मतयनी लीखेल सुवार्ता
1
येसुना वाडावडील
(लुक ३:२३-३८)
1 येसु ख्रीस्‍त दावीद राजानी पीढीमं जल्म लीयेल व्हताल आनं तो दावीद राजा आब्राहामनी पीढीमं जल्म लीयेल व्हताल. आठी तो येसु ख्रीस्तना वाडावडीलंसना नाव लीखामं ईयेल सय.
2 आब्राहाम ईसहाकना बाप व्हताल आनं ईसहाक याकोबना बाप व्हताल. याकोब यहुदाना आनं तेनं भाऊसंसना बाप व्हताल. 3 आनं यहुदा पेरेसना आनं जेरहना बाप व्हताल आनं तमार तेसनी माय व्हतील. पेरेस हेसरोनना बाप व्हताल. हेसरोन आरामना बाप व्हताल. 4 आनं आराम आ‍मीनादाबना बाप व्हताल. आमीनादाब नहशोनना बाप व्हताल. नहशोन सलमोनना बाप व्हताल. 5 आनं सलमोन बवाजना बाप व्हताल आनं राहाब तेनी माय व्हतील. बवाज ओबेदना बाप व्हताल आनं रुथ तेनी माय व्हतील. ओबेद ईशायना बाप व्हताल. 6 आनं ईशाय दावीद राजाना बाप व्हताल.
मंग जी पयलं उरीयानी बायको व्हतील, तीनी संगं दावीद राजा लगीन करना. आनं दावीद शलमोनना बाप व्हयना. 7 आनं शलमोन रहबामना बाप व्हताल. रहबाम आबीयाना बाप व्हताल. आबीया आसाना बाप व्हताल. 8 आनं आसा यहोशाफाटना बाप व्हताल. आनं यहोशाफाट योरामना बाप व्हताल. आनं योराम ऊ‍जीयाना बाप व्हताल. 9 आनं ऊ‍जीया योथामना बाप व्हताल. आनं योथाम आहाजना बाप व्हताल. आहाज हीज्कीयाना बाप व्हताल. 10 आनं हीज्कीया मन‍शेना बाप व्हताल. मन‍शे आमोनना बाप व्हताल. आमोन योशीयाना बाप व्हताल. 11 आनं जवं बाबील देशना राजा ईस्रायेल लोकंसला लढाईमं हाराईसनं तेसला बाबील देशमं ली गया, तवं योशीया यखनयाना आनं तेनं भाऊसंसना बाप व्हयना.
12 मंग बाबील देशमं जावानी नंतर यखनया शलतीयेलना बाप व्हयना. शलतीयेल जरु‍बाबेलना बाप व्हताल. 13 आनं जरु‍बाबेल आबीहुदना बाप व्हताल. आनं आबीहुद येलयाकीमना बाप व्हताल. येलयाकीम आजुरना बाप व्हताल. 14 आनं आजुर सादोकना बाप व्हताल. सादोक याखीमना बाप व्हताल. याखीम येलीहुदना बाप व्हताल. 15 आनं येलीहुद येलाजारना बाप व्हताल. येलाजार मतानना बाप व्हताल. मतान याकोबना बाप व्हताल. 16 आनं याकोब योसेफना बाप व्हताल. आनं तो योसेफ मरीया बाईना नवरा व्हताल. ती मरीया बाईनी द्वारा येसु जल्म लीना. आनं तोज येसुला लोकं ख्रीस्त मंजे देवना धाडेल राजा सांगत.
17 तशाज आब्राहाम प‍ईन दावीद राजा परन आखं मीळीसनं चवदा पीढ्या व्हतल्यात. आनं दावीद राजा प‍ईन जवं ईस्रायेल लोकंसला बाबील देशमं लेवामं वना, तवं परन आजुन चवदा पीढ्या व्हतल्यात. आनं जवं ईस्रायेल लोकं बाबील देशमं गयत तवं पईन येसु ख्रीस्‍त परन आजुन चवदा पीढ्या व्हतल्यात.
येसु ख्रीस्‍तना जल्म
(लुक २:१-७)
18 मंग येसु ख्रीस्‍तना जल्म आशा व्हयना का, तेनी माय मरीयानी मांगनी योसेफनी संगं व्हयेल व्हतील. आनं ते दोनी जनंसना लगीननी आगुदार आशा मायती पडना का, मरीया बाई पवीत्र आत्माना चमत्कार रीतथीन दोनदीवसी व्हयनी सय. 19 मंग तीना नवरा योसेफ येक नीतीवान मानुस व्हताल आनं तेला मायती ना व्हताल का, हाई देवघाई व्हयेल सय. आनं मरीयानी आपमान करानी तेनी ईशा ना व्हतील. तेमन तो मरीयाला गच्‍चुप सोडी देवाला नक्‍की करना. 20 मंग जवं तो येनी बद्दल वीचार करी रहनाल, तवं देवना येक दुत तेला सपनमं ईसनं सांगना, हे दावीदना पोर्‍या योसेफ, तु तुनी बायको मरीयानी संगं लगीन कराला घाबरु नोको. कजं का तीना पोटमं जो पोर्‍या सय तो पवीत्र आत्मा प‍ईन सय. 21 मरीया येक पोर्‍याला जल्म देई, आनं तु तेना नाव येसु ठेव. कजं का तोज तेनं लोकंसला तेसना पाप प‍ईन वाचाडी.
22 मंग परभु तेना वचन सांगनारघाई जो भवीस्यवानी सांगेल व्हताल, तो पुरा व्‍हवानी करता हाई आखा व्हयना. 23 ती भवीस्यवानी आशी सय का,
"दखा, येक कुवारी बाई दोनदीवसी व्हईसनं येक पोर्‍याला जल्म देई. आनं तो पोर्‍याला ईमानुयेल सांगामं येई."
हाई नावना आर्थ 'आपली संगं देव', आशा सय.
24 तवं योसेफ नीज म‍ईन उठना आनं परभुना दुत तेला जशा सांगनाल, तशाज तो करना आनं मरीयानी संगं लगीन करना. 25 आनं जो परन मरीया पोर्‍याला जल्म दीनी ना, तो परन योसेफ तीनी संगं नीजना ना. मंग जवं पोर्‍याना जल्म व्हयना, तवं योसेफ तेना नाव येसु ठेवना.