5
येसु डोंगरवर लोकंसला शीकाडय
1 मंग लोकंसनी गरदीला दखीसनं येसु डोंगरवर जाईसनं बसना. तवं तेनं चेलं आनं तेनी मांगं चालनारं तेनी चारीमेर गोळा व्हयनत. 2 मंग तो तेसला शीकाडाला लागना.
येसु खरा आनंदनी बद्दल शीकाडय
(लुक ६:२०-२३)
3 जे लोकं आख्या गोस्टीनी करता देववर भरोसा ठेवत, ते धन्य सत. कजं का देवना राज्य तेसनाज सय. 4 जे लोकं रडत, ते धन्य सत. कजं का देव तेसला दीलासा देई. 5 जे लोकं गर्व करत ना, ते धन्य सत. कजं का ते जगना वारीस बनीत. 6 जे नीतीवाननी करता भुक्ये आनं तीसे सत, ते धन्य सत. कजं का देव तेसनी ईशा पुरी करी. 7 जे लोकं दुसरंसवर दया करत, ते धन्य सत. कजं का देव बी तेसवर दया करी. 8 जेसना मन चांगला सय, ते धन्य सत. कजं का येक दीवस ते देवला खरज समोर समोर दखीत. 9 जे लोकं दुसरंसला समजाडीसनं शांतीमं ठेवत, ते धन्य सत. कजं का तेसला देवनं पोरे सांगामं येई. 10 जा देवनी नजरमं चांगला सय, ता करत मनीसनं जे लोकंसला वीरोध व्हय, ते धन्य सत. कजं का देवना राज्य तेसनाज सय.
11 जवं मना साठी लोकं तुमना आपमान करत आनं वीरोध करत आनं लबाड सांगीसनं तुमना वीरुद आखा वाईट बोलत, तवं तुमं धन्य सत. 12 तेनी करता तुमं पक्का आनंद करा, कजं का सोरगंमं देव तुमला मोठा बक्षीस देई. आनं तुमना आगुदार जे देवना वचन सांगनारं व्हतलत तेसला बी लोकं तशेज वीरोध करनंलत.
तुमं मीठ आनं ऊजाळा सारकं सत
(मार्क ९:५०; लुक १४:३४-३५)
13 येसु आखु सांगना, तुमं जगना आखं लोकंसनी करता मीठ सारकं सत. पन मीठना खारटपना गया तं, तेनी चव परत लवता येवावु ना. तवं तो काही कामना रहवावु ना. तेला फक्त बाहेर फेकी देवामं येय आनं लोकं तेला पाय खाल चेंदी टाकत.
14 तशाज तुमं जगना आखं लोकंसनी करता ऊजाळा सारकं सत. जो गाव डोंगरवर बनाडेल सय, तो कधी दपु शकावु ना. 15 कोनी बी दीवा लाईसनं चंपानी खाल ठेवत ना, पन सानामं ठेवत. तवं तो घरना आखंसला ऊजाळा देय. 16 तशाज तुमना ऊजाळा लोकंसनी समोर पडु द्या. तवं ते तुमना चांगलं कामं दखीसनं तुमना सोरगंना बापला मोठा मान देईत.
येसु नीयमनी बद्दल शीकाडय
17 मंग येसु आखु तेसला सांगना, तुमं आशा वीचार करु नोका का, मी मोसाना लीखेल नीयमला आनं देवना वचन सांगनारंसना वचनला मीटाडानी करता हाई जगमं वना सय. खरज मी तेसला मीटाडानी करता वना ना, पन तेसला पुरा करानी करता वना सय. 18 मी तुमला खरज सांगय का, जो परन आकास आनं धरती रही, तो परन देवना नीयमना येक बी काना मात्राना नास व्हवावु ना. आनं ते आखं नक्की पुरा व्हईत. 19 तेमन प्रतेक लोकं देवन्या धाकली आज्ञा पईन तं मोठी आज्ञा परन या आख्या पाळाला पायजे. जो कोनी देवनी आज्ञा पाळय ना, आनं दुसरंसला बी तेनी सारकाज कराला शीकाडय, तेला देवना राज्यमं धाकला मनीसनं गनामं येई. पन जो कोनी त्या आज्ञा पाळय आनं दुसरंसला बी पाळाला शीकाडय, तेला देवना राज्यमं मोठा मनीसनं गनामं येई. 20 मी तुमला खरज सांगय का, जर नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकंस पेक्षा तुमं जास्त नीतीवान बनत ना तं, तुमं कधीज देवना राज्यमं जावावुत ना.
