14
बापतीस्मा करनार योहानना मरन
(मार्क ६:१४-२९; लुक ९:७-९)
1 तवं गवर्नर ✞हेरोद येसुना करेल कामंसनी बद्दल आयकना. 2 आनं तेनं सेवकंसला तो सांगना का, हाऊ बापतीस्मा करनार योहान सय आनं मरन मयथीन उठना सय, तेमन तेघाई ये चमत्कार व्हई रहना सय.
3-4 हेरोद राजा आशा सांगना, कजं का तो हेरोदीयानी संगं लगीन करेल व्हताल. आनं ती हेरोदीया तेना धाकला भाऊ फीलीपनी बायको व्हतील. तेमन योहान हेरोदला सांगता का, तु तुना भाऊनी बायकोला ठेवाना ✞देवना नीयमना वीरुद सय. तेमन हेरोद सोता मानसं धाडीसनं बापतीस्मा करनार योहानला धरनाल आनं जेलमं ठेवनाल. 5 आनं तो तेला जीवता मारानी करता दखी रहनाल, पन तो लोकंसला दखीसनं भीवाय रहता. कजं का ते योहानला येक देवना वचन सांगनार सांगतत.
6 येकदाव हेरोद तेना वाढ दीवस ठेवना. तवं हेरोदीयानी पोर सोती वाढ दीवसमं जाईसनं नाचनी आनं हेरोदला खुस करनी. 7 तवं हेरोद राजा ती पोरला शपथ दीसनं सांगना का, तु जा काही बी मापन मांगशी, ता मी तुला दीसु. 8 तवं तीनी माय तीला शीकाडीसनं धाडनी, तेमन ती जाईसनं सांगनी का, बापतीस्मा करनार योहाननी डोकी येक ताटमं ठेईसनं आतंज माला दे. 9 हाई आयकीसनं हेरोद राजाला पक्का दुख वाटना. पन तेनी देयेल शपथ मुळे आनं जेवाला बसेल लोकंस मुळे तो तीला मना करु शकना ना. आनं लगेज योहाननी डोकी कापी लयाला येक सीपाईला सांगना. 10 मंग तो सीपाई जेलमं गया आनं योहाननी डोकी कापी टाकना. 11 आनं ती डोकी येक ताटमं ठेईसनं लयना आनं ती पोरला दीना. मंग ती पोर लीसनं तीनी मायला दीनी. 12 मंग योहाननं चेलं वनत आनं योहानना शरीरला लीसनं मसानमं ठेवनत. आनं येसुपन जाईसनं आखी हाकीगत तेला सांगनत.
येसु पाच हाजार पेक्षा जास्त लोकंसला जेवाडय
(मार्क ६:३०-४४; लुक ९:१०-१७; योहान ६:१-१४)
13 तवं योहाननी बदल आयकीसनं येसु तेनं चेलंसनी संगं डुंगामं बसना आनं तथाईन नींगीसनं येक सुमसाम जागामं नींगी गया. तवं जवळनं गावंसनं लोकंसला हाई मायती पडी गया, तेमन ते तेनी मांगं पायपाय गयत. 14 मंग जवं येसु डुंगा मयथीन खाल उतरना, तवं तो लोकंसनी मोठी गरदीला दखना आनं तेला तेसनी कीव वनी. आनं ते लोकंसमं जे आजारी व्हतलत तेसला तो बरा करना.
15 मंग याळ बुडाना टाईमला तेनं चेलं तेपन ईसनं सांगनत का, गुरुजी हाई जागा सुनी सय आनं आतं पक्की येळ व्हई गयी सय, तेमन लोकंसला आजुबाजुनं खेडं पाडंसमं जाईसनं सोतानी करता खावाला काहीतरी लेवाला धाड. 16 पन येसु तेसला संगना, तेसला जावानी गरज ना सय, तुमंज तेसला काहीतरी खावाला द्या. 17 मंग ते सांगनत, आमपन फक्त पाच भाकरी आनं दोन मासं सत. 18 येसु सांगना, त्या भाकरी आनं मासं मापन ली या. 19 मंग तो आखं लोकंसला नीळा चारावर बसाला सांगना. आनं त्या पाच भाकरी आनं ते दोन मासं लीना आनं वर सोरगं कडं दखीसनं देवना ऊपकार मानना. आनं तेसला मोडीसनं तेनं चेलंसपन वाढला दीना. तवं ते चेलं लोकंसला वाटी दीनत. 20 आनं आखं लोकं पोटभरी जेवन करनत आनं तेनी नंतर भाकरीसनं आनं मासंसनं ऊरेल तुकडं बारा टोपलं भरनत. 21 आनं तई जीतलं बी भाकरी आनं मासं खानत, तेस मईन फक्त मानसंज कमीतं कमी पाच हाजार व्हतलत. आनं मानसंसला सोडीसनं तई बाया आनं पोरे बी व्हतलत.
येसु पानीवर चालय
(मार्क ६:४५-५२; योहान ६:१५-२१)
22 मंग येसु लगेज तेनं चेलंसला सांगना, तुमं डुंगामं बसीसनं मनी आगुदार समुद्रनी तथानी बाजुला नींगी जावा. आनं तो लोकंसला बी तेसना घर परत धाडी दीना. 23 मंग तेसला परत धाडीसनं तो प्राथना कराला डोंगरवर येकटाज गया आनं याळ बुडय ताव, तो तई येखलाज व्हताल.
24 तवं ते चेलंसना डुंगा समुद्रना मजार व्हताल आनं तेसला लाटास मुळे पानी माराना कठीन जाई रहनाल. कजं का तेसना तोंड समोरथीनज पक्का वारा चालु व्हताल. 25 तवं मोठी पाहाटला येसु पानीवर चालता चालता तेसनी कडं वना. 26 मंग जवं चेलं तेला पानी वयथीन चालताना दखनत, तवं ते पक्कं घाबरी गयत आनं सांगनत, हाऊ भुतंज सय. आनं ते घाबरीसनं आराळ्या देवाला लागनत. 27 पन लगेज येसु तेसला सांगना, धीर धरा, मी सय, भीवु नोका. 28 तवं पेत्र तेला सांगना, परभु, जर खरज तु सय तं, माला बी पानीवर चालीसनं तुनी कडं येवाला सांग. 29 मंग येसु तेला सांगना, मनी कडं ये. तवं पेत्र येसु कडं जावानी करता डुंगा मयथीन खाल ऊतरीनं पानीवर चालाला लागना. 30 पन पक्का वाराला आनं लाटासला दखीसनं तो भीवाय गया आनं पानीमं बुडाला लागना. मंग तो जोरमं आराळ्या दीसनं सांगना, परभु माला वाचाड. 31 तवं येसु लगेज हात पुडं करीसनं तेला धरी लीना आनं सांगना, आरे कमी वीस्वासना मानुस, तु मनमं शकां कजं धरना? 32 मंग येसु आनं पेत्र डुंगामं जाईसनं बसानी नंतर वारा थांबी गया. 33 तवं जे चेलं डुंगामं बसेल व्हतलत ते येसुना पाय पडीसनं सांगनत का, खरज तुज देवना पोर्या सय.
येसु बरज आजारीसला बरा करय
(मार्क ६:५३-५६)
34 मंग येसु आनं तेनं चेलं गालील समुद्रनी तथानी बाजुना गनेसरेत नावनी जागामं गयत. 35 मंग तो भागनं काही लोकं येसुला वळखी लीनत आनं तेसनं चारीमेरनं गावंसमं मानसं धाडीसनं तो आठी ईयेल सय मनीसनं सांगी दीनत. तवं लोकं आखं आजारी लोकंसला येसु कडं लयाला लागनत. 36 आनं ते तेला वीनंती करीसनं सांगनत का, आमला फक्त तुना कपडाना काटना गोंडाला हात लावु दे. मंग जीतलं लोकं हात लावनत तीतलं बरं व्हयनत.