MATTHEW
मत्ती
1
1 अब्राहामची पिढी दाविदाचा मुलगा येशुख्रिस्ताचा वंशावळीचा पुस्तक 2 अब्राहामपासून इसाक जन्माला आला इसकापासून याकोब, आणि याकोबापासून यहुदा आणि याहुदाचे भाऊ जन्माला आले 3 यहुदा आणि तामारेपासून पेरेस व जेरेह जन्माला आलेपेरेसापासून हेस्रोम झाला आणि हेस्रोनापा सून अराम 4 आणि अरामापुसून अम्मिनादाब जन्माला आला अम्मिनादाबापुसून नहशोन आणि नहशोनापासून सल्मोनजन्माला झाला 5 सल्मोनाला राहाबेपासून बोवाज जन्माला आला बोवाजाला रुथपासून ओबेद जन्माला आला ओबेदाला ईशाय, 6 आणि ईशायला दावीद राजा जन्माला आला जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासुन दाविदाला शलमोन जन्माला झाला 7 शलमोनाला रह्बाम जन्माला आला रहबामाला अबीया; अबीयला आसा, 8 आसाला यहोशाफात जन्माला आला यहोशाफातला योराम आणि योरामाला उज्जिया जन्माला आला 9 उज्जियापासुन योथाम जन्माला आला आणि योथामापासून आहाज आणि आहाजाला हिज्कीया जन्माला आला 10 हिज्कीयाला मनश्शे जन्माला आला आणि मनश्शेला आमोन आणि आमोनाला योशीया; 11 आणि बाबेलला वस्ती केली योशीयाला यखन्या व त्याचे भाऊ जन्माला आले 12 बाबेलला वस्ती केल्यानंतर यखन्याला शल्तिएल जन्माला आला आणि शल्तिएलापासुन जरुब्बाबेल आणि 13 जरुब्बाबेलापासून अबीहुद जन्माला आलाअब्बीहुदापासुन एल्याकीम; एल्याकीमला अज्जुर, 14 अज्जुराला सादोक जन्माला आलाआणि सदोकापासुन याखीम, याखीमाला एलीहुद; 15 एलीहुदाला एलाजार जन्माला आला एलाजाराला मत्तान; मात्तानाला याकोब, 16 आणि याकोबापासुन योसेफ जन्माला आला जो मरीयेचा नवरा होताआणि मरीयेपासुन येशु जन्माला आला ज्याला ख्रिस्त म्हटले जाते 17 याप्रमाणे अब्राहामापासुन दावीदापर्यंत चौदा पिढया झाल्या व दाविदापासुन बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढया; आणि बाबेलास देशांतर झाल्यापासुन ख्रिस्तापर्यंत चौदा पिढया 18 आता ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला की जेव्हा त्याची आई मरीयाची मांगणी योसेफबरोबर झाली तेव्हा त्यांच्या सम्बधाच्या अगोदर ती पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती झालेली दिसुन आली 19 तिचा नवरा योसेफ हा धार्मिक असल्याकारणाने तिला भ्रष्ट करायचं नाही ही इच्छा घेऊन गुपचुप तिला सोडून देण्याचा विचार केला 20 पण जेव्हा तो हे सगळे विचार करत होता तेव्हा प्रभूचा एक स्वर्गदुत त्याला स्वप्नात असे सांगताना दिसला की; “हे यसोफा, दाविदाच्या मुला, तू मरियेला आपली बायको बनविण्यास भिऊ नकोस, कारण जो तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र अत्म्याकडून आहे 21 ती मुलगा जन्म देणार आणि तु त्याचे नाव येशु ठेव,कारण तोच आपल्या लोकांच्या त्यांच्या पापांपासून सोडविणार !” 22 आता हे ह्यासाठी झाले की,प्रभुने जे वचन भविष्यवक्त्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे- 23 “पाहा एक तरुणी गर्भवती राहणार आणि ती एका मुलाला जन्म देणार आणि त्याचे नाव ईम्मानुएल असे ठेवण्यात येईल’’ ज्याचा अर्थ आहे, “परमेश्वर आम्हांबरोबर आहे!” 24 तेव्हा योसेफ झोपेतुन उठला आणि परमेश्वराच्या स्वर्गदूताने अज्ञापिल्याप्रमाणे केलेत्याने आपल्या बायकोचा स्विकार केला 25 तरी तिला मुलगा होईपर्यंत त्याने तिला जाणले नाहीत्याने त्याचे नाव येशु असे ठेविले