला दखाडानी करता तेसना तोंडला तशे करत. पन मी तुमला खरज सांगय का, तेसला लोकंस पईन मान भेटु शकी, पन देव पईन तेसला काही बक्षीस भेटावु ना. 17 पन जवं तुमं ऊपास करत, तवं तुमना डोकाला तेल लावा आनं सोताना तोंड धवा. 18 तवं तुमं ऊपास करी रहनं सत, हाई लोकंसला मायती पडावु ना, पन तुमना देवबाप जेला कोनी बी दखु शकत ना, तेला मायती पडी. तवं तो तुमला बक्षीस देई. कजं का जा काही गच्चुप करामं येय, ता बी तेला मायती पडी जाय.
येसु सोरगंना धन संपतीनी बद्दल सांगय
19 आखु येसु तेसला सांगना, तुमं हाई धरतीवर सोतानी करता धन संपती गोळा करु नोका. कजं का तेवर कीडा आनं जंग लागीसनं नास करी टाकत आनं चोर घर फोडीसनं चोरी करी ली जात. 20 पन तुमं सोतानी करता सोरगंमं धन संपती गोळा करी ठेवा. कजं का तो धन संपतीवर कीडा आनं जंग लागीसनं नास करत ना आनं चोर बी घर फोडीसनं चोरी करी ली जात ना. 21 मी तुमला येनी करता हाई सांगय का, जई तुमना धन रहय, तई तुमना मन बी लागय.
डोळा शरीरना दीवा सारका सय
(लुक ११:३४-३६)
22 येसु आखु सांगना, तुमना डोळा तुमना शरीरना दीवा सारका सय. तेमन जवं तुमना डोळा चांगला सय तं, तुमना आखा शरीरमं ऊजाळा व्हई जाई. 23 पन जवं तुमना डोळा चांगलं ना सय, तवं तुमना आखा शरीरमं पापना आंधारा व्हई जाई. आनं तुमना मजारना ऊजाळा आंधारा व्हई गया सय तं, तुमना जीवन खरज पक्का आंधारा व्हई जाई.
काळजी करु नोका पन देववर भरोसा ठेवा
(लुक १२:२२-३४; १६:१३)
24 मंग येसु आखु तेसला सांगना, कोनी बी येक नौकरला येक संगं दोन मालकंसना काम करता येवावु ना. कजं का तो येक मालकवर मया करी आनं दुसरावर मया करावु ना. नातं येकनी संगं तो ईमानदार रही आनं दुसराला नीचा मानी. तशाज तुमला बी येक संगं देवनी आनं धन संपतीनी सेवा करता येवावु ना.
25 तेमन मी तुमला सांगय का, काय खावाना आनं काय पेवाना मनीसनं तुमना जीवननी बद्दल काळजी करु नोका. आनं घालाला कपडं ना सत मनीसनं बी तुमना आंगनी बद्दल काळजी करु नोका. कजं का जेवन पेक्षा जीवन जास्त मतवंना सय. आनं कपडंस पेक्षा आंग जास्त मतवंना सय. 26 आकास मयलं चीडंसनी बद्दल वीचार करा. ते बीवारा पयरत ना आनं कापनी करत ना. आनं ते धान्य बी गोळा करीसनं तेसना घरमं ठेवत ना. तरी बी तुमना सोरगं मतला देवबाप तेसला जेवन पुरा पाडय. आनं तुमं देवनी नजरमं ते चीडंस पेक्षा बी पक्कं कीमतीवान सत. तेमन तो नक्की तुमला जेवन पुरा पाडी. 27 आनं काळजी करीसनं तुमं मयथीन कोनी बी तेना आयुस्यना येक तास बी वाढावु शकत ना.
28 तशाज कपडंसनी बद्दल बी कजं तुमं काळजी करत? जंगलनं फुलं कशे वाढत हाई तुमं दखा. ते काही मेहनत करत ना आनं सोतानी करता कपडं तयार करत ना. 29 पन मी तुमला सांगय का, शलमोन राजा ईतला श्रीमंत व्हताल, तरी बी तो ते फुलंसनी सारका भारी कपडं घालना ना. 30 तशाज चारा आज वावरमं सय आनं सकाळ ईस्तुमं टाकामं येय. जर तो चाराला देव कपडं सारका ईतला भारी रंग देयेल सय तं, तो तुमला जास्त भारी कपडं देवावु ना का? तो तुमला देई मनीसनं तुमं कजं वीस्वास ठेवत ना? 31 तेमन काय खावाना, काय पेवाना आनं काय घालाना येनी बद्दल तुमं काळजी करु नोका. 32 कजं का जे लोकं देववर वीस्वास ठेवत ना, तेज या गोस्टीसनी मांगं लागत. आनं तुमला या गोस्टीसनी गरज सय मनीसनं तुमना सोरगं मतला देवबापला मायती सय. 33 पन पयलं देव तुमना जीवनमं राज्य कराला पायजे मनीसनं तुमं झटा आनं तेनी नजरमं नीतीवानना जीवन जगा. मंजे या तुमन्या गरजन्या बठ्या गोस्टी बी तुमला भेटी जाईत. 34 तेमन सकाळनी गरजनी बद्दल काळजी करु नोका. कजं का सकाळ तुमला जा गरज सय, ता देव नक्की पुरा पाडी. आनं आज जा गरज सय, तेनी बद्दलज काळजी कराना भरपुर सय.