राग नोको कराला पायजे मनीसनं येसु शीकाडय
21 मंग येसु आखु तेसला सांगना, तुमला मायती सय का, बराज वरीसनी आगुदार आपला वाडावडील आपुनला शीकाडेल सत का,
✞"कोनी बी खुन नोको कराला पायजे. आनं जो कोनी खुन करी, तेना न्याय करीसनं दंड देवानी करता तेला कोर्टमं ली जावाला पायजे."
22 पन मी तुमला सांगय का, जर कोनी येखादावर ऊगाज राग करय तं, तेना न्याय कोर्टमं करीसनं तेला दंड देवामं येई. आनं जर कोनी येखादाला बीनडोक सांगय तं, तेना बी न्याय करीसनं दंड देवामं येई. आनं जर कोनी येखादाला 'आरे मुर्ख' आशा सांगय तं, तेला नरकनी ईस्तुमं टाकामं येई. 23 तेमन जवं तुमं मंदीरनी वेदीपन दान आर्पन कराला जाशात, तवं जर तुमला याद येय का, येखादाना मनमं तुमना वीरुद काहीतरी सय तं, 24 तुमना दान आर्पन करु नोका. पन तो दान तईज वेदीपन सोडीसनं तेनी कडं परत जा आनं लगेज तेनी संगं येक व्हई जा. तेनी नंतर परत ईसनं तुना दान देवला आर्पन करा. 25 जर तुमना येखादा वयरी तुमला कोर्टमं ली जावाना नक्की करना व्हई तं, लवकर जाईसनं वादवीवाद मीटाडीसनं तेनी संगं येक व्हई जा. नातं कदाचीत तो तुमला न्याय करनार कडं ली जाई आनं तो न्याय करनार तुमला पोलीसंसना हातमं सोपी देई. आनं तुमला जेलमं कोंडी देईत. 26 जर तशा व्हयना तं, मी तुमला खरज सांगय का, तुमं येक येक पयसा देत ताव तुमं ती जेल मईन सुटावुतंज ना.
शीनाळीना पापनी बद्दल येसु सांगय
27 येसु आखु सांगना, देवना नीयममं आशा लीखेल सय का,
✞"तुमं शीनाळीना काम कराला नोको पायजे."
हाई गोस्टं तुमला मायती सय. 28 पन मी तुमला खरज सांगय का, कोनी बी येखादी बाई कडं वाईट नजरथीन बी दखाला नोको पायजे. जर कोनी तशा करय तं, तो तेना मनमं तीनी संगं शीनाळीना काम करी टाकना सय. 29 जर तुना जेवना डोळा तुला पापमं ली जाता व्हई तं, तेला ✞काडीसनं फेकी दे. कजं का तुना आखा शरीर नरकमं जावा पेक्षा तुना शरीरना येकंज भागना नास व्हई, हाई तुनी करता चांगला सय. 30 तशाज जर तुना जेवना हात तुला पापमं ली जाता व्हई तं, तेला तोडीसनं फेकी दे. कजं का तुना आखा शरीर नरकमं जावा पेक्षा तुना शरीरना येकंज भागना नास व्हई, हाई तुनी करता चांगला सय.
फारकटीनी बद्दल येसु शीकाडय
(मतय १९:९; मार्क १०:११-१२; लुक १६:१८)
31 मंग येसु आखु सांगना, देवना नीयममं आशा लीखेल सय का,
✞"जर येखादा मानुस तेनी बायकोला सोडी देय तं, तो फारकटी दीसनं तीला सोडाला पायजे."
32 पन मी तुमला सांगय का, जर येखादी बाई शीनाळीना काम करनी ना, तरी बी तीना नवरा तीला सोडी देय तं, तो मानुस तीला शीनाळीना काममं लावानी सारका सय. आनं जर येक बाईला तीना नवरा फारकटी दीसनं सोडी दीना सय तं, आनं जर दुसरा मानुस ती बाईनी संगं लगीन करय तं, तो बी शीनाळीना काम करय.
शपथनी बद्दल येसु शीकाडय
33 मंग येसु आखु लोकंसला सांगना, पयलंग आपला वाडावडीलंसला सांगामं ईयेल व्हताल का,
✞"तुमं परभुनी समोर जा शपथ करीसनं कबुल करत, ता कधी मोडु नोका. पन जा कराला शपथ करत, ता नक्की करा."
हाई गोस्टं तुमं आयकेल सत. 34 पन मी तुमला सांगय का, तुमं कोनती बी शपथ लेवु नोका. तुमं सोरगंनी शपथ लेवु नोका, ✞कजं का तई बसीसनं देव सता चालाडय. 35 तशाज तुमं धरतीनी बी शपथ लेवु नोका, कजं का ती धरतीवर देव सता चालाडय. आनं तुमं यरुशलेम शेहेरनी बी शपथ लेवु नोका, कजं का तो मोठा शक्तीवान राजा मंजे देवना शेहेर सय. 36 तशाज तुमं सोतानी बी शपथ लेवु नोका, कजं का तुमना सोताना येक बी केशला धवळ्या नातं काळा कराला तुमं शक्तीवान ना सत. 37 पन तुमं 'हं' सांगाना व्हई तं 'हं'ज सांगा आनं 'ना' सांगाना व्हई तं 'ना'ज सांगा. आनं येनी पेक्षा जास्त बोलाना मंजे तो सैतान पईनंज येय.
बदला नोको लेवाला पायजे
(लुक ६:२९-३०)
38 मंग येसु आखु सांगना, देवना नीयममं आशा सांगामं ईयेल सय का,
✞"जर कोनी येखादाना डोळा काडी टाकय तं, तेना डोळा बी काडी टाकाला पायजे. तशाज जर कोनी येखादाना दात पाडी टाकय तं, तेना दात बी पाडी टाकाला पायजे".
हाई गोस्टं बी तुमं आयकेल सत. 39 पन मी तुमला सांगय का, जर कोनी तुना वीरुद काहीतरी वाईट करना तं, तेना बदला लेवु नोको. पन ✞जर कोनी तुना जेवना गालवर थापड मारना तं, तेनी कडं दुसरा गाल बी करी दे. 40 ✞तशाज जो कोनी तुना वीरुद केस करीसनं तुनी कुडची ली जावाला दखय, तेला तुना कोट बी दी दे. 41 आनं जर कोनी ✞बळजुबरी तुला येक कीलोमीटर ली जावाला दखय तं, तेनी संगं दोन कीलोमीटर जाज्यी. 42 तशाज जर कोनी तुपन काही बी मांगय तं, तेला दे. आनं जर कोनी तुपन काहीतरी ऊसना मांगय तं, तेला नाकारु नोको.
तुमनं दुशमनंसवर मया करा
(लुक ६:२७-२८, ३२-३६)
43 मंग येसु आखु लोकंसला सांगना, तुमला सांगामं ईयेल सय का,
✞"तुमनं शेजारनंसवर मया करा आनं दुशमनंसवर मया करु नोका."
हाई गोस्टं तुमं आयकेल सत. 44 पन मी तुमला सांगय का, फक्त शेजारनंसवरज ना, पन तुमनं दुशमनंसवर बी तुमं मया करा. आनं जे लोकं तुमना वीरोध करत, तेसनी करता प्राथना करा. 45 जर तुमं आशा करशात तं, तुमं तुमना सोरगं मतला देवबापनं पोरे बनशात. कजं का तो बी तशाज आखंसवर मया करय. तो जशा चांगलं लोकंसवर तेना सुर्य ऊगाडय, तशाज वाईट लोकंसवर बी तेना सुर्य ऊगाडय. आनं जशा तो चांगलं लोकंसनी करता पानी पाडय, तशाज वाईट लोकंसनी करता बी पानी पाडय. 46 आनं जे तुमवर मया करत, तेसवरज तुमं मया करनत तं, तुमला काय फायदा भेटी? कजं का कर वसुली करनारं सारकं पापी लोकं बी तशेज करत. 47 आनं जर तुमं फक्त तुमना भाऊबंदसनी संगंज चांगला वागनुक करत तं, तुमं कोनता मोठा काम करत? कजं का जे लोकं देववर वीस्वास ठेवत ना, ते बी तशेज करत. 48 तेमन जशा तुमना सोरगं मतला बाप जा चांगला सय ताज कायम करय, तशेज तुमं बी जा चांगला सय ताज कायम कराला पायजे.