2
काही बुधीवान लोकं येसुला दखाला येत
1 हेरोद राजाना काळमं येसु यहुदीया जील्लाना बेथलेहेम नावना गावमं जल्म लीना. तवं पुर्व कडलं देश मयथीन काही बुधीवान लोकं यरुशलेम शेहेरमं वनत आनं वीचाराला लागनत का, 2 यहुदी लोकंसना जो राजा जल्म लीना सय, तो क‍ई सय? कजं का आमं पुर्व बाजुमं तेना तारा दखीसनं तेला नमन कराला ईयेल सत.
3 जवं हेरोद राजा हाई आयकना, तवं तो आनं तेनी संगं आखं यरुशलेमनं लोकं घाबरी गयत. 4 मंग तो राजा आखं मुख्य याजक आनं यहुदी लोकंसना नीयम शीकाडनारंसला बलावना आनं वीचारना का, देवना धाडेल राजाना जल्म क‍ई व्हयनार सय? 5 मंग ते सांगनत, यहुदीया जील्लाना बेथलेहेम गावमं तेना जल्म व्हयनार सय. कजं का देवना वचन सांगनार मीखा तेना पुस्तकमं आशा लीखेल सय का,
6  "हे यहुदीयाना देशमं रहनार बेथलेहेम गाव, तु धाकला सय, पन यहुदीयाना आखा शेहेरंसमं तु पक्‍का मतवंना सय. कजं का देवना ईस्रायेल लोकंसला समाळनार राजा तु मयथीनंज नींगी."
7 मंग हेरोद राजा ते बुधीवान लोकंसला गच्‍चुप बलावना आनं तेस प‍ईन तो तारा दखावाना टाईम नीट वीचारी लीना. 8 आनं तो तेसला बेथलेहेम कडं धाडीसनं आशा सांगना का, तुमं जाईसनं तो पोर्‍यानी बद्दल चांगला वीचारपुस करा. आनं तुमला तो सापडना का ल‍गेज माला सांगा, मंजे मी बी जाईसनं तेला नमन करसु. 9 मंग ते बुधीवान लोकं राजाना आयकीसनं नींगी गयत. आनं जो ताराला ते पुर्व बाजुमं दखनंलत, तो तारा तेसनी पुडं पुडं जावु लागनाल आनं जी जागामं तो पोर्‍या व्हताल ती जागापन जाईसनं थांबी गया. 10 मंग तो ताराला दखीसनं तेसला पक्‍का आनंद वाटना. 11 आनं ते घरमं जाईसनं तो पोर्‍याला तेनी माय मरीयापन दखनत आनं तेना पाय पडीसनं तेला नमन करनत. मंग ते तेसन्‍या थयल्या सोडनत आनं तो पोर्‍याला सोना, ऊद आनं गंधरस भेट दीनत.
12 मंग ते बुधीवान लोकंसला देव सपनमं सांगना का, 'तुमं हेरोद राजा कडं परत जावाला नोको पायजे'. तेमन ते दुसरा रस्ताथीन तेसना देशमं परत नींगी गयत.
येसुला लीसनं तेना मायबाप मीसर देशला नींगी जात
13 मंग ते बुधीवान लोकं नींगी जावानी नंतर देवना दुत योसेफला सपनमं ईसनं सांगना, योसेफ उठ, पोर्‍या आनं तेनी मायला लीसनं मीसर देशमं नींगी जा. आनं मी तुला सांगय ताव त‍ईज रह. कजं का हेरोद राजा पोर्‍याला जीवता मारानी करता दखी रहना सय. 14 मंग योसेफ उठना आनं पोर्‍या आनं तेनी माय मरीयाला लीसनं तीज रातला मीसर देशमं नींगी गया. 15 आनं हेरोद राजा मरना ताव ते त‍ईज रहनत. मंग बरज वरीसनी आगुदार परभु तेना वचन सांगनारघाई जी भवीस्यवानी सांगेल व्हताल, ती पुरा व्हयनी. ती भवीस्यवानी आशी सय का,
"मी मना पोर्‍याला मीसर देश मयथीन बलावना सय."
हेरोद राजा बेथलेहेमनं धाकलं पोरेसला मारी टाकय
16 मंग हेरोद राजाला मायती पडना का, ते बुधीवान लोकं तेला फसाडनत. तवं तेला पक्‍का राग वना. आनं तो पोर्‍याला मारानी करता मानसं धाडीसनं बेथलेहेम शेहेरनी चारीमेरनं दोन वरीस पेक्षा आखं धाकलं जे पोरे व्हतलत, तेसला मारी टाकना. कजं का ते बुधीवान लोकंस प‍ईन येसुना जल्मना जो काळ तो नीट वीचारेल व्हताल, तो काळ प्रमानं येसु जल्म लीसनं दोन वरीस व्हई जायेल व्हताल. 17 मंग बरज वरीसनी आगुदार देवना वचन सांगनार यीर्मया जी भवीस्यवानी सांगेल व्हताल, ती भवीस्यवानी तवं पुरी व्हयनी. 18 ती भवीस्यवानी आशी सय का,
"रामा शेहेरमं पक्‍का दुखमं आनं जोरमं रडाना आवाज आयकामं वना. आनं राहेलनी पीढीन्या बाया तीसनं पोरेसनी करता रडी रहन्या सत. लोकं तीसला दीलासा देवानी कोशीत करी रहनं सत, पन तीसनं पोरे मरी गयत मनीसनं त्या ऊग्या बी रहु शकत ना."
येसु आनं तेना मायबाप मीसर देश मयथीन परत येत
19 मंग जवं हेरोद राजा मरी गया, तवं देवना येक दुत मीसर देशमं योसेफला सपनमं ईसनं सांगना, 20 योसेफ उठ, पोर्‍याला आनं तेनी मायला लीसनं ईस्रायेल देशमं परत जा. कजं का पोर्‍याला जीवता मारानी करता जे लोकं कोशीत करी रहनंलत ते मरी गयत. 21 तवं योसेफ उठना आनं पोर्‍या आनं तेनी मायला लीसनं ईस्रायेल देशमं परत वना. 22 पन जवं योसेफला मायती पडना का, हेरोदनी जागामं तेना पोर्‍या आर्खेलाव यहुदीयाना राजा बनेल सय, तवं तो त‍ई जावाला भीवाय गया. पन आखु देव तेला सपनमं सांगना का, तुमं गालील जील्लामं नींगी जावाला पायजे. तेमन ते तई नींगी गयत. 23 आनं तई जाईसनं ते नासरेथ नावना येक गावमं रव्हाला लागनत. मंग देवना वचन सांगनारं जा सांगेल व्हतलत, ता वचन पुरा व्हयना. तो वचन आशा सय का,
"तेला नासरेथना रहनार सांगामं येई."