4
सैतान येसुला पापमं फसाडानी कोशीत करय
(मार्क १:१२-१३; लुक ४:१-१३)
1 मंग सैतानघाई परीक्षा व्हई मनीसनं पवीत्र आत्मा येसुला येक सुना रानमं ली गया. 2 मंग तई तो चाळीस दीवस आनं चाळीस राता ऊपास करना. नंतर तेला भुक लागनी. 3 तवं परीक्षा करनार सैतान तेनी शेजार ईसनं तेला सांगना, जर तु खरज देवना पोर्‍या सय तं, ये दगडंसला भाकर बनाला सांग. 4 पन येसु तेला नाकारीसनं सांगना, देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"येखादा मानुस फक्‍त भाकरघाई जगु शकय ना. पन देवना तोंड मयथीन नींगेल आखं वचनघाई तो जगु शकय."
5 मंग सैतान येसुला पवीत्र शेहेर यरुशलेममं ली गया आनं मंदीरना टोकावर हुबा करना. 6 आनं तेला सांगना, जर तु खरज देवना पोर्‍या सय तं, आठीथीन खाल कुद. कजं का देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"तुला वाचाडानी करता तो तेनं दुतंसला सांगी. आनं तुना पायला बी दगड लागाला नोको पायजे मनीसनं ते तुला हातवर झेली धरीत."
7 पन येसु तेला नाकारीसनं सांगना, देवना वचनमं आशा बी लीखेल सय का,
"तु तुना देव परमेस्वरनी परीक्षा करु नोको."
8 मंग सैतान येसुला येक पक्‍का ऊचा डोंगरवर ली गया आनं जग मयलं आखं राज्‍य आनं त‍ईना धन संपती तेला दखाडना. 9 आनं तेला सांगना, जर तु मना पाय पडीसनं माला नमन करशी तं, मी तुला ये आखं दीसु. 10 पन येसु तेला नाकारीसनं सांगना, आरे सैतान मा पईन नींगी जा. कजं का देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"तु तुना देव परमेस्‍वरनाज पाय पड आनं फक्‍त तेनीज सेवा कर."
11 मंग सैतान तेला सोडीसनं नींगी गया आनं देवनं दुतं ईसनं तेनी सेवा कराला लागनत.
येसु गालीलमं तेना कामनी सुरुवात करय
(मार्क १:१४-१५; लुक ४:१४-१५)
12 नंतर जवं येसु आयकना का, बापतीस्मा करनार योहान धराय गया सय, तवं तो गालील जील्लामं परत नींगी गया. 13 आनं तो नासरेथ सोडीसनं कफरनाहुम शेरहमं जाईसनं रहना. तो कफरनाहुम गालील समुद्रना काटला व्हताल आनं तो भागमं जबुलुननी आनं नफतालीनी पीढीनं लोकं रहतत. 14 आनं देवना वचन सांगनार यशया जी भवीस्यवानी सांगेल व्हताल, ती पुरी व्‍हवाला पायजे मनीसनं येसु तई जाईसनं रहना. ती भवीस्यवानी आशी व्हतील का,
15 "जे लोकं गालील समुद्रना काटना जबुलुनना भागमं आनं नफतालीना भागमं रहत आनं जे यार्दन नदीनी तथानी बाजुमं रहत आनं जे बीगर यहुदी लोकं रहनारं गालील जील्लामं रहत, तेसला मी सांगय का, 16 \qt जे पापना आंधारामं जीवन जगत ते येक मोठा ऊजाळा दखीत. आनं जे देवला ना वळखीसनं आत्मीक मरनना रस्तावर सत, तेसला तो ऊजाळा तारनना रस्ता दखाडी."
17 तवं प‍ईन येसु प्रचार कराला लागना आनं बोलना का, पाप कराना सोडी द्या आनं देवला वळखा. कजं का देव लोकंसवर राज्य कराना टाईम जवळ ई लागना सय.
येसु तेनं पयलं चेलंसला नीवाडय
(मार्क १:१६-२०; लुक ५:१-११)
18 येक दीवस येसु गालील समुद्रना काटला चाली रहनाल. तवं तो दोन भाऊसंसला समुद्रमं जाळा टाकताना दखना. ते दोन भाऊ शीमोन जेला पेत्र बी सांगतत आनं तेना भाऊ आंद्रीया व्हतलत. आनं ते मासं मारनारं व्हतलत. 19 मंग येसु तेसला सांगना, मनी संगं या आनं मी तुमला लोकंसला मनी बांग लयाना शीकाडसु. 20 मंग ते ल‍गेज जाळा सोडीसनं येसुनी संगं गयत.
21 मंग येसु तथाईन थोडा पुडं जाईसनं आजुन दोन भाऊसंसला दखना. ते जबदीनं दोन पोरे याकोब आनं योहान व्हतलत. ते तेसना बापनी संगं डुंगामं जाळा सवारी रहनंलत. आनं येसु तेसला बी तेनं चेलं बनाला बलावना. 22 मंग लगेज याकोब आनं योहान डुंगाला आनं तेसना बापला तईज सोडीसनं येसुनी संगं गयत.
येसु बरज आजारीसला बरा करय
(लुक ६:१७-१९)
23 मंग येसु आखा गालील जील्लामं फीरीसनं यहुदीसनं प्राथना घरंसमं लोकंसला शीकाडना. आनं कशा देव लोकंसवर राज्य करी, येनी बद्दल सुवार्ता गाजाडना. आनं लोकंसला आखं आजार आनं दुख प‍ईन तो बरा करना. 24 तेमन तेनी बद्दल आखा सुरीया जील्लामं पसरी गया. तवं लोकं बरज आलंग आलंग दुख आनं आजारमं पडेलंसला आनं भुतं लागेल लोकंसला आनं फीट लागेल लोकंसला आनं पक्षीवाद लोकंसला तेनी कडं ली वनत आनं तो तेसला बरा करना. 25 मंग लोकंसनी मोठी गरदी तेनी मांगं चालाला लागनी. ते लोकं गालील, दकापलीस, यहुदीया जील्लासनं आनं यरुशलेम शेहेरनं आनं यार्दन नदीनी तथानी बाजुनं गावंसनं व्हतलत.