2
ओमे ऐ दोस लगाडनारा तू कोडू केहे ने होय तू निरन्तर होय काहाके जी गोठीई मेहे तू बिह्रापो ओ दोस लागतल्यु होय तीज गोठीई मेहे आपाहा स्वतःहा दोषी थोरावत्ल्यु होय याआ कोअता का तू जो स्वतः हा दोष लागतल्यु होय स्वतः बी तोच काम कोत्ल्यु होय 2 आमुहू मालूमे होय एहलो काम कोअनारापो परमेश्वारापोरोत ठीक दंडाओ आज्ञा उवे 3 ओ महांआ, तू जे एहेलू एहलो काम कोअनारापो दोष लागाडीत आना तांहुज ओ काम कोअत्लू नाहाकोत ओ होमजीत्लू का तू परमेश्वराआ दंडाओ आज्ञा पोरोत वचल्लू जाइअलो? 4 नाहाकोत तू त्याआ कृपा आना त्याआ सहनशीलता, धीरपणाने मालदार तुच्छ मोनोहो? नाहाकोत ओ समाजात नाहा का परमेश्वराआ कृपा ताहु मोन बदुलुलो शिकाडीलो 5 पोन तू आपाआ कठोरपणाने आना एकदम मोनोमेहे कारनोवाही त्याआ क्रोधाअ दिहोकोअता ज्याम परमेश्वराआ खोरो न्याय प्रगट उवे, आपाआकाजे राग मेलविलो होय 6 तो प्रत्येकाहा ज्याआ त्याआ कामोबद्दल फोल आपही 7 जो सुकर्मामध्ये स्थिर रोत गौरव आना आदराकोईत अक्षयताची होद कोत्ले, त्याफासाडी तो सार्वकालिक जीवोन आपही 8 पोन जो वाद कोअनारू होय आना सत्याहा मानीत नाहा आना आर्धमाल मोनोहो त्याआपो राग आना खाकार पोडी 9 आना त्रस आना संकट हरएक मांहु जो वाईट कोअत्लू त्याआपो आवे पहीले यहुद्यावर फासाड़ी युनानीवर, 10 पोन गौरव आना सन्मान आना कल्याण प्रत्येकाहा जोडीत , जो पण सत्कृत्ये कोअत्लू पहीले यहुदी फासाड़ी युनानीवर, 11 काहाके परमेश्वर कोडाआच पक्षपात कोईत नाहा 12 याकोअता जिये नियमशास्त्र नाहा पण पाप कोल्यु ते बिना नियमशास्त्राआ नाहा पण होये जिये नियम शास्त्र नाहीत पाप कोल्यो त्याआ दंड नियमामेहे नुसार उवे 13 काहाके का परमेश्वराआ शास्त्रानुसार उनाणारे धोर्मी नाहा पण शास्त्रानुसार चालणारो धोर्मी ठेरव्यो जाथ 14 जाहा बिहरे जातीही माहे ज्याआ त्याही नियमशास्त्र नाहा पण स्वभावमेह शास्त्राआ गोठी नुसार सालतेहे ताहा नियमशास्त्र त्यांआपो नेअयताहा पण ते आपाआकाजे खुद नियमशास्त्र होय 15 ते नियमशास्त्राआ गोठी आपाआ- आपाआ MONAAHMEHE लेखीतमेकली देखाडतलू आना त्याआ सद्विवेक बुद्धी पण साक्ष आपे आना त्याआं फूस परस्पर दोष लागाडीत नाहा ताहा निर्दोष ठराविलु 16 ज्या तेदीही परमेश्वर माआ सुवार्ते अनुसार येशू ख्रिस्ताच्या त्यापोरत माहाहा गुप्त गोठीई न्याय कोअही तिया तेदीही ओ देखाईलो आवे 17 केधी तू यहुदी म्हणविला जात्लू आना नियमशास्त्रावर विश्वास मेकतुल्यो आना परमेश्वराआ विषयामे खत मेकोहो 18 आना त्याआ इच्छा जाआत्लू आना नियमशास्त्राची शिक्षाम मिलवीत उत्तम गोथिहिई प्रिय मोनोहो 19 आना आपापो विश्वास मेकोहो का आय आंधला वाटाडी आना आदाराम पोडिजानारा प्रकाश, 20 आना ज्ञानाना हिकाडनारो आना हाणाआ गुरु होय आना ज्ञान आना खराआ नमुना जे नियमशास्त्राम होय , माहु जोडयेहे होय 21 आखरी; नाहाकोत तू बिहराहा हिकाडत्लू, स्वतःहा हिकाडीत नाहा नाहाकोत? नाहाकोत तू चोरी नाहा कोईलाकाजे शिकाकाडलू? आना खुद चोरी कोअत्लू 22 तू जे कोतलू, 'व्यभिचार कोहू नाहा, नाहाकोत तुमु पण व्यभिचार कोअता? तू मूर्तीचा विटाळा कोअत्लू, नाहाकोत खुद मंदिरोम लुटनारू ? 23 तू जे नियमशास्त्रामध्ये खत कोअत्लू, नाहाकोत नियम शास्त्राआ नाहा मानीत परमेश्वराआ अपमान कोअत्लू? 24 काहाके का तुमाआ कारनोवाही बिहरे जातीमेहे परमेश्वराआ नावाआ निंदा कोअयी जाहो , जेहलो लेखिलो पण होय 25 केधी तू नियम शास्त्रानुसार सालनारू ताहा सुंतेने लाभ होय , परंतु केधी तू नियम शास्त्राआ मान्ये नाहा ताहा ताआ सुंता बिना सुंतेए दशा ठरेल 26 याकोअता केधी सुनते रोत्लू माहाजाती व्यवस्थेची दिहरो जोह मानीत जाथ ताहा त्याआ नाहाकोत बिना सुंतेए दशा सुंतेच्या आरी नाहा तोली जानारू 27 आना जो मांहु शारीरिक रुपोमे बिना सुतांआ रोही केधी ओ नियम शास्त्राआ पुरो कोअयेते नाहाकोत ताहु जो लेख मिळूहुजोवे आना सुंता कोहिताहा तेबी पण नियमशास्त्र पालीलो नाहा दोषी ठराविलो नाहा? 28 काहाके यहुदी तो नाहा जो प्रगटात यहुदी होय आना नाहा ते सुंता होय जे प्रगटात होय आना देहामेहे होय 29 पोन तू यहुदी तो होय जो मोनामेहे आना आत्मामेरोत होय नाहा का लेखिलो एहलो का प्रशंसा माहामोरोत नाहा पोन परमेश्वारापोरोत ओये